
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या संभाव्य नावावर चर्चा झालीय. पक्षाच्या वाट्याला १० ते १२ मंत्रिपद मिळावीत ही प्रमुख मागणी करण्यात आलीय. त्यात सुरुवातीला पहिल्यावेळी ७-८ मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. त्या मंत्र्यांमध्ये कोण कोण असावं यावर बैठकीत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.
माजी खासदार रावसाहेब दानवे दिल्ली दौऱ्यावर
सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर दानवे दिल्लीत
खासगी कामासाठी दिल्लीत आल्याची माहिती
दानवे यांच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
चाकू हल्ल्यात दिलीप मोरे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव
घटनेची माहिती मिळताच बेगमपुरा पोलीस घटनास्थळी दाखल
पोलीस येताच दोन्ही गट घटनास्थळावरून पसार
शुल्लक कारणावरून चाकू झाल्याची प्राथमिक माहिती; पोलिसांचा तपास सुरू आहे.
दोन तीन दिवसांपासून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी आहेत. त्यांच्या भेटीसाठी भाजपचे नेते संकटमोचक गिरीश महाजन ठाण्यात आलेत. दरम्यान महाजन काय निरोप घेऊन आलेत ही याची माहिती थोड्यावेळात समजणार आहे.
यवतमाळ शहरात प्रतिबंधित असलेला नायलॉन मांजा मुळे वाहन चालकाचा गळा कपाल्याची घटना घडली.वाहन चालवीत असताना कटलेल्या पतंगीचा नायलॉन मांजा गळ्याला गुंडाळल्याने एक जण गंभीरित्या जखमी झाल्याची घटना यवतमाळच्या भोसा रोड परिसरात घडली. प्रशांत रामचंद्र राऊत असे गंभीर रित्या जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.प्रशांत हे काही कामानिमित्त आपल्या दुचाकी वाहनाने रस्त्याने जात असताना अचानक त्यांच्या गळ्याला नायलॉन मांजा गुंडाळल्याने ते रक्तबंबाळ होऊन गंभीरित्या जखमी झाले दरम्यान ही बाब तेथील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी प्रशांत यांना यवतमाळ खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले प्रतिबंधित असलेला नायलॉन मांजावर बंदी असतानाही सर्रासपणे यवतमाळ शहरासह जिल्ह्यात विक्री होत आहे असे असतानाही मात्र पोलिसांची कारवाई कुठेही होताना दिसून येत नाही त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
कोकेन हा अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोन नायजेरियन यांना अटक करण्यात आलीय. मिरारोड परिसरात कोकेन हा अमली पदार्थ विक्रीसाठी आले होते.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात EVM विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्या टप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून 3 डिसेंबर ते 16 डिसेंबर पर्यंत राज्यात EVM विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे.
21 ते 23 फेब्रुवारी 2025 दरम्यान दिल्लीत संमेलन होणार आहे. 70 वर्षांनी दिल्लीत होणार्या या संमेलनाचे आयोजन सरहद संस्थेद्वारे केले जात आहे. शरद पवार यांनी औरंगाबाद (2004), नाशिक (2005), चिपळूण (2013) आणि सासवड (2014) येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले आहे. आयोजकांच्या विनंतीवरून शरद पवार यांनी स्वागताध्यक्षपद स्वीकारल आहे.
ब्रेन स्ट्रोकमुळे नाशिकच्या नाईन पर्ल्स रुग्णालयात गेल्या 45 दिवसांपासून उपचार सुरू आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी रुग्णालयात जाऊन घेतली मधुकर पिचड यांची भेट घेतली.
महायुतीच्या नेत्यांची आज सोमवारी दिल्लीत बैठक होणार नाही. अजित पवार दिल्लीत येणार असल्याची माहिती आहे. मात्र, अमित शहा यांच्यासोबत कुठलीही बैठक होणार नसल्याची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली आहे. अजित पवार कोणाला भेटणार याची उस्तुकाता आहे.
ाझा बाबा सिद्दीकी होण्याआधी मला संरक्षण देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची माजी आमदार रमेश कदम यांची मागणी.मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट घेतली.
या अपघातात तिघांचा मृत्यू झालाय. तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात दाखल केले आहे. दोन फोर व्हीलर कारची जबर धडक झाली. दर्यापूर तालुक्यातील लासुर फाट्या नजीक हा अपघात झाला.
पुण्यात आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक
पुणे जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांची राष्ट्रवादीचे कार्यालयात बैठक
बैठकीला सुरुवात
जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील सर्व पराभूत उमेदवार बैठकीसाठी दाखल
हर्षवर्धन पाटील, रमेश आप्पा थोरात, अशोक पवार, देवदत्त निकम यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी बैठकीला उपस्थित
विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर राष्ट्रवादीच पुण्यात आत्मचिंतन
अर्जुन खोतकर हे देखील ठाण्यात दाखल.
श्रीकांत शिंदे यांची भेट घेण्यासाठी अर्जुन खोतकर हे ठाण्यात आले आहेत.
अर्जुन खोतकर यांच्या माध्यमातून मंत्रिपदावर दावा केला जातो.
यासाठी कोतकर जोरदार प्रयत्न करताना बघायला मिळत आहेत.
या आधी देखील युतीच्या सरकारमध्ये खोतकर मंत्री होते.
मात्र त्यानंतर खोतकर यांना पराभवाचा सामना करावा लागला.
आता पुन्हा खोतकर आमदार झाल्याने मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत
पुण्यातील सिंहगडावर शिवसैनिक यांनी केली पोस्टर घेऊन केंद्रीय नेतृत्वाकडे मागणी.
एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी शिवसैनिकांची मागणी.
पुण्यातील शिवसैनिकांची पोस्टरबाजी
शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या उपस्थितीत सिंहगडावर तानाजी मालुसरे यांच्या पुतळ्यासमोर शिवसैनिकांची घोषणाबाजी
हडपसर-हिसार, दौंड- अजमेर रेल्वेला मुदतवाढ
रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता हडपसर-हिसार, दौंड-अजमेर आणि सोलापूर-अजमेर दरम्यानच्या विशेष गाड्यांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
ट्रेन क्रमांक ०४७२४ हडपसर-हिसार साप्ताहिक विशेष ट्रेनच्या तीन फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.
२ ते १६ डिसेंबरदरम्यान गाडीचा कालावधी वाढविण्यात आला आहे.
- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहीत पवार यांची पत्रकार परिषद
- ईव्हीएम बाबत नवा खुलासा करण्याची शक्यता
- विधानसभा निवडणूकीत ईव्हीएम मशीन मध्ये गैरप्रकार झाल्याचा विरोधक करत आहेत आरोप
- दुपारी दोन वाजता रोहीत पवार यांची पत्रकार परिषद
वरळी मध्ये आदित्य ठाकरे यांना पोस्टलमध्ये 51 टक्के आणि मिलिंद देवरा यांना 30 टक्के मते मिळाली
Evm मध्ये आदित्य ठाकरे यांना 44 टक्के आणि मिलिंद देवरा 38 टक्के...
आदित्य ठाकरे पोस्टलमध्ये 21 टक्क्यांनी वाढली
आणि Evm मध्ये 6 टक्क्यांनी मिलिंद देवरा यांना मते वाढली
एकनाथ शिंदे यांच्या सर्व बैठका रद्द
आज आमदारांची बैठक बोलावली होती
डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिल्यामुळे आज सर्व बैठका रद्द
आज एकनाथ शिंदे ठाण्यात असतील
मुलुंड पश्चिमेस हिट अँड रन मध्ये अमृता पूनमिया महिलेचा जागेच मृत्यू
पती आणि मुलगा गंभीर जखमी
मुलुंड गोरेगाव लिंक वर भरधाव ट्रकने दिली टक्कर
ट्रक चालक टक्कर देऊन चालक फरार पोलिसांनी गुन्हा नोंदवत चालकाचा शोध सुरू
स्थानिकांच्या मदतीने महिलेला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी केले मृत्यू घोषित
बांगलादेशी हिंदूंच्या समर्थनार्थ ठाकरेंची शिवसेना आक्रमक
ठाकरेंच्या शिवसेनेकडून बांगलादेशचा झेंडा जाळून निषेध व्यक्त..
रस्त्यावर बांगलादेशचा झेंडा पायांनी तुडविला
संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून धरणे आंदोलने
बांगलादेशी हिंदू के सन्मान में, शिवसेना मैदान मे. म्हणत शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी.
देशातील बांगलादेशींना परत बांगलादेशामध्ये पाठवा
भारताने बांगलादेश बरोबर सर्व आर्थिक व्यवहार बंद करावे..
दखल घेतली नाही तर येता काळात राज्यभरात मोठे आंदोलन उभारणार..
विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची मागणी.
5 तारखेला होणाऱ्या शपथविधी संदर्भात मुंबई भाजपामध्ये तयारीसंदर्भात बैठक
मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली बैठक.
आज दुपारी 02:00 वाजता होणार बैठक.दादर वसंतस्मृती येथे बैठक होणार
मुंबई भाजपाचे सर्व आमदार,नगरसेवक,जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, महामंत्री, मंडल अध्यक्ष सर्व आघाड्यांचे अध्यक्ष सर्व उपस्थित राहणार.
शपथविधी मोठ्या दिमाख्यात करण्यासंदर्भात नियोजन आढावा बैठक.
भाजप विधिमंडळ गटनेता निवडीसाठी निरीक्षकांची नाव आज दुपारी जाहीर होणार
भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक उद्या बैठक होण्याची शक्यता
उद्या सकाळी निरीक्षक मुंबईला जाणार
सूत्रांची माहिती
- शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अपूर्व हिरे यांनी मुंबईत घेतली अजित पवार यांची भेट
- ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात अपूर्व हिरे यांनी अजित पवार गटातून उद्धव ठाकरे गटात केला होता प्रवेश
- अपूर्व हिरे आहेत माजी आमदार, अपूर्व हिरे यांनी आता पुन्हा अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा
शिवसेनेतील काही आमदारांची धाकधूक वाढली.
येत्या नव्या मंत्रिमंडळात ४ नव्या आमदांराची वर्णी लागण्याची शक्यता.
तर ४ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता.
आज वर्षावर सर्व शिवसेना आमदारांची बैठक.
दिल्लीला जाण्याआधी ही बैठक महत्वाची मनाली जातेय.
दत्ता भरणेंना मंत्रीपद द्या, कार्यकर्तांचे अजित पवारांना निवेदन
विश्वकर्मा लोहार विकास संस्थेचे पुणे-सोलापूरमधील शेकडो कार्यकर्ते अजित पवारांच्या भेटीला
इंदापूरमध्ये यंदा दत्ता भरणेंना मंत्री पद मिळाव, कार्यकर्तांनी दादांच्या समोर व्यक्त केली इच्छा
राहुल जगताप हे अजित पवारांच्या भेटीला
राहुल जगताप लवकरच राष्ट्रवादीच्या पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा
मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर होऊ शकतो पक्ष पक्षप्रवेश
श्रीगोंदा येथून बंडखोरी करणारे अपक्ष उमेदवार राहुल जगताप
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार आज पुन्हा दिल्लीला जाण्याची शक्यता
येत्या २४ तासांत खातेवाटपावर होणार अंतिम शिक्कामोर्तब
आज अमित शाह यांच्या सोबत पुन्हा बैठक होऊन अंतिम निर्णय होणार
सुत्रांची माहिती.
काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी बोलावली शिवसेना आमदाराची बैठक
आज दुपारी ही महत्वाची बैठक वर्षा किंवा नंदनवनला होणार असल्याची सूत्रांची माहिती
या बैठकित मुख्यमंत्री जागा वाटप त्याच बरोबर महायुतीतील आपल्या सहभागाबाबत आमदारांना मार्गदर्शन करतील
शिवसेनेच्या वाट्याला १३ मंत्रीपद येण्याची शक्यता वर्तवली जात आहे
यात काही जुने ज्येष्ठ नेत्यांना संधी दिली जाणार असून मंत्री मंडळात शिवसेनेकडून काही नव्या चेहर्यांनाही संधी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली
- अक्कलकोटमध्ये २ दिवसांत १०० कुत्र्यांवर विषप्रयोग, 12 कुत्र्यांचा मृत्यू
- श्वानप्रेमींची पोलिसांत धाव,अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
- अशितोष कटारे या श्वानप्रेमीणे पोलिसांत तक्रार केलीय दाखल
- अक्कलकोट शहरातील करंजा चौक, फुटाणे गल्ली, विजयकामगार चौक या ठिकाणी थोंडाला फेस येऊन मृत अवस्थेत आढळले श्वान
- अज्ञात वक्तीने खाद्यपदार्थ देऊन या कुत्र्यांना संपवल्याचा व्यक्त केला जातोय संशय..
- या कुत्र्यांच्या मृत्यूची मुंबईतील मानव अधिकार कमिशन आणि पीएएल ऍनिमल फाउंडेशन वेलफेअर संघटनेने घेतली आहे दखल.
मतदानानंतर मतपत्रिकेचा फोटो काढणारा पोलीस निलंबित
शिवडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार रियाझ पठाण यांना करण्यात आलं निलंबित
त्यांच्या पोस्टल बॅलेट पेपरचा फोटो शेअर झाल्यानंतर निवडणूक गोपनीयतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी निलंबन
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या सुविधा केंद्रात मतदान करणाऱ्या पठाणने आपल्या चिन्हांकित मतपत्रिकेचा फोटो काढून साताऱ्यातील मित्राला पाठवला
हा फोटो व्हायरल झाल्यानंतर चौकशीला करण्यात आली होती सुरवात
चौकशीअंती पोलिसांनी जेजे मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरण
१८ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळावी,असा अर्ज गुन्हे शाखेकडून न्यायालयात दाखल करण्यात आला.
विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी आंदेकर खून प्रकरणातील आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी ३० दिवसांची मुदतवाढ पोलिसांना दिली.
आंदेकर यांचा खून कौटुंबिक, संपत्ती, तसेच वर्चस्वाच्या वादातून १ सप्टेंबर रोजी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून, तसेच कोयत्याने वार करुन करण्यात आली होती.
मुंबईत आलिशान कारची ३ वाहनांना धडक, ३ जण जखमी
बीएमडब्ल्यू चालकाला आली अचानक फिट,
रस्त्यावरील एक दुचाकी आणि दोन रिक्षांना जोरदार धडक,
तिघे जखमी, जखमींना उपचारासाठी केले रूग्णालयात दाखल
विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित
भाजप आमदारांच्या बैठकीत अधिकृत घोषणा होणार
उद्या भाजप आमदारांची बैठक होण्याची शक्यता
या बैठकीतच देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ पक्ष नेते पदी नियुक्ती केली जाणार
सूत्रांची माहिती
नवी दिल्ली - अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा आज पाहिला दिवस
अदानी मुद्यावरून आजही विरोधक आक्रमक राहण्याची शक्यता
शुक्रवारी विरोधी पक्षाने अदानी मुद्द्यावर जोपर्यंत चर्चा होत नाही तोपर्यंत सदन सुरू राहणार नाही अशी भूमिका घेतली होती
त्यामुळं १० मिनिटांनी सभागृह तहकूब कराव लागलं होत
आज सकाळी १० वाजता राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात INDIA आघाडीच्या गटनेत्यांची बैठक होणार असून अधिवेशनाची आगामी रणनीती ठरवली जाणार आहे
आज सभागृहात अर्थमंत्री निर्मला सीतारामन बँकिंग लॉ संशोधन विधेयक मांडण्याची शक्यता आहे
ईव्हीएम हॅकचा दावा करणाऱ्या हॅकरवर गुन्हा दाखल
निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरून मुंबईच्या सायबर पोलिसांनी हॅकर सय्यद सुजाविरुद्ध केला गुन्हा दाखल
भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
व्हिडीओ कॉलिंगवर दोन व्यक्ती कथित हॅकरशी ईव्हीएम हॅकिंगबाबत चर्चा करत असल्याचा व्हिडीओ झाला होता व्हायरल
व्हिडीओबाबत निवडणूक आयोगाची मुंबईतील दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात तक्रार
नोएडा आणि ग्रेटर नोएडाच्या शेतकऱ्यांचा आज दिल्लीवर हल्लाबोल मोर्चा
जिल्हाभरातील हजारो शेतकरी आज दिल्लीकडे कूच करणार
डझनभर शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या संयुक्त किसान मोर्चा कडून आज आंदोलन
नोएडा, ग्रेटर नोएडा आणि यमुना प्राधिकरणाच्या अखत्यारीतील सर्व गावातील शेतकरी आज दिल्लीकडे कुच करणार
10% विकसित भूखंड, नवीन कायद्यांतर्गत भूसंपादन आणि 64% वाढीव मोबदला या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
शेतकऱ्यांच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर परिसरात कलम 163 लागू
खबरदारी म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीला जाणार
उद्या निवडणूक आयोगानं काँग्रेसला चर्चेसाठी पाचारण केलंय
ईव्हीएमच्या तक्रारीसंदर्भात काँग्रेस नेते निवडणूक आयोगाला भेटणार
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.