Maharashtra Political News : महायुतीतील दिग्गजांविरोधात मविआमधील तरुण नेतृत्व सज्ज, आदित्य ठाकरे-रोहित पवार राज्य पिंजून काढणार

Aditya Thackeray-Rohit Pawar Maharashtra Tour : सप्टेंबर महिन्यात आदित्य ठाकरे आणि रोहित पवार महाराष्ट्रात दौरा करणार आहेत.
Aditya Thackeray-Rohit Pawar
Aditya Thackeray-Rohit PawarSaam TV
Published On: 

गिरीश कांबळे

Mumbai News : शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर राज्यातील राजकारणात अनेक बदल झाले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील दिग्गज नेते भाजपसोबत गेल्या विरोधकांची बाजू काहीशी कमकुवत झाली आहे.

शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात तर अनेक नवीन चेहरे आता समोर आले आहेत. मात्र महाविकास आघाडीने एकत्रितपणे शिंदे-फडणवीस-पवार सरकारला टक्कर देण्यासाठी नवी रणनिती आखली आहे.

महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडीचे तरुण आमदार एकत्र मैदानात दिसणार आहेत. आदित्य ठाकरे आणि रोहित पवार एकत्र महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. त्यांचा सप्टेंबरमध्ये एकत्रित महाराष्ट्र दौरा ठरला आहे.

Aditya Thackeray-Rohit Pawar
Tourists Beaten in Nashik : धबधब्यावर मजा करायल गेले अन् सुजून आले, हुल्लडबाज पर्यटकांना सुरक्षारक्षकांची बेदम मारहाण

सप्टेंबर महिन्यात आदित्य ठाकरे आणि रोहित पवार महाराष्ट्रात दौरा करणार आहेत. ज्या ठिकाणी शरद पवार-उद्धव ठाकरे जाणार नाहीत, तिथे आदित्य ठाकरे-रोहित पवार एकत्रित दौरा करणार आहेत.

आदित्य ठाकरे पक्षातील बंडखोरीनंतर वैयक्तिकरित्या राज्यभर दौरे करत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर शरद पवार यांनी सोबतच्या आमदारांसोबत महाराष्ट्र दौरे सुरू केले आहेत. (Latest News)

Aditya Thackeray-Rohit Pawar
Sambahji Bhide Controversy : संभाजी भिडेंची मिशी कापणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस, समता परिषदेच्या माजी जिल्हाध्यक्षांची घोषणा

मात्र सर्वच ठिकाणी मोठ्या नेत्यांना जाता येत नाहीये, त्यामुळे ज्या ठिकाणी मोठे नेते जाणार नाहीत त्याठिकाणी रोहित पवार आणि आदित्य ठाकरे एकत्रित दौरे करणार आहेत. नुकताच आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांचा भेटीचा फोटो समोर आला होता. दोन्ही नेत्यांनी फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत एकसाथ मिलकर लडेंगे और जितेंगे असं म्हटलं होतं. (Maharashtra News)

त्यांनतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दोन्ही नेत्यांनी एकत्रित दौरा करावा, अशी मागणी केली आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेते एकत्रित दौरा करण्याच्या तयारीत असून सप्टेंबरमध्ये हा दौरा असेल. दौऱ्याची तारीख ठरलेली नाही मात्र दौरा होणार हे ठरलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.