Maharashtra Politics: पंकजा मुंडे, देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर...भाषणात कोण काय बोलणार?

Maharashtra Politics: धनंजय मुंडे यांच्या परळीत शासन आपल्या दारी कार्यक्रम होत असतानाच या कार्यक्रमात चर्चा होतेय ती भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची. या कार्यक्रमाला पंकजा मुंडे हजर राहणार का ? यावरून चर्चा सुरू होती. मात्र भाजप नेत्या पंकजा मुंडे या शासन आपल्या दारी कार्यक्रमाला हजर राहणार आहेत.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam Digital

Maharashtra Politics

धनंजय मुंडे यांच्या परळीत शासन आपल्या दारी कार्यक्रम होत असतानाच या कार्यक्रमात चर्चा होतेय ती भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची. या कार्यक्रमाला पंकजा मुंडे हजर राहणार का ? यावरून चर्चा सुरू होती. मात्र भाजप नेत्या पंकजा मुंडे या शासन आपल्या दारी कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. विशेष म्हणजे नांदेडहून ज्या हेलिकॉप्टरने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे येणार आहेत त्याच हेलिकॉप्टरमध्ये पंकजा मुंडे या देखील येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर गोपीनाथ गडावर दाखल होणार असून शासन आपल्या दारीच्या व्यासपीठावर एकत्र येण्यापूर्वी मुंडे - फडणवीस हे एकाच हेलिकॉप्टरमधून एन्ट्री करणार आहेत. त्यामुळं आता या एकाच व्यासपीठावरून कोण काय बोलणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

परळी शहरात शासन आपल्या दारी कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडत आहे. या कार्यक्रमाला भाजप नेत्या पंकजा मुंडे उपस्थित राहणार की नाही याबाबत सर्वत्र चर्चेचा विषय बनला होता. दरम्यान संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे, त्यामुळे पंकजा मुंडे या दिल्लीत असल्यामुळे त्या कार्यक्रमाला हजर राहणार नसल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान उजणीच्या पाण्यासाठी अक्कलकोटसह दक्षिण सोलापूरमधील शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू असून पंकजा मुंडे या ठिकाणी भेट देणार असल्याची माहिती होती. त्यामुळे भगवान गडावरील शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला त्यांच्या उपस्थितीबाबत शंका होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Politics
Manoj jarange Patil: 'मराठा, मुस्लिम , धनगर एक व्हा, एकत्र लढू आणि आरक्षण मिळवू..." मनोज जरांगे पाटलांचे आवाहन

विशेष म्हणजे भाजपमध्ये पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील अंतर्गत वाद सर्वश्रुत आहे. मात्र भगवान गडावर होणाऱ्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार येत आहेत. सर्वात आधी दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे समाधीस्थळावर जाऊन अभिवादन करणार आहेत.

Maharashtra Politics
Manoj jarange Patil: 'मराठा, मुस्लिम , धनगर एक व्हा, एकत्र लढू आणि आरक्षण मिळवू..." मनोज जरांगे पाटलांचे आवाहन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com