
बुलढाणा जिल्ह्यातील मेहेकर तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाला सुद्धा पावसाचा फटका बसला आहे. मेहेकर येथील इंटरचेंज टोल नाक्यावर जाण्यासाठी रस्ता पाण्याखाली गेला अडून त्याला नदीचे स्वरूप आलं आहे.
रत्नागिरी- समुद्राला आलेल्या भरतीचा फटका गणपतीपुळ्याला देखील
गणपतीपुळे मंदिराच्या बाहेरील प्रसाद रांगेपर्यंत समुद्राच्या लाटांचे पाणी
अजस्त्र लाटा गणपतीपुळे मंदिराच्या जवळच्या गेटपर्यंत आल्याचे व्हिडिओ समोर
कोकण किनारपट्टी भागात आज पावणे पाच मीटर उंचीच्या लाटा
गणपतीपुळे मंदिराच्या प्रसाद रांगेच्या ठिकाणचा मंडपाचे सुद्धा नुकसान
साडेतीन शक्तीपीठापैकी पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावरील श्री रेणुकामाता मंदिराची संरक्षण भींत पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मंदिराच्या बाजूने लिफ्ट आणि स्काय वाँकचे काम सुरू होते, कामासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निधी मंजूर केला होता, मात्र संबंधित गुत्तेदारांनी या कामासाठी पश्चिम बाजूचा भाग पोखरला होता, पुन्हा तो भाग सुरक्षित न केल्याने आता पावसाळ्यात मंदिराची सुरक्षाभिंत कोसळली आहे. भिंतीच्या कडेला असलेल्या रूममध्ये पूजा साहित्य व इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. या धक्कादायक प्रकारामुळे मुख्य मंदिराला धोका पोहोचण्याची शक्यता आहे.
शरद पवार यांनी कसबा बावडा परिसरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं दर्शन घेतलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर पुष्पहार अर्पण करून शरद पवारांनी अभिवादन केलं.
रिपब्लिन सेनेने खोपोली पोलिसांकडे केलेल्या तक्रारीच्याच्या आधारे छापा टाकून अन्न व औषध प्रसासन आणि खोपोली पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत 65 हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधीत विमल कंपनीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
ताकई महड रस्तावर हे फार्म हाऊस असून कंटेनर केबिनची खिडकी कटरच्या सहाय्याने तोडून हि कारवाई करण्यात आली. फार्म हाऊस मालक खारघर येथे रहात असून या कारवाईची माहिती मिळताच येथील चौकिदार आणि त्याच्या साथीदाराने पळ काढला. गुटख्या सह या कारवाईत दोन मोबाईल आणि एक स्कुटी देखील जप्त करण्यात आली आहे.
बबनराव लोणीकर सारखा दळभद्री भाजपचा नेता महाराष्ट्रात आत्तापर्यंत पाहिला नव्हता. सगळे घाणेरडे वाचाळवीर भरलेत. स्वार्थी, कपटी, लाचार आणि कपाळकरंटा माणूस शेतकऱ्यांची, तरुणांची, महिला भगिनींची चेष्टा करतो यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट कुठली नाही. बबनराव लोणीकर सारखा दलिंदर माणूस जन्माला येणे हे अत्यंत वाईट गोष्ट आहे.
लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा संभाजी ब्रिगेड ह्या घाणेरडे विचाराच्या माणसाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही...
भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानाच्या नंतर परभणीत युवक काँग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर येत बबनराव लोणीकर यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर लोणीकर दांपत्याला कपड्याचा आहेर ,बूट,एक डमी मोबाईल आणि पन्नास हजार असे कुरियर द्वारे पाठवले आहेत बबनराव लोणीकरांनी शेती करून दाखवावी अन्यथा तत्काळ आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी केली आहे.
रुग्णालयातील चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी सकाळपासूनच काम बंद आंदोलन करत आहेत. नव्याने आलेल्या कंत्राटदाराने दोन महिन्याचा पगार थकवल्यामुळे कामगारांचे काम बंद आंदोलन सुरू केले आहे. कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारल्यामुळे रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. जोपर्यंत पगार मिळत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्यावर कर्मचारी ठाम आहेत.
विद्या विकास शाळेच्या पाठीमागे असलेल्या या भंगारचा गोडाऊन जळून खाक झाले आहे.
ही आग साडेतीन च्या सुमारास लागण्ची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
फ्रिज, टीव्ही, एसी, अशा भंगार इलेक्ट्रिक वस्तू जळून खाक झाल्या आहेत.
आगीची भीषणता मोठी असल्यामुळे धुराचे लोड परिसरात पसरले होते.
घटनास्थळी वसई विरार शहर पालिकेच्या अग्निशम दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.
आज लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 151 जयंती
कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरात असणाऱ्या शाहू विलास पॅलेस इथं शरद पवारांनी केलं शाहू महाराज यांना अभिवादन
नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने पालखेड धरण ८० टक्के भरले असून,धरणाच्या १४ गेट पैकी सात गेट एक फुटाने वर करून धरणामधून कादवा नदीपात्रात 5754 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आहे.नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे
आज दुपारी अडीच वाजता माऊलींच्या पादुकांचं अभ्यंग स्नान नीरा नदीच्या काठावर झालं,यावेळी हजारो भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम लोणंदला असणार आहे.
पोलीस अधिकारी विनयभंग प्रकरणात आमदार हेमंत रासने यांनाही सह आरोपी करा, रवींद्र धंगेकरांची पोलीस आयुक्तांकडे मागणी
भारतीय जनता पक्षाचा पुण्यातील पदाधिकारी असलेल्या प्रमोद कोंढरे याने दोन दिवसांपूर्वी शनिवारवाडा परिसरात एका पोलीस अधिकारी महिलेचा विनयभंग केला..
या प्रकाराचे सीसीटीव्ही समोर आल्यानंतर प्रमोद कोंढरे याच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र हा संपूर्ण प्रकार कसल्याचे आमदार हेमंत रासने यांच्यासमोर घडला.
त्याचवेळी हेमंत रासने यांनी प्रमोद कोंढरे याला समज देणे आवश्यक होते. मात्र असे काहीही घडले नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात हेमंत रासने यांना देखील सह आरोपी करण्यात यावं अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.
अजित पवार गट नाही राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष म्हणा अशी आग्रही भुमीका खा. सुनिल तटकरे यांनी अलिबाग येथील पत्रकार परिषदेत मांडली. महायुती बाबत प्रश्न विचारताना पत्रकाराने अजित पवार गट असा उल्लेख केला. त्यावर तटकरे यांनी प्रश्न थांबत अजित पवार गट नाही राष्ट्रवादी कॉग्रेस म्हणून आम्हाला निवडणूक आयोग, उच्च न्यायालयाने मन्यता दिलेय आणि आम्ही घड्याळाच्या चिन्हावर निवडून आल्याचे स्पष्टीकरण तटकरे यांनी केल.
बुलढाणा जिल्ह्यात सततधार पाऊस होत असल्याने मेहेकर् तालुक्यातील मारोती पेठ येथील लघु प्रकल्प तुडुंबं भरला आहे तसेच तालुक्यातील नदी नाले तुडुंबं भरून वाहत आहे तर काही ठिकाणी नद्यांना पूर आले आहेत... मारोती पेठ येथील लघु प्रकल्पाचा कालवा फुटल्याने असंख्य शेतकऱ्यांच्या शेती खरडून गेल्या आहेत .. पेरणी झालेल्या शेती वाहून गेल्या आहेत.. त्यामुळे या पावसाने जिल्ह्यातील काही भागात पावसाने कहर केला आहे ..
शिवसेना आणि राष्ट्रवादी हे महायुतीतील दोन्ही घटक पक्ष राज्यात एकत्र असले तरी रायगडच्या पालकमंत्री पदावरून दोन्ही पक्षात जोरदार वाद सुरु आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावरून निघालेल्या प्रत्येक शब्दाला उत्तर दिल जात आहे. बुधवारी माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी सर्वांच्या मनातले पालकमंत्री म्हणून आदीती तटकरे यांचा उल्लेख केला. अनिकेत तटकरे यांना उत्तर देत मंत्री भरत गोगावले यांनी कमीत कमी 75 टक्के लोकांच्या मनात भरतशेठ असल्याच म्हटल आहे.
श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचा पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला दुपारी या पालखी सोहळ्याला निरोप देण्यासाठी लाखो भाविक या ठिकाणी उपस्थित होते.. पालखी सोहळ्यात देखील मोठ्या संख्येने वारकरी सहभागी झाले असून. . 11 दिवसाच्या मुक्कामानंतर हा पालखी सोहळा पंढरपूर मध्ये पोहोचणार आहे.. आषाढी एकादशी दिवशी पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी हे सर्व भाविक या पालखी सोहळा मध्ये सहभागी झाले आहेत.
माऊलींच्या पादुकांना निरा स्नान
माऊलींची पालखी आज पुणे जिल्हा सोडून साताऱ्यात प्रवेश करत आहे
त्याआधी माऊलींच्या पादुकांना पवित्र निरा नदीत स्नान घालण्यात आले
या सोहळ्यानंतर पालखी ने आज सातारा जिल्ह्यात प्रवेश केला
नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली होती
हिंदी भाषा सक्तीविरोधात सरकारची भूमिका मांडण्यासाठी आज शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. यानंतर आता दादा भुसे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले आहेत.
राज्यामध्ये हिंदी भाषेच्या सक्तीवरून राजकारण चांगलंच तापलं आहे.यावर कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.हिंदी भाषेची सक्ती केलेली नाही, हिंदी भाषा तिसरी भाषा म्हणून घेतली आहे.हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आम्ही सगळे मावळे आहे, महाराष्ट्राचा अपमान होईल असं कोणतंही काम आमच्याकडून होणार नाही असं लोढा यांनी म्हटल आहे.
गेल्या २० तासांपासून वाशिम जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
नागपूर – संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपरी सरहद्द गावाजवळील ऊतावळी नदीला मोठा पूर आला असून, नदीचं पाणी थेट पुलावरून वाहू लागलं आहे. यामुळे या महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.
हिंदी भाषा सक्तीवरुन राज्यात राजकारण तापलं आहे. अशातच शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. यानंतर राज ठाकरे यांनी पत्रका परिषद घेतली आहे. त्यात त्यांनी सांगितलं की, मराठी माणसासाठी ६ जुलैला मोर्चा काढणार आहे. प्रत्येक मराठी माणसाने या मोर्चामध्ये सहभागी व्हा, असं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.
राज ठाकरेंसोबत हिंदी सक्तीबाबत चर्चा झाली.
राज ठाकरेंनी काही सूचना आम्हाला केल्या आहेत.
उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांसमोर तो तपशील मांडणार आहे.
- यवतमाळ जिल्ह्यात मध्यरात्री पासून पावसाने जोरदार बॅटींग सुरू केली या पावसामुळे घाटंजी शहरातील घाटी व इंदिरा आवास भागतील काही घरामध्ये रस्त्याचे पाणी हे घरात शिरल्याने अनेक घरात नुकसान झाले आहे.घरात ठेवलेले धान्य सुद्धा ओले झाले मजूर वर्ग राहत असलेल्या या भागात घरात पाणी शिरल्याने नागरिकांनी मोटार च्या साहाय्याने पाणी बाहेर काढण्याचं काम करीत आहे.
नीटच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या रागातून आपल्याच मुलीची हत्या करणाऱ्या बापाला सांगली न्यायालयाकडून 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
तालुक्यातल्या नेलकरंजी येथे धोंडीराम भोसले हा शिक्षक बापाने मुलगी साधना हिला नीटच्या सराव परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्याच्या रागातून बेदम मारहाण केली होती. ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला होता.या प्रकरणी साधनाच्या आईने आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आटपाडी पोलिसांनी धोंडीराम भोसले याला अटक केली होती,24 जून पर्यंत त्याचे पोलीस कोठडी होती.
- दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत पुराचं पाणी
- रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरात पर्यटकांची स्टंटबाजी
- पुराच्या पाण्यात सेल्फी आणि फोटोसेशन करण्यासाठी पर्यटक आणि भाविकांचा अट्टाहास
- पुराच्या पाण्यातून दुचाकी चालवून हुल्लडबाजी
- प्रशासनाकडून या परिसरात तैनात करण्यात आलेले सुरक्षारक्षक मात्र गायब
यावर्षी खरीप हंगामासाठी मराठवाड्यात 49 लाख 72 हजार 728 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगरमधील 4 लाख 50 हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत.
जालना जिल्ह्यात 2 लाख 97 हजार 664 हेक्टर, बीडमध्ये 1 लाख 91 हजार 908 हेक्टर तर लातूरमधील 4 लाख 35 हजार 1 हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत.
- भावलीचा धबधबा खळाळून वाहू लागल्यानं ठरतोय पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू
- भावली धरणाच्या वरच्या भागातील डोंगरावरून कोसळणाऱ्या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावलं धबधब्याकडे वळू लागली
दडी मारलेल्या पावसाने अखेर जोरदार पुनरागमन केले असून,यवतमाळ जिल्ह्यात पावसाची जबरदस्त बॅटींग सुरु आहे.कालरात्री पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत शेतामध्ये पाणी साचून तळ्याचे स्वरूप आले आहे
- पुरामुळं वर्धा - राळेगाव राज्य महामार्ग झालाय बंद
- गेल्या एक तासापासून वाहतूक झाली बंद
- सरूळ गावाला लागूनच आहे नाला
- नाल्यावरून पाणी वाहत असल्यानं मार्ग झालाय बंद
- पहिल्याच पावसानं उडालीय दाणादाण
शिक्षणमंत्री दादा भुसे राज ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत. त्रिभाषा सुत्रांबाबत चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हिंदी सक्तीबाबत ही चर्चा होणार आहे. चर्चा सकारात्मक होईल, अशी आशा आहे.
स्थानिक वादातून टोळक्याकडून वाहनांची तोडफोड
हवेली पोलिसांनी ९ जणांना ताब्यात घेऊन ४ जणांना अटक केली आहे
या टोळक्यात ५ जणं अल्पवयीन असल्याची माहिती
सिंहगड किल्ला परिसरातील खानापूर येथे १० ते १२
जणांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड केली
८ ते १० वाहनांची तोडफोड झाल्याने मोठे नुकसान
वाशिम जिल्ह्यात रात्री पासून मुसळधार पाऊस सुरू आहे..या पावसाने जिल्ह्यात अनेक भागात दाणादाण उडवल्याच चित्र आहे ..सँभाजीनगर ते नागपूर ह्या जुन्या महामार्गावर असलेल्या पुलावर आणि रस्त्यावर पूर आल्याने संभाजीनगर-नागपूर महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. विशेषतः पिंपरी सरहद्द परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे
- नाशिक जिल्ह्यात पावसाळी पर्यटनासाठी जात असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी
-
- पावसाळ्यात पर्यटनस्थळांवर पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेता कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी निर्णय
- जिल्ह्यातील हरिहर गड आणि अन्य किल्ल्यांवर ट्रेकिंगसाठी जाणाऱ्या पर्यटकांना देखील करावं लागणार नियमांचं पालन
- हरिहर गडावर ३०० पर्यटकांची मर्यादा तर अन्य किल्ल्यांवर ट्रेकिंगसाठी टप्प्याटप्प्याने बॅचेसच्या माध्यमातून पर्यटकांना सोडलं जाणार
वाशिम जिल्ह्यात काल संध्याकाळ पासून बरसत असलेल्या जोरदार पावसाने नदी नाले आता चांगलेच भरून वाहत आहेत... अनेक ठिकाणी या पावसाने नुकसान झाल्याचं समोर येत आहे. मालेगाव तालुक्यातील मुंगळा गाव परिसरात असलेल्या 25 वर्षे जुन्या पाझर तलावाचा सांडवा फुटल्याने तलावा शेजारी असलेल्या 8 ते 10 शेतकऱ्याचं नुकसान झालंय... सांडवा जर्जर झाल्या बाबत शेतकऱ्यांनी दुरुस्ती संदर्भात निवेदन देऊन देऊन ही दुरुस्ती न केल्याने पहिल्याच पावसात पाझर तलावाचा सांडवा फुटल्याच समोर आलंय..
तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी सुरू केली पेरणी.....
मका, ज्वारी ,सोयाबीन पेरणीकडे सातपुड्यातील शेतकऱ्यांचा कल....
बैल जोडीच्या साहाय्याने पारंपारिक पद्धतीने आजही केली जाते पेरणी.....
खारघर पासून ते नेरूळ पर्यंत वाहनांच्या रांगाचा रांगा
मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहतूकंडी होत आहे
ट्रक बंद पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे
करमाळा तालुक्यात खडी क्रशरसाठी विना परवाना दगड साठा केल्याप्रकरणी खडी क्रशर मालकाला 33 लाख 29 हजार तीनशे रुपयांचा दंड केला आहे. खडी क्रशरसाठी विना परवाना दगड साठा केल्याची तक्रार जनशक्ती संघटनेचे अतुल खुपसे यांनी केली होती. त्यानंतर तहसीलदार शिल्पा ठोकळे यांनी पांगरे येथील महेश शिवाजी टेकाळे यांनी खडी क्रशरसाठी विनापरवाना 338 ब्रास दगड साठा केल्याप्रकरणी 33 लाख 29 हजार तीनशे रुपये दंड केला आहे.
- पारधी समाजाच्या राज्यभरातील पीडित व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी ऐतिहासिक पारधी न्याय संकल्प परिषद
- या परिषदेत पारधी समाजावर जाणीवपूर्वक झालेल्या अन्याय आणि अत्याचाराच्या ११८ प्रकरणांवर सविस्तर चर्चा
- या सुनावणीदरम्यान, अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी पारधी समाजावर अन्याय करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले
डॉ. तनपुरे कारखान्याचे चेअरमन अरुण तनपुरे यांच्या अजित पवार गटात प्रवेशाने राहुरीतील राजकीय समीकरणे बदलणार
राहुरी येथील डॉ. तनपुरे साखर कारखान्याचे नवनियुक्त चेअरमन तथा बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे आणि संचालक मुलगा हर्ष तनपुरे यांनी देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केलाय.. अरुण तनपुरे हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपूरे यांचे जवळचे नातेवाईक आहेत..
माऊलींची पालखी आज घेणार पुणे जिल्ह्याचा निरोप
संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.
त्याआधी निरा येथे दुपारची विश्रांती आटोपल्यानंतर माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत पवित्र स्नान घातला जाणार आहे.
यासह वारकरीही नीरा नदीत स्नान करणार आहे. नीरा नदी माऊलींच पवित्र स्नान हा पालखी सोहळ्यातील एक विशेष क्षण असतो.
त्यानंतर पालखी सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार असून लोणंद या ठिकाणी मुक्कामी असणार आहे.
श्री संत सोपानकाका पालखी सोहळ्यानिमित्ताने पुण्यात वाहतुकीत बदल
- श्री संत सोपानकाका पालखी सोहळ्यानिमित्ताने बारामती तालुक्यात २७ जूनपर्यत वाहतूक बदलाबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश जारी केले आहेत.
- बारामती तालुक्यातील निरा-बारामती रोडवरुन होणारी वाहतूक २६ जून २०२५ रोजी निरा कार्नर निंबुत वरुन मोरगाव रोडने चौधरवाडी फाट्यावरुन चौधरवाडीमार्गे करंजेपूल
तसेच २७ जून रोजी निरा-बारामती रोडने होणारी वाहतूक ही कटींगपुल, बजरंगवाडी, को-हाळे खुर्द मार्गे होळ, वाणेवाडी, करंजेपूलमार्गे निरा यापर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याबाबत आदेशात नमूद करण्यात आले आहे.
पुणे -
सायबर पोलिस ठाण्यांसाठी महासंचालकांकडे प्रस्ताव
शहरात नव्याने परिमंडळनिहाय ५ सायबर पोलिस ठाण्यांची निर्मिती
पुणे पोलिसांनी नुकताच पोलिस महासंचालक कार्यालयाला प्रस्ताव पाठवला आहे, पोलिस ठाण्यांसाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचीदेखील मागणी करण्यात आलीय
नवीन सात पोलिस ठाण्यांसाठी १६०० मनुष्यबळाची मागणी करण्यात आली होती. त्यातील ८०० पदे भरण्यात आली आहेत
नव्याने एक हजार मनुष्यबळाचा प्रस्ताव पुणे पोलिसांनी पोलिस महासंचालक कार्यालयाकडे पाठवला आहे
शहर पोलिस आयुक्तालयात लवकरच सहाव्या झोनची निर्मिती होणार आहे
पुणे -
- पुणे विभागाकडून रेल्वे गाड्यांच्या कालावधीत वाढ
- पुण्यातून धावणाऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनसन पुणे हरंगुळ एक्सप्रेस सोलापूर दौंड आणि पुणे कोल्हापूर गाड्यांच्या कालावधी वाढवणार
- पुणे रेल्वे प्रशासनाकडून गाड्यांच्या कालावधीमध्ये वाढ करण्यात आली आहे
- सोलापूर साप्ताहिक विशेष गाडी एक आक्टोंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे
- लोकमान्य टिळक टर्मिनसन ते सोलापूर साप्ताहिक गाडी 30 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे
- सोलापूर दौंड विशेष गाडी 30 सप्टेंबर पर्यंत तर हरंगुळ विशेष गाडी 30 सप्टेंबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे
पुणे -
- पुण्यात स्वच्छतागृहाजवळ डबक्यात टाकले अर्भक
- पुण्यातील विमान नगर परिसरातील धक्कादायक घटना
- ७ महिन्यांचे स्त्री जातीचे मृत अर्भक टाकून दिल्याची धक्कादायक घटना
- विमानतळ पोलिसांनी एका संशयित महिलेला घेतलं ताब्यात
- संशयित महिला विमान नगर परिसरातील लेबर कॅम्प मध्ये राहते
- लातूर शहरातील खाजगी इंग्रजी माध्यमाच्या दोन शाळांना कसलीही मान्यता नसताना, अनधिकृतपणे विद्यार्थ्यांना प्रवेश देत, शाळा राजरोसपणे चालविल्या जात असल्याच उघड झालं आहे.
- तर या बोगस शाळा विरोधात लातूरच्या शिक्षण विभागाने कारवाई केली आहे. तर दुसरीकडे जिल्हाभरात देखील शासनाची परवानगी न घेता सुरू असलेल्या अनधिकृत शाळांची शोध मोहीम मागच्या दोन दिवसांपासून शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात येत आहे.
- दरम्यान अशा विनापरवाना बोगस शाळांविरोधात शोध मोहीम सुरू असल्याने, या बोगस शाळा चालवणाऱ्याचे धागे चांगलेच दणाणले आहेत...
कोल्हापूर -
संताजी घोरपडे साखर कारखाना कथित अपरातफरी प्रकरणी मंत्री मुश्रीफांना क्लीन चीट
मंत्री हसन मुश्रीफ यांना मोठा दिलासा
घोरपडे कारखान्यातील कथित 40 कोटी रुपयांच्या आर्थिक अपरातफर प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात दाखल होता गुन्हा
पोलिसांनी सी-समरी अहवाल अर्थात क्लोजर रिपोर्ट दाखल केल्याची पोलिसांकडून माहिती
गुन्हा रद्द करण्यासाठी मुश्रीफ यांनी दाखल केलेली याचिका निकाली काढली
न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने याचिका निकाली काढली
पुणे -
- जिल्ह्यातील खाणीची ड्रोनद्वारे मोजणी होणार जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प राबवणार
- महसूल मंत्र्यांचे जिल्हा प्रशासनाला आदेश लीडर सारख्या अद्यावत ड्रोन द्वारे मोजणी
- जिल्ह्यातील मुरूम दगड वाळू उपसा करणाऱ्या खाण्याची मोजणी याड्रोन करण्यात येणार आहे
- लीडारसारख्या अद्यावत दोन कडून सर्वेकडून मोजमाप करण्याचा प्रायोजित प्रकल्प राबवला जात आहे
- लवकरच हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे याचे महसूल वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे
धुळे -
- धुळे तालुक्यातील देवभाने येथे मुंबई आग्रा महामार्गावर बर्निंग बसचा बघावयास मिळाला थरार
- इंदोरच्या दिशेने जाणाऱ्या खाजगी बसणे भर रस्त्यात अचानक घेतला पेट
- सुरुवातीला टायर पेटल्याचे लक्षात आल्यानंतर चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे बसमधील सर्व प्रवाशांचा वाचला जीव
- अग्निशमन विभागाच्या जवानांतर्फे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
- चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टाळला
नागपूर -
- पावसाळ्याला सुरुवात झाल्यामुळे वन विभागांना एक जुलैपासून पर्यटकांना जंगल सफारी बंद करण्याचा घेतला निर्णय
- त्यामुळे पर्यटकांना आता जंगल सफारीसाठी पावसाळा संपण्याची वाट पहावी लागणार
- पावसाळ्यात जंगलातील रस्त्यांची अवस्था बिकट होते, पर्यटकांची वाहने अडकून पडतात
- याशिवाय पावसाळ्याच्या हंगामात वन्य प्राण्यांचा प्रजनन कालावधी लक्षात घेऊन वनविभागाने सफारी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
- पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्र, बोर व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड पवनी कऱ्हान्डला अभयारण्यात जंगल सफारीची सुविधा एक जुलैपासून पुढील आदेशापर्यंत असणार बंद.
नागपूर -
नागपुरात काल रात्री झालेल्या दमदार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये सखल पाणी साचले होते.
महानगरपालिकेकडून दावा करण्यात येत असला तरी नालीसफाईचीही पोलखोल झाली.
नंदनवन आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले होते.
तर काही ठिकाणी घरांच्या अंगणात ही पाणी साचले होते.
खरंतर काळ पहिल्याच दमदार पाऊस झाला, पावसाचा साचल पाण्याने महापालिकेच्या नालेसफाईच्या दावा कसा फोल ठरला हे दिसून आलं.
नागपूर
- नागपुरात कोरोनाने दोघांचा मृत्यू, आतापर्यंतची संख्या सातवर
- नागपुरात एका 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला
- तर भंडारा जिल्ह्यातील 59 वर्षीय व्यक्तीचा देखील मृत्यू झाला
- आजपर्यंत शहरातील विविध रुग्णालयामध्ये 60 पेक्षा अधिक रुग्ण नोंदवल्या गेल्या आहेत.
नाशिक -
- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांना अनुभवता येणार हेलिकॉप्टरची सफर
- ओझरहून नाशिकमधील तपोवन, त्र्यंबकेश्वर, कावनईसाठी हेलिकॉप्टरची राईड
- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात प्रयागराज प्रमाणेच नाशिकमध्ये भाविकांची मोठी गर्दी होणार असल्यानं हेलिकॉप्टर सेवा पुरवली जाणार
- एका हेलिकॉप्टरमध्ये ६ प्रवासी बसण्याची क्षमता, दिवसभरात हेलिकॉप्टरच्या ५० फेऱ्या
- एका भाविकासाठी ओझर ते नाशिक भाडे अंदाजित ६ हजार रुपये तर त्र्यंबकेश्वरसाठी १० हजार रुपये भाडे राहण्याचा अंदाज
नागपूर -
- शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात ओंकार भाऊराव अंजीकर यांच्या तीन शाळेवर SIT चा छापा
- गुलशन नगर येथील जय हिंद विद्यालय येथे छापा टाकून SIT काही कागदपत्र जप्त केली...
- तपासणीदरम्यान शिक्षकांचे शालार्थ आयडी बोगस असल्याचं आढळून आलंय...
- शालार्थ आयडी घोटाळ्यात अंजीकरला मंगळवारी एसआयटीने अटक केली होती. 27 पर्यंत पोलीस कोठडी.
- ओंकार अंजीकर यांने आपल्याच संस्थेचं बनावट लेटरहेड वापरुन अपात्र मुख्याध्यापक पराग पुडके याने पद मिळवल्याची तक्रार केली होती...
नागपूर-
- नागपूरमध्ये घरातील उघड्या चेंबरमध्ये पडल्याने 18 महिन्याचा चिमुकलीचा मृत्यू झाला
- भांडवाडी परिसरातील घटना आहे.
- देवांशी श्याम साहू असं मृतक मुलीचं नाव आहे.
- देवांशी खेळत असताना चेंबर उघड असताना त्यात पडली. त्यातच तिचा मृत्यू झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.