राज्‍यातील ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर; २७१ ग्रामपंचायतींसाठी ४ ऑगस्‍टला मतदान

राज्‍यातील २७१ ग्रामपंचायतींना ४ ऑगस्‍टला मतदान
राज्‍यातील ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर; २७१ ग्रामपंचायतींसाठी ४ ऑगस्‍टला मतदान

मुंबई : पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध ६२ तालुक्‍यातील २७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ४ ऑगस्ट २०२२ रोजी मतदान होणार आहे. याबाबची घोषणा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक (Election 2022) आयोगाने केली आहे. त्यानुसार संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून ५ ऑगस्ट २०२२ रोजी मतमोजणी होईल; अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली. (maharashtra news Voting for 271 Gram Panchayats in the state on 4th August)

राज्‍यातील ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर; २७१ ग्रामपंचायतींसाठी ४ ऑगस्‍टला मतदान
पाण्याचा पुरवठा नाही; संतप्त नागरिकांचा पालिकेवर हंडा मोर्चा

श्री. मदान यांनी सांगितले, की सर्वोच्च न्यायालयाच्या १७ मे २०२२ रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले ६२ तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या (Gram Panchayat) सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार संबंधित तहसीलदार ५ जुलैला निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. यासाठीचे नामनिर्देशनपत्रे १२ ते १९ जुलै या कालावधीत दाखल करण्यात येतील. शासकीय सुट्टीमुळे १६ आणि १७ जुलैला नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी २० जुलै २०२२ रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत २२ जुलै दुपारी ३ वाजेपर्यंत असून प्रत्‍यक्ष मतदान ४ ऑगस्टला होईल. मतमोजणी ५ ऑगस्ट २०२२ रोजी होईल.

ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या

नाशिक: बागलाण- १३, निफाड- १, सिन्नर- २, येवला- ४, चांदवड- १, देवळा- १३ आणि नांदगाव- ६. धुळे: धुळे- २, साक्री- ४९ आणि शिंदखेडा- १. जळगाव: रावेर- १२, अमळनेर- १, एरंडोल- २, पारोळा- ३ आणि चाळीसगाव- ६. अहमदनगर: अहमदनगर- ३, श्रीगोंदा- २, कर्जत- ३, शेवगाव- १, राहुरी- ३ आणि संगमनेर- ३. पुणे: हवेली- ५, शिरुर- ६, बारामती- २, इंदापूर- ४ आणि पुरंदर- २. सोलापूर: सोलापूर- २, बार्शी- २, अक्कलकोट- ३, मोहोळ- १, माढा- २, करमाळा- ८, पंढरपूर- २, माळशिरस- १ आणि मंगळवेढा- ४. सातारा: कराड- ९ आणि फलटण- १. सांगली: तासगाव- १. औरंगाबाद: औरंगाबाद- १, पैठण- ७, गंगापूर- २, वैजापूर- २, खुलताबाद- १, सिल्लोड- ३, जालना- ६, परतूर- १, बदनापूर- १९ आणि मंठा- २. बीड: बीड- ३, गेवराई- ५ आणि अंबेजोगाई- ५. लातूर: रेणापूर- ४, देवणी- १ आणि शिरूर अनंतपाळ- ४. उस्मानाबाद: तुळजापूर- २, कळंब- १, उमरगा- ५, लोहारा- २ आणि वाशी- १. परभणी: सेलू- ३. बुलढाणा: खामगाव- २ आणि मलकापूर- ३.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com