Maharashtra Police: पोलीसदादा बाईक, कारवर 'पोलीस' लिहाल तर खबरदार! ,वाहनांवर होणार कारवाई

Maharashtra Police Motor Vehicles Act : पोलीस सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना खासगी वाहनांवर 'पोलीस' किंवा पोलिसांचे बोध चिन्ह वापरता येणार नाहीये. जर असे वाहने आढळली तर त्यावर कारवाई केली जाणार आहे.
Maharashtra Police: पोलीसदादा बाईक, कारवर 'पोलीस' लिहाल तर खबरदार!; वाहनांवर होणार कारवाई
Maharashtra Police live law
Published On

सूरज मसूरकर, साम प्रतिनिधी

राज्यातील सर्वात पोलिसांसाठी एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. पोलीस सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या खासगी वाहनावर पोलीस किंवा पोलिसांचे बोध चिन्ह लावत असतात. आता पोलीस कर्मचाऱ्यांना असं करता येणार नाहीये. जर कोणत्या पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस किंवा बोध चिन्ह आपल्या वाहनावर लावलं असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील मधील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या खासगी वाहनांवर "पोलीस बोध चिन्ह तसेच पोलीस" लिहिलेले आढळून असल्यास त्या वाहनांवर कारवाई होणार आहे.

पोलीस यंत्रणेत नोकरी मिळाली तर ही मोठी अभिमानाची गोष्ट असते. आपल्यातील काहीजण पोलीस यंत्रेत नोकरी असतीलच. पोलीस म्हटलं म्हणजे एक रुबाबदार व्यक्तीमत्व समोर येत असतं. पोलीस झाल्यानंतर अनेकांची देहबोली वेगळी होत असते. वागण्या बोलण्या एक वेगळा भाव निर्माण होत असतो. पोलीस झाल्यानंतर आपल्यातील अनेकजण आपल्या वाहनावर 'पोलीस', किंवा पोलिसांचं बोध चिन्ह लावत असतात. जेणेकरून समोरील व्यक्तीवर आपली धाक बसावी, यासाठी अनेकजण याचा वापर करतात. तर काहीजण आपल्या वाहनाला कोणी अडकवून नये,यासाठी त्याचा वापर करत असतात.

आता अशी वाहने आढळल्यास त्यावर मोटार वाहन अधिनियम, १९८८ व तद्गुषंगीक नियमांतील तरतूदीनुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विकी जाधव (पत्रकार) यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी खाजगी वाहनांवर "पोलीस बोध चिन्ह तसेच पोलिस" लिहणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी अशी तक्रार प्रादेशिक परिवहन कार्यालयाला केली होती.

त्याच पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व कार्यरत वायुवेग पथकांमधील मधील मोटार वाहन निरीक्षक तसेच सहा. मोटार वाहन निरीक्षक यांनी आपल्या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात तपासणी दरम्यान खासगी वाहनांवर “पोलिस बोध चिन्ह तसेच पोलीस" तसेच वाहनांत 'महाराष्ट्र शासन' अशी पाटी किंवा बांध चिन्हांचा वापर वाहनमालक त्यांच्या वाहनांवर करीत असल्याचं वाहन तपासणीमध्ये निदर्शनास आले.

Maharashtra Police: पोलीसदादा बाईक, कारवर 'पोलीस' लिहाल तर खबरदार!; वाहनांवर होणार कारवाई
Navi Mumbai : पुण्यातील तरुणाला लाखो रुपयांचा गंडा; नवी मुंबई पोलीस आयुक्तांचे नाव वापरून फसवणूक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com