Maharashtra Politics: नागपुरमध्ये भाजपचा मास्टरस्ट्रोक, काँग्रेसला जोरदार धक्का; डझनभर नेत्यांनी हाती घेतलं 'कमळ'

Nagpur Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नागपुरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पक्षांची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे नागपुरमध्ये भाजपची ताकद वाढली.
Maharashtra Politics: नागपुरमध्ये भाजपचा मास्टरस्ट्रोक, काँग्रेसला जोरदार धक्का; डझनभर नेत्यांनी हाती घेतलं 'कमळ'
CM Devendra Fadnavis Saam Tv
Published On

Summary -

  • नागपूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीदरम्यान काँग्रेसला मोठा धक्का

  • काँग्रेसचे जवळपास डझनभर पदाधिकारी आणि नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला

  • भाजपच्या ऑपरेशन लोटसला नागपुरमध्ये यश आले

  • काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजीमुळे नेते आणि पदाधिकारी नाराज

पराग ढोबळे, नागपूर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक काळात राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरूच आहे. या निवडणुकीत भाजपच्या ऑपरेशने लोटसला मोठं यश आले आहे. नागपुरमध्ये भाजपचा मास्टरस्ट्रोक पाहायला मिळाला. भाजपने काँग्रेसला मोठं खिंडार पाडलं आहे. काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या सामूहिक राजीनाम्यानंतर नागपुरमध्ये काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. डझनभर नेत्यांनी पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला.

नागपूर जिल्ह्यात काँग्रेसला हादरे सुरुच आहे. बुधवारी शेकडो पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत सामूहिक राजीनामे दिले होते. त्यानंतर आता डझनभर नेत्यांनी पक्षाची साथ सोडली. आज सकाळी काँग्रेसचे नरखेड तालुका अध्यक्ष सुदर्शनजी नवघरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काटोलचे भाजप आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या उपस्थितीत सुदर्शन नवघरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लागल्यानंतर नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत डझनभर स्थानिक नेत्यांनी पक्ष सोडला आहे.

Maharashtra Politics: नागपुरमध्ये भाजपचा मास्टरस्ट्रोक, काँग्रेसला जोरदार धक्का; डझनभर नेत्यांनी हाती घेतलं 'कमळ'
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ; पुण्यात शरद पवार गटाच्या उमेदवाराला बेदम मारहाण

नागपूरमध्ये राजा तिडके, चंद्रपाल चौकसे, शहजाहा अंसारी यासह वाडी शहरातील ४० पदाधिकाऱ्यांनी पक्षाची साथ सोडली. पक्षांतर्गत गटबाजीमुळे अनेक नेते काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत आहेत. सुदर्शनजी नवघरे यांच्या प्रवेशानं नगरपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा फायदा होणार आहे. अनेक पदाधिकारी आणि नेत्यांच्या पक्ष प्रवेशामुळे नागपूरमध्ये भाजपची ताकद वाढली.

Maharashtra Politics: नागपुरमध्ये भाजपचा मास्टरस्ट्रोक, काँग्रेसला जोरदार धक्का; डझनभर नेत्यांनी हाती घेतलं 'कमळ'
Maharashtra Politics: निवडणुकांच्या आधी राज्यात नवी घडामोड! ठाकरेंप्रमाणे राजकारणात आणखी दोन बंधू येणार एकत्र

दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून २२१ पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. नगरपंचायत, नगरपालिकेत मनमानी झाल्याचा आरोप करत या सर्वांनी राजीनामे दिले. वाडी पालिका क्षेत्रातील काँग्रेस कार्यकारिणी सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. त्यामुळे हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. या सर्वांनी अद्याप कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही. त्यामुळे ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे पाहणं महत्वाचे राहिल.

Maharashtra Politics: नागपुरमध्ये भाजपचा मास्टरस्ट्रोक, काँग्रेसला जोरदार धक्का; डझनभर नेत्यांनी हाती घेतलं 'कमळ'
Maharashtra Politics: जे पेरलं त्याची फळं मिळत आहेत, ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंवर घणाघात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com