विक्रोळीतील गोदरेज जवळ संशयित कॅश व्हॅन आरटीओ पोलीस व निवडणूक कर्मचाऱ्यांनी पकडली आहे. विक्रोळी पोलिसांनी ही व्हॅन विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये आणली असून याचा अधिक तपास पोलीस व निवडणूक अधिकारी करत आहेत.
- पहिली सभा कसब्यातील फडके गौद या ठिकाणी होणार
- दुसरी सभा कोथरूड मध्ये होणार
- मनसेचे गणेश भोकर हे कसब्यातील उमेदवार आहेत
- तर कोथरूड मधून किशोर शिंदे हे मनसेचे उमेदवार आहेत.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करताना फडणवीस यांनी मोदी -शहा यांची परवानगी घेतली का? कारण अमीत शहा यांनी, आम्ही कर्जमाफीच्या विरोधात आहोत, असे आधीच जाहीर केले. त्यामुळे कर्जमाफीची घोषणा करताना आधी त्यांची परवानगी घेतली का, हे फडणवीस यांनी स्पष्ट करावे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांनी आज चंद्रपुरात बोलताना, महायुती सरकार सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी करू,अशी घोषणा केली. त्यावर वडेट्टीवार यांनी ही प्रतिक्रिया दिली.
शरद पवार गटाचे उमेदवार आणि आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची घटना घडलीय. त्याचा व्हिडिओ व्हारयल झालाय. अपहरण झालेल्या मुलाला मारहाण देखील करण्यात आल्याच म्हटलं जात आहे.
किर्तीकुमार भांगडीया यांच्यासह पूर्व विदर्भातील प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. किर्तीकुमार भांगडीया यांची तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात आहे.
तूर्भे स्टोअर येथे डंपरच्या धडकेत एका इसमाचा मृत्यू झाल्याने मनसे आक्रमक झालीय. ठाणे बेलापूर मार्गावर मनसेच्या रास्ता रोको आंदोलनामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झालीय. तुर्भे स्टोअर येथे उड्डाणपुल लवकरात लवकर उभरावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे.
तब्बल दोन कोटी सदतीस लाख रुपये किमतीचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केलीय. अटक करण्यात आलेले चारही आरोपी उत्तराखंडचे रहिवासी आहेत. आरोपी मुंबईच्या मालाड येथे हेरॉईन ड्रग्स विकण्यासाठी आले असता अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली.
आचारसंहिता सुरू झाल्यापासून पालघर जिल्ह्यात तब्बल नऊ कोटी 87 लाख 39 हजार 565 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . यामध्ये तलासरीतील उधवा आणि वाडा येथे केलेल्या दोन कारवायांमध्ये पालघर पोलिसांनी आठ कोटी तीन लाख 50 हजार रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. दोन्ही ठिकाणी कॅश व्हॅन मधूनच ही रोकड पोलिसांनी हस्तगत केली असून सध्या निवडणूक आयोग या सगळ्याचा अधिक तपास करत आहे.
जिल्ह्यात चार लाख 35 हजार रुपयांच ड्रग्स देखील जप्त करण्यात आलं असून ही कारवाई मतदान दिवसापर्यंत सुरूच राहणार असल्याचा इशारा पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिला आहे .
हॉटेलच्या टेरसवर विना परवाना शिवसेना उमेदवाराच्या नावाचा एअर बलुन लावल्याप्रकरणी एका हॉटेल मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मुंबईच्या अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्रात भाजप उमेदवार अमित साटम यांचा प्रचार सुरू आहे. अंधेरी पश्चिमेकडील इंदिरानगर परिसरात प्रचार सुरू असताना छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वेशभूषा असलेल्या व्यक्तींना स्वतःच्या प्रचारात कार्यकर्ते म्हणून फिरवल्यामुले उमेदवार साटम यांच्याकडून महामानवांचा अवमान झाला असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आलेला आहे.
वर्सोवा विधान सभा मतदार संघात उद्या राज ठाकरेंची सभा
मनसे उमेदवार संदेश देसाई यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे उद्या वर्सोवा जोगेश्वरी येथे घेणार सभा
राज ठाकरे यांनी निवडणुकीत हिंदुत्वाच्या मुद्द्याला घातलाय हात
शालिनी ठाकरे यांनी देखील वर्सोवा विधानसभेतील शिवसेना ठाकरे गटाच्या अल्पसंख्यांक उमेदवारीवरून उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती टीका
राज ठाकरे यांनी घाटकोपर येथील सभेत सत्ता दिल्यास 48 तासात मशिदी वरील भोंगे उतरवण्याचा दिलं होतं वचन
उद्या वर्सोवा जोगेश्वरी येथील सभेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरे बोलणार का याची मतदार संघातील नागरिकांना उत्सुकता
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार अपात्रता प्रकरणाला आता फक्त अकॅडमीक महत्त्व
शिवसेना आमदार अपात्रता आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर 10 डिसेंबरला सुनावणीची शक्यता
महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपत आहे, त्यामुळं कोणत्याही गटाच्या आमदारांवर अपात्र होण्याची वेळ येणार नाही
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची जयंत पाटलांवर टीका
जयंत पाटील खरं बोला, तुमच्या कारखान्याला अमित शहाच्या नेतृत्वात 1442 कोटी मिळाले.
- आपण सगळ्यांनी संकल्प केलाय 8 ची 8 जागा महायुती विजयी होणार.
- मुख्यमंत्री यांचे पुण्यासाठी मोठं योगदान आहे.
- महाराष्ट्र वेगाने विकास होतोय, सर्वाधिक परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रमध्ये.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज विदर्भ दौऱ्यावर असून नागपूर विमानतळ दाखल झाले..
दीक्षाभूमी येथे जाऊन माहमनाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दर्शन घेतले.
यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी कलेशाला अभिवादन करून अभिवादन केले.
- नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे निर्धार बैठक
- संजय राऊत यांच्या उपस्थिती बैठकीचे आयोजन
- ठाकरे गटाचे पश्चिमचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर बैठक
- बैठकीसाठी खासदार संजय राऊत , राजाभाऊ वाजे , माजी आमदार अपूर्व हिरे प्रमुख पदाधिकारी उपस्थित
- सोलापुरात विविध राजकीय प्रचार यंत्रणेवर असणार ड्रोन कॅमेऱ्याची नजर,सोलापूर शहर पोलिसांचा अनोखा उपक्रम
- सोलापुरातील राजकीय नेत्यांच्या होणाऱ्या सभेतील अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहर पोलिसांकडून ड्रोन कॅमेराचा वापर
- शहरातील विविध मतदारसंघातील भागांवर ड्रोन च्या साह्याने ठेवले जाणार लक्ष
- सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाकडून स्वातंत्र्य ड्रोन कॅमेरा कक्षाची स्थापना,पोलीस आयुक्तालयातील कंट्रोल रूम मध्ये ड्रोन कॅमेरा जोडले असल्यामुळे असणार लक्ष
- सोलापुरातील होम टू होम प्रचार, कॉर्नर सभा, मोठ्या सभा यांच्यावर असणार ड्रोन कॅमेराची नजर
- सोलापूर शहर पोलीस सांकडून चार ड्रोन कॅमेराचा वापर, सायंकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत सोलापुरात ड्रोन कॅमेरा फिरणार..
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झारखंडमधे आयकर विभागाची छापेमारी
रांची आणि जमशेदपूरमधे ७ ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी सुरू
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या खासगी साचिवाच्या घरावर छापेमारी
सोरेन यांचे खासगी सचिव सुनील श्रीवास्तव यांच्या घरावर छापेमारी
घरातून काही कागदपत्र ताब्यात घेतल्याची माहिती
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून काही केस संदर्भात चौकशी सुरु
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर छापेमारी सुरू असल्याने राजकारण तापण्याची शक्यता
निवडणूक काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे ५० सभा घेणार
१८ तारखेला प्रचाराची सांगता सभा ही बारामतीमधे युगेंद्र पवार यांच्यासाठी घेणार आहे
आज शरद पवार यांची ४ सभा होणार
धनंजय मुंडे यांच्या विरोधात आज शरद पवार यांची सभा परळीत होणार
शरद पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आज बीड मधे उमेदवारांच्या प्रचारार्थ शरद पवार मैदानात
परळी मधे राजेसाहेब देशमुख,आष्टी मधे मेहबूब शेख,बीड मधे संदीप क्षीरसागर या उमेदवारांसाठी शरद पवार यांची प्रचार सभा
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारांसाठी जाहीर सभा
आज सोलापुरात प्रकाश आंबेडकर यांची तोफ धडाडणार
हॉस्पिटल मधून बरे होऊन परतल्या नंतर प्रकाश आंबेडकर सोलापुरात घेणार जाहीर सभा
सोलापूर दक्षिणचे उमेदवार संतोष पवार, सोलापूर शहर मध्यचे उमेदवार श्रीनिवास संगेपाग, अक्कलकोटचे उमेदवार संतोषकुमार इंगळे आणि सोलापूर शहर उत्तरचे उमेदवार विक्रांत गायकवाडसाठी होणार सभा
सोलापुरातील नेहरू नगर परिसरातील चंद्रमगुरुजी प्रशाला ग्राउंडवर होणार सभा
प्रकाश आंबेडकर आपल्या सभेतून नेमक काय बोलणार याकडे लागलं सर्वांचं लक्ष..
निवडून आल्यानंतर बापू पठारे यांना मंत्रिपद मिळणार?
वडगाव शेरीच्या सभेत सुप्रिया सुळे यांची घोषणा?
महाविकासआघाडीचे सरकार आल्यास ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून बापू पठारे कॅबिनेट मंत्री असतील?
बापू तुमच्याकडून फार अपेक्षा आहेत, मला एक शब्द द्या
तुमच्या मतदारसंघात अपघात झाल्यास पोलीस स्टेशनला न जाता रुग्णालयात जाल..
रुग्णालयात जाऊन त्या गरीब माणसाला मदत कराल
नागपुरमध्ये मद्यसाठ्यासह 37 लाख 71 हजारांचा मुद्देमाल जप्त
धरमपेठ परिसरात महागड्या विदेशी स्कॉच मद्याचा साठा जप्त करण्यात आला
राज्य उत्पादन शुल्क विभागाने सिताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत धरमपेठ परिसरात ही कारवाई केली
महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला मद्याचा हा साठा हरियाणा राज्यातील आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.