
जळगाव संजय राऊत यांनी घेतली सुरेश दादा जैन यांची भेट. विमानतळावर आगमन होतास शिवसेने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विमानतळाच्या प्रतीक्षा कक्षात बसलेल्या माजी मंत्री सुरेश जैन यांची भेट घेतलं. सुरेश जैन हे शिवसेना ठाकरे पक्षात होते मात्र लोकसभेत त्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. आता संजय राऊत आणि सुरेश जैन यांच्यात बंदद्वार चर्चा सुरू आहे.
नाशिकच्या देवळा तालुक्यातील निंबोळा येथे 55 वर्षीय अनिल आहेर यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना आज सकाळ च्या सुमारास उघडीस आलीय,अनिल आहेर हे मूळचे कळवण तालुक्यातील निवाणे गावचे असून त्यांची शेती निंबोळा येथे असल्याने आठवड्यातून 2/3 दिवस ते शेतावर जात असत मात्र आज त्यांचा मृत देह आढळून आल्याने गावकऱ्यांनी पोलसात याची माहिती दिली.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मुंबई विद्यापीठाच्या कलिना कँपसमध्ये ठिय्या आंदोलन केलं. मुंबई विद्यापीठाचे अंडर आणि पोस्ट ग्रॅज्युएशन प्रवेशसाठीचं अॅप 4 ते 5 दिवस बंद होतं.
छत्रपती संभाजीनगरमधे गेल्या काही दिवसापासून स्कील गेमच्या नावाखाली शहरात अवैध ऑनलाइन लॉटरी सेंटरचा सुळसुळाट झाला आहे. या लॉटरीमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत असल्याच्या तक्रारी आहेत. अशाच छावणी परिसरात सुरू असलेल्या अवैध पाच सेंटरवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी साडेपाच लाख रुपयाचा ऐवज जप्त केला आहे.
नांदेड जिल्हयातील माहुर येथे भाविकांची कार घाटात कोसळली. घाटातून जात असताना वळणाचा अंदाज न आल्याने कार थेट ४० फूट दरीत कोसळली. या घटनेत कारमधील सहाजण जखमी झाले असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. तीर्थक्षेत्र असलेल्या माहुरच्या घाटात हा अपघात घडला.
अमीर खान व शाहरुख खान यांना बघायला मोठी गर्दी होते. मात्र याच आमिर खान शाहरुख खान याचं देशप्रेम पहलगाम हल्ल्याच्या वेळी दिसलं अशी उपरोधिक टीका नितेश राणे यांनी केली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं ते बोलत होते. यावेळी बोलताना मंत्री नितेश राणे यांनी अहिल्यादेवींनी घडवलेला ज्वलंत इतिहास सांगत अमीर खान शाहरुख खान सारख्या लोकांसोबत सेल्फी काढण्यापेक्षा ढोपर टेकून अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेसोबत सेल्फी घ्या असा सल्ला उपस्थितांना दिला
महाड MIDC तील इंडो अमाईन्स कंपनी गुरुवारी रात्री वायु गळती झाली होती. यामध्ये गीतेश शिंदे या कामगाराला गॅस लागला होता. या प्रकरणी इंडो अमाईन्स कंपनीचा मॅनेजर रामभाऊ आरोटे, सेफ्टी मॅनेजर सचिन जांभळे आणि प्लँट मॅनेजर प्रतिक गरुड याच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विषारी वायू पासून कामगाराचे संरक्षण आणि उपकरणांची देखभाल दुरुस्तीमध्ये निष्काळजीपणा केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
कल्याण जवळील बल्यानी परिसरात शाळेची भिंत कोसळली
केबीके इंटरनॅशनल स्कुलची भिंत अचानक कोसळल्याने तीन ते चार विद्यार्थी जखमी असल्याची माहिती
तर यात एक विद्यार्थी गंभीर जखमी असल्याची माहिती
पोलीस अग्निशामक दल व पालिका कर्मचारी घटनास्थळी दाखल
जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
मुंब्रा-शिळफाटा बायपास रोडवर ट्राफिक जॅम
कंटेनर नाल्यात कोसळला
अर्धा तास वाहतूक थांबवली
क्रेनच्या साह्याने कंटेनरला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू
कोपरगाव शहरातील पुणतांबा फाटा येथे एसटी बस का थांबवली नाही? अशी दमबाजी करत कंडक्टर कानिफनाथ जेजुरकर यांना चार ते पाच प्रवाशांनी मारहाण केल्याची घटना घडलीय.. मारहाणीत जेजुरकर यांच्या डोक्याला दुखापत झाली असून, या प्रकरणी बस मधील प्रवासी सतीश काकडे, बापू काकडे आणि इतर तीन अनोळखी व्यक्ती विरोधात कोपरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय..
वांगणी-बदलापूर मुख्य हायवेवर आज सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. पावसामुळे इथला डांबरी रस्ता निसरडा झाल्यामुळे तीन वाहनं उलटली. दोन मालवाहू पिकअप आणि एका स्कूटरला अपघात झालाय. या अपघातात दोन वाहनचालक गंभीर जखमी झाले आहेत.
पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी दिनांक ३१ मे रोजी मध्यरात्री १२.०५ वाजल्यापासून ते १३ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
कोल्हापूर शहरातील राजारामपुरी परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ४० वर्षीय महिलेला साखळदंडाने गळ्यात आणि पायात बांधून ठेवण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या महिलेला लोखंडी साखळ्यांनी जखडून त्यावर कुलूप घालण्यात आले होते.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि महिलेची सुटका करून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. सद्यस्थितीत तिची तब्येत स्थिर असून, तिला वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात आलं आहे.
नांदेड समृद्धी महामार्गासाठी बळजबरीने शेतकऱ्यांच्या जमिनी घ्याल तर पोलीस,महसूल अधिकाऱ्यांच्या नजरा काढून टाकण्याचा आमच्यात दम, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा ईशारा.
जालना समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांची जमीन घेण्यासाठी प्रशासनाने बळजबरी केली तर याद राखा, पोलिस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची नजर काढून टाकण्याचा आमच्यात दम आहे.असा सज्जड ईशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महसूलसह पोलिस अधिकाऱ्यांना दिलाय.आज दानवे यांनी जालन्यातील देवमूर्ती येथे जाऊन शेतकऱ्याच्या धरणे आंदोलनाला भेट दिली यावेळी दानवे यांनी हा ईशारा प्रशासनाला दिलाय.गेल्या काही दिवसांपासून जालना- नांदेड समृद्धी महामार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमीनीचे फेर मूल्यांकन करून सिडको प्रकल्पासारखा मोबदला देण्यात यावा अशी मागणी देवमूर्ती गावातील शेतकऱ्यांची आहे. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी देवमूर्ती येथे धरणे आंदोलन सुरु केलंय.अंबादास दानवे यांनी ही जमिनीचे फेरमूल्यांकन झाल्या शिवाय जमिनीचे अधिग्रहण करू नये अशी मागणी केली.तसेच बळजबरीने जमीन संपादित करण्यास विरोध केलाय.
राष्ट्रवादी महिला काँग्रेस रोहिणी खडसे
हगवानेचे मामा पोलीस यंत्रणेत असल्याने पाठबळ
महिला आयोग ,हगवणेचे मामा आणि हगवणे एका सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता असल्याने तपास योग्य दिशेने होत नसल्याने हा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात यावा
गोकुळ शिरगाव एमआयडीसी परिसरातील गोकुळ दूध संघात संचालकांसह कार्यकर्ते येण्यास सुरुवात
गोकुळ अध्यक्ष पदासाठी कोणाचं नाव जाहीर होणार याची उत्सुकता
राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ यांच्या गळ्यात गोकुळ अध्यक्ष पदाची माळ पडण्याची शक्यता
कामगार कल्याण मंडळाच्या भांडे वाटप ठिकाणी गेल्या चार दिवासपासून सुरु असलेल्या भांडे वाटप ठिकाणी तोबा गर्दी.....
लाभार्थ्यांना तासन तास वाट पहावी लागत असल्याची परिस्थिती ...
संतप्त महिला लाभार्थ्यांनी थेट शेवाळी नेंत्रंग महामार्गावर रस्ता रोको केल्याचे पहायला मिळाले आहे.
नंदुरबार शहरातील बाहेरच्या उड्डाण पुला लगत असलेल्या ठेकेदाराच्या गोदामापाशी नागरीकांनी रस्तावर येत याठिकाणच्या नियोजनशुन्य कारभाराविरोधात नाराजी प्रकट करत रस्ता रोकून धरला. यामुळे या महामार्गावर काही काळ वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. नोंदणी साठी दिवसाला फक्त पाचशेची क्षमता असतांना तीन ते चार हजार नागरीक येत असल्याने यातूनच फज्जा उडत असल्याचे ठेकेदाराचे म्हणने आहे.
नाशिकच्या चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी नितीन आहेर यांची बिनविरोध निवड झाल्याने आहेर समर्थकांनी एकच जल्लोष केला. मावळते सभापती संजय जाधव यांच्यावर अविश्वास ठराव आणल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता,त्यामुळे रिक्त झालेल्या सभापतीपदाच्या निवडणुकीत नितीन आहेर यांचा एकमेव उमेदवारी दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सभापती नितीन आहेर हे उबाटा गटाचे चांदवड तालुक्यातील पधिकारी असून त्यांच्या निवडीमुळे चांदवड बाजार समितीत शिवसेना उबाटा गटाचा वर्चस्व निर्माण झाले आहे
सांगलीच्या आटपाडी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पुन्हा हटवण्यात आला आहे.आटपाडी प्रशासनाकडून सांगोला चौकामध्ये असणारा डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा पहाटेच्या सुमारास पोलीस बंदोबस्तामध्ये काढण्यात आला आहे.त्यामुळे आंबेडकर अनुयायांकडून याला विरोध करण्यात येत आहे.2 फेब्रुवारी 2025 रोजी पहिल्यांदा आंबेडकर अनुयायांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्यात आला होता. मात्र तो विनापरवान बसवण्यात आल्याचे कारण देत काढण्यात आला होता,त्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी संतप्त आंबेडकर अनुयांयकडून पुतळा बसवण्यात आला होता. मात्र आज पहाटेच्या सुमारास प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तात पुतळा पुन्हा हटवण्यात आला आहे,त्यामुळे सकाळपासून आटपाडी मध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी त्याच्या जखमेवर मीठ चोळण्याच काम सरकारमधील मंत्री करत आहेत... तुपकर
बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना आवरा, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ... शेतकऱ्यांचा संयम तुटण्याची वाट सरकारने पाहू नये...
शेतकऱ्यांसंदर्भात कृषिमंत्री यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून रविकांत तुपकर संतप्त...
माण तालुक्याला पावसाने झोडपल्यानंतर हजारो शेतकऱ्यांचं कोट्यावधींचे नुकसान मंत्री जयकुमार गोरे यांनी केली नुकसानीची पाहणी सरकारकडून मदतीसाठी शेतकऱ्यांचा टाहो
अँकर-माण तालुक्यातील झालेल्या पावसामध्ये अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यामध्ये टोमॅटो आणि कांद्याचं पीक जमीनदोस्त झालेलं पाहायला मिळालं या नुकसानीची पाहणी मंत्री जयकुमार गोरे यांनी केली आणि शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन सुद्धा दिले मात्र हे नुकसान किती प्रमाणात आहे
दापोली तालुक्यातील वणंद येथील नदीत पाण्याच्या मोठ्या प्रवाहात वाहून गेल्याने राजेश कोळंबे यांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या दुर्घटनेची तातडीने दखल घेत महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी कोळंबे यांच्या निवासस्थानी भेट देवून, कुटुंबियांचे सांत्वन केले. शासनाच्यावतीने चार लाखाच्या मदतीचा धनादेश त्यांनी कुटुंबियांकडे सुपूर्द केला.कोळंबे यांची कन्या प्रज्ञा हिला बारावीत ८३ टक्के गुण मिळाले आहेत. तिला तसेच दहावीत असणाऱ्या भावाच्या पुढील शिक्षणासाठी 'कोणती मदत लागली तर मला सांगा मी तुमच्या बरोबर आहे, अशा शब्दात राज्यमंत्री श्री कदम यांनी कोळंबे कुटुंबीयांना धीर दिला.
पावसामुळे शेतीच्या आणि शेतीमालाच्या झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत देण्याऐवजी, कशाचे पंचनामे करायचे? ढेकळांचे का? असे वादग्रस्त विधान कृषिमंत्र्यांनी केले आहे.. कृषिमंत्र्यांनी हे विधान मागे घेत माफी मागावी आणि राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करत मदत करावी, अन्यथा किसान सभेच्या वतीने याबाबत तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा शेतकरी नेते अजित नवले यांनी दिलाय..
निलेश चव्हाणला अटक करण्याची परवानगी मिळावी यासाठी पुणे पोलिसांचा न्यायालयात अर्ज
या अर्जावर आज निर्णय येण्याची शक्यता
निलेश चव्हाणची मालमत्ता जप्तीसाठी बावधन पोलिसांकडून हालचाली सुरू परवानगी मिळावी म्हणून पोलिसांनी न्यायालयात अर्ज केलाय
याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.स्नेहल हरिश्चंद्र कांबळे (३२, रा. लोणी काळभोर) असे महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार आणि आरोपीची ओळख गावातील एक महिलेच्या माध्यमातून झाली होती. त्या महिलेच्या घरातील कौटुंबिक केसही आरोपीने घेतली होती.
फिर्यादीचा मुलगा आणि सुनेमध्ये वाद आहेत.मुलाला सुनेपासून सोडचिठ्ठी मिळवून देते, असे आश्वासन कांबळे हीने दिले होते.यासाठी वेळोवेळी तीने ५ लाख ९४ हजार उकळले. दरम्यान, तीने पुन्हा एकदा तुमची सून मुलावर बलात्काराची केस करीत महिला आयोगाकडे तक्रार करणार आहे, अशी भीती दाखवत पुन्हा त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. फिर्यादीने वैतागून तक्रार केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला.यामध्ये तीला १५ हजार घेताना रंगेहाथ पकडण्यात आले..
बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात सध्या हाय हॉल्टेज ड्रामा सुरू आहे एका केबिन मध्ये जूने जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे आणि दुसऱ्या केबिन मध्ये नवीन जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे आणि दोन्ही एकाच खुर्ची साठी दावा सांगत आहेत बुलढाणा येथे जिल्हा पोलिस अधीक्षक असलेले विश्व पानसरे यांची काही दिवसापूर्वी बदली झाली होती त्या विरोधात ते cat प्रशासकीय न्यायिक प्राधिकरण मध्ये जाऊन त्यांनी बदली वर स्थगिती मिळवली दरम्यान त्यांच्या जागी निलेश तांबे बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक पदावर रुजू ही झाले आज विश्व पानसरे केबिन मध्ये येऊन बसले तर दुसरी कडे निलेश तांबे बसून काम करत आहेत मात्र पोलिस अधिकारी आणि कर्मचारी मात्र तणावात आहेत या बाबत विश्व पानसरे byte द्यायला तयार नाहीत पण अनौपचारिक चर्चेत त्यांनी मी 7 दिवस वैद्यकीय रजेवर होतो आता रुजू झालो असे सांगितले या वर मला काही बोलायचे नाही असे ते म्हणाल
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील भांडगाव येथील विश्वरुपा नदिवरील बार्शीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पर्यायी पुल वाहुन गेला
त्यामुळे बार्शीकडे जाण्याचा संपर्क तुटला,दुध उत्पादक शेतकऱ्यांना दुध नेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली.
जेसीबी मशीनवर बसुन दुध उत्पादकांचा डेअरीवर दुध घालण्यासाठी प्रवास करावा लागला.
प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन रस्त्याची सोय करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
वैष्णवी हगवणे प्रकरणात हगवणेच्या वकिलाने केलेल्या युक्तिवादावरून रोहिणी खडसे यांनी वकिलाला कानाखाली मारणाऱ्याला बक्षीस जाहीर केलं होतं
वकिली व्यवसायात आपल्या वकिलाला कायद्यानुसार आपला युक्तिवाद करता येत असतो त्यामुळे रोहिणी खडसे यांच्यावर कारवाई करा
आपल्या ग्राहकाचा बचाव करण्याचा पूर्ण अधिकार वकिलाला कायद्याने दिलेला आहे त्यामुळे रोहिणी खडसे यांची वक्तव्य वकिलावर दबाव आणि धमकी टाकण्याचा प्रयत्न अशा पद्धतीचा असल्याचं मत
पुणे बार असोसिएशन ने महाराष्ट्र बार कौन्सिल ला रोहिणी खडसे यांच्यावर कारवाई करण्यासाठी पत्र पाठवला आहे.
आमदार रवीना हे आश्वासक समितीचे अध्यक्ष असल्याने सरकारने जे फासेपारधी समाजाला आश्वासन दिले ते पूर्ण करण्याची मागणी.....
फासे पारधी समाजाला इतर विकास महामंडळ प्रमाणे महामंडळ मिळावे....
यासोबतच फासेपारधी समाजाच्या विकासासाठी आर्थिक महामंडळ सुद्धा स्थापन व्हावे...
फासे पारधी समाजाचे रखंडलेले घरकुलाचे प्रश्न मार्गी लावावे.......
जोपर्यंत मुख्यमंत्र्यांसोबत आमचं बोलणं करून देणार नाही व आमची मीटिंग मंत्रालयात लावणार नाही तोपर्यंत आम्ही रवीना यांच्या घरासमोरून हटणार नाही फासे पारधी समाजाचा निश्चय..
आमदार रवी राणा यांच्या घरासमोर फासेपारधी समाजाचे ठिय्या आंदोलन सुरू
मुसळधार पावसामुळधार पावसामुळे पेरणीच्या कामात खोळंबा
पावसानं थोडी उसंत घेतलीय त्यामुळे आता पेरणीच्या कामाला कोकणात सुरुवात झालीय
कोकणात आजही पारंपारीक शेती केली जातेय
ढवळ्या पवळ्याची जोडी आजही शेतात दिसतेय
तांत्रिक बिघाडामुळे मुंबईहून लेहला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचं उड्डाण होऊ शकलेलं नाही. त्यामुळे गेल्या साडेतीन तासांपासून जवळपास 60हून अधिक प्रवासी मुंबई विमानतळावर खोळंबले आहेत. इंडिगो प्रशासनाकडून समाधानकारक उत्तरं मिळत नसल्यामुळे संतप्त प्रवाशांनी गोंधळ सुरू केलाय.
मुंबईहून आज सकाळी 7.30 वाजता 6E803 हे इंडिगोचं विमान लेहसाठी रवाना होणार होतं. मात्र विमानाचं टायर पंक्चर असल्यामुळे उड्डाणाला उशीर होईल अशी सूचना इंडिगोकडून प्रवाशांना देण्यात आली. मात्र आता साडेतीन तास उलटले तरीही प्रवाशांची पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. विमान कधी निघणार याबाबत प्रवाशांकडून विचारणा केल्यानंतरही इंडिगो प्रशासनाकडून कोणतही ठोस उत्तर दिलं जात नाही त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
राज्यात लवकर दाखल झाल्याने याचा परिणाम शेती सोबतच मासेमारी व्यवसायाला देखील बसताना पाहायला मिळत आहे
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेतून वाहणाऱ्या नर्मदा नदी पात्राजवळ राहणारे शेकडो आदिवासी बांधव मासेमारीचा व्यवसाय करत नर्मदा नदीतून सर्वात जास्त मागणी ही भातमाश्याला असते
मात्र लवकर आलेल्या पावसामुळे याचा फटका आता मासेमारी व्यवसायाला बसला असून भात माश्याचे दर झपाट्याने कमी झाले आहे
नर्मदा नदीतून काढलेले मासे उन्ह नसल्याने सुकत नाही परिणामी ते खराब होत गेल्या 6 महिन्यात तब्बल दीडशे टन मासेच उत्पादन झालं आहे
पावसामुळे 200 ते 250 किलो दराने विकले जाणारे भात मासे आता 150 रुपये किलो दराने विकले जात आहेत झपाट्याने कमी झालेल्या दरामुळे मासेमारी करणाऱ्या आदिवासी बांधवांना लाखोंचा फटका बसला आहे ...
गृह विभाग सुपेकर यांची चौकशी करणार का?
हगवणे बंधू यांना शस्त्र परवाना बनावट कागदपत्रांवर मंजुरी देऊन दिल्या गेल्याची माहिती
शशांक हगवणे याचे मामा जालिंदर सुपेकर हे तेव्हा पुण्याचे तत्कालीन अपर पोलिस आयुक्त होते
सुपेकर यांना त्यांचे भाचे पुणे शहरात राहत नसल्याची माहिती असताना सुद्धा त्यांनी परवाना देण्यासाठी कागदपत्रांवर सही केली?
जालिंदर सुपेकर हे सध्या पुणे येरवडा कारागृहाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत
मस्तीत पिस्तुल लोड करून हवेत गोळी फायर करत असताना त्याच्याच मावस भावाच्या खांद्यातून गोळी आरपार गेली
गावठी पिस्तुलातून हा गोळीबार झाल्याची माहिती
पुण्यातील हडपसर पोलिसात गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी वैभव श्रावण गवळी (वय 20) हा त्याचा मावस भाऊ सुमित खवळे, बसवराज सुतार यांचेसह काल रात्री 08.15 वाजताच्या सुमारास दुचाकीवरून हडपसर मधील पांढरे मळा कॅनॉल येथे वाढदिवसाकरिता जात होता.
यावेळी सुमित खवळे याने त्याचे जवळ अवैध्यरित्या बाळगलेल्या गावठी कट्ट्यामधून गोळी सुटून त्याचे समोर त्याचे गाडीवर असलेल्या वैभव गवळी याचा डाव्या खांद्यावर लावली आणि यात तो जखमी झाला
सध्या त्याच्यावर ससून हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून तो सुस्थितीत आहे
जखमी इसम वैभव गवळी व सुमित खवळे हे एकमेकांचे मावसभाऊ आहेत
सुमित खवळे आणि त्याने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व गावठी कट्टा जप्त केला आहे
पोलिस गुन्हा नोंद करून पुढील तपास करीत आहेत
जुन्नर तालुक्यातील उंब्रज नं. १, उंब्रज नं. २, काळवाडी आणि पिंपळवंडी या गावांमध्ये झालेल्या घरफोडी व चोरीच्या गुम्ह्यातील आरोपींना आळेफाटा पोलीसांनी मुद्देमालासह अटक केलीय
या प्रकरणी अक्षय शिंगोटे याला मुद्देमालासह अटक केली असुन मोबाईलची तांत्रिक माहिती, बँक व गोल्ड लोन खात्यांचे तपशील तपासून, चौकशीत त्याने गुन्ह्यांची कबुली दिलीय..
आषाढी यात्रेच्या तोंडावर अकलूज व माळीनगर येथे दोन संशयित कोरोना रुग्ण...
कोरोना रूग्ण आढळून आल्याने प्रशासनामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
माळशिरसच्या वैद्यकीय अधिकारी प्रियंका शिंदे यांचा दुजोरा....
लातूरच्या चाकूर तालुक्यातील आष्टा येथे विजेचा धक्का बसून नवविवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे...
पुणे येथून गावी इंजिनिअरिंगची परीक्षा देण्यासाठी आलेल्या अर्पिता गौरव शेळके वय 21 ही घरात कपडे वाळवत असताना तिला विजेचा धक्का लागला.
अर्पिता हिला उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला..
तर हा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केलाय.या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला आहे., तर अधिकचा तपास करत आहेत..
मावळच्या कार्ला येथील दत्ता येवले या शेतकऱ्याने आपल्या दीड एकर शेतामध्ये बीन्स या पिकाची लागवड केली होती. पीकही जोमात आले होते. मात्र गेले दहा दिवस मावळमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसाने त्यांच्या शेतात पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे तोडणीस आलेले बीन्स पीक वाया गेले आहे. सर्व पीक पाण्याखाली असल्याने सर्व बीन्स ची झाडेही कुजून जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लाखोंची नुकसान झाले आहे...
या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे यांनी थेट खड्ड्यात झोपून आगळावेगळे आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केलाय. यावेळी सर्वपक्षीय नेते, सामाजिक संघटना, व्यापारी, शैक्षणिक संस्था आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
आंदोलनाची एस.टी. महामंडळाने दखल घेत मागण्या मान्य करत पुन्हा लेखी आश्वासन दिले, मात्र याआधीही अशाच आश्वासनांना हरताळ फासल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. मागण्यांमध्ये – बसस्थानकात नव्या बसगाड्या, मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण, स्वच्छतागृहांत पाणी, पिण्याचे शुद्ध फिल्टर, महिलांसाठी हिरकणी कक्ष, आणि सुरक्षेच्या सुविधा यांचा समावेश आहे.
तुळजापुर येथील तुळजाभवानी मंदीर संस्थान च्या कार्यालयासमोर अखील भारतीय भट्राचार निर्मुलन संघर्ष समीतीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आलय तुळजाभवानी मंदीराच्या लेखापालाची 2013 पासुन ते आजपर्यंत कामकाजाची चौकशी करुन कारवाई होत नसल्याने आंदोलन करण्यात आले तर तुळजाभवानी मंदीर संस्थानने 47 जणांची भरती प्रक्रीया राबविली ज्यामध्ये 13 ते 15 पदे वाढविण्यात आली परंतु मंदीराच्या संकेतस्थळावर कुठलीही माहिती न देता ही पदे भरण्यात आली त्यामुळे वाढीव पदाची चौकशी करुन संबधितावर कारवाई होत नसल्याने हे आंदोलन करण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य प्रशासनाने करोनाच्या दृष्टीने सर्व तयारी केलेली आहे
तसेच पनवेल महानगरपालिकेचे कार्यक्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या 3वर पोचली आहे
पनवेल महानगरपालिकेने सुद्धा खबरदारी घेतलेली आहे
धाराशिव जिल्ह्यातील ईट परिसरामध्ये रात्री उशिरा एक ते दीड तास जोरदार पाऊस झाला,ढगफुटी सदृश्य पावसाने या परिसरामध्ये सर्वत्र पाणीच पाणी केले.या ढगफुटी सदृश्य पावसाने इट गावातील दुकानात आणि विविध कार्यालयात पाणी शिरले,त्यात दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे, तर दुसरीकडे परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दीड वर्षांपूर्वी डॉ. राजेंद्र भोसले यांची राज्य सरकारने पदोन्नतीने पुणे महानगरपालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती केली. या दीड वर्षांच्या कार्यकाळात पुणे महानगरपालिकेत लोकनियुक्त प्रतिनिधी नसताना व आवश्यकता नसताना हजारो कोटिंचे अनावश्यक टेंडर काढून अनेक चुकीचे धोरणात्मक निर्णय घेतले. या धोरणशून्य निर्णयांचा त्रास आज समस्त पुणेकरांना सहन करावा लागत आहे व पुढील अनेक वर्षे याचे विपरीत परिणाम पुणे शहरात उद्भवणार आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. राजेंद्र भोसले यांच्या नियुक्तीपासून दिनांक २९ मे २०२५ पर्यंत त्यांनी घेतलेल्या सर्व आर्थिक व धोरणात्मक निर्णयांची श्वेतपत्रिका राज्य सरकारने जाहीर करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राज्य सरकारकडे केली आहे. तशा आशयाचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
मॉन्सूनपूर्व पावसाचे दमदार आगमन यामुळे वेळेआधी मच्छीमार हंगाम संपुष्टात आला. वादळी वारा आणि पाऊस यामुळे समुद्रकिनारी भागातील वातावरण खराब असल्याने मच्छीमार बांधवांनी मच्छीमारी नौका बंदरामध्ये उभ्या करून ठेवायला प्राधान्य दिले होते. त्यामुळे गेल्या दहा दिवसांमध्ये नाटे बंदरामध्ये होणारी सुमारे 50 लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. येत्या रविवारपासून मासेमारी बंदीचा कालावधी सुरू होणार असल्याने मासेमारीच्या अंतिम टप्प्यात चांगले पैसे मिळविण्याच्या मच्छीमारांच्या आशेवर निसर्गानेच पाणी ओतले आहे.
सिंहगडावर वन विभाग पुरातत्व विभाग महसूल विभाग आणि जिल्हा परिषदेकडून संयुक्त अतिक्रमण कारवाई सुरू
ही कारवाई आज ही सुरू राहणार असल्याने सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद
आपत्ती व्यवस्थापन विषयक पाहणीसाठी सिंहगड पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती काल वन विभागाने दिली होती मात्र रात्री अतिक्रमण कारवाई करण्यात आली
ही अतिक्रमण कारवाई आजही सुरू असणार आहे त्यामुळे आजही पर्यटकांना सिंहगड किल्ला वरती प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे
जिल्ह्यात पाच दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे तीन हजारांपेक्षा जास्त कुटुंबांना फटका
पावसाने सहा ते सात जणांचा बळी अतिवृष्टीमुळे पशुधनाचेही मोठे नुकसान
जिल्ह्यातील नुकसानग्रस्त गावातील पंचनामे सुरू, दोन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करून बाधितांना तातडीने मदत करण्यात येणार
इंदापूर, दौंड आणि बारामती या तालक्यांत पाच दिवसांपूर्वी ढगफुटीसदृश पाऊस झाला. या तिन्ही तालुक्यांतील अनेक गावांना अतिवृष्टीचा फटका बसला. पावसामुळे शेतशिवारांमध्ये पाणी साचले
शेतातील चिखलामुळे काढणीला आलेल्या विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्यही वाहून गेले.
पंचनामा करून बाधित क्षेत्राची संख्या निश्चित होईल. त्यानंतर बाधित नागरिक आणि शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाकडून तातडीने मदत पोहोचविली जाणार
नवी मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य प्रशासनाने करोनाच्या दृष्टीने सर्व तयारी केलेली आहे.
तसेच पनवेल महानगरपालिकेचे कार्यक्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या 3वर पोचली आहे.
पनवेल महानगरपालिकेने सुद्धा खबरदारी घेतलेली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिल्लेगावमध्ये दरोडाच्या तयारीत असलेल्या टोळीला ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले. त्यामुळे आणखी एक सशस्त्र दरोडा टळला आहे. शिल्लेगाव पोलिसांनी सिनेस्टाईल कारवाई करीत तीन दरोडेखोरांना पकडल्याने शिल्लेगाव परिसरातील जिल्ह्यातील आणखी एका दरोड्याची घटना टळली आहे. गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या बाहेर एक व्यक्ती रेकी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाले होती. पोलिसांनी घटनास्थळ गाठून रेकी करणाऱ्या चोरट्याला सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी आत्तापर्यंत 100 गुन्हे केले असल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून चोरीचे दोन मोबाईल, कात्री, गलूल, सोलापूर येथून चोरलेली युनिकॉर्न दुचाकी, स्क्रू ड्राइवर, ब्लूटूथ हेडफोन, आदी मुद्देमाल जप्त केला. स्टेट बँकेत सध्या सुरक्षेचेही धिंडवडे उडालेले दिसून येत आहे. कोट्यावधी रुपयांचा व्यवहार असलेल्या यां बँकेत साधा सुरक्षारक्षक तैनात नाही. त्यामुळे संशयित चोरटे बँकेत रेकी करत असल्याची पुसटशी कल्पना बँक प्रशासणाला नव्हती मात्र शिल्लेगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी चोरीची घटना टळली.
राज्यात नागपूर येथील बोगस शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी प्रकरणी शिक्षण विभागातील उच्चपदस्त अधिकाऱ्यांना अटक झाली असतानाच... पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील खुटबावच्या शिक्षण संस्थेतील बोगस शिक्षक भरतीचा प्रकार झाला असल्याचे समोर येत आहे.भैरवनाथ शिक्षण मंडळातील बोगस शिक्षक भरती प्रकरणी शिक्षक आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक कांबळे हे गेली 12 दिवस झाले त्यांच्या पत्नीसह पुणे येथील शिक्षण संचालक आणि शिक्षण आयुक्त यांच्या कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसलेले आहेत... आज त्यांच्या उपोषणाचा 12 वा दिवस आहे.... त्यांच्या सेवा पुस्तकातील खाडाखोड, सन 2121व 2022या वर्षातील वेतनातील अनियमितता याबरोबरच
पुणे जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी 19 मार्च रोजी सुनावणी घेऊन सुद्धा कांबळे हे उपोषणाला बसल्यावर अहवाल वरिष्ठ कार्यालयाला सादर केला
वाळू माफियांवर लगाम लावता यावा, यासाठी राज्य सरकारनं नुकताच नवीन वाळू धोरण राज्यात लागू केलं. या राज्य सरकारच्या वाळू धोरणानंतर वाळू तस्करांच्या मुस्क्या आवळताना भंडारा प्रशासनानं मोठी कारवाई केली. भंडारा जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते, जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी स्वतः ही कारवाई केली. भंडाऱ्याच्या गोपेवाडा येथे वाळूची वाहतूक करणाऱ्या १० पेक्षा अधिक टिप्परवर ही कारवाई केली. या कारवाईत ८० ब्रास पेक्षा अधिक वाळूसाठा आणि टिप्पर असा ५ कोटींचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला आहे. पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या वतीनं संयुक्तरीत्या केलेली ही भंडाऱ्यातील मागील काही दिवसातील ही सर्वात मोठी कारवाई समजल्या जाते.
- माजी काँग्रेस नेते अरविंद नेताम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'तृतीय संघ शिक्षा वर्ग' समापनाच्या कार्यक्रमात मुख्य अतिथी
- अरविंद नेताम हे माजी काँग्रेसचे नेते, एकीकृत मध्यप्रदेश असताना ते 1971 मध्ये पहिल्यांदा संसदेत खासदार म्हणून निवडून आले...
- माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात अरविंद नेताम हे 1973 ते 1977 मध्ये शिक्षण मंत्रीपदावर होते
- अरविंद नेताम हे छत्तीसगढ येथील आदिवासी नेते असून 2023 मध्ये त्यांनी 'हमार राज पार्टी' संघटना स्थापन केली.
- यापूर्वी 2018 मध्ये तृतीय संघ शिक्षा वर्गाच्या समापन प्रसंगी माजी राष्ट्रपती आणि काँग्रेस नेते प्रणव मुखर्जी यांनी हजेरी लावली होती
- 12 जून पासून नागपूरच्या रेशीमबाग परिसरात आरएसएस तृतीय संघ शिक्षा वर्ग सुरू असून त्याचे समापन 5 जून रोजी होणार आहे.
- आरएसएसचा तृतीय संघ शिक्षा वर्गाला आता 'कार्यकर्ता विकास वर्ग-2' नावाने ओळखला जाते.
पिस्तूल परवाना व सुरक्षा रक्षक मिळावा यासाठी स्वतःच्या गाडीवर गोळीबार घडवून आणल्याप्रकरणी पोलिस कोठडी
या गुन्ह्यात घारे याच्यासह सचिन अनिल गोळे, शुभम संपत खेमनार आणि अजय ऊर्फ बगली रवींद्र सकपाळ यांना अटक करण्यात आलेली आहे
१९ मे रोजी घारे रात्री १२ च्या सुमारास कार्यालयात आले होते. त्यांनी त्यांची कार पार्क केली व ते कार्यालयात गेले. ते आत जाताच दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर गोळी झाडली. गोळीबार झाल्याने घारे धावत बाहेर आले
वारजे माळवाडी पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून या घटनेचा तपास सुरू केला
तपासात गोळीबाराचा बनाव रचला गेल्याचे समोर आले. घारे यांनी त्यांना पिस्तूल परवाना मिळावा व पोलिस संरक्षण मिळावे, यासाठी हा बनाव रचला गेल्याचे निष्पन्न झाले
वाघोली येथील लोहगाव चौकाजवळील अभिषेक लॉन्सजवळ पोलिसांनी मोठी कारवाई करत ८ किलो ४०२ ग्रॅम गांजासह एकाला अटक केली आहे. आरोपीकडून एकूण १ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्याविरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुरेश साहेबराव पाटील (वय ४४, रा. शिरपूर, जि. धुळे) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो हा गांजा विक्रीसाठी बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.ही धडक कारवाई वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने केली. आरोपीकडून गांजासह मोबाईल फोन असा एकूण १ लाख ६९ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
महापालिका निवडणुकीत युती होणार की स्वतंत्र लढायचे याचा निर्णय आपल्या पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील, त्याची कार्यकर्त्यांनी काळजी करू नये. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून, घरोघरी जाऊन तुम्हाला दिलेली जबाबदारी पार पाडा. आगामी महापालिका निवडणुकीत आपल्याला ऐतिहासिक विजय मिळवायचा आहे, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केल्या.
चंद्रकांत पाटील यांनी कसबा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले. शहराध्यक्ष तसेच मंडल अध्यक्षांची निवड पूर्ण झाली आहे. मंडल अध्यक्षांनी आता सर्व आघाड्या व मोर्चाच्यांच्या अध्यक्षांची व कार्यकारिणी निवड लवकर पूर्ण करावी. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी ग्राउंडवर उतरून काम केले. त्यामुळे आपल्याला मोठे यश मिळाले. आगामी महापालिका निवडणुकीत ही आपल्याला तसेच यश मिळवायचे आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे, असेही त्यांनी सांगितले.
दमदार पाऊस होऊनदेखील सिंचन प्रकल्पांत जलसाठा होण्यासाठी अजून महिनाभराचा कालावधी आहे. तोपर्यंत नगरपालिका, नगरपंचायती व ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
जिल्ह्यात गिरणा, हतनूर व वाघूर असे तीन मोठे, तर १४ मध्यम व ९६ लघुप्रकल्प आहेत. यात वाघूर ७०.२२, हतनूर ३२.०८, तर गिरणा प्रकल्पात अवघा २१ टक्के असा उपयुक्त जलसाठा आहे. गिरणा प्रकल्पावर चार ते पाच तालुक्यांसह दीडशेवर ग्रामीण पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. गिरणा प्रकल्पातून पेयजलाची तीन आवर्तने शिल्लक आहेत.
- तथाकथित कौन्सिलर बनवून तरुण-तरुणीचे लैंगिक शोषण करणाऱ्या विजय घायवटच्या पत्नीला तब्बल चार महिन्यानंतर अटक.
- पायल घायवट असं महिलेचा नाव आहे.
- विजय घायवट हा हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत समुपदेशन केंद्र चालवत होता. त्या ठिकाणी वस्तीगृह होते आणि तरुणी तिथे राहत होत्या. चार महिन्यांपूर्वी त्याचावर गुन्हा दाखल झाला होता.
- आर्थिक परिस्थितीचा फायदा घेत, त्यांचा तरुणीची लैंगिक शोषण करत असल्याचा प्रकार चार महिन्यापूर्वी उघडकीस आला होता..
- या प्रकरणात विजय घायवटची पत्नी पायल ही सुद्धा कधीतरी त्याची विद्यार्थिनी होती. नंतर त्याने तिच्याशी विवाह केला होता. तिच्या माध्यमातून अनेक तरुणींना जाळ्यात ओढल.
- विशेष म्हणजे विजय घायवटला या सगळ्यांमध्ये त्याची पत्नीची ही मदत असल्याचा आरोप पोलीस तपासात करण्यात आलेला आहे.
दुपारी ४ वाजता पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता युवा मोर्चातर्फे 'युवा प्रेरणा संवाद या कार्यक्रमाला फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती
संध्याकाळी ५.३० वाजता खजिन्यांची शोधयात्रा या पुस्तकाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रकाशन
शेषात्मज गणेश जयंतीच्या निमित्ताने फुलांच्या शेषनागांच्या प्रतिकृतींची मंदिरात केलेली आकर्षक आरास आणि गाभाऱ्यात विविधरंगी फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये विराजमान लाडक्या गणरायाच्या चांदीच्या मूर्तीचे विलोभनीय रुप पहायला मिळाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे शेषनागाच्या विविधरंगी फुलांच्या प्रतिकृती साकारुन ही सजावट करण्यात आली. याच दिवशी श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झाला होता.
अकोल्यातल्या महागावमध्ये माणसं पूर्व झालेल्या पावसामुळे केळी बागा अक्षरशः उध्वस्त झाले.. जोराच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळी बागाच मोठं नुकसान झालं.. अद्यापही महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी नुकसानग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी केली नाही, असा आरोप शेतकरी करतायेत.. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागाची दखल घेत, कृषी अधिकाऱ्यांनी बांधावर यावा आणि नुकसानाचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी अपेक्षा अर्थातच मागणी शेतकरी करतायेत.. कारण मागील दोन दिवसात झालेल्या पावसामुळे केळी पपई यासह अन्य फळबागांना मोठा फटका बसला आहे
- मंत्री मंडळात परतण्याची आशा मावळल्यानंतर धनंजय मुंडे विपश्यना केंद्रात ध्यान साधनेत मग्न
- इगतपुरीतील आंतरराष्ट्रीय दर्जाचं विपश्यना केंद्र आत्मशांती आणि अंतर्मुखतेचं केंद्र म्हणून प्रसिद्ध
- मागील ८ दिवसांपासून धनंजय मुंडे विपश्यना केंद्राच्या १० दिवसांच्या शिबिरात सहभागी
- शनिवारी ३१ तारखेला मुंडेंची १० दिवसांची विपश्यना होणार पूर्ण
अमरावती महापालिका क्षेत्रातील 56 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण...
अमरावती शहरात कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ....
कोरोना पॉझिटिव्ह महिलेला श्वास घेण्यास त्रास झाल्याने केली तपासणी...
सध्या या महिलेवर गृहविलेगीकरणात उपचार सुरू....
आरोग्य विभाग व महानगरपालिकेचे पथक पॉझिटिव्ह रुग्ण महिलेच्या कुटुंबीयांच्या संपर्कात..
कोरोनाच्या संभावित लाटेचा धोका टाळण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय...
दहा खाटांचा कोरोना वार्ड जिल्हा सामान्य रुग्णालयात तयार करण्यात आलाय
उल्हासनगर शहरातील वडोळ गावातील पुलापर्यंतच्या रस्त्याचं काम अर्धवट असतानाही ठेकेदाराला बिल अदा करण्यात आलंय. यामुळं नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीला वाचा फोडण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत.
लाडका भाऊ असणाऱ्या मुख्यमंत्री प्रशिक्षण कार्य योजनेतले कर्मचारी सध्या वाऱ्यावरच आहेत. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून देखील जिल्हा पातळीवरील कारभाऱ्यांकडून योजनेतल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याबरोबर वेतन देखील देण्यात येत नसल्याचा प्रकार समोर आला आहे.त्यामुळे राज्य सरकारने तातडीने याची दखल घेऊन राज्यातल्या सव्वा लाख कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारया निर्णयाची अंमलबजावणी करून आडवणूक होणाऱ्या नियुक्त तातडीने करण्याबरोबर थकीत वेतन देण्यात यावं,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व मुख्यमंत्री प्रशिक्षण योजना कर्मचारी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.येत्या पाच जून पर्यंत मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा देखील तुकाराम बाबा महाराजांनी दिला आहे याबाबतचे निवेदन सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांचा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी यांना देखील देण्यात आले आहे.
अंबरनाथ पालिकेत गेल्या काही वर्षात टेंडरची स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याच स्पर्धेतून अंदाजपत्रकीय दरापेक्षा कमी दराने, म्हणजेच बिलो रेटने काम करण्याचं प्रमाणही वाढलंय.अंबरनाथ पालिकेनं एखाद्या रस्त्याच्या काँक्रिटिकरणासाठी १ कोटी रुपयांचं टेंडर काढलं, तर ते काम करण्यासाठी साधारण ८ ते १० ठेकेदार अर्ज भरतात. यात सर्वात कमी दर ज्याने भरला असेल, त्याला हे काम दिलं जातं. पण हे काम आपल्याला मिळावं, यासाठी ठेकेदार चक्क २० ते ३० टक्के कमी दर भरतात. म्हणहेच १ कोटीचं काम ७० लाखात करून द्यायला तयार होतात. यात पालिकेचा पैसा वाचत असल्याने पालिका या ठेकेदाराला काम देते. पण १ कोटीचं काम ७० लाखात केल्यावर कामात दर्जा राखला जातो का? हा प्रश्न निर्माण होतो.याच प्रश्नाचं उत्तर म्हणून पालिकेनं आता अशा बिलो रेटने झालेल्या कामांचं VJTI सारख्या नामांकित संस्थेकडून थर्ड पार्टी ऑडिट करण्याचा निर्णय घेतलाय. यात १० कामांची यादी VJTI ला पाठवण्यात आली असून या ऑडिटनंतर दूध का दूध आणि पानी का पानी होणार आहे.
रक्तदान हेच श्रेष्ठदान,असा सामाजिक संदेश देण्यासाठी एका नवरदेवाने थेट लग्नाच्या कार्यालयातच रक्तदान शिबिराचा आयोजन केलं.आणि लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधी स्वतः रक्तदान देखील केलं. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील पडवळवाडी येथे हा लग्नाबरोबर रक्तदान शिबिराबरोबरचा अनोखा सोहळा पार पडला.प्रवीण येवले,या तरुणाने आपला लग्नाच्या निमित्ताने रक्तदानाबाबत समाजात जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आपल्या लग्नाच्या दिवशीच लग्न कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित केलं होते.या लग्नाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील उपस्थिती नवरदेवाला शुभेच्छा दिल्या..
बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील निपाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे पावसाळ्यात मुख्य रस्त्यावर गुडघाभर पाणी साचत होते, यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता, शिवाय रस्त्यावर साचलेल्या या गटारांमुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता, या संदर्भात ग्रामपंचायतकडे वारंवार तक्रारी करूनही कुठलीच दखल घेण्यात आली नसल्याचे ग्रामस्थांनी पुढाकार घेत, गावातून जवळपास एक लाख रुपयांची वर्गणी गोळा केली आणि या मुख्य रस्त्याची पायाभरणी खडीकरण काम पूर्ण केले आहे, यामध्ये प्रामुख्याने गावातील तरुणांनी मोठा पुढाकार घेतला, ग्रामपंचायतला गावच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होत आहे, मात्र मूलभूत सुविधा देण्यासाठी निपाना ग्रामपंचायत अपयशी होत असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे...
धुळे जिल्ह्यात एका आठवड्यापासून सातत्याने पाऊस, वादळ होत आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळ आणि पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे. वादळी पावसाने सेलू तालुक्यातील धोंडगाव शिवारात शेतकऱ्यांचे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये धोंडगाव शिवारातील चार ते पाच शेतकऱ्यांच्या शेतात असलेले केळीचे पीक उद्ध्वस्त झाले.
बुलढाणा जिल्ह्यात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाळी रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, मेहकर तालुक्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी मुगाची लागवड करण्यात आली होती, मात्र या पावसामुळे मुगाच्या शेंगांना कोंब येत आहेत, त्यापासून कुठलेही उत्पन्न आता मिळणार नसल्याने दुधा येथील प्रेम सास्ते या शेतकऱ्याने उभ्या पिकात शेळ्या मेंढ्या सोडल्या आहेत.. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे...
मान्सूनपूर्व पावसामूळ अकोल्यातला मुख्य भुयारी मार्ग अर्थातच अंडरपास पाण्यामूळ बंद पडलाये.. या भुयारी मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय.. साचलेल्या पाण्यात अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहन अडकून पडताहेत. अकोल्यातल्या टॉवर चौकापासुन गांधी मार्गावर निघणारा हा अंडरपास मार्ग गेल्या काही दिवसांपासून बंद आहेय.. कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला हा अंडरपास मार्ग पूर्णतः पाण्याखाली गेलाय..... जवळपास 3 फूट पाणी या अंडरपासमध्ये साचले
रायगड महसूल प्रशासनातील संवर्ग 3 मधील तलाठी, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून आणि लिपीक अशा 177 कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या समुदेशन पद्धतीने करण्यात आल्या आहेत. रायगडच्या महसूल विभागात पहिल्यांदाच हा प्रयोग राबवण्यात आला असून त्यामुळे कर्मचारी बदल्यांमधील राजकीय हस्तक्षेप आणि अन्य दबाव टाळण्यात प्रशासन यशस्वी ठरले आहे. या अभिनव प्रक्रियेमुळे कर्मचारी समाधानी असल्याचा दावा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केला आहे. कर्मचारी बदल्यांसाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत पारदर्शक पद्धतीने ही बदली प्रक्रिया पार पडली. कुठल्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.