
वाशी एपीएमसीजवळ सिडकोच्या गृहप्रकल्पासाठी काम करणाऱ्या कामगारांच्या ट्रांजिस्ट कॅम्पला लागली भीषण आग
अग्निशामक दल घटनास्थळी दाखल
आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
कल्याण प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याला शेगाव पोलिसांनी एका सलून दुकानातून अटक केली. या अटकेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत.
जळगाव जेवणाचे पार्सल घेण्यासाठी मामासोबत दुचाकीवर जात असलेल्या एका ९ वर्षीय भाच्याचा भरदार डंपरने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कालिंका माता चौकात घडली आहे. तर सोबत असलेली त्यांची बहीण आणि मामा हे किरकोळ जखमी झाले आहे. दरम्यान या घटनेमुळे जळगाव शहरातील संतप्त नागरिकांनी उभ्या डंपरला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार देखील घडला आहे.
उपमुख्मंत्री एकनाथ शिंदे मुंबईचा दिशेने रवाना झाले आहेत. मुंबईहून दिल्लीच्या दिशेने रवाना होणार आहेत.
सायन पनवेल मार्गावर वाहनाला लागली आग.
कारने गाडीने घेतला पेट
नेरुळ उड्डाणपुला नजदिक मुंबईला जाणाऱ्या मार्गीकेवर वाहनाने घेतला पेट
अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु.
वाहन चालक प्रसंगावधान साधत बाहेर पडल्याने जीवितहानी झाली नसली तरी गाडी जळून खाक.
घाटकोपरच्या पंतनगर विभागात फेरीवाल्याची महिलांशी अश्लील वर्तन
दोन महिलांचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न
महिलेने जाब विचारताच काढला पळ
महिला पोलीस ठाण्यात दाखल
महिलांना तुम्ही काफिर आहात, तुम्हाला वंशीकरण करून आपली करेल, असे शब्द वापरायचा ,पाठलाग करायचा.
शिवाजी शिक्षण संस्थेच्या शाळेच्या बाजूलाच रस्त्यावर फळे विक्रीची करीत होता धंदा
पीडित महिला तक्रारीसाठी पोलीस ठाण्यात दाखल
मुंबई गोवा महामार्गावर वाहतूककोंडी
० माणगाव बाजारपेठे ते मुगवली गावा दरम्यान 4 किलो मीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा
० मुंबईतून कोकणात जाणाऱ्या मार्गावर वाहतूककोंडी
० नाताळ आणि थर्टीफस्टसाठी कोकणात जाणारे पर्यटक वाहतूककोंडीत अडकले
चिपळूण परिसरात भीषण अपघात झाला आहे. भीषण अपघात 5 वाजण्याच्या आसपास घडेलेला असल्याची चिपळूण पोलिसांकडून माहिती मिळाली. पोफळीवरून चिपळूणकडे जाणाऱ्या रोडवर पोफळी येथील नदीवर असणाऱ्या पुलाखाली सदरची घटना घडली आहे. दोन जण जखमी झाले आहेत. दोघांना उपचारासाठी दाखल झाले आहेत.
कल्याण पोलिसांचं पथक आताच आरोपी विशाल गवळी याला ताब्यात घेण्यासाठी शेगावात पोहचले आहे.
लातूर शहरातल्या गाव भागात मद्यधुंद ट्रकचालकाचा धुमाकूळ पाहायला मिळालाय. भर दिवसा ट्रक चालकाने उसाचा रिकामा ट्रक वस्तीत घातला आहे. वस्तीत समोर येणाऱ्या पाच ते सात दुचाकी स्वरांना देखील उडवल्याची माहिती समोर आहे. दरम्यान आता या ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
वांगणी स्थानकावर उभ्या असलेल्या एका तेलवाहक मालगाडीतून तेल गळती झाल्यामुळे प्रवाशांमध्ये भीती पसरली होती. एका सजग प्रवाशानं तत्काळ ही घटना रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर ही मालगाडी कर्जतकडे रवाना केल्याची माहिती समोर येतीय. प्लॅटफार्मशेजारीच ही तेलवाहतूक करणारी मालगाडी उभी असल्यानं प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकला असता मात्र आता रेल्वे अधिकाऱ्यांनी पाहणी करून मालगाडी कर्जतकडे रवाना केलीय.
छगन भुजबळांची वेदना आणि संघर्ष जवळून पाहिला आहे. मी अनेकदा जेलमध्ये त्यांना पाहिला आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
वांगणी स्थानकावर उभ्या असलेल्या तेलवाहक मालगाडीतून तेल गळती होतीय. ही तेल गळती थोड्या प्रमाणावर असली तरीही धोकादायक आहे. प्लॅटफार्मशेजारीच ही तेलवाहतूक करणारी मालगाडी उभी असल्यानं प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. रेल्वे प्रशासनाने तेलगळती थांबवण्यासाठी तत्काळ पावलं उचलावीत अशी मागणी प्रवाशांमधून होतीय.
उत्तराखंडमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० ते १२ जण गंभीर जखमी झाले आहेत.
कोपरखैरणे मधील एका चर्चमध्ये लागली आग.
आगीमुळे चर्च बाहेर एकच खळबळ
चर्चमधील तळमजल्यावर लागली आग.
आग लागल्यामुळे चर्चमध्ये आलेले अनेक जण पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावर अडकले.
अमरावती-भातकुली मार्गावर असलेल्या नरखेड रेल्वे लाईन वर उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे, त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आल्याने नागरिकांना ये जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे, परिणामी परिसरातील नागरिकांनी आक्रमक होत भातकुली येथील रेल्वे फाटक जवळ एक रेल्वे रोखली, गेल्या तासाभरापासून ही रेल्वे रोखली आहे,त्यामुळे परिसरात चांगला तणाव निर्माण झाला असून पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, उडानपुलाचे काम होईपर्यंत पर्यायी मार्गासाठी नागरिकांनी रेल्वे रोखत एल्गार केला,
मालेगावात छगन भुजबळ यांचे समर्थनार्थ बॅनर झळकले..
सही वक्त पर करवा देंगे हदो का एहसास कुछ नाले खुद को समंदर समझ बैठे है..
ओबीसी संघर्ष योद्धा..
आदेश भुजबळ साहेबाचा.!
अश्या अशाच बॅनर भुजबळ समर्थकांकडून लावण्यात आल्याने सर्वत्र चर्चा...
मालेगावात मोसम चौक चौकात लागले बॅनर...
नाशिकच्या पिंपळगाव बाजार समितीत टॉमॅटोचा हंगाम संपल्या नंतर पाच आडतदारांनी २३५ शेतक-यांचे सुमारे दोन कोटी तीस लाखाची रक्कम थकविल्याने संतप्त शेतक-यांनी पिपंळगाव-बाजार समितीच्या कार्यालय समोर आंदोलन करत निषेध करत पैसे देण्याची मागणी केली.चांदवड,निफाड,दिंडोरी,सटाणा,सिन्नर येथून टोमॅट उत्पादक आपला माल विक्रीला घेऊन येत असतात.तर लिलावात झालेल्या मालाची विक्री झाल्यानंतर तातडीने पैसे देण्यासाठी प्रसिध्द असतांना याचील अनेक शेतक-यांना पैसे मिळाले नसल्याने या शेतक-यांनी निषेध करत तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय.
ख्रिसमस नाताळच्या पार्श्वभूमीवर ठाणे वाहतूक शाखेने एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना आवाहन करण्यासाठी थेट सॅन्टाच रस्त्यावर उतरला होता. या वेळी सॅन्टाने सीटबेल्ट लावा, हेल्मेट वापर, सिग्नल व वाहतुकीचे नियम पाळा, स्वतःचे आणि पादचाऱ्यांची सुरक्षा हे तुमच्या हातात आहे त्यामुळे वाहने हळू चालवा अशा सूचना यावेळी वाहन चालकांना दिल्या. आज ठाणे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ क्षेत्रातील सर्व मुख्य चौक आणि सिग्नलवर सॅन्टाने फलक हातात घेऊन नागरिकांना आवाहन केले.
- शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात विरोधात कठोर कायदा करणार
- कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची नाशिकमध्ये घोषणा
- नव्या कायद्यात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद करणार
- येत्या मार्च महिन्यात होणाऱ्या अधिवेशनातच नवा कायदा आणण्याचा प्रयत्न
- नाशिकमध्ये व्यापाऱ्यांकडून फसवणूक झालेल्या शेतकरी आणि पोलीस प्रशासनाच्या बैठकीत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची घोषणा
- कृषीमंत्री पद हे सेन्सेटिव्ह आणि मी त्याही पेक्षा सेन्सेटिव्ह
- मी शेतकऱ्याचा मुलगा, कोणतीही चिटिंग मला चालत नाही आणि चालणारही नाही, माणिकराव कोकाटे यांचा अधिकाऱ्यांना इशारा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कोट्यावधी रुपये खर्च करून एक मे 2024 रोजी मराठी भाषा भवन उभारलं. अवघ्या सात महिन्यातच या भावनांची ही दुरावस्था झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी भाषा भवनाची दुरावस्था झाल्याने शिवसेने आवाज उठवला.
पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लक्झरी बसचा पुढील ट्रकला धडकून झालेल्या भीषण अपघातात एकजण ठार झालाय, तर पंधरा ते वीस जण गंभीर जखमी झाले आहेत.
मला मिळालेल्या संधीचं सोनं करणार
सर्व आवास योजानांमध्ये बांधण्यात येणाऱ्या घरांना सोलार देणार
केंद्राच्या मदतीने महाराष्ट्राला पुढे नेहण्याचा प्रयत्न करणार
पारदर्शी कारभार करून महाराष्ट्र पुढे नेहणार
सायबर गुन्हे हे सर्वात मोठं आव्हान
नाताळच्या सुट्टया, सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी साईंची शिर्डी नगरी सज्ज झालीये.. ख्रिसमसच्या सुुट्यांमुळे शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी झाली असून पुढील आठ दिवस शिर्डीत भाविकांची मांदियाळी असणार आहे.. साई दर्शनानंतर भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत असून कुटुंबियांसोबत सुकर दर्शन होत असल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केलय..
तामिळनाडू राज्यातून गुजरातच्या दिशेने जात असलेल्या ट्रकचा कोंडाबारी घाटात अपघात.....
महामार्गावर ट्रक चालक्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने घडला अपघात...
अपघातात ट्रकचालक गंभीररीत्या जखमी.....
महामार्ग लगत असलेल्या खड्ड्यात ट्रक गेल्याने ट्रकचं मोठ्या प्रमाणात नुकसान.....
जखमी ट्रक चालक विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल....
मालवण चौके स्थळकरवाडीतील एका घरातील पडवीला रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याने घरात वास्तव्यास असलेले दिपक परब (बावकर) यांचा अगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. आग लागल्याचे समजताच शेजाऱ्यांनी धाव घेतली मात्र दरवाजा आतून बंद असल्यामुळे तो उघडता आला नाही त्यामुळे खोलीत अडकलेल्या दिपक परब यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. आग नेमकी कशी लागली हे समजू शकले नाही. घटनेचा अधिक तपास मालवण पोलीस करीत आहेत.
इन्शुरन्स कंपनीत काम करणाऱ्या अधिकाऱ्याला ५.७० कोटी रुपयांचा गंडा
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली कोट्यावधींचा गंडा
सायबर गुन्हेगारांनी बँकेचे अधिकारी असल्याचा बनाव करत गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याच आमिष दाखवत खोट्यावधींची फसवणूक
सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या पुणेकरांवर पुणे महानगरपालिकेची दंडात्मक कारवाई
सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या पुणेकरांकडून दीड कोटी रुपये दंड वसुली
चालू वर्षात महानगरपालिकेने एक कोटी 82 लाख रुपये दंड वसूल केला
यामध्ये प्लास्टिक बंदी उल्लंघन ,कचरा वर्गीकरण न करणे, बांधकाम राडाराडा ,रस्त्यावर थुंकणे, सार्वजनिक जागी अस्वच्छता करणे ,या कारणाचा समावेश आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अर्बन नक्षल संदर्भातील फेरफार केलेला व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल
महाराष्ट्र सायबर सेलने केला गुन्हा दाखल
मध्यंतरी देवेंद्र फडणवीस यांचा अर्बन नक्षल संदर्भातील व्हिडिओ झाला होता व्हायरल
बनावट व्हिडिओ शेअर करण्यात आलेल्या समाज माध्यमांच्या चौकशीला सुरुवात
व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या आयपी ऍड्रेसच्या पडताळणीला केली सायबर सेलने सुरुवात
दंगल भडकवण्याच्या उद्देशाने व्हिडिओत फेरफार केल्याचा पोलिसांचा दावा
फडणवीस उपमुख्यमंत्री असताना केलेल्या भाषणात फेरफार करून समाजमध्यमांवर पसरवण्यात आल्याचा आहे आरोप
फुलकोबी 8 रुपये किलोवर,वांगे 10 रुपये आणि टमाटर 20 रुपये किलोवर..
भाजीपाल्याचे दर 50% ने घसरल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघेना...
भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत
मागणी ही मागणी घटल्याने भाजीपाल्याच्या दरात मोठी घट...
याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांनी
गेल्या वर्षभरापासून या चोरट्यांनी बदलापूर आणि परिसरात धुमाकूळ घातला होता. 6 डिसेंबरला बदलापुरातल्या श्रुतिका कॉम्प्लेक्स मधील एका दुकानाचं शटर तोडून त्यांनी दुकानातील रोख रक्कम आणि सामान लंपास केलं होतं. फिर्यादीच्या तक्रारीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर आणि राजेश गज्जल यांच्या मार्गदर्शनाखाली बदलापूर पूर्व पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांनी दोन आरोपींना अटक केलीय. दीपक उर्फ जोथा शैलेश झा आणि आकाश उर्फ राजू उर्फ बटल्या संतोष सिंग अशी या आरोपींची नाव आहेत. सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत पोलिसांनी पाठलाग करून या दोन्ही आरोपींना अटक केलीय.
नाशिक शहरासह जिल्ह्याला तीन दिवस येलो अलर्ट
गडगडाटी पावसासह गारपिटीचा देखील हवामान विभागाचा अंदाज
नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर ओढवले चिंतेचे ढग
रब्बी पिकासह इतर पिकांना धोका असल्याने शेतकरी चिंताग्रस्त
गारपिटीचा धोका असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता
- एकीकडे पडलेले बाजारभाव तर दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे कांदा शेतातच सडण्यास सुरुवात
- मागील महिन्यात झालेला अवकाळी पाऊस, कमी झालेली थंडी आणि धुक्याचा कांद्याला मोठा फटका
- लाल कांद्याची वाढ खुंटली, शेतातच कांदा करपायला सुरुवात
- कांद्याचं उत्पादन निम्म्याने घटलं, शेतकरी चिंताग्रस्त
- ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे फवारणीचा खर्च देखील वाढला
- कांद्यासाठी प्रती एकर शेतकऱ्यांना ८० ते ९० हजार रुपयांचा खर्च
- मात्र नैसर्गिक बदलांमुळे उत्पादन घटल्याने उत्पादन खर्च, मजुरी आणि वाहतूक खर्च देखील वसूल होत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात
कोल्हापूर जिल्ह्यातील गव्यासाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य 31 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत 2 दिवस पर्यटक व अभ्यासक यांना प्रवेश बंद असणार
राधानगरी तालुक्यातील दाजीपूर अभयारण्य हे गवारेडा व इतर प्राण्यांसाठी प्रसिद्ध
दरवर्षी महाराष्ट्रतुन हजारो पर्यटक हे अभयारण्य पहायला येत असतात
31 डिसेंबर वर्षाअखेर व नववर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार घडू नये म्हणून वन्यजीव विभागाने या दोन दिवसासाठी अभयारण्य बंद ठेवण्याचा घेतला निर्णय
या काळात अभयारण्य क्षेत्रात विनापरवाना प्रवेश करणे, मद्य पिणे, गाणी वाजवणे, प्लॅस्टिक कचरा करणे, हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर वन्यजीव कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार
31 मे आणि 1 जानेवारी या दोन दिवसात पर्यटनाला बंदी असल्याने पर्यटकांनी येऊ नये
वन्यजीव विभागाकडून करण्यात आले आवाहन
दारूच्या नशेत एका चारचाकी चालकाने दिली अनेक वाहनांना धडक
मद्यधुंद अवस्थेत असलेला चालक पोलिसांच्या ताब्यात
पुण्यातील मध्यवर्ती भागातून जात असलेल्या एका चार चाकी गाडी ने रस्त्यावरून जात असलेल्या अनेक दुचाकींना उडवले
दयानंद केदारी असे संशयित चालकाचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे
या अपघातात एका व्यक्तीला पायाला किरकोळ जखम झाली असल्याची माहिती
चतुशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांनी दिला चालकाला पोलिसांच्या हवाली
पुणे नगर रस्त्यावरील डंपरने कामगारांना चिरडल्याप्रकरणात पोलिसांनी डंपर मालकाला अटक केलीय
निष्काळजीपणा केल्याचा आरोप ठेवत पोलिसांनी ही कारवाई केली आहे
अनिल काटे असे अटक करण्यात आलेल्या डंपर मालकाचे नाव असून लोणीकंद पोलिसांत गुन्हा दाखल
मजुरांना चिरडण्यापूर्वी चालकाने एका दुकानावर घातला होता डंपर
वाघोलीतील बायफ रोडवरील ग्राहक सेवा केंद्राच्या दुकानावर घातला होता डंपर
यामध्ये त्या केंद्र चालकाचे संगणक, प्रिंटर व झेरॉक्स मशीनचे व भिंतीचे नुकसान
तेथे धडक देवून व तेथे एका चहा विक्रेत्याशी वाद घालून तो पुढे आला अन् केसनंद फाट्यावर मजुरांना चिरडले. त्या डंपरचा एक आरसा या शटर जवळ आढळून आला आहे
योगेश मोटकर असे या सेवा केंद्र मालकाचे नाव
सकाळी दुकान उघडण्यासाठी गेल्यावर त्याला हा अपघात झाल्याचे समजल्यानंतर त्याने अपघात स्थळी जात डंपरची पाहणी केली. यात त्याच्या शटर व भिंतीचा रंग डंपरला लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आणि त्यांनतर त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली
पुणे महापालिकेच्या भरारी पथकाच्या ताफ्यात आणखी दहा गाड्यांचा समावेश
शहरात अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईचा वेग वाढणार
महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाईमध्ये वाढ होण्यासाठी दहा गाड्या महापालिका प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या
पुणे महापालिकेने शहरात अस्वच्छता करणाऱ्यांवर वचक बसावा, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करता यावी, यासाठी भरारी पथक तयार केले
या पथकाला शहरात कारवाई करणे सोईस्कर व्हावे, यासाठी महापालिका प्रशासनाने अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त वाहने उपलब्ध
मंगळवारी दहा नवीन गाड्या भरारी पथकाच्या ताफ्यात दाखल झाल्या
भवानी पेठेतील जल वाहिनीवर कामाच्या निमित्ताने काही भागात पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे
पुण्यातील शंकरशेठ रोड, गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, नाना पेठ, सारसबाग परिसर, गंज पेठ, महर्षी नगर या भागात उद्या संपूर्ण दिवस पाणी पुरवठा बंद
शुक्रवारी सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे
थर्टी फर्स्ट च्या धांगडधिंग्यावर पोलिसांची असणार करडी नजर
पुण्यातील ग्रामीण भागात होणाऱ्या पार्ट्यांवर पोलिसांचा वॉच
लोणावळा, खंडाळा, पवना, मावळ, मुळशी या ठिकाणी होणाऱ्या पार्टी कडे असेल लक्ष
विनापरवाना कार्यक्रमावर होणार सक्त कारवाई
रस्त्यांवर आरडा ओरडा करणे, दारू पिऊन गाडी चालवणे या सारख्या अनेक गोष्टींवर पोलिसांची असणार नजर
बुलढाणा जिल्ह्यात हरबऱ्या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे.. यावर्षी पाऊस जास्त झाल्याने रब्बी पिकपेरा चांगला झाला असून शेतकऱ्यांनी हरबरा पिकाला मोठी पसंती दिली आहे मात्र बदलत्या हवामानामुळे हरबरा पिक धोक्यात आले असल्याची भीती व्यक्त केल्या जात आहे.. ढगाळ वातावरणा मुळे हरबरा पिक जळून जात आहे.. आता हरबरा पिकावर रोगराई वाढण्याची भीती व्यक्त केल्या गेली आहे.. त्यामुळे शेतकऱ्यांनी ठिबक सिंचणाचा प्रयत्न सुरु केला आहे हरबरा पिक जिवंत ठेवण्यासाठी ठिबकचा उपयोग केला.
नांदेडच्या लोहा तालुक्यातील माळेगाव येथे श्री खंडोबाच्या यात्रेला 29 तारखेपासून सुरुवात होणारा असून त्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.हौशा, गौशा आणि नवस्याची यात्रा म्हणून माळेगावची यात्रा प्रसिद्ध आहे.यात्रेला 400 वर्षाची परंपरा लाभलेली आहे. माळेगाव यात्रेचे नियोजन ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडू केलं जातं. यात्रेत देशभरातून आलेल्या सर्वच प्रकारच्या पाळीव प्राणी यांचा मोठा बाजार भरवल्या जातो. दरवर्षी यात्रेला 15 ते 16 लाख भाविक येत असतात.भटक्या विमुक्त जमातीचे अनेक उत्सव, विवाह सोहळे यात्रेत पार पडत असतात.जिल्हा प्रशासनाकडून यात्रेत कृषी प्रदर्शन, कुस्तीच्या दंगली, पशुप्रदर्शन, बैलगाडा शर्यत यासह लावणी महोत्सव, कला महोत्सव अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.
आईच्या समोरच 4 वर्षीय चिमुकल्या लेकीवर बिबट्याने हल्ला करत ठार केल्याची घटना शिरुर तालुक्यातील पिंपळसुटी येथे घडलीय शिरुर तालुक्यात मागच्या दोन महिन्यातली बिबट्याच्या हल्ल्याची तिसरी घटना आहे रक्षा अजय निकम असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या मुलीचे नाव आहे.
आंबेगाव विधानसभा मतदार संघातुन वळसपाटीलांना अष्ठविजय काठावर मिळालाय तशी खंतही त्यांनी आभार मेळाव्यातुन व्यक्त केलीय दरम्यान राज्यातली कुठलीच जबाबदारी नसल्याने वळसेपाटील मतदार संघातील प्रश्न सोडविण्यासाठी कामाला लागले असुन सर्व प्रशासकीय विभागांची व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन तालुक्यात सुरु असलेल्या कामं नागरिकांच्या समस्या जाणुन घेऊन प्रशासनाच्या समोर सोडवुन घेत वळसेपाटील आता जनतेतच रमलेले पहायला मिळत आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्याचं कोणीच समर्थन करू शकत नाही, इतकी वाईट गोष्ट कोणाच्या आयुष्यात येऊ नये आणि कोणालाही पाहायला मिळू नये..यासाठी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कडक शासन करा.मात्र याचं वेगळं राजकारण करायचं पाप आमदार सुरेश धस करत आहेत.
नाताळाच्या सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी पुणे, मुंबईसह देशभरातून अनेक पर्यटक लोणावळ्यात दाखल झालेत. लायन्स आणि टायगर पॉईंट या ठिकाणी पर्यटकांची गर्दी झालीय. लोणावळ्याच निसर्ग सौंदर्य आणि प्रदूषणमुक्त वातावरण अनुभवण्यासाठी लोणावळ्यात आल्याचं पर्यटकांनी सांगितलं, पर्यटक कुटुंबासह लोणावळ्यात दाखल झाले असून पर्यटनाचा आनंद घेतायत.
31 डिसेंबर ला संत गजानन महाराज मंदिर भक्तांसाठी रात्रभर खुले राहणार.
देशभरातून शेगाव येथे येत असलेल्या भक्तांच्या वाढत्या संख्येमुळे संत गजानन महाराज मंदिर प्रशासनाचा निर्णय.
31 तारखेला सकाळी पाच वाजेपासून 1 जानेवारीच्या रात्री नऊ वाजेपर्यंत मंदिर समाधी दर्शनासाठी खुले राहणार.
पिंपरी चिंचवड शहरातील महापालिकेच्या शाळा आणि खाजगी शाळांमध्ये आता शिव्या मुक्त समाज अभियान राबविण्यात येत आहे. त्यामुळें पिंपरी चिंचवड शहरातील शाळात आता आई - बहीण वरून दिल्या जाणाऱ्या अश्लील शिव्या आता पूर्णपणे हद्दपार होणार आहेत.
राज्य शासनाने शिव्या मुक्त समाज अभियान राबवायला आता सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकाला पत्र लिहून स्त्रीत्वाचा अपमान होतो अशा अश्लील शिव्यांच्या वापरावारत पूर्णपणे बंदी घातली आहे. तसेच शिव्या मुक्त समाजासाठी विद्यार्थ्यांना शपथ घेण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत.
तुळजाभवानी मंदीर 1 जानेवारी पर्यंत 22 तास राहणार खुले - नाताळ सुट्यांच्या पाश्र्वभूमीवर पहाटे 1 वाजता मंदीर भाविकांसाठी उघडणार
तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या व्यवस्थापक तहसीलदार माया शिंदे यांनी काढले आदेश
25 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत मंदीर पहाटे 1 वाजता चरणतीर्थ पुजा होवुन मंदीर भाविकांसाठी खुले होणार तर राञी 10.30 वाजता प्रक्षाळ पुजेनंतर मंदीर बंद करण्यात येणार
नाताळच्या सुट्या,नविन वर्ष तसेच लग्नसराईमुळे तुळजाई नगरीत भाविकांची होतेय गर्दी
आगामी 1 जानेवारी पर्यंत भावीकांची गर्दी कायम राहणार असल्याने मंदीर 22 तास खुले ठेवण्याचा घेतला निर्णय
तुळजाभवानी मंदीर पहाटे 1 वाजता उघडण्यात येणार असुन,अभिषेक पुजा सकाळी 6 वाजता होणार असल्याचे मंदीर संस्थानच्या वतीने काढले जाहीर प्रगटन
नवीन हंगामातील तूर बाजारात येण्यापूर्वीच दर कोसळले असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मागील आठवड्यात तुरीचे दर ९,००० ते ९,५०० रुपये प्रतिक्विंटल होते. मात्र, आता वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला ५,१५० ते ७,३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले आहेत. रिसोड बाजार समितीमध्ये ६५०० ते ७५७५ दर मिळाले आहेत. यंदा सोयाबीन आणि कापसाला अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी तुरीकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले होते. मागील काही वर्षांतील चांगल्या दरामुळे तुरीच्या पेरणी क्षेत्रात वाढ झाली होती. मात्र सध्या बाजारातील बदलत्या परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.
मुंबई गोवा महामार्गावर वीर इथं धावत्या कारला लागलेल्या आगीत कार जळून खाक झाली. आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कारमधील तिन्ही प्रवासी बचावले असून तिघे कोकण फिरायला पुण्याहून आले होते. अलिबाग इथून मालवण कडे जाताना ही घटना घडली. महाड नगर पालिकेच्या अग्निशमन दलाने आग विझवली
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.