Parth Pawar: कुणी चुकीचे काम करत असेल तर...; पार्थ पवारांवरील घोटाळ्याच्या आरोपावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Ajit Pawar On Parth Pawar: पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप आहे. याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या प्रकरणावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
Parth Pawar: कुणी चुकीचे काम करत असेल तर...; पार्थ पवारांवरील घोटाळ्याच्या आरोपावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Ajit Pawar Saam tv
Published On

Summary -

  • पार्थ पवार यांच्यावर १८०४ कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी केल्याचा आरोप

  • हा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले

  • या आरोपावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर आली.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पार्थ पवारांच्या अमीडिया कंपनीने १८०४ कोटींची जमीन फक्त ३०० कोटींना विकत घेतल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी हा आरोप केला आहे. या आरोपानंतर आता राजकारण चांगलेच तापले आहे. याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत जमीन खरेदी प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया देत 'मुख्यमंत्र्यांनी जरूर चौकशी करावी. आरोपांची शहानिशा करण्यात येईल. सत्यता पडताळण्याचे काम सरकार करत आहे.', असे स्पष्ट मत त्यांनी सांगितले.

अजित पवार यांनी जमीन घोटाळ्याच्या आरोपावर आज पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, 'जे काही सध्या सर्व चॅनेललला सुरू आहे त्याबद्दलची मला पूर्ण माहिती नाही. माझा त्या गोष्टीशी अजित पवार म्हणून काहीही संबंध नाही. मला ३५ वर्षे झाली जनता ओळखते. मी याप्रकरणाी संपूर्ण माहिती घ्यायचे ठरवले आहे. काहीही चुकीचे केलेले मला अजिबात चालणार नाही. जमिनीबद्दल बरंच काही सांगितले जात आहे त्याची सविस्तर माहिती मी घेत आहे. मी माझ्या जवळच्या आणि लांबच्या नातेवाईकांना कोणताही फायदा होण्यासाठी एकाही अधिकाऱ्याला फोन केला नाही किंवा त्यांना सांगितले नाही.'

Parth Pawar: कुणी चुकीचे काम करत असेल तर...; पार्थ पवारांवरील घोटाळ्याच्या आरोपावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Parth Pawar: पार्थ पवारांवर १८०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

अजित पवारांनी पुढे सांगितले की,'माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचे करत असेल किंवा नियमात न बसणारे काम करत असेल तर त्याला माझा पाठिंबा नसेल. मी नियमाच्या चौकटीत राहून काम करणारा कार्यकर्ता आहे. जर उद्या कुठल्याही बाबतीत कुणी तक्रार केली तर त्याची शहानिशा करून तडताळणी करणे सरकारचे काम आहे. मी दिवसभर कामात असल्यामुळे याची माहिती घेतली नाही. पण उद्या मी याची माहिती देईल. काय झाले, कसे झाले? याची कायदेशीर माहिती घेऊन मी वस्तूस्थिती सांगेन.'

Parth Pawar: कुणी चुकीचे काम करत असेल तर...; पार्थ पवारांवरील घोटाळ्याच्या आरोपावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Maharashtra Politics : अजित पवारांना मोठा दणका; 20 शिलेदारांसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

तसंच, 'स्टॅम्प ड्युटीची शहानिशा करू. मी आज राज्याचा अर्थमंत्री म्हणून काम करताना सगळ्या बाबतीत नियमाप्रमाणे गोष्टी झाल्या पाहिजे. कुणीही नियमाबाहेर जाऊन काम करता कामा नये. तो बंगला पार्थ अजित पवार याच्या नावाने आहे. त्यावर त्याच्या नावाचा पत्ता आहे. मी चुकीच्या कमाचे समर्थन करत नाही. जर चूक झाली तर कबुल करतो. अलिकडच्या काळात तुमच्या- आमच्या घरातील मुलं सज्ञात होतात तेव्हा ते त्यांचा त्यांचा व्यवसाय करतात. मी कुणाला कामासाठी काहीही सांगितले नाही. मी संविधानाला, घटनेला मानणारा, कायद्याने चालणारा आहे. कायद्याच्या चौकटीत राहून सगळ्यांना समजून सांगणारा कार्यकर्ता आहे.', असे अजित पवारांनी स्पष्ट केले.

Parth Pawar: कुणी चुकीचे काम करत असेल तर...; पार्थ पवारांवरील घोटाळ्याच्या आरोपावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Maharashtra Politics: कोकणात मोठी राजकीय घडामोड, भाजपकडून ठाकरेसेना अन् शिंदेसेनेला धक्का; बड्या नेत्यांनी हाती घेतलं 'कमळ'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com