Police Recruitment 2024 : राज्यात गेल्या 2 वर्षांत जवळपास 35 हजार पोलिसांची भरती झाल्यानंतर आता पुन्हा डिसेंबरमध्ये भरती होणार आहे. कोरोना काळात पोलिस भरतीला ब्रेक लागला होता. मात्र आता राज्यात डिसेंबरमध्ये पुन्हा मेगाभरती होणार आहे...
राज्यात गेल्या 2 वर्षांत जवळपास 35 हजार पोलिसांची भरती झाल्यानंतर आता पुन्हा डिसेंबरमध्ये भरती होणार आहे. साधारण साडेसात हजार पदांसाठी भरती होणार असून त्यात मुंबई पोलीस दलासाठी 1200 पदं आहेत. राज्यात 2022 आणि 2023 मध्ये मोठ्या पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार आहे.
करोना काळात सुमारे तीन वर्षे राज्य पोलीस दलात भरती झाली नाही. त्यात वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक ठिकाणी तुलनेत पोलीस संख्याबळ कमी आहे. गेल्या दोन वर्षांत अनुक्रमे 18 हजार आणि 17 हजार पदांची मोठी पोलीस भरती राज्यात झाली. त्या तुलनेनं आणखी सात ते आठ हजार पोलीस संख्याबळ मिळणं अपेक्षित असल्यामुळे डिसेंबरमध्ये पुन्हा साडेसात हजार पदांसाठी भरती होण्याची शक्यताय.
डिसेंबरमध्ये मेगा पोलिस भरती, मुंबईत सर्वाधिक जागा
कोरोना काळात 3 वर्ष भरती नाही. प्रशिक्षण केंद्राची क्षमता वाढण्यात येणार आहे. राज्यात 7500 पदं भरली जाणार आहेत. मुंबईत पोलीस दलात मनुष्यबळ वाढण्यात येणार आहे. १२०० पदे मुंबईमध्ये भरली जाणार आहे. भरतीसाठी पोलिसांकडे 5 लाख 69 हजार अर्ज आले आहेत.
गेल्या 3 वर्षात कोरोनामुळे पोलिस भरतीला ब्रेक लागला होता. तर पावसाळ्यात मुंबई पोलिसांना मैदानं न मिळाल्यामुळे त्यांची भरती प्रक्रिया थोडी उशीराने सुरू झाली होती. मात्र, आता राज्यात नवीन पोलिस भरतीला सुरुवात होणार आहे.त्यामुळे पोलिस दलातील मनुष्यबळ वाढणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.