Agriculture News: शेतकऱ्यांनो पेरणीची अजिबात घाई करू नका, कारण... हवामान तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

Weather Department Important Advice For Farmers: राज्यात मान्सून दाखल झाला. पण अनेक जिल्ह्यांमध्ये अजून म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणा कधी कराव्या असा प्रश्न पडला आहे. अशा शेतकऱ्यांसाठी हवामान खात्याने महत्वाची माहिती दिली आहे.
Agriculture News: शेतकऱ्यांनो पेरणीची अजिबात घाई करू नका, कारण... हवामान तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला
Weather Department Important Advice For FarmersSaam Tv

राज्यामध्ये मान्सूनचे (Monsoon 2024) आगमन झाले असून हळूहळू मान्सून पुढे सरकत आहे. मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांची पावसाला सुरूवात झाल्यामुळे उकाड्यापासून सुटका झाली. मान्सून आल्यामुळे शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळाला. मान्सूनचे आमगन झाल्यामुळे अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाला आणि पेरण्यांना सुरूवात केली.

मान्सून पश्चिम विदर्भात पोहचला पण अद्याप पूर्व विदर्भात पोहचला नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी अद्याप मान्सूची प्रतीक्षा करत आहेत. अशामध्ये शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी याबाबत हवामान तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना महत्वाची माहिती दिली आहे.

पश्चिम विदर्भात मान्सून दाखल झालाय. यवतमाळ, वाशीम, बुलडाणा, अकोला जिल्ह्यात आज मान्सून पावसाला सुरूवात झाली. मात्र पूर्व विदर्भामध्ये मान्सून सुरू झाला नाही त्यामुळे येथील नागरिक आणि शेतकरी मान्सूची अजूनही प्रतीक्षा करत आहेत. पूर्व विदर्भात अद्याप मान्सूनचा सकारात्मक प्रवास नसल्याने पूर्व विदर्भाला मान्सूनची अजूनही प्रतीक्षा आहे.

Agriculture News: शेतकऱ्यांनो पेरणीची अजिबात घाई करू नका, कारण... हवामान तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला
Rain in Maharashtra : ढगफुटीसदृश्य पाऊस, घरांमध्ये पाणी शिरलं, रस्ते वाहून गेले; महाराष्ट्रभर धुमाकूळ घालणाऱ्या पहिल्या पावसाचे VIDEO

विदर्भातील मान्सूनच्या आगमनाची तारीख साधारणतः १५ जून असली तरी यंदा चार दिवस आधीच पश्चिम विदर्भात मान्सूनचे आगमन झाले त्यामुळे शेतकरी आनंदी झाले आहेत. विदर्भातील काही जिल्ह्यात सामान्य वातावरण असले तरी नागपूरसह काही जिल्ह्यात तापमान जास्त आहे.

मात्र पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये. जोपर्यंत पेरणीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत प्रतीक्षा करण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. जून महिन्याच्या अखेरीपर्यंत समाधानकारक पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभाग तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी ही महत्वाची माहिती दिली आहे.

Agriculture News: शेतकऱ्यांनो पेरणीची अजिबात घाई करू नका, कारण... हवामान तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला
Rain Hits Latur: पावसाचा धुमाकूळ, लातूरचे जनजीवन विस्कळीत;शिरूर अनंतपाळ- उदगीर, लातूर- उदगीर मार्गावरील वाहतुक ठप्प

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com