Maharashtra Monsoon Session: राज्यात पोलिस ठाण्याची संख्या वाढवली जाणार... गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती; अशी असेल रचना

Devendra Fadanvis On Crime Rate In Maharashtra: यंदा जर गुन्ह्याची परिस्थिती पाहिली तर मागच्या वर्षाच्या तुलनेत 5 हजार गुन्ह्यांची घट आहे.. अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Maharashtra Monsoon Session
Maharashtra Monsoon SessionSaamtv
Published On

Devendra Fadanvis News: राज्यात गंभीर गुन्ह्यांच्या तसेच महिला अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येत आहेत. या घटनांमुळे राज्यात महिला सुरक्षित नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा चर्चेत आला. ज्यावर बोलताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात पोलिस स्टेशन वाढवण्याची घोषणा केली आहे.

Maharashtra Monsoon Session
Statistics Of Pune Accident: पुणेकरांनो सावधान! रस्ते अपघातात जातोय रोज एकाचा बळी; वर्षभरातील आकडेवारी चिंता वाढवणारी, कारण काय?

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

"मुंबई शहर इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत महिलांना सुरक्षित वाटते. हे सेफ्टी परसेप्शन महत्त्वाचं आहे. राज्य गुन्ह्यात तिसरं आहे असं सांगितले जाते. परंतु हे लक्षात घ्यावे की देशात महाराष्ट्र लोकसंखेनुसार दुसऱ्या क्रमांकावर आहोत. यंदा जर गुन्ह्याची परिस्थिती पाहिली तर मागचा वर्षीच्या तुलनेत 5 हजार गुन्ह्यांची घट आहे.. " अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

राज्यात पोलिस स्टेशन वाढवणार..

तसेच "राज्यात व शहरात नव्या आकृतीबंदाप्रमाणे पोलिस ठाण्याची संख्या वाढवली जाणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. याआधी १९६० च्या आधारवर आपली पोलिस रचना होती. आता नवी आकृतीबंदानुसार २०२३ नुसार नवीन आकृतीबंदात पोलिस काम करणार असल्याचे" त्यांनी सांगितले.

Maharashtra Monsoon Session
Bribe : प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रासाठी पैसे घेताना तलाठ्यास पकडले, जिल्हाधिकारी कार्यालयात 'त्याची' रंगली चर्चा

अशी असेल रचना..

"नव्या आकृती बंदाप्रमाणे राज्यात पोलिस ठाण्यांची संख्या वाढवली जाणार असून शहरातील दोन पोलिस ठाण्यातील अंतर ४ किलोमीटर असेल तर ग्रामीण भागात हेच अंतर १० किलोमीटर असेल.."असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com