Maharashtra Monsoon Session 2023: राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाल्यापासून विरोधी पक्षनेता कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या विधिमंडळ आमदारांनी विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेते करावे अशी शिफारस अध्यक्षांना केली होती. आज विजय वडेट्टीवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागतपर भाषण करताना चांगलीच फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले.
काय म्हणाले एकनाथ शिंदे...
"विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) हे विदर्भातील नेते आहेत. विदर्भातील पाण्यात वेगळा गुण असतो. त्यामुळेच आत्तापर्यंत विदर्भातील चार मुख्यमंत्री राज्याला लाभले. ही विदर्भासाठी अभिमानाची बाब आहे. तसेच पाहुणचार करण्यातही त्यांचा हात कोणीही धरु शकत नाही.." अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कौतुक केले.
उद्धव ठाकरेंवर टीका...
यावेळी पुढे बोलताना एकनाथ शिंदे यांनी "विजय वडेट्टीवार हे घराबाहेर पडून काम करणारे, लोकांमध्ये मिसळून अडचणी सोडवणारे नेते आहेत. ते वर्क फ्रॉम फोम नेते असून बाहेर पडून काम करणारे प्रतिनिधी आहेत.." असे म्हणत उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) टोला लगावला.
देवेंद्र फडणवीसांनीही केले अभिनंदन...
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच विजय वडेट्टीवार हे अनुभवी नेते असून त्यांच्या अनुभवाचा विधानसभेला फायदा होईल.. अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.