Maharashtra Politics: सोलापूरमध्ये मोठा राजकीय भूकंप, अनगर नगरपंचायत निवडणूक स्थगित

Angar Nagar Panchayat: सोलापूर जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. सोलापुरात मोठी राजकीय घडामोड घडली असून सर्व राजकीय पक्षांना धक्का बसला. जिल्हाधिकाऱ्यांकडून अनगर नगरपंचायत निवडणूक स्थगित करण्यात आली.
Maharashtra Politics: सोलापूरमध्ये मोठा राजकीय भूकंप, अनगर नगरपंचायत निवडणूक स्थगित
Maharashtra PoliticsSaam Tv
Published On

Summary -

  • सोलापुरमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला

  • सोलापूर जिल्ह्यातील २ नगराध्यक्ष आणि ६ नगरसेवक पदांच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली

  • अनगर नगरपंचायत निवडणूक चर्चेत होती

  • अनगर नगरपंचायतीची निवडणूक स्थगित करण्यात आली

सोलापूर जिल्ह्यातील २ नगराध्यक्षपद आणि ६ नगरसेवक पदाच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. यामध्ये बहुचर्चित अनगर नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला देखील स्थगिती देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याबाबत आदेश काढले आहेत. यामध्ये मैंदर्गी, सांगोला, मंगळवेढा, मोहोळ, बार्शी, पंढरपूर या नगरपरिषदेतील नगरसेवक पदाच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे.

सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अनगर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. सोलापुरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात परिपत्रक काढून एक आदेश काढलेला आहे. त्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यामधील दोन नगराध्यक्षपद आणि सहा वेगवेगळ्या ठिकाणच्या नगरपालिकेतील नगरसेवक पदाच्या निवडणुकांना आता स्थगिती आलेल्या आहेत. या निर्णयामुळे अनगरसह मंगळवेढा, मोहोळ, बार्शी आणि पंढरपूर येथील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रशासकीय कारणास्तव या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

Maharashtra Politics: सोलापूरमध्ये मोठा राजकीय भूकंप, अनगर नगरपंचायत निवडणूक स्थगित
Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत भाजपला मोठा हादरा; १०-१० वर्षे नगरसेवक असलेल्या नेत्यांनी बेधडक पक्ष सोडला

सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अनगर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. सोलापुरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात परिपत्रक काढून एक आदेश काढलेला आहे. त्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यामधील दोन नगराध्यक्षपद आणि सहा वेगवेगळ्या ठिकाणच्या नगरपालिकेतील नगरसेवक पदाच्या निवडणुकांना आता स्थगिती आलेल्या आहेत. या निर्णयामुळे अनगरसह मंगळवेढा, मोहोळ, बार्शी आणि पंढरपूर येथील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रशासकीय कारणास्तव या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

Maharashtra Politics: सोलापूरमध्ये मोठा राजकीय भूकंप, अनगर नगरपंचायत निवडणूक स्थगित
Maharashtra Politics: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेनं पुण्यात अशांतता; शरद पवार गटातील नेत्यांची नाराजी

सांगोल्यात आजी- माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सोलापूर जिल्ह्यातील सांगोला नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेची माजी आमदार शहाजी पाटील आणि शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाबासाहेब देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. येथील निवडणुकीत प्रथमच भाजप आणि शेतकरी कामगार पक्ष एकत्रित आले आहेत. तर शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील हे एकाऐकी लढत देत आहेत.

Maharashtra Politics: सोलापूरमध्ये मोठा राजकीय भूकंप, अनगर नगरपंचायत निवडणूक स्थगित
Maharashtra Politics : 'राजकारण नाही, मलाच संपवण्याचा डाव';धनंजय मुंडेंचे विरोधकांवर टीकास्त्र, VIDEO

भाजपने ज्येष्ठ नेते मारुती बनकर आणि शिवसेनेचे आनंदा माने यांच्यात लढत होणार आहे. भाजप आणि शिवसेनेने मोठी ताकद लावली आहे. शिवसेनेचे उमेदवार आनंदा माने यांच्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर भाजपचे उमेदवार मारुती बनकर यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेऊन निवडून देण्याचे आवाहन केले आहे. सध्यातरी शिवेसनेचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे. तरीही येत्या 3 तारखेला होणाऱ्या मतमोजणीमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Politics: सोलापूरमध्ये मोठा राजकीय भूकंप, अनगर नगरपंचायत निवडणूक स्थगित
Maharashtra Politics: 'महायुती'तला बेबनाव दिल्लीपर्यंत; भाजप बाटलेली, अजितदादांच्या मंत्र्याचा हल्लाबोल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com