Maharashtra Politics: विधानसभेसाठी किती जागा मिळाव्यात? रामदास आठवलेंनी थेट आकडाच सांगितला

Maharashtra Assembly Election 2024: आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आरपीआयला महायुतीकडून किती जागा मिळाव्यात यासंदर्भात रामदास आठवलेंनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी किती जागा पाहिजे याचा आकडाच सांगितला.
Maharashtra Politics: विधानसभेसाठी किती जागा मिळाव्यात? रामदास आठवलेंनी थेट आकडाच सांगितला
Ramdas AthavaleSaam tv
Published On

ओंकार कदम, सातारा

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. कोणत्या पक्षाला किती जागा द्यायच्या, कोणाला किती जागांची अपेक्षा आहे याबाबत एकएक अपडेट्स समोर येत आहेत. अशातच महायुतीमध्ये असलेल्या आरपीआय पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी जागावाटपाबाबत मोठं वक्तव्य केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आरपीआय पक्षाला ८ ते १० जागा मिळाव्यात अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

रामदास आठवले यांनी साताऱ्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना जागावाटपाबाबत मोठं विधान केले आहे. 'आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुतीच्या जागा वाटपामध्ये आरपीआय पक्षाला ८ ते १० जागा मिळाव्यात.', अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. तसंच, 'राज्यात महायुतीचा १७० च्या पुढे जागा निवडून येतील अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केलीय. 'राज्यात महायुतीमध्ये तीन प्रमुख पक्ष असले तर आम्हाला गृहीत धरू नका.', असा इशारा देखील रामदास आठवले यांनी महायुतीला दिला आहे.

Maharashtra Politics: विधानसभेसाठी किती जागा मिळाव्यात? रामदास आठवलेंनी थेट आकडाच सांगितला
Maharashtra Politics : लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले, मनोज जरांगेंना मदत करणाऱ्यांना पाडण्याचा निर्धार, १०० जागा लढणार!

'मी ज्यांच्यासोबत असतो त्यांचे सरकार येते.' अशी मिश्किल टिप्पणी देखील रामदास आठवले यांनी केली आहे. अमित शहा यांनी समान नागरी कायदा आणणार असं विधान केलं आहे. त्याबाबत रामदास आठवले यांनी देखील सहमती दर्शवत समान नागरी कायदा आला पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली आहे. तसंच, आरपीआयच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना आरपीआय पक्षात एकत्र येण्याचे आवाहन केले.

प्रकाश आंबेडकर जर आरपीआयमध्ये आले तर नेतृत्व सोडण्याची तयारी रामदास आठवले यांनी दर्शवली आहे. 'प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करून त्यांनी आरपीआयचे नेतृत्व हातात घ्यावे आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू.' असे आवाहन त्यांनी केले आहे. रामदास आठवले यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Maharashtra Politics: विधानसभेसाठी किती जागा मिळाव्यात? रामदास आठवलेंनी थेट आकडाच सांगितला
Maharashtra Politics : पुण्यातील ११ विधानसभा मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा; शिंदेंच्या शिवसेनेचंही तगडं प्लानिंग

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com