
नाशिकमध्ये ठाकरे गटाला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यासह माजी मंत्री बबनराव घोलप यांनी ठाकरे गटाची साथ सोडल्यानंतर आता आणखी काही बड्या नेत्यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये ठाकरे गटाला सुरू असलेली गळती अजूनही सुरूच आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपमहानगर प्रमुखांच्या पत्नी आणि माजी नगरसेवकांसह अनेक नेत्यांनी ठाकरे गटाची साथ सोडली ते आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. शिवसेना ठाकरे गटाचे उपमहानगर प्रमुख बाळा दराडे यांच्या पत्नी ठाकरे गटातील माजी नगरसेवक किरण गामने, पुंजाराम गामने आणि सीमा निगळ यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला. हे सर्वजण आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज मुंबईत या सर्वांचा शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश होणार आहे. एकीकडे सुधाकर बडगुजर, माजी मंत्री बबन घोलप यांच्यासह ठाकरे गटातील अन्य काही माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करत असतानाच शिंदेच्या शिवसेनेने देखील ठाकरे गटाला सुरुंग लावला.
दरम्यान, सुधाकर बडगुजर यांच्यासह माजी मंत्री बबनराव घोलप यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाला रामराम ठोकला. ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सुधाकर बडगुजर, बबनराव घोलप, नयना घोलप, देवानंद बिरारी यांच्यासह ६ ते ७ माजी नगरसेवक भाजपचे कमळ हाती घेणार आहेत. तर दुसरीकडे मनसेला देखील नाशिकमध्ये मोठा धक्का बसला. मनसेचे नेते आणि माजी महापौर अशोक मुर्तडक आणि दिलीप दातीर हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
दुपारी १ वाजता मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात सर्व नेत्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. 'ठाकरेंच्या शिवसेनेत अनादर झाला, जिथं किंमत नाही तिथं राहून काय उपयोग. उद्धव ठाकरे आमचा फोन देखील घेत नाही.', अशी प्रतिक्रिया माजी मंत्री बबनराव घोलप यांनी ठाकरे गटाची साथ सोडल्यानंतर दिली. नाशिकमध्ये अनेक बड्या नेत्यांनी साथ सोडल्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाची ताकद कमी झाली. तर नाशिकमध्ये भाजप आणि शिंदे गटाची ताकद वाढली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.