Maharashtra Politics: एकनाथ खडसेंना मोठा दिलासा; भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात जामीन मंजूर

Eknath Khadse News: भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांना जामीन मंजुर करण्यात आला आहे.
Eknath khadse
Eknath khadse Saam tv
Published On

सचिन गाड, प्रतिनिधी

Maharashtra Politics:

पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांना या प्रकरणी नियमित जामीन मंजुर करण्यात आला आहे.

मुंबई सत्र न्यायालयाने राष्ट्रवादीचे नेते (NCP) एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा दिला आहे. एकनाथ खडसे यांच्यविरोधात ईडीने (ED) दाखल केलेल्या भोसरी जमीन खरेदी घोटाळा (Bhosari Land Scam) प्रकरणात न्यायालयाने त्यांना जामीन मंजुर केला आहे.

यापुर्वी खडसे (Eknath Khadse) यांना न्यायालयाने अंतरीम जामीन मंजुर केला होता. आजच्या सुनावणीत त्यांना मोठा दिलासा मिळाला असून न्यायालयाने नियमित जामीन मंजुर केला आहे. एकनाथ खडसेंचे वकिल मोहन टेकावडे यांनी बाबतची अधिक माहिती दिली आहे.

Eknath khadse
Maharashtra Politics: 'पुढचे २० वर्ष एकनाथ शिंदेच राज्याचे मुख्यमंत्री...' शिंदे गटाच्या आमदाराचं मोठं भाकित

काय आहे भोसरी जमीन घोटाळा..

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या काळात महसुल मंत्री असताना एकनाथ खडसे यांनी भोसरी येथे ३.१ एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता.

३.१ कोटी रुपये किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ ३.७ कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा करत सामाजिक कार्यकर्ते हेमंत गावंडे यांनी पुण्यातील बंड गार्डन पोलिसांत खडसे यांच्यासह त्यांची पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. (Latest Marathi News)

Eknath khadse
Satara News : औषध विक्रेत्यांसाठी सातारा जिल्हाधिका-यांचा आदेश, दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनाकरक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com