Ashok Chavan News: महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप? काँग्रेस नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

Ashok Chavan on Resignation Latest News: काँग्रेसचे दिग्गज नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
Ashok Chavan News: Congress leader Ashok Chavan likely to join BJP
Ashok Chavan News: Congress leader Ashok Chavan likely to join BJPSaam Tv
Published On

Ashok Chavan May Resign:

काँग्रेसचे दिग्गज नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा देखील राजीनामा दिल्याची चर्चा सुरु झाली आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत ११ आमदारदेखील भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अशोक चव्हाण यांना भाजपकडून मंत्रिपदाची ऑफर असल्याचं देखील कळतंय. अशोक चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवल जात आहे.

काँग्रेसचे अशोक चव्हाण धक्का देणार?

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेसचे राज्यातील मोठे नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याच्या चर्चा समोर येत आहेत. अशोक चव्हाण यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतल्यानंतर या बातम्या समोर आल्या आहेत.

अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची भेट घेऊन आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. अशोक चव्हाण अनेक दिवसांपासून पक्षात नाराज असल्याचं म्हटलं जात होतं. तसेच अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. मात्र आता विधानसभा अध्यक्षांच्या भेटीनंतर या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ashok Chavan News: Congress leader Ashok Chavan likely to join BJP
Mumbai Politics : मुंबई काँग्रेसला पुन्हा एकदा खिंडार, आणखी एक नेता भाजपमध्ये प्रवेश करणार

नार्वेकराच्या भेटीमुळे रंगल्या चर्चा...

साम टीव्हीने अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. सध्या सुरु असेलल्या चर्चांवर अशोक चव्हाण लवकरच खुलासा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या भूमिकेकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, लातूरमध्ये (Latur) अशोक चव्हाण यांच्या समर्थकांनी भाजप प्रवेशाचे स्टेटस ठेवल्याच्याही चर्चा समोर आल्या आहेत. अद्याप अशोक चव्हाण यांनी अशोक चव्हाण यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसून अशोक चव्हाण यांच्या प्रतिक्रियेकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. या चर्चा खऱ्या ठरल्यास हा महाराष्ट्र काँग्रेससाठी सर्वात मोठा धक्का असेल. (Latest Marathi News)

Ashok Chavan News: Congress leader Ashok Chavan likely to join BJP
Manoj Jarange Patil: आमच्यातील कोणीही त्यांना भेटायला जाणार नाही; अमित शहांच्या दौऱ्यावर जरांगेंनी स्पष्ट केली भूमिका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com