व्होटचोरीच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक; विरोधकांकडून आयोगावर प्रश्नांची सरबत्ती , बैठकीत नेमकं काय घडलं?

Opposition Leader Meeting With Election Commission: महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्यांनी कथित मतदान चोरी आणि अनियमिततेबद्दल निवडणूक आयोगाला प्रश्न विचारली. या बैठकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर प्रश्नाची सरबत्ती केली.
Opposition Leader Meeting With Election Commission
MVA and Raj Thackeray question Election Commission officials over alleged vote theft in Maharashtra.saam tv
Published On
Summary
  • व्होटचोरीच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक.

  • राज ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते एकत्र आले.

  • बैठकीत निवडणूक आयोगावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली.

व्होटचोरीच्या मुद्द्यावरून पहिल्यांदाच नव्या भिडूसह महाविकास आघाडीचे नेत्यांनी निवडणूक आयोगाविरोधात एकीची वज्रमूठ आवळलीय.. एवढंच नाही तर राज ठाकरेंसह आघाडीच्या नेत्यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना घेरलंय. नेमकं या बैठकीत काय घडलं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर आल्या असताना विरोधक व्होट चोरीच्या मुद्द्यावर चांगलेच आक्रमक झालेत. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, अजित नवले, शेकापचे जयंत पाटील यांनी एकीची वज्रमूठ आवळत मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. मतदार याद्या दुरुस्त होईपर्यंत निवडणुका घेऊ नका असं स्पष्टपणे सुनावत राज ठाकरेंनी VVPT आणि मतदारयाद्यांतील घोळावरुन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत चोकलिंगम यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केलीय.

राज ठाकरेंचे आयोगाला सवाल

31 जानेवारीपर्यंत निवडणुका घेण्यासाठी सज्ज आहात का?

मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ ,2-2 ठिकाणी मतदारांची नाव कशी?

वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी कसं?

निवडणूक लागलेली नाही तरी मतदान नोंदणी बंद का केली?

नोंदणी बंद केल्यानं आज 18 वर्ष पूर्ण करत आहेत त्यांनी मतदान करु नये का?

राज ठाकरे हे प्रश्न विचारुन थांबले नाहीत तर त्यांनी थेट मतदार याद्या दुरुस्त केल्याशिवाय निवडणूक घेऊ नका, अशी भूमिका घेतलीय. आधीच राज ठाकरेंच्या टोकदार प्रश्नांनी घायाळ झालेल्या निवडणूक आयोगावर दुसरा वार केला तो पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी. राज्यात बोगस मतदारांची संख्या लाखोंच्या घरात आहे. अनेक मतदारांची 2 ठिकाणी नावं आहेत. त्याचे पुरावे असल्याचं सांगत जयंत पाटलांनी आयोगाला घेरलंय.. तर आमदार बाहेरुन मतं आणल्याचं सांगत असेल तर ती व्होटचोरी नाही तर काय? असा सवालच जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केलाय.

दरम्यान राज ठाकरे पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत एकत्र आल्याने महाविकास आघाडीत नवा भिडू येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत.व्होटचोरीच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झाल्यानंतर निवडणूक आयोगही सावध झालाय. त्यामुळे निवडणूक आयुक्त एस चोकलिंगम आणि राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे एकत्रित विरोधकांच्या शिष्टमंडळाला सामोरे जाणार आहेत. आता या बैठकीनंतरही विरोधक एकीची वज्रमूठ कायम ठेऊन भाजपविरोधात शड्डू ठोकणार का? यावर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील विजयाचं समीकरण अवलंबून असणार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com