Today's Marathi News Live: नाशिक लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीदेखील रिंगणात

Maharashtra Live Marathi Batmya and Updates (22 April 2024): देश विदेश तसेच महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी वाचा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra's Live News in Marathi By Saam TV
Aajchya Marathi Batmya Live 22 April 2024 | Latest Updates on Nashik, Mahayuti IPL, Lok Sabha Election, PM Narendra Modi and overall MaharashtraSaam TV

Nashik Lok Sabha: नाशिक लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीदेखील रिंगणात

नाशिक लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीदेखील रिंगणात उतरलीय. वंचित बहुजन आघाडीकडून नाशिकसाठी उमेदवाराची घोषणा करण्यात आलीय. मराठा क्रांती मोर्चाचे करण गायकर यांना वंचित आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. नाशिक लोकसभा मतदारसंघातील जातीय समीकरणे आणि मत विभाजणीचं गणित मांडत वंचितकडून नाशिकसाठी उमेदवारी देण्यात आलीय.

PM Narendra Modi: पीएम नरेंद्र मोदी यांची खोटं बोलण्याची गॅरंटी; संजय सिंह यांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खोटं बोलण्याची गॅरंटी आहे. 15 लाख देणार म्हणून सांगितलं.15 पैसे देखील आले नाहीत. भाजपचं नाव मी ठेवलं आहे...भारतीय झूठा पार्टी. ४०० पारचा नारा देताहेत पण महाराष्ट्रातील जनता म्हणतेय तडीपार, अशी घणाघाती टीका आपचे खासदार संजय सिंह यांनी केलीय. महाविकास आघाडीची वर्धा लोकसभा मतदारसंघात उमेदवार विक्रम काळे यांच्या प्रचारार्थ वर्धा हिंगणघाट येथे जाहीर सभेच आपचे खासदार संजय सिंह बोलत होते.

प्रतापराव जाधव दोन लाखांच्या फरकाने निवडून येतील; सामंतांचा दावा

Mahayuti News: महायुतीचं टेन्शन वाढणार? नाशिकच्या जागेवरून भाजप पुन्हा अ‍ॅक्टिव्ह

भाजप नेते दिनकर पाटील यांनी गोडसेंविरोधात लेटर बॉम्ब टाकत महायुतीची डोकेदुखी वाढलीय. दिनकरा यांनी भाजपाचे वरिष्ठ नेत्यांना पत्र पाठवत विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यावर टीका केलीय. हेमंत गोडसे यांनी भ्रष्ट कारभार केल्याचा आरोप पाटील यांनी आपल्या पत्रात केलाय.

सातारा लोकसभेच्या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार राज्यसभेची जागा?

सातारा येथील जागा भाजपला गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला आता राज्यसभेची जागा मिळणार आहे.

विजेचा शॉक लागून १० वर्षीय मुलाचा मृत्यू; मुंबईच्या गोरेगाव दिंडोशी भागातील घटना

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील दिंडोशी गोकुळधाम परिसरातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. गोकुळधाम परिसरातील महाराजा रिट्रेट इमारतीत राहणारा दहा वर्षीय अरे वीर चौधरी हा शनिवारी आपल्या मित्रांसोबत सोसायटीच्या गार्डनमध्ये खेळण्यासाठी गेला. मात्र त्या ठिकाणी असलेल्या इलेक्ट्रीक वायरचा शॉक लागल्याने दहा वर्षीय मुलाच मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.

नांदेडच्या मुखेड तालुक्यात वादळी वारा; वादळी वाऱ्याने उडाला लग्नाचा मंडप

नांदेडच्या मुखेड तालुक्यातील डोंगळेवाडी येथे लग्नातील मंडप वादळी वाऱ्याने उडाला आहे.डोंगळेवाडी येथील नाईक परिवाराचा विवाह सोहळा होता.आज अचानक चारच्या सुमारास जोराचा वादळी वारा सुरू झाला. या वादळी वाऱ्यात लग्न सोहळ्यात लावण्यात आलेला मंडप उडाला.यामुळे वऱ्हाडी मंडळींची मोठी धावपळ उडाली.नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

सांगलीत विशाल पाटील यांना मिळालं 'लिफाफा' चिन्ह

सांगलीतील काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलाय. यावेळी निवडणूक आयोगाने विशाल पाटील यांना 'लिफाफा' हे चिन्ह दिलंय.

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत निवडणुक आयोगाच्या कार्यालयात दाखल

आचारसंहिता सुरू असताना मुख्यमंत्री यांच्या वर्षा या निवासस्थानी राजकीय बैठका सुरू असल्याची तक्रार केली होती. याप्रकरणी निवडणूक आयोगाककडून दखल घेण्यात आलीये .

Pune :पुण्यातील बालगंधर्व येथे भरवण्यात आलेल्या आंबा महोत्सवात चोरी

पुण्यात आंबे विक्री केलेल्या पैशांची चोरी झाल्याची घटना पुण्यात घडलीय. बालगंधर्व येथे भरवण्यात आलेल्या आंबा महोत्सवात आंबे विक्री करून कमावलेले ८० हजार चोरांनी लांबवले. आंबा घेण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन महिला एका पुरुषाने ८० हजार रुपये असलेली बॅग पळवलीय

Mahayuti : छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी महायुतीकडून संदिपान भुमरे यांनी भरला उमेदवारी अर्ज

छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून संदिपान भुमरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. 24 एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगर शहरात महायुतीची रॅली होणार आहे.

Sangli Politics : सांगलीत विशाल पाटील यांची बंडखोरी कायम

सांगलीत विशाल पाटील यांची बंडखोरी कायम असणार आहे.

विशाल पाटील यांनी ठेवला अपक्ष अर्ज

विशाल पाटील यांचे मन वळवण्यात काँग्रेस नेत्यांना अपयश

विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता

सांगली लोकसभेसाठी तिरंगी लढत निश्चित..

महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील, भाजपाचे उमेदवार संजयकाका पाटील , आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यात होणार प्रमुख लढती

अपक्ष विशाल पाटील यांना थोड्याच वेळात मिळणार निवडणूक चिन्ह

जिल्हाधिकारी कार्यालयात थोड्याच वेळात होणार चिन्हांचे वाटप

बजरंग सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज भरताना पोलीस आणि समर्थक आमनेसामने

बीड लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज भरताना पोलीस कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. फॉर्म भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात किती लोकांना पाठवावं यावरून शाब्दिक वाद झाल्याची माहिती समोर आलीय. तर उमेदवारासोबत आलेल्या समर्थकांना परत पाठवताना पोलीस आणि समर्थक आमनेसामने.

माढा लोकसभा मतदारसंघातून शेकापची माघार

शेकापचे उमेदवार सचिन देशमुख यांनी माघार घेतली आहे. माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी अगोदरच माघार घेतली होती. शेकाप अर्ज मागे घेतल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फायदा होण्याची शक्यता आहे.

अजित पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध

राष्ट्रवादीचा जाहिरनामा प्रसिद्ध झाला आहे. सगळ्यांना समान लेखण्याचा प्रयत्न या जाहीरनाम्यात आहे.

Nandurbar : नंदूरबार लोकसभेसाठी हिना गावित यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

- नंदुरबार लोकसभेच्या भाजप उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला...

- यावेळेस त्यांनी तीन उमेदवारी अर्ज केले दाखल...

- जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आणि शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज केला दाखल...

- तसंच हिना गावित यांच्या बहिण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुप्रिया गावित यांनीही तीन अर्ज केले दाखल.

- डॉ. सुप्रिया गावीत यांच्याकडूनही डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल...

PM Modi Pune Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा;  पुणे पोलिसांकडून सुरक्षेचा आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौराच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून शहरातील मुख्य मार्गावर पाहणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याचा पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून तयारीला सुरुवात झाली आहे. 29 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आहेत.

Maval Politics : मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या बरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप नेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. यावेळी शक्तिप्रदर्शन करत बारणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मावळ लोकसभेत मीच विजयी होणार, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Election Commission : निवडणूक आयोगाकडून आज तापमान वाढ आणि उष्णतेच्या लाटांचा अंदाज घेण्यासाठी बैठक

निवडणूक आयोगाची आज महत्वाची बैठक

देशातल्या काही भागांमध्ये तापमान वाढ आणि उष्णतेच्या लाटांचा अंदाज लक्षात घेता निवडणूक आयोगाची बैठक

उष्णतेच्या लाटांमुळे होणारा धोका कमी करण्याच्या उपायांवर होणार चर्चा

निवडणूक आयोगाचे अधिकारी विविध विभागांसोबत आज बैठक करणार

देशातल्या अनेक राज्यातील अधिकारी बैठकीत सहभागी होणार

Dharashiv Politics : ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटील यांना निवडणूक आयोगाची नोटीस

ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटील यांना निवडणूक आयोगाची नोटीस

जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी काढली नोटीस

आचारसंहिता भंगाच्या तक्रारीच्या अनुषंगाने सबळ पुरावे तात्काळ सादर करण्याचे दिले आदेश

तेरणा हॉस्पिटलने रुग्णावर उपचार करण्यासाठी सरकारकडून 18 कोटी रुपये घेतले असा आरोप , तो चुकीचा असल्याचे सांगत अर्चना पाटील यांनी केली होती तक्रार

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घेतलेल्या प्रचार सभेत अर्चना पाटील यांनी 500/1000 रुपये देऊन गर्दी जमा केल्याची ओमराजे यांची तक्रार

Aaditya Thackeray : आम्ही जय भवानी काढणार नाही, हिंमत असेल तर भाजपवर कारवाई करा : आदित्य ठाकरे

'आम्ही जय भवानी काढणार नाही, निवडणूक आयोगामध्ये हिमंत असेल, तर त्यांनी भाजपवर कारवाई करावी. निवडणूक आयोग भाजपसोबत मिळालेलं असून हे पुन्हा एकदा दिसला आहे. जय भवानी जय शिवाजी काढणे म्हणजे महाराष्ट्रात द्वेष त्यांच्या मनात असलेला दिसून येतोय, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Pune Politics : आबा बागुल यांची पक्षातून हकालपट्टी करा; काँग्रेस पदाधिकाऱ्यांची वरिष्ठांकडे मागणी

आबा बागुल यांची पक्षातून हकालपट्टी करा, काँग्रेस पदाधिकाऱ्यांची वरिष्ठांकडे मागणी केली आहे.

आबा बागुल यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी ठेवले एकमत

पुण्यात काल काँग्रेस ची बैठक पार पडली

या बैठकीला पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात उपस्थितीत होते

आबा बागुल यांच्या विरोधात काँग्रेसमध्ये नाराजी

पुण्यातील काँग्रेस नेते आबा बागुल यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

बागुल हे भाजपच्या वाटेवर असण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत्या.

Amravati Politics : अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष आज ठाकरे गटात प्रवेश करणार

बच्चू कडू अध्यक्ष असलेल्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत ढेपे हे आज ठाकरे गटात प्रवेश करणार

अभिजित ढेपे सहकार क्षेत्रातील मोठं नाव

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अमरावतीच्या प्रचार सभेत करणार प्रवेश...

महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचार सभेसाठी उद्धव ठाकरे आज अमरावतीच्या दौऱ्यावर

अभिजीत ढेपे यांच्या प्रवेशामुळे अमरावती जिल्ह्यात ठाकरे गटाला बळ मिळणार.

Mumbai Accident : रायगडमधील ठाकरे गटाच्या नेत्याच्या कारला अपघात

० शिवसेना ठाकरे गटाचे रायगड लोकसभा मतदार संघ समन्वयक संजय कदम यांच्या कारला अपघात

० मुंबई कुर्ला येथे ट्रकने मागून दिली जोरदार धडक

० रायगड जिल्हयातील रोहा येथुन प्रचार सभा आटोपून मुंबईला परत जात असताना झाला अपघात

० गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान

० संजय कदम यांच्यासह गाडीतील सर्व जण सुखरूप

० अपघात करणारा ट्रक पोलिसांच्या ताब्यात

Nagpur Rain :  नागपुरात काही भागात पावसाच्या हलक्या सरी

नागपूरात काही भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या....

शहरात सकाळपासून वातावरणात बदल पाहायला मिळत होता..

पावसाच्या सरी बरसल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

उन्हाच्या कडाक्यापासून त्रस्त नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे.

Manoj Jarange Patil :  मनोज जरांगे यांची नाव न घेता छगन भुजबळ यांच्यावर टीका

'स्वतःला मोठे समजत होते, आता कुठे गेले?.. हिमालयातील बर्फात जाऊन झोपले का? असं म्हणत जरांगे यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.

Nashik Fire :  नाशिकमध्ये गोदामाला भीषण आग, ५० हून अधिक दुचाकी जळून खाक

नाशिक : जुने नाशिक परिसरात घर आणि गोदामाला भीषण आग.

आगेत 50 पेक्षा जास्त दुचाकी जळून खाक

संपूर्ण परिसरात पसरला धूर

अग्निशमन दल घटनास्थळी दाखल.

आग विझविण्यासाठी नागरीकांनी केली गर्दी

आगीचं कारण अस्पष्ट

Mumbai - Goa Highway :  मुंबई-गोवा महामार्गावर बर्निंग टेम्पोचा थरार

मुंबई - गोवा हायवेवर लांजा येथे बर्निंग टेम्पोचा थरार

लांजा पेट्रोल पंप येथे पेम्पोने घेतला अचानक पेट

गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोने घेतला अचानक पेट

स्थानिकांकडून टेम्पोला लागलेली आग विझावण्याचे प्रयत्न सुरु

Ahmednagar News :  सुजय विखे आज दाखल करणार उमेदवारी अर्ज; अहमदनगरमध्ये महायुतीचं शक्ती प्रदर्शन

महारॅलीने सुजय विखे करणार उमेदवारी अर्ज दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आज अहमदनगर मध्ये

राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती

डॉ. सुजय विखे पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालय येथे ११ वाजता आपला अर्ज दाखल करणार

अहमदनगर मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवाद करून दहा वाजता निघणार महारॅली

शहरातील मिरवणूक मार्गावरील प्रमुख रस्त्यावरून काढली जाणार महारॅली

महायुती करणार जोरदार शक्ती प्रदर्शन

Sharad Pawar - Uddhav Thackeray Rally :  शरद पवार आणि उद्धव ठाकरे आज एकाच मंचावर

अमरावती लोकसभा मतदारसंघात आज महाविकास आघाडीची जाहीर सभा होणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज एकाच मंचावर येणार आहेत.

अमरावती लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने बळवंत वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारार्थ दुपारी १२ वाजता शरद पवार आणि उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत.

नवनीत राणा यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांची ही पहिली जाहीर सभा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या सभेत नेमकं काय बोलणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com