Maharashtra Politics: तातडीने मुंबईला या..., एकनाथ शिंदेंचा तानाजी सावंत यांना निरोप; तब्बल २ तास चर्चा, मंत्रिपद मिळणार का?

Eknath Shinde And Tanaji Sawant: राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. आमदार तानाजी सावंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुंबईत तब्बल २ तास त्यांच्यामध्ये बैठक झाली.
Maharashtra Politics: तातडीने मुंबईला या..., एकनाथ शिंदेंचा तानाजी सावंत यांना निरोप; तब्बल २ तास चर्चा, मंत्रिपद मिळणार का?
Maharashtra PoliticsSaam Tv
Published On

Summary-

  • तानाजी सावंत आणि एकनाथ शिंदे यांच्यात मुंबईत दोन तास बैठक.

  • मंत्रीपद मिळणार का? या चर्चेला उधाण.

  • शिवाजी सावंत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने शिंदे गटाला मोठा धक्का.

  • धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात नवे समीकरणं तयार होण्याची चिन्हं.

माजी मंत्री आणि परंडा विधानसभेचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून तातडीने मुंबईला बोलावून घेतलं. उपमुख्यमंत्र्यांच्या निरोपानंतर तानाजी सावंत यांनी मुंबईला धाव घेत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल दोन तास महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. या भेटीनंतर धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळणार का? अशा प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

माजी आमदार राहुल मोटे यांच्या राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्ष प्रवेश झाल्यानंतर तानाजी सावंत सक्रीय झाले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याडून त्यांना तातडीने मुंबईला येण्याचा निरोप आला होता. त्यानंतर शनिवारी मुंबई तब्बल दोन तास राजकीय आणि विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती तानाजी सावंत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर पोस्ट करत भेटीबाबतची माहिती दिली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या त्यांच्या भेटीची आता चांगलीच चर्चा होऊ लागली आहे.

Maharashtra Politics: तातडीने मुंबईला या..., एकनाथ शिंदेंचा तानाजी सावंत यांना निरोप; तब्बल २ तास चर्चा, मंत्रिपद मिळणार का?
Maharashtra Politics: निवडणुकीआधीच महायुतीत वादाची ठिणगी, ठाणे महापालिका भाजप जिंकणार?

मंत्रिपद न दिल्याने तानाजी सावंत नाराज आहेत. अशामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या दीर्घ चर्चेमुळे सावंत यांच्या राजकीय पुनरागमनाचे संकेत? असल्याचे देखील म्हटले जात आहे. एकीकडे मंत्रिपद न मिळाल्यामुळे तानाजी सावंत हे नाराज आहेत. तर दुसरीकडे त्यांचे बंधू आणि सोलापूर जिल्ह्याचे शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख असलेल्या शिवाजी सावंत यांनी पक्षाला रामराम ठोकला. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Maharashtra Politics: तातडीने मुंबईला या..., एकनाथ शिंदेंचा तानाजी सावंत यांना निरोप; तब्बल २ तास चर्चा, मंत्रिपद मिळणार का?
Maharashtra politics : भाजपची मनसेशी जवळीक, शिंदेंचा शिलेदार पवारांच्या भेटीला, राज्यात नेमकं काय घडतेय?

शिवाजी सावंत यांनी एकनाथ शिंदे यांची साथ सोडल्यामुळे धाराशिवमध्ये शिंदे गटाला मोठा हादरा मानला जात आहे. हा एकनाथ शिंदेंसाठी देखील मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. शिवाजी सावंत यांच्या राजीनाम्यानंतर तानाजी सावंत यांना एकनाथ शिंदे यांनी बोलावून घेतलं त्यामुळे आता धाराशिवमध्ये काय राजकीय समिकरणं बदलतात हे पाहणं महत्वाचे राहिल. या भेटीमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

Maharashtra Politics: तातडीने मुंबईला या..., एकनाथ शिंदेंचा तानाजी सावंत यांना निरोप; तब्बल २ तास चर्चा, मंत्रिपद मिळणार का?
Maharashtra Politics: प्रभागरचनेत कुणाचा फायदा, कुणाचा तोटा?, भाजप-शिंदेंकडून दादांची कोंडी?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com