Maharashtra Politics 2024 : घरातच मंत्रिपदासाठी खासदारकी?; बारामतीवर वर्चस्वासाठी नवी खेळी?

Maharashtra Politics 2024 Update : घरच्या मैदानातच अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्याने अजित पवारांनी त्यांना राज्यसभेवर बिनविरोध निवडून आणलंय. पण सुनेत्रा पवारांना राज्यसभा खासदार बनवण्यामागे अजित पवारांनी कोणता डाव खेळलाय?
Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024Saam Digital
Published On

भरत मोहळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

घरच्या मैदानातच अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्याने अजित पवारांनी त्यांना राज्यसभेवर बिनविरोध निवडून आणलंय. पण सुनेत्रा पवारांना राज्यसभा खासदार बनवण्यामागे अजित पवारांनी कोणता डाव खेळलाय? त्यावरचा हा खास रिपोर्ट.

बारामती लोकसभेतील पराभवानंतर सुनेत्रा पवारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं थेट राज्यसभेवर पाठवलं. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला येणारं मंत्रिपद आता सुनेत्रा पवारांना मिळणार अशा चर्चांना उधाण आलंय. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार ही बारामतीची लढत काका-पुतण्याने प्रतिष्ठेची केली होती. यामध्ये सुप्रिया सुळेंनी बाजी मारली. हा अजित पवारांना मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे अजितदादांनी पुन्हा एकदा बारामतीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी राज्यसभेची खेळी खेळल्याचं बोललं जातंय.

'दादां'ची बारामतीसाठी मोठी खेळी

पक्षावर पकड ठेवण्यासाठी केंद्रात सुनेत्रा पवार आणि राज्यात स्वतः अजित पवार ही रणनिती

पराभवानंतर बारामतीवर वर्चस्व ठेवण्यासाठी सुनेत्रा पवारांना खासदारकी

राष्ट्रवादीच्या वाट्याला येणारं मंत्रिपद सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून घरातच ठेवता येणार

मंत्रिपदाच्या माध्यमातून भरघोस निधी आणून बारामतीवर वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न

आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन दादांची रणनिती

सुप्रिया सुळे आणि शरद पवारांच्या खासदार निधीला उत्तर देण्याचा प्रयत्न

Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics: वहिनी राज्यसभेत, भुजबळ नाराज? सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर वर्णी

खुद्द बारामतीतच सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्याने अजित पवार खडबडून जागे झालेत. त्यातच शरद पवारांनी शहर आणि तालुक्यात दौरा सुरु करून रणशिंग फुंकलंय. तर युगेंद्र पवारांनीही काका अजित पवार यांना आव्हान देण्याची तयारी सुरु केलीय. त्यामुळेच सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर निराश झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी राज्यसभेवर बिनविरोध पाठवण्यात आलंय. त्यामुळे आता सुनेत्रा पवारांचा केंद्रिय मंत्रिमंडळात समावेश होणार का? आणि मंत्रिपद मिळालं तर त्याचा विधानसभेसाठी फायदा होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Maharashtra Politics 2024
Maharashtra Assembly Election: राज ठाकरे स्वबळावर लढणार? विधानसभेसाठी 250 जागांची तयारी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com