Nashik News: ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत वाढ; पोलीस अधिकाऱ्यांनी धाडली थेट तडीपारीची नोटीस

Deportation Notice To Sudhakar Badgujar: नाशिकमध्ये ऐन निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. शिवसेना उबाठा गटाच्या जिल्हाप्रमुखांना तडीपारची नोटीस देण्यात आली आहे.
Nashik News: ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत वाढ; पोलीस अधिकाऱ्यांनी धाडली थेट तडीपारीची नोटीस
Nashik News: Saam tv
Published On

तबरेज शेख, साम टीव्ही नाशिक

नाशिकमध्ये (Nashik News) ऐन निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. शिवसेना उबाठा गटाच्या जिल्हाप्रमुखांना तडीपारची नोटीस देण्यात आली आहे. नाशिक निवडणुकीच्या तोंडावर सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस आल्यामुळे ठाकरे गटाची चिंता वाढली आहे.

परिमंडल दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत यांनी तडीपारीची नोटीस काढली आहे. ऐन लोकसभेच्या रणधुमाळीत (Deportation Notice To Sudhakar Badgujar) नाशिकमध्ये ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना तडीपारीची नोटीस आली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्यावर मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहीम याचा उजवा हात समजला जाणाऱ्या सलीम कुत्ताशी संबंध असल्याचा आरोप केला होता. समोर आलेला व्हिडीओ खोटा आहे. त्यात मोर्फिंग करून त्यांना दाखवण्यात आल्याचं सुधाकर बडगुजर म्हणाले होते.

Nashik News: ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत वाढ; पोलीस अधिकाऱ्यांनी धाडली थेट तडीपारीची नोटीस
Pune Lok Sabha 2024: प्रचाराचा शेवटचा टप्पा; आज पुण्यात सभांचा धडाखा; अजित पवार, सुप्रिया सुळे अन् देवेंद्र फडणवीस उमेदवारांच्या प्रचारार्थ मैदानात

काल शिंदेंच्या शिवसेनेच्या मेळाव्यात नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आपल्या भाषणात बडगुजर (Shiv Sena Thackeray Group Nashik ) यांचं नाव न घेता सलीम कुत्तावर मुख्यमंत्र्यांचं लक्ष असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही भाषणात भुसेंच्या वक्तव्याला दुजोरा दिला होता. त्यानंतर आज सकाळीच नाशिक पोलिसांनी सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस काढल्याने राजकीय विरोधातून ही कारवाई झाल्याची चर्चा आहे. निवडणुकीच्या तोंडावर सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस मिळाली आहे.

Nashik News: ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत वाढ; पोलीस अधिकाऱ्यांनी धाडली थेट तडीपारीची नोटीस
Shiv Sena MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण; ठाकरे गटाच्या याचिकेवरील सुनावणी लांबणीवर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com