Maharashtra Rain Update: राज्यातील विविध भागात पावसाची तुफान बॅटिंग, आज 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

राज्यात मुसळधार पाऊस सुरु, अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर
Weather updates | Weather Forecast
Weather updates | Weather ForecastSaam Tv
Published On

मुंबई - मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात, महाराष्ट्राच्या (Maharashtra) बहुतांश भागात मुसळधार पाऊस (Rain) सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीने धोक्याचा इशारा ओलांडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पुरामुळे जिल्ह्यातील काही रस्ते बंद झाले आहेत. राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी 41 फुटांच्या पुढे गेली आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्कतेचा इशार देण्यात आला आहे.

हे देखील पाहा -

गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातलेल्या पावसाने 24 तासांत उसंत दिली असली तरी राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्वतवण्यात आली आहे.

दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर नांदेड जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भातील ही काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

सतत कोसळणाऱ्या या पावसामुळे नागरिकांनाचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर काही ठिकाणी शेती पिकांना देखील पावसाचा फटका बसला आहे. दरम्यान, मुंबईसह मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाती देखील पावसाची संततधार कायम आहे.

पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली

पुण्यात संसतधार पाऊस सुरु आहे. दोन दिवस पुण्यात आणि आजूबाजूच्या परिसरातदेखील मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्येही जोरदार पावसानं हजेरी लावली. पुण्यात खडकवासला धरणातून नदीपात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू करण्यात आल्याने मुठा नदीवरील बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे भिडे पूल गुरुवारी सायंकाळी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

Weather updates | Weather Forecast
Maharastra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; बाजू मांडण्यासाठी फक्त १५ दिवसांची मुदत

विदर्भातही पाऊस

विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांना पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. या पावसामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर भंडाऱ्यात पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

मिठी नदीत दोघे बुडाले

कुर्ला येथे दोन तरुण माहिम कोस्वे येथील मिठीत नदीत बुडाल्याची (Drown In River) घटना समोर आली आहे. माहिम दर्ग्यात दर्शनासाठी हे दोघं मित्रांसह कुर्ल्याहून (Kurla) येथे आले होते. मध्यरात्री घरी जात असताना, नैसर्गिक विधीसाठी दोघं माहीम खाडीवर उभे होते. त्याचवेळी एकाचा पाय सरकल्याने एक तरुण खाली पडला, त्याला वाचवण्यासाठी दुसरा गेला असता तोही पाण्यात बुडाला. जावेद शेख आणि असिफ अशी वाहून गेलेल्या दोघांची नावे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com