Maharashtra Politics: प्रभागरचनेत कुणाचा फायदा, कुणाचा तोटा?, भाजप-शिंदेंकडून दादांची कोंडी?

BJP And Shinde Sena’s Advantage: प्रभागरचनेवरुन महायुतीत शीतयुद्ध रंगण्याची शक्यता आहे.. कारण प्रभागरचनेवरुन अजित पवारांच्या राष्ट्रवादीचीच कोंडी करण्यात आलीय.. मात्र ती नेमकी कशी
New ward delimitation plan in Pune likely to benefit BJP-Shinde camp, cornering Ajit Pawar’s NCP
New ward delimitation plan in Pune likely to benefit BJP-Shinde camp, cornering Ajit Pawar’s NCPSaam Tv
Published On

महापालिका निवडणुकांसाठी प्रभागरचना जाहीर करण्यात आली आणि त्यावरुनच महायुतीत महाभारत रंगण्याची शक्यता आहे... 165 नगरसेवकांच्या पुणे महापालिकेत 41 प्रभाग असणार आहेत.. त्यातील 40 प्रभाग 4 सदस्यीय तर 1 प्रभाग 5 सदस्यीय असणार आहेत. त्याचा भाजप आणि शिंदे गटाला फायदा होणार आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र फटका बसण्याची शक्यता आहे.. त्यावरुनच महायुतीत वादाची ठिणगी पडलीय..

नव्या प्रभाग रचनेचा भाजप आणि शिंदेसेनेला कसा फायदा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कसा फटका बसणार आहे?भाजपचं वर्चस्व असलेल्या मध्यवर्ती भागातील प्रभागांमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. तर विजय शिवतारेंच्या पुरंदरमधील गावं जोडलेल्या प्रभाग 38 मध्ये 5 नगरसेवक असणार आहेत.. त्याचा फायदा शिंदेंना होण्याची शक्यता आहे.. दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरेंचा प्रभाव असलेला टिंगरेनगरमधील बार्माशेल झोपडपट्टी विमाननगरला जोडण्यात आलीय... तर वाघोली आणि लोहगावचे 2 तुकडे करुन विमाननगरला जोडण्यात आलेत...वारजे-पॉप्युलरनगर भागातील झोपडपट्ट्या प्रभाग 32 मधून वगळून इतर प्रभागांना जोडलाय.. त्याचाही फटका अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता आहे..

फक्त पुण्यातच नाही तर राज्यभरातील प्रमुख महापालिकांचीही प्रभाग पुनर्रचना करण्यात आलीय.. पाहूयात.. कोणत्या महापालिकेत किती प्रभाग आणि किती नगरसेवकांची संख्या असणार आहे....

HDER महापालिकांची प्रभागरचना

प्रभाग नगरसेवक

मुंबई 227 227

कल्याण- डोंबिवली 31 122

नवी मुंबई 28 111

पिंपरी-चिंचवड 32 128

नाशिक 31 122

राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना जाहीर केली असली तरी 4 सप्टेंबरपर्यंत त्यावर हरकती घेता येणार आहेत.. त्यानंतर हरकतींवर सुनावणी घेऊन अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे.. मात्र हरकतीनंतर पुन्हा प्रभाग रचनेत बदल केला जाणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com