कार्यकर्ते गेले उडत, सत्ता हवी घरात, मंत्र्यांच्या घरातच उमेदवारीची खैरात

Political Hypocrisy In Maharashtra: घराणेशाहीविरोधात नारा देणाऱ्या सत्ताधारी पक्षांची दुटप्पी भूमिका समोर आली आहे. मंत्री आणि आमदारांनी पत्नीला उमेदवारी देत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलंय. कार्यकर्त्यांची निवडणूक असूनही नेत्यांनी आपल्या कुटुंबातच उमेदवारी दिली आहे.
Ministers and MLAs face backlash after nominating wives and family members for Maharashtra municipal polls.
Ministers and MLAs face backlash after nominating wives and family members for Maharashtra municipal polls.Saam Tv
Published On

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजले आहेत.. त्यातच राज्यात 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीसाठी निवडणूक होणार आहे... मात्र या निवडणुकीत कार्यकर्ते गेले उडत, सत्ता हवी आमच्या घरात, असंच चित्र राज्यात दिसून आलंय...कारण मंत्री, माजी मंत्री, आमदार, खासदारांनी कार्यकर्त्यांना डावलून आपल्या पत्नीला उमेदवारी दिलीय.

जामनेरमधून गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी

भुसावळमधून मंत्री संजय सावकारेंच्या पत्नी रजनी सावकारेंना उमेदवारी

पुसदमधून राज्यमंत्री इंद्रनील नाईकांच्या पत्नी मोहिनी नाईक नगराध्यक्षपदासाठी रिंगणात

चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण यांना उमेदवारी

पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनिता पाटील नगराध्यक्षपदासाठी रिंगणात

बुलढाण्यात आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड मैदानात

संगमनेरमध्ये आमदार सत्यजित तांबेंच्या पत्नी मैथिली तांबेही नगराध्यक्षपदासाठी मैदानात आहेत

एवढंच नाही तर घरात मंत्रिपद असतानाही अशोक उईके, आकाश फुंडकर, जयकुमार रावल यांच्यासह 33 नेत्यांनाही नगरपरिषद आणि नगरपालिकेची हाव सुटली नाही... या नेत्यांनी आई, मुलगी, भाऊ, पत्नी, बहीण यांना उमेदवारी दिलीय.. एका बाजूला आमदार आणि मंत्र्यांनी घरातच उमेदवारी दिली असताना दुसरीकडे मात्र फक्त बदलापूर नगरपालिका निवडणुकीत 12 जोडपी मैदानात उतरले आहेत... त्यापैकी 11 जोडप्यांना शिंदेसेना आणि भाजपने उमेदवारी दिलीय.. हे कमी होतं की काय? शिंदेसेनेने तर एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी दिलीय... त्याचं शिंदेसेनेनं समर्थनच केलंय.

खरंतर देशातील सत्तेची केंद्र असलेल्या 149 कुटुंबांपैकी महाराष्ट्रात 23 कुटुंबात आमदारकी आणि खासदारकी ही दोन्हीही पदं आहेत... हे कमी होतं की काय आता नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत त्यात आणखी 33 परिवारांची भर पडलीय.. त्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्ये अस्वस्थ झालेत...

कार्यकर्ता घरादारावर तुळशीपत्र ठेऊन नेत्यांना आमदारकी, खासदारकी मिळावी म्हणून धावपळ करतो... मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पदंही नेत्यांना आपल्याच घरात ठेवावी वाटत असतील तर कार्यकर्त्यांनी फक्त आयुष्यभर नेत्यांच्या सतरंज्याच उचलायच्या का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com