Maharashtra Political News: शिंदेंचे 6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात?; शिंदे गटात महाभूकंप?

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: लोकसभा निकालानंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता आहे. मविआला मोठं यश मिळाल्यानंतर आता शिंदे गटात अस्वस्थता पसरल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
Maharashtra Political News: शिंदेंचे 6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात?; शिंदे गटात महाभूकंप?
Uddhav Thackeray AND Eknath ShindeSaam Digital

तन्मय टिल्लू, साम टीव्ही

लोकसभा निकालानंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता आहे. मविआला मोठं यश मिळाल्यानंतर आता शिंदे गटात अस्वस्थता पसरल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. शिंदे गटातले 6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्याला ठाकरे गटानंही दुजोरा दिलाय. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळवता आलं नाही. भाजप आणि शिंदे गटाला या निवडणुकीत मोठा धक्का बसलाय.. विद्यमान खासदारांच्या सहा जागाही शिंदे गटाला गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे आता शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरलीय. विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र राहिलं तर आपल्याला पाच वर्ष घरी बसावं लागेल अशी भीती या आमदारांच्या मनात निर्माण झालीये. त्यामुळेच शिंदेंच्या सहा आमदारांनी उद्धव ठाकरेंशी संपर्क साधल्याची माहिती सुत्रांनी दिलीये. ठाकरे गटानंही या वृत्ताला दुजोरा दिलाय. तर शिंदे गटानं हा दावा फेटाळून लावलाय.

लोकसभा निवडणुकीत जागावाटपात उशीर झाला. अऩेक खासदारांचे पत्ते कापण्यात आले होते. मात्र शिंदे गटाला विद्यमान खासदारांच्या जागाही राखता आलेल्या नाहीत. विद्यमान खासदारांपैकी 7 खासदारच निवडून आलेत. त्यामुळे आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. दरम्यान सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरे गट कोणत्या अटीवर शिंदेंच्या आमदारांना परत घेणार आहेत ते पाहूयात.

Maharashtra Political News: शिंदेंचे 6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात?; शिंदे गटात महाभूकंप?
Maharashtra Politics 2024 : महाविकास आघाडी विधानसभेत एकत्र लढणार का?; काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांनी स्पष्टच सांगितलं

घरवापसीसाठी ठाकरेंच्या अटी

जे आमदार शिंदे गटात गेले होते. मात्र तटस्थ राहिले

ज्यांनी ठाकरे गटावर टीका केली नाही

मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही आमदार संपर्कात

अशा तटस्थ आमदारांना ठाकरे गटाचे दरवाजे पुन्हा खुले होतील अशी माहिती सुत्रांनी दिलीये. एकीकडे भाजपने सर्व्हेच्या नावाखाली शिंदे गटावर मोठा दबाव टाकला होता. त्यामुळे भावना गवळींसह इतरांना मुख्यमंत्री शिंदेंनी तिकीट नाकारलं होतं..आता विधानसभेतही तसंच होण्याची भीती शिंदेंच्या आमदारांना सतावतेय. त्यात मविआला मिळणा-या यशामुळेही शिंदे गट अस्वस्थ आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यात पुन्हा मोठ्या राजकीय घडामोडी घडू शकतात.

Maharashtra Political News: शिंदेंचे 6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात?; शिंदे गटात महाभूकंप?
Maharashtra Election Result: '...तर भाजपच्या एक दोन जागा आल्या त्याही आल्या नसत्या'; सांगलीच्या जागेवरून विश्वजीत कदम स्पष्टच बोलले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com