Nana Patole: राज्यातील सरकार हे कॉमेडी शो सारखे...; नाना पटोले यांची व्यंगात्मक टीका

नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांचा व्यवसाय सुरू आहे. त्याला राज्य सरकार खतपाणी घालतं का?, असा सवालही नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.
Nana Patole
Nana PatoleSaam tv
Published On: 

Maharashtra Political News:

भाजप सरकार हे अत्याचारी सरकार आहे. सोयाबीनचे भाव कमी झालेत. राज्यातील सरकार झोपी गेले आहे आणि शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहे, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील सरकारवर आगपाखड केली आहे. (Latest Marathi News)

Nana Patole
Nana Patole News: 'सर्वसामान्यांना जगू न देणे ही भाजपची प्रवृत्ती...' कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे टीकास्त्र

कॉमेडी शो सारखे सरकार

या सरकारने दुष्काळ जाहीर केला पाहिजे, पण अजूनही दुष्काळ जाहीर केला नाही. राज्यातील सरकार हे कॉमेडी शो सारखे सरकार आहे. इथल्या जनतेचे सरकारला काही घेणं देणं नाही, अशी घनाघाती टीकाही नाना पटोले यांनी राज्यातील सरकारवर केली आहे.

अमरावतीमध्ये काँग्रेसच्या पदाधिकारी मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर पटोलींनी हल्लाबोल केला. तसेच सरकारच्या कामांवर प्रश्न उपस्थित केलेत.

राज्यत बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. उद्योगधंदे पळवले जात आहेत. महागाई वाढली आहे सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत. पेट्रोलच्या किमतीही वाढल्यात. याकडे सरकारचं लक्ष नाही. तर दुसरीकडे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांचा व्यवसाय सुरू आहे. त्याला राज्य सरकार खतपाणी घालतं का?, असा सवालही नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

Nana Patole
Pune Crime: ड्रग्स माफिया ललित पाटीलचा भाऊ भूषणला अटक; पुणे पोलिसांची उत्तर प्रदेशात कारवाई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com