
निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात पहिल्यांदा भेट होण्याची शक्यता
महापालिका निवडणुकीत युती होण्याची संभावना
मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथील घटना
गेल्या 3 तासांपासून शेतकऱ्याचा मृतदेह महावितरणच्या कार्यालयाबाहेर..
महावितरणच्या हलगर्जीपणामुळे 30 वर्षीय मनोज डंके यांचा मृत्यू झाल्याचा आरोप...
विजेच्या झटक्याने एकाच मृत्यू तर इतर दोन जखमी
संतप्त जमावाला शांत करण्यासाठी पोलिस आणि आमदार राजू खरे घटनास्थळी
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांना सांगलीमध्ये कुत्र्याने चावा घेतल्याचे प्रकार घडला आहे. त्यासाठी नंतर संभाजी भिडे यांच्या प्रकृतीचे अनेकांकडून चौकशी करण्यात येत आहे.
सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडून देखील संभाजी भिडेंची प्रकृतीची चौकशी करण्यात आली आहे.
म्हसवड शहरात भरदिवसा तिघा बंदूकधारी चोरट्यांनी डॉक्टरच्या बंगल्यात घुसून लाखोंचा मुद्देमाल लंपास केला.
घटना मंगळवारी दुपारी डॉ. नरेंद्र पिसे यांच्या घरात घडली. त्यावेळी घरात त्यांच्या सुनबाई आणि लहान बाळ होते.
चोरट्यांनी दोघांना खोलीत बंद केलं आणि मोबाईल संभाषणातून धक्कादायक माहिती उघड झाली.
चोरटे मागच्या दरवाजातून पळाले, आणि बंदुकीचा धाक दाखवत दुचाकीवरून पसार झाले.
म्हसवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू आहे.
- पक्षात राहून पक्षाला न्याय देऊ शकत नाही, पाटील यांनी फेसबुकवर व्हिडिओ शेअर करत दिली माहिती
- विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमधून शिवसेनेत हेमलता पाटील यांनी केला होता प्रवेश
- 30 ते 35 वर्ष काँग्रेसमध्ये काम केल्यानंतर विधानसभा निवडणुकीत पक्षाने उमेदवारी नाकारल्याने हेमलता पाटील होत्या नाराज
- याच नाराजीनंतर त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत जाण्याचा घेतला होता निर्णय
- सध्या कुठल्याही पक्षात प्रवेश न करता सामाजिक संघटनेच्या माध्यमातून काम करत राहणार असल्याची माहिती
सोलापुरात आज तापमानाने गाठला उच्चांक
सोलापुरात 42.8 अंश सेल्सियस तापमानाची झाली नोंद
वाढत्या तापमानामुळे सोलापूरकरांची झाली लाहीलाही
- वार्डमधून उपचार करुन रुग्ण आला घसरत
- अपघातात एक पाय गेल्यानं उपचार घेण्यासाठी आला होता रुग्ण
- उपचार झाले, मात्र येताना रुग्णाला सोडायला व्हीलचेअर उपलब्ध नाही
- ससून रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
पश्चिम रेल्वेच्या सफाळे आणि केळवे रोड रेल्वे स्थानकांदरम्यान बिकानेर एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. या बिघाडामुळे डहाणूकडे जाणाऱ्या डाऊन मार्गावरील लोकल गाड्या २० ते २५ मिनिटं उशिराने धावत आहेत.
मुंबईच्या अंधेरी पूर्व भागातून एक भीषण आगीची घटना समोर आली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळील गुंदवली येथील महापालिकेच्या दवाखान्या मागील पार्किंगमध्ये अचानक आग लागली. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ४ ते ५ गाड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. आगीचा धुर मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला.
पुण्यातील ससून रुग्णालयातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. अपघातात एक पाय गमावलेल्या रुग्णाला उपचारानंतर डिस्चार्ज देताना व्हीलचेअरच उपलब्ध न झाल्याने त्याला जमिनीवर घासत रुग्णालयाबाहेर आणावं लागलं.
पुण्यातील धायरी भागात एका ज्वेलर्स दुकानावर थरारक दरोडा टाकण्यात आला आहे. श्री ज्वेलर्स या दुकानावर तीन दरोडेखोरांनी प्लास्टिकच्या खेळण्यातील पिस्तुलाचा धाक दाखवत २० ते २५ तोळे सोने लुटून नेले. यासंदर्भात दुकानाचे मालक विष्णू दहीवाळ यांनी तक्रार दाखल केली आहे.
मुंबईच्या अंधेरी पूर्व भागात गुंदवली परिसरातील महानगरपालिकेच्या दवाखान्याच्या मागील पार्किंगमध्ये आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत ४ ते ५ गाड्या जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या जवळ घडल्यामुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली होती.
धुळ्यात तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या वाढत्या तापमानाचा परिणाम धुळेकरांच्या शरीरावर देखील होताना दिसून येत आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना डिहायड्रेशनसारखे त्रास उद्भवू लागले आहे. या त्रासामुळे हैराण असलेले नागरिक उपचारासाठी शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे.
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात दोषारोपपत्र दाखल. दहा हजार पानांचे दोषारोपपत्र धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता. आतापर्यंत 14 आरोपींना अटक, 21 आरोपी फरार.
फुले चित्रपटाबाबत सेन्सर बोर्डाने चित्रपटाच्या दिग्दर्शक निर्मात्यांना काही सूचना दिल्या आहे. मात्र सेन्सरला आधी कॉमन सेन्स नव्हता का? आधी चित्रपट पाहिला नव्हता का? असा संतप्त सवाल हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी विचारला आहे. फुले चित्रपटाबाबतच्या आमच्या भूमिकेनंतर सेन्सरने आत्ता त्यात काही बदल सांगितले आहेत. डोळे आणि मेंदू उघडे ठेवून हे जर आधीच केलं असतं तर तर चित्रपट रिलीज होऊन आठवडा झाला असता, अशी प्रतिक्रिया दवे यांनी दिली आहे.
हिंगोलीच्या डीसीसी बँकेमध्ये शेतकरी आणि बँक कर्मचाऱ्यांमध्ये तुफान राडा झाला.पीक विम्याचे पैसे काढण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना बँकेतील कर्मचारी दुय्यम वागणूक देत असल्याचा आरोप करत शेतकरी संतप्त झाले होते. सुरुवातीला शेतकरी आणि कर्मचाऱ्यांध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर बाचाबाची हाणामारी सुरू झाली होती. या घटनेत एका कर्मचाऱ्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. ओम काळे असे या जखमी कर्मचारी चे नाव असून त्यांच्यावर हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरातील एका कुलरच्या गोदामाला आग लागली. आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले. परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले आहेत. तिसऱ्या मजल्यावर असलेल्या कुलरच्या गोदामाला ही आग लागली. या अगीच्या घटनेत गोदाम जळून खाक झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या आधीच्या घटनेत दुकान मालकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर टोमॅटोचा लाल चिखल करून सामाजिक कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी लक्षवेधी आंदोलन केले. लाखो रुपये खर्च करून पिकवलेल्या टोमॅटोला सध्या पाच ते दहा रुपये प्रति किलो दर मिळतोय. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहे. याच प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर 200 किलो टोमॅटोचा लाल चिखल करून लक्ष वेधण्यात आले. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा.. अशी मागणी यावेळी करण्यात आली..
यवतमाळच्या उमरखेड पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या अनेक गावात भीषण पाणी टंचाई आहे. दोन वर्षांपासून जलजीन योजनेचे काम ठप्प,ग्रामसेवकाला निलंबन करण्याची ग्रामस्थांची मागणी. ग्रामपंचायत कार्यालयात फाशी घेण्याचा प्रयत्न केला. सटवा बन्सी राठोड असे फाशी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकाचे नाव आहे. चुरमुरा हे गाव जंगलात वसलेला असून उमरखेड पंचायत समिती अंतर्गत येताहेत.
जालन्यातील घनसांवगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली गावातील एका शेतकऱ्याने जिल्हा परिषदेमध्ये सीईओच्या दालनासमोर अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. गावातील पाणी समस्येला कंटाळून या शेतकऱ्याने हे पाऊल उचलल आहे. प्रशासनाला अनेक वेळा तक्रारी करून देखील गावातील पाणीपुरवठा सुरळीत होत नसून पाणीटंचाईला गाव समोरे जात आहे. प्रशासनाला वारंवार तक्रारी करून देखील प्रशासनाने मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्याने अखेर हे पाऊल उचललं आहे. दरम्यान जिल्हा परिषदेमध्ये सिओच्या दालनासमोर डिझेल ओतून घेताना पोलिसांनी हस्तक्षेप करत या शेतकऱ्याला ताब्यात घेतल आहे..
रायगड - रोह्यात धाटाव येथील एम आयडीसीमध्ये भीषण आग लागली आहे. ट्रान्सवर्ल्ड कंपनीत खिडक्याची कामे सुरू असताना आग लागली. आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलेय.
ठाकरे गटाचे नेते चंद्रकात खैरे उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत. उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन ते अंबादास दानवे यांची तक्रार करणार असल्याची माहिती समोर आली आहे. खैरे अन् दानवेंमधला वाद विकोला गेला आहे. याच पार्श्वभूमीवर ते भेट घेणार असल्यची माहिती आहे.
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससूनमध्ये तज्ज्ञांच्या समितीची बैठक सुरू.
तज्ज्ञांची समिती करणार तिन्ही अहवालाच्या कागदपत्रांची तपासणी.
समितीमध्ये ससूनचे वैद्यकीय अधीक्षक यांच्यासह, स्त्रीरोग विभागप्रमुख, औषधशास्त्र विभागप्रमुख, न्यायवैद्यकशास्त्र विभाग प्रमुख, भूलशास्त्र विभागप्रमुख, बालरोगतज्ज्ञ विभागप्रमुख अशा सहा जणांचा समावेश.
तनिषा भिसे प्रकरणातील सर्व बाबी तज्ज्ञांकडून तपासले जाणार.
दीनानाथ रुग्णालय, सूर्या रुग्णालय, मणिपाल रुग्णालय आणि इंदिरा आयव्हीएफ फर्टिलिटी सेंटर चे नोंदविण्यात आलेल्या जबाबची तपासणी केली जाणार.
अंतरिम अहवाल अलंकार पोलिस स्टेशन येथे सादर करण्यात येणार.
यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यात पहिल्यांदाच रानगव्याची वैज्ञानिक नोंद करण्यात आली आहे. अलीकडच्या काही वर्षात या अभयारण्यात वाघाची संख्या वाढली आहे. त्यानंतर आता प्रथमच रानगव्याची नोंद करण्यात आली आहे.
१९८५ मध्ये, त्यानंतर २००२ ते २००३ मध्ये रानगवा दिसल्याची चर्चा होती. मात्र, त्याची नोंद झाली नव्हती. दरम्यान आता ११ एप्रिल २०२५ला टिपेश्वर अभयारण्याच्या ११०मध्ये काही पर्यटकांनी रानगवा पाहिल्याचे सांगितले.
पूजा खेडकर विरोधातील सुनावणी पुढे ढकलली
पुढील सुनावणी २१ एप्रिल रोजी होणार
पूजा यांच्यावर संघ लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी इतर मागासवर्गीय (OBC) आणि अपंगत्व कोट्याअंतर्गत आरक्षण मिळविण्यासाठी फसवणूक केल्याचा आरोप
भांडुपच्या विहार तलावात तरुणावर मगरीचा हल्ला
तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणावर मगरीने केला हल्ला
अग्निशमन दल आणि पोलीस तसेच एन डी आर एफ चा पथक घटना सही दाखल
पुणे -
विदर्भात सूर्य कोपला! अकोल्यात तापमानाचा पारा ४३ वर
विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पारा ४० पार
चंद्रपूर आणि वाशिम मध्ये ४१.८ अंश सेल्सिअस, अमरावती आणि यवतमाळ मध्ये ४१.४ अंश तापमान
विदर्भाच्या पाठोपाठ मराठवाड्यात सुद्धा तापमान ४० वर
बीड मध्ये ४१.९, परभणी मध्ये ४१.६ तर छत्रपती संभाजीनगर मध्ये ४०.८ अंश तापमानाची नोंद
पुण्यातील लोहगाव भागात सोमवारी ४१.८ अंश तापमानाची नोंद
पुणे -
पुणे शहरासंदर्भात महिला आयोगाची आज जिल्हाधिकारी कार्याला जनसुनावणी
महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर घेणार जन सुनावणी
जन सुनावणीसाठी जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त व इतर अधिकारी राहणार उपस्थित
नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी जन सुनावणीचा आयोजन
अकरा वाजता सुरू होणार जिल्हाधिकार्यालयात जन सुनावणी
जळगाव -
सात्री येथे शासकीय जागेवर बेकायदा खोदकाम
शेतकऱ्याविरोधात गुन्हा दाखल
उच्च न्यायालयाच्या अतिक्रमण काढण्याच्या आदेशाचे उल्लंघन
पिंपरी चिंचवड-
- पिंपरीत काही भटक्या श्वानावर विषप्रयोग करण्यात आलाय
- पैकी 6 श्वानांचा मृत्यू झाला
- श्वान प्रेमींच्या तक्रारीनंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- महेंद्रा ॲनथिया सोसायटी पिंपरी येथील सोसायटीच्या आवारातील 12 श्वान विषप्रयोग करण्यात आला. यापैकी 6 श्वानाचा मृत्यू झाला आहे.
- श्वानप्रेमी प्रिया गुगळे यांनी याबाबत संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील बँकांमध्ये पैशांची टंचाई
बँकेत कॅश मिळत नसल्याने नागरिक हैराण
घरकुल योजनेचे पैसे अकाउंटला आल्यामुळे पैसे काढण्यासाठी नागरिकांची गर्दी
गेल्या महिन्याभरापासून बँकांमध्ये पैसे नसल्याच्या तक्रारी
बँकेमध्ये केवळ एका व्यक्तीला पाच हजार रुपये कॅश दिली जात असल्याची माहिती
बँकेतून जास्तीचे पैसे न मिळत असल्यामुळे धडगाव तालुक्यात रोकड ची अडचण
गेल्या अनेक दिवसांपासून एटीएम मध्ये पैसेच नाही
कर्जतच्या दहिवलीमध्ये घरफोडीचा प्रयत्न; चोरटे CCTV कॅमेऱ्यात कैद
कर्जत शहरा लागत असलेल्यात दहिवली येथे रात्री घरफोडीचा प्रयत्न झाला. मध्यरात्री साडेतीन वाजताची हि घटना असून कुलूप तोडताना घरातील माणस जागे झाल्याने चोर तेथुन पसार झाले. चोरट्यांचा हा प्रताप CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दहिवली येथील विनायक अंगण या इमारतील हि घटना आहे.
केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या रेशन प्राधान्य योजनेतील निकष तपासले जाणार
त्यासाठी राज्य समिती गठित करण्यात आली
समिती दोन महिन्यात अहवाल सादर करणार
येणाऱ्या धान्यापैकी धान्य हे शिल्लक राहत आहे
ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील लाभार्थ्यांचे उत्पन्नाचे निकष तपासले जाणार आहेत
दोन महिन्यात समिती देणार अहवाल
राष्ट्रीय समाज पक्षाने पुण्यात भरवली युवा संघर्ष निर्धार परिषद
अध्यक्ष महादेव जानकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तमे मेळाव्याच आयोजन
मेळाव्याला बच्चू कडू आणि राजू शेट्टी राहणार उपस्थित
फुले वाड्याजवळ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल आहे
२० तारखेला महादेव जानकर यांचा ५० वा वाढदिवस
पुढील पाच ते सहा दिवस तापमान ४० अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता
तसेच किमान तापमानही सरासरीपेक्षा एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा उन्हाचा चटका, उष्मा सहन करावा लागणार आहे.
हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच गुजरात, राजस्थानसारख्या उत्तरेकडील राज्यांमध्येही तापमान वाढले आहे.
त्यामुळे तिकडून उष्ण वारे येत आहेत.
आता दिल्लीत होणार आंबा महोत्सवाचे आयोजन
30 एप्रिल रोजी दिल्लीत होणार आंबा महोत्सवाचे आयोजन
शिवसेना शिंदे गटाचे उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर करणार आंबा महोत्सवाचे आयोजन
30 एप्रिल रोजी दिल्लीत आंबा महोत्सव भरणार
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आंबा महोत्सवाचे उद्घाटन
खासदार रवींद्र वायकर यांनी दिली माहिती
MPSC आंदोलनांचं एक शिष्टमंडळ आज मुंबईत आयोगाला जाऊन भेटणार
पुण्यातील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली
शरद पवारांच्या भेटीदरम्यान आयोगाच्या अध्यक्षांकडून फोनद्वारे मंगळवारच्या भेटीची वेळ मिळाली होती
आजच्या या भेटीदरम्यान राज्यसेवा पूर्व परीक्षा 45 दिवसांनी पुढे ढकलावी, ही मागणी केली जाणार हे यासोबत कंबाइंड परीक्षेच्या जागा वाढवाव्यात ही देखील मुलांची अनेक दिवसांपासूनची मागणी
दरम्यान पुणे पोलिसांनी एमपीएससीच्या आजच्या आंदोलनाला परवानगी नाकारल्याची माहिती
- नाफेडकडून लवकरच कांदा खरेदीला होणार सुरुवात
- मात्र नाफेडच्या कांदा खरेदीत यंदा मोठा बदल
- मागील वर्षी नाफेडच्या कांदा खरेदीत मोठा गैरव्यवहार झाल्याचं समोर आल्यानंतर नाफेडचा महत्वाचा निर्णय
- यंदा नाफेडने कांदा खरेदीतून फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना वगळलं
- आता नाफेड आपल्या सदस्यत्व असलेल्या सहकारी संस्थांमार्फत करणार कांदा खरेदी
- कांदा खरेदीत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी नाफेडचा प्रयत्न
- सध्या कांद्याचे दर घसरत असल्यानं नाफेडच्या कांदा खरेदीने कांद्याच्या भावात सुधारणा होण्याची शक्यता
राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर अशोक उईके यांच्या राळेगावात तब्बल दहा दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केल्या जात आहेत.सध्या कडक ऊन्हाळा सुरू आहेत.अशात दहा दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने पाण्यासाठी महिलांना मोठी कसरत करावी लागतेय.या गंभीर विषयाकडे आदिवासी विकास मंत्री लक्ष देण्याची मागणी होत आहेत.
वाशिमच्या रिसोड तालुक्यातील येवती परिसरात मागील चार दिवसापासून कृषी पंपाची विज बंद असल्यानं शेतकऱ्याची उन्हाळी पिकं सुकन्याच्या मार्गावर आहेत. या परिसरात पैनगंगा नदीवर बॅरेज बांधण्यात आल्यानं मोठया प्रमाणात उन्हाळी मूग, भुईमूग, तीळ या सारखी पिकं घेतली जातात, उन्हाळी मूग सध्या दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. मात्र विज नसल्यानं शेतकऱ्यांना पिकाला पाणी देता येत नाही. त्यामुळं ही पिकं सुकन्याच्या मार्गावर असून लवकर विज पुरवठा दुरुस्त करुन सुरळीत सुरु नं केल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
नांदेडच्या देगलूर शहरात दुकानासमोरून गाडी काढण्यास सांगितल्याच्या कारणावरून तलवारीने जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडलीय.युनूस गफूर शेख यांच्या मदनूर रोडवरील रिपेरिंग सेंटर समोर हायवा गाडी लावलेली काढण्यास सांगितल्याने हायवा चालकाच्या मित्राने युनूस व त्याच्या भावावर तलवार हातात घेऊन जीवे मारण्याची धमकी दिली.पोलिसात दिलेल्या तक्रारीवर सुधाकर कावटवार वर गुन्हा दाखल करण्यात आलाय,मात्र तलवार पाहून परिसरात काही काळ दशदीचे वातावरण निर्माण झाले होते.
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपुर तालुक्यातील भारत शासन राजपत्राद्वारे जन्म मृत्यु नोंदणी कायदा 1969 मध्ये सुधारणा करुन उशिरा जन्म मृत्यु नोंदणी संबंधीचे अधिकार हे जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी यांना प्राधिकृत केलेले होते, यांना प्रदान करण्यात आलेल्या कार्यवाही संदर्भात शासनाकडे मोठया प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.... शासन निर्णयानुसार तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी या पदापेक्षा कमी दर्जाच्या अधिका-यांनी जन्म-मृत्यु प्रमाणपत्र निर्गमित केलेले आहेत ते सर्व प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेले आहे.... असे संग्रामपूर तालुक्यातील 449 जन्म,मृत्यू आदेश रद्द करण्यात आले असून कोणते शासकीय योजनेसाठी, लाभासाठी किंवा कायदेशीर कामासाठी ,अथवा नोंदणीसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही असे संग्रामपूर तहसीलदार प्रशांत पाटील यांनी माहिती दिली आहे.
कर्ज काढून, शेतीच्या मातीला सोनं करणं शक्य होईल या आशेने रात्रंदिवस राबलेल्या शेतकऱ्यांनी टोमॅटोचं पीक उभं केलं होतं. पण आभाळातून आलेल्या गारांनी ही मेहनत काही क्षणांत मातीमोल करून टाकली.टोमॅटो पाण्यात गेला, कष्टाची माती झालीय याआधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले शेतकरी आता आणखी खोल खाईत ढकलले गेले आहेत. "आता नुकसानभरपाई नको, आमचं कर्ज तरी माफ करा!" असा आक्रोश शेतकऱ्यांकडून होतोय कारण नुकसान एवढं प्रचंड आहे की फक्त काही हजारांची भरपाई शेतकऱ्यांच्या डोळ्यांतले अश्रू थांबवू शकत नाही. टोमॅटोने उभारी मिळेल, सणवार साजरे होतील, मुलांचं शिक्षण सुरू राहील, अशी स्वप्नं गारपिटीच्या थेंबांमध्ये विरघळून गेली.
वाशी गाव येथे एका हळदी समारंभात आलेल्या फुकट्या पाहूण्याने जेवणावर ताव मारत हळदी समारंभाला उपस्थित इसमाच्या दागिन्यांवरच आपले हात साफ केलेत. परेश पवार हे वाशी गावं येथे एका हळदी समारंभाला उपस्थित होते. यावेळी जेवणाच्या टेबलवर गाडीची चावी विसरल्याने ही चावी घेऊन चोरट्याने परेश यांच्या फॉर्चूनरचा दरवाजा उघडून त्यामध्ये ठेवलेले सुमारे 14 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि 2 मोबाईल फोन चोरी केले. घटना लक्षात येताच परेश यांनी तात्काळ वाशी पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलीसांनी देखील तात्काळ तपासाला सुरुवात करत गाडी समोरील सिसीटीव्ही द्वारे आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपी अंकुश सलगर हा स्थानिक टॅक्सी चालक असून फुकट जेवण करण्यासाठी आला असताना त्याने हे कृत्य केलेय. वाशी पोलीसांनी आरोपी अंकुश सलगर विरोधात गुन्हा दाखल केला असून सर्व दागिने आणि मोबाईल हस्तगत केलेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.