Maharashtra News Live Updates: विधानसभा निवडणुकीबाबत राज ठाकरे यांनी बोलावली बैठक

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 2 October 2024: आज बुधवार दिनांक २ ऑक्टोबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, विधानसभा निवडणुकासंदर्भातील अपडेट्स, महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, अक्षय शिंदे इन्काउंटर प्रकरण, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Updates:
Maharashtra Live News UpdatesSaam tv

Mumbai News: विधानसभा निवडणुकीबाबत राज ठाकरे यांनी बोलावली बैठक

विधानसभेबाबत राज ठाकरे यांनी बोलावली बैठक

पुणे येथे ७ ऑक्टोबरला पुण्यात राज ठाकरे घेणार पश्चिम महाराष्ट्रचा आढावा.

पश्चिम महाराष्ट्रातील इच्छुकांना तसेच महत्त्वाच्या नेत्यांना पुण्यात बोलवणार.

Wardha News: महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमाला राज्यपालांनी दिली भेट 

महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमाला राज्यपाल यांनी दिली भेट

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्यासोबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती

महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त आश्रमात येत केले अभिवादन

राज्यपालकडून आश्रमाची पाहणी

महात्मा गांधींच्या वस्तूंची पाहणी करत जाणून घेतली माहिती

महात्मा गांधींच्या कुटीत प्रार्थना करत वाहली श्रद्धांजली

Ratnagiri News: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रिफायनरी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेला सुरूवात

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रिफायनरी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेला सुरूवात.

पोलिसांकडून राजापूर न्यायालयात याबाबतची कागदपत्रे सादर.

पुढील मोजक्याच दिवसांत रिफायनरी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जाणार.

गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारनं दिला होता शब्द.

Mumbai News: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राज ठाकरे यांच्या भेटीला

भाजपचे नेते आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले.

शिवतीर्थ येथे राज ठाकरे आणि राहुल नार्वेकर यांची बैठक. बैठकीच कारण गुलदस्त्यात.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती.

Mumbai News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह्याद्री अतिथीगृहावर दाखल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह्याद्री अतिथीगृहावर दाखल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घेणार भेट.

आशिष शेलार आणि गणेश नाईक देखील अमित शहांच्या भेटीसाठी दाखल.

Mumbai News: भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक अमित शहांच्या भेटीला

भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक अमित शहांच्या भेटीला.

गणेश नाईक सह्याद्री अतिथीगृह येथे अमित शहांच्या भेटीसाठी दाखल.

आशिष शेलार देखील सह्याद्री अतिथीगृहावर दाखल.

Pune News: सुनील तटकरेंना घेण्यासाठी येणारं हेलिकॉप्टर पुण्यात कोसळलं

पिंपरी चिंचवडमध्ये कोसळलेले हेलिकॉप्टर सुनील तटकेरांना घेण्यासाठी येत होतं

पुण्याहून मुंबईला येत होते हेलिकॉप्टर.

उड्डाणानंतर 3 मिनिटांत कोसळलं.

ट्विन इंजिन ऑगस्टा बनावटीचं हेलिकॉप्टर.

HEMRL संस्थेच्या परिसरात कोसळलं हेलिकॉप्टर.

Mumbai News: अनंत अंबानी यांनी घेतली तेजस ठाकरेंची भेट

अनंत अंबानी यांनी घेतली तेजस ठाकरेंची भेट.

काल रात्री उशिरा मातोश्री येथे जाऊन घेतली भेट.

त्यानंतर अनंत अंबानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतल्याची माहिती मिळत आहे.

ही भेट रात्री दीडच्या सुमारास झाली.

Amravati News: अमरावतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग मोकळा

अमरावतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग मोकळा.

एम. बी.बी. एस.च्या प्रथम वर्षांसाठी 100 प्रवेश क्षमतेला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची मंजुरी.

20 ओक्टॉबरपासून प्रवेश प्रक्रियेला होणार सुरूवात.

1 नोव्हेंबर पासून महाविद्यालयाला होणार सुरुवात.

जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या परिसरात सुरू होणार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.

वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी सर्व तयारी पूर्ण.

मुला मुलींसाठी वेगवेगळया वसतिगृहाची ही केली व्यवस्था.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com