Maharashtra News Live Updates: अजित पवारांना मोठा दिलासा, आयकर विभागाने जप्त केलेली मालमत्ता केली मुक्त

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 4 December 2024: आज शुक्रवार दिनांक ६ डिसेंबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, महाराष्ट्रातली थंडी, राज्यात आज पाऊस, संसदेचे हिवाळी अधिवेशन अपडेट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी, नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे अपडेटसह मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking Live Marathi Headlines Updates 6 December 2024
Maharashtra Live News UpdatesSaam tv
Published On

Ajit Pawar News : अजित पवारांना मोठा दिलासा, आयकर विभागाने जप्त केलेली मालमत्ता केली मुक्त

अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आयकर विभागाने जप्त केलेली मालमत्ता मुक्त केली आहे. दिल्ली ट्रिब्यूनल कोर्टाने निर्णय दिला आहे. पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी सबंधित जप्त मालमत्ताही कोर्टाने मोकळी केली आहे. स्पार्कलिंग सॉइल, गुरु कमोडिटी, फायर पॉवर अग्री फार्म आणि निबोध ट्रेडिंग कंपनीशी सबंधित मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या.

Badlapur Accident : बदलापुरातील भीषण अपघात; भरधाव ट्रकने दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू 

बदलापूरच्या वडवली भागात भरधाव ट्रकने दोघांना उडवलं. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाय. मरण पावलेल्या व्यक्तीचं नाव संतोष पडवळ असं असून तो जीवन प्राधिकरणाचा कर्मचारी आहे. तर एक जण किरकोळ जखमी झालाय.

आज संध्याकाळच्या सुमारास सिमेंटच्या विटांनी भरलेला हा ट्रक वडवली भागातल्या म्हात्रे लॉन्स समोरून वेगाने जात होता. त्याचवेळी रस्त्याच्या कडेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात कंत्राटी तत्त्वावर काम करणारे दोन कर्मचारी जात होते. या ट्रकने दोघांना जोरदार धडक दिली. त्यात संतोष पडवळ यांच्या अंगावरून ट्रक गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

madhukar pichad Death : मधुकर पिचड यांचं निधन, ८४ व्या वर्षीय घेतला अखेरचा श्वास 

मधुकर पिचड यांचं निधन झालं आहे. त्यांनी ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

madhukar pichad : ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांची प्रकृती खालावली

- ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांची प्रकृती खालावली आहे.

- गेल्या अनेक दिवसांपासून सुरू रुग्णालयात उपचार आहे

- ब्रेन स्ट्रोक आल्याने दोन महिन्यांपासून रुग्णालयात सुरू उपचार आहेत

- माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांची प्रकृती चिंताजनक असल्याची डॉक्टरांनी दिली माहिती

Wardha Rain Update : वर्धा जिल्ह्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस

- वर्धा जिल्ह्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस सुरु आहे.

- अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

- मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते.

- आज संध्याकाळी बरसल्या पावसाच्या सरी

- पावसाच्या सरी बरसल्याने थंडी वाढणार

- अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांच्या तूर पिकांसह फळबागाना बसणार फटका

- वर्धा जिल्ह्याच्या देवळी, वर्धा, आर्वी, कारंजा आणि हिंगणघाट तालुक्याच्या काही भागात पाऊस

Pune News : पुणे-बेंगळुरु महामार्गावर गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा सेफ्टी वॉल लिक

पुणे बेंगळुरु महामार्गावर एलपीजी गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा सेफ्टी वॉल लिक झाला आहे. या गॅस टँकरमधून होणाऱ्या गॅस गळतीमुळे रस्त्यावरील वाहतुकीला धोका झाला निर्माण

गॅस गळती थांबविण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचा अग्निशमन घटनास्थळाकडे रवाना

Mahayuti : ठरलं! महायुतीच्या मंत्र्यांच्या शपथविधीच्या तारखेबाबत मोठी अपडेट समोर 

शिवसेना आमदार संतोष बांगर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी पोहोचले आहेत.

१०-१२ तारखेला महायुतीचा शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे.

अनेक नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेत आहेत.

Pune News : पुणे शहरात खोट्या ब्रँडेड कपड्यांच्या दुकानावर कारवाई

पुणे शहरात आणखी एका फेक ब्रँडेड कपड्यांच्या दुकानावर करवाई

कोरेगाव पार्क परिसरातल्या एनक्लॉथ नावाच्या दुकानावर छापेमारी

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची करवाई

करवाईत फेक ब्रँडेड कपड्यांसह ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी २ जणांवर गुन्हा दाखल

Ajit pawar : अजित पवारांकडून महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकरी अनुयायांना भोजन वाटप

महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने अजित पवार यांच्याकडून आंबेडकरी अनुयायांना भोजन वाटप करण्यात आलं. दादरच्या शिवाजी पार्क मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टॅालवर सकाळी अजित पवार पोहचले. अजित पवारांनी स्वत: आंबेडकरी अनुयायाना जेवणाचे डबे आणि पाण्याचे वाटप केले.

Bhiwandi News: भिवंडीमध्ये पेरणा कॉम्प्लेक्स येथील गोदामाला भीषण आग

भिवंडी तालुक्यातील राहणाळ येथे पेरणा कॉम्प्लेक्स येथील गोदामाला भीषण आग

गोदामा मध्ये ठेवण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक सामानाला आग लागली असल्याची माहिती

आगीचे कारण अस्पष्ट

घटनास्थळी अग्निशामक दलाची एक गाडी व एक पाण्याचा टँकर दाखल

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरू

आगीत संपूर्ण गोदाम जवळून खाक

Mumbai News: कालिदास कोळंबकर यांनी घेतली हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ

विशेष अधिवेशासाठी भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांनी घेतली हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ

विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी राज भवनात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी दिली हंगामी अध्यक्षांना शपथ

विशेष अधिवेशासाठी भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती

Mumbai News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज भवनावर दाखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज भवनावर दाखल

उद्यापासून सुरु होणार विधानसभेचे विशेष अधिवेशन

विशेष अधिवेशासाठी भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती

विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी राज भवनात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हंगामी अध्यक्षांना शपथ देणार

हंगामी अध्यक्षांनी शपथ घेतल्यानंतर विशेष अधिवेशनात आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाणार

Ratnagiri News: रत्नागिरी जिल्ह्यात कोणाला मिळणार मंत्रिपद याकडे सर्वांचं लक्ष

नव्या सरकारचा शपथविधी झाला, आता जिल्ह्यात कोणाला मिळणार मंत्रिपद याकडे सर्वांचं लक्ष

उदय सामंत, योगेश कदम, शेखर निकम यांची नावं चर्चेत

उदय सामंत यांचं नाव आघाडीवर

संधीचं सोनं करेन : काही दिवसांपूर्वी योगेश कदम यांनी व्यक्त केला होता विश्वास

शेखर निकमांसाठी पदाधिकारी आणि समर्थकांकडून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन

तिघांपैकी कोणाला मंत्रिपद मिळणार याकडे जिल्ह्याचं लक्ष

Jalna News: जालन्यात अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका

जालन्यात अवकाळी रिमझिम पावसाचा द्राक्ष बागायतदारांना फटका

द्राक्ष बागांवर डावनी सह इतर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव, द्राक्ष बागातदार अडचणीत

जालन्याच्या तहसीलदार छाया पवार यांनी शेतात जाऊन केली पाहणी

मात्र कृषी विभागाचे सपशेल दुर्लक्ष

Maharashtra Politics: विधानसभेचे एकूण २८८ प्रतिनिधी उद्या घेणार आमदारकीची शपथ

आमदारांच्या विधानसभेतील ज्येष्ठतेच्या क्रमवारीनुसार शपथ दिली जाणार

विधानसभेचे एकूण २८८ प्रतिनिधी उद्या घेणार आमदारकीची शपथ

राज्यातील निवडून आलेले प्रतिनिधी आमदारकीची शपथ घेणार

हंगामी अध्यक्षांनी आज शपथ घेतल्यानंतर विशेष अधिवेशनात आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाणार

विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदावर भाजपाचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती

Mumbai News: ८ डिसेंबर रोजी नव्या अध्यक्षपदासाठी भरला जाणार उमेदवारी अर्ज

८ डिसेंबर रोजी नव्या अध्यक्षपदासाठी भरला जाणार उमेदवारी अर्ज

भाजपकडून ८ डिसेंबरला दुपारी बारा वाजेपर्यंत अर्ज भरला जाणार

९ डिसेंबरला होणार नव्या अध्यक्षाची निवड

राहुल नार्वेकर यांना पुन्हा संधी मिळणार की नवा अध्यक्ष होणार याकडे सर्वांचे लक्ष?

उद्यापासून सुरु होणार राज्याचे विशेष अधिवेशन

Mumbai News: मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उद्या राज्यातील महायुतीच्या नेत्यांची बैठक

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उद्या राज्यातील महायुतीच्या नेत्यांची बैठक

महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिन्ही वरिष्ठ नेत्यांची आज बैठक पार पडली

प्रफुल पटेल यांच्या सीजे हाऊस येथील निवासस्थानी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्यात १ तास बैठक

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बैठकीत चर्चा

बैठकीत ७ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्री पदाचे चेहरे निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती

Delhi News: राज्यसभेत विरोधी पक्षाचा गोंधळ

राज्यसभेत विरोधी पक्षाचा गोंधळ

काल काँग्रेस खासदारांच्या बेंचवर नोटांचे बंडल मिळाल्याच दावा

काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवी यांच्या बेंच वर बंडल सापडल्याचा आरोप

घडलेली घटना निंदनीय - जे पी नड्डा

ही गंभीर घटना आहे - जे पी नड्डा

Mumbai News : बाबासाहेबांमुळे अखंड भारत टिकून आहे - छगन भुजबळ

बाबासाहेबांमुळे अखंड भारत टिकून आहे

कुणीच हे संविधान बदलू शकत नाही, पंतप्रधानांनीही हे स्पष्ट केलंय

घटना ही लोकशाहीवर आधारीत आहे

लोकांना मतदानाचा अधिकार या घटनेनंच दिलाय

इंदू मिलच्या जागेवर एक जागतिक दर्जाचं भव्य स्मारक उभारलं जातंय, त्याबाबत प्रत्येकजण काहीतरी सतत सुचवत असतो. त्यामुळे थोडा उशिर होणं स्वाभाविक आहे.

एका पक्षाचं सरकार येत तेव्हाही खातेवाटपाच्या मुद्यावर एकवाक्यता नसते, इथं तर तीन पक्ष आहेत. पण सर्व मुद्यांवर एकत्र बसून चर्चा केरून तोडगा काढला जाईल

Mumbai News: 8 वेळा आमदार राहिलेल्या बाळासाहेब थोरात यांना आम्ही पराभूत करू शकलो ते संविधानामुळे - अमोल खताळ

शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी चैत्यभूमिवर अभिवादन केलं

यावेळी त्यांनी माझ्यासारख्या सामान्य माणसाला संविधानामुळेच आमदार बनण्याची संधी मिळाली.

आठ वेळा आमदार राहिलेल्या बाळासाहेब थोरात यांना आम्ही पराभूत करू शकलो ते संविधानामुळे

लोकसभेच्या वेळी त्यांनी संविधानाबाबत फेक नेरेतिव्ही केलं होतं. त्याला लोकांनी आता विधानसभेला उत्तर दिलं आहे.

मी भाग्य समजतो मी प्रथमच चैत्यभूमीवर अभिवादनासाठी आलो आहे

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील 5 मतदारसंघातील 44 केंद्रांवर होणार 'मॉक पोल'

कोल्हापूर जिल्ह्यातील 5 मतदारसंघातील 44 केंद्रांवर होणार 'मॉक पोल'

निवडणूक आयोगाची माहिती

मॉक पोल घेण्यासंदर्भातली तारीख लवकरच जाहीर होणार

कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर दक्षिण, उत्तर, करवीर, चंदगड आणि हातकणंगले या 5 मतदार संघातून तक्रारी दाखल झाल्या

करवीर मतदार संघामधून सर्वाधिक 14 केंद्रावरील मतमोजणीवर घेण्यात आला आक्षेप

ईव्हीएम मशीन मधील मतदानावरच उमेदवारांचा आक्षेप

निवडणूक आयोगाने घेतली दखल

Bhandara News: मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअपला अपघात, १५ जण जखमी

मजुरांना घेऊन जाणारा पिकअप वाहन उलटून अपघात

दोघे जण गंभीर तर १५ मजूर जखम

भंडाऱ्याच्या करडी येथील घटना

Bhandara News: भंडाऱ्याच्या बीड-सितेपार मार्गावर अपघात, विद्यार्थ्याला ट्रकने चिरडले

भंडाऱ्याच्या बीड-सितेपार मार्गावर अपघात

भरधाव ट्रकने दुचाकीस्वार शाळकरी मुलाला चिरडले

नागरिकांनी आक्रोश व्यक्त करत अडवून ठेवला मार्ग

Mumbai News: महायुतीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या नजरा पुन्हा मुंबईकडे, अनेक आमदार मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत

महायुतीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या नजरा पुन्हा मुंबईकडे

महायुती चे अनेक नेते आता मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत

मंत्री होऊ पाहणाऱ्या अनेकांची धाकधूक वाढली

महायुती मधील अनेक आमदारांना "त्या" फोन ची अपेक्षा

नेत्यांच्या निरोपाकडे कार्यकर्त्यांचे डोळे

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथविधी नंतर इतर मंत्र्यांचे शपथविधी कधी होणार याकडे लक्ष

अन्य मंत्रिमंडळाचा शपथविधी ११ डिसेंबरला होण्याची शक्यता

Mumbai News: विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती होणार

विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी आज राजभवनामध्ये राज्याचे राज्यपाल हंगामी विधानसभा अध्यक्ष यांना शपथ देणार.

राज्याच्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती होणार

आज ते हंगामी अध्यक्ष म्हणून राजभावनात जाऊन घेणार शपथ

विशेष अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड केली जाते

आज या हंगामी अध्यक्षांना शपथ दिली जाईल

7, 8 आणि 9 डिसेंबर या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशन दरम्यान हे हंगामी अध्यक्ष विधानसभेतील नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com