
भाजपा आमदार सुरेश धस उद्या करणार गौप्यस्फोट
खासदार संजय राऊत यांच्या आरोपांना देणार उत्तर
बीडमध्ये घेणार पत्रकार परिषद
सायंकाळी चार वाजता साधणार माध्यमांशी संवाद
कृषी विभागातील वेगवेगळ्या गैरप्रकारांचा करणार भंडाफोड
मुंबईत आगीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, कांदिवलीत झोपडपट्टीला आग लागली आहे.
कांदिवलीतील दामू नगर झोपडपट्टीत ही आग लागली आहे.
मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले
अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी
आग आटोक्यात आणण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न
राहुल गांधींनी शिवनेरी किल्ल्यावरती जाऊन नाक घासून शिवप्रेमींची माफी मागावी आंदोलक आक्रमक
छत्रपतीच्या जयंतीच्या दिवशी भावपूर्ण श्रद्धांजली अशी पोस्ट राहुल गांधी यांनी केली होती यामुळे आता शिवप्रेमी मधून संताप व्यक्त केला जात आहे.
सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर बीडच्या पाडळसिंगे टोलनाक्यावर जोडे मारून राहुल गांधी यांचा अकेला तीव्र निषेध
भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव दत्तप्रसाद जाधव यांच्या नेतृत्वात आंदोलन
राहुल गांधींनी रायगडावर नाक घासून माफी मागावी
छत्तीसगड राज्यातील नक्षल दलम कमांडरच्या मुसक्या आवळण्यात आल्या. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाने तब्बल दीड महिन्याच्या मागोव्यानंतर यवतमाळ शहरातील लकडगंज परिसरात केली.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने पक्षातून निलंबित करण्यात आले होते. रामटेक तालुक्यातील मनसर येथील सेलिब्रेशन लॉन येथे मल्लिकार्जुन रेड्डी यांचा पक्ष प्रवेश झाला. रेड्डी यांच्यासह १२ जणांवरील निलंबन कारवाई रद्द करुन त्यांचा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करण्यात आला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत रामटेकमधून रेड्डी भाजपकडून निवडून आले होते.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मागच्या अनेक वर्षापासून लातूर शहरात मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे.
ग्रामदैवत सिद्धेश्वर व रत्नेश्वर मंदिरातून परिसरातील मोटरसायकल रॅलीला प्रारंभ करण्यात आला होता.
तर शहरातील मुख्य भागातून ही,मोटरसायकल रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात पर्यंत काढण्यात आली होती.
दरम्यान या मोटरसायकल रॅलीत तब्बल 10 हजार मोटरसायकल स्वरांनी सहभाग नोंदवला आहे..
संपूर्ण लातूर शहरात शिवमय भगवं वातावरण निर्माण झालं होतं..
- महाराष्ट्रातील आणि देशातील प्रत्येक विद्यार्थी शिवसृष्टी पाहण्यासाठी आला पाहीजे
- शिवसृष्टी प्रेरणेचं आणि अभ्यासाचं केंद्र
- मराठी भाषेला राजभाषेचा खरा दर्जा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला
- छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्कोच्या वर्ल्ड हेरीटेज साईटसाठी रेकमंड केले आहेत.
- शिवसृष्टीचं काम अधिक वेगानं व्हावं यासाठी राज्य सरकार आणखी ५० कोटी रुपये देईन
- आम्ही तिघेही मावळे आहोत, मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री. शिवसृष्टीसाठी आणखी काही लागले तर सांगा
- मी शिवप्रेमी आहे, शिंदे शिवप्रेमी आहेत. अजितदादा तर पुण्याचेच आहेत. पुण्यातले काही काम सांगितले तर ते नाहीच म्हणत नाहीत. शिवसृष्टीला मदत करण्यासाठी
दोन मंत्र्यांना सोबत घेत सरकार नवे मराठा आरक्षण आंदोलन उभं करण्याच्या तयारीत, मनोज जरांगे पाटील यांचा गौप्यस्फोट
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दोन मंत्र्यांची आंदोलनाबाबत चर्चा झाल्याची ही माहिती
दोन मंत्री अगोदर आरक्षणासाठी अन्नत्याग आंदोलन करणार, त्यानंतर आरक्षण आंदोलन उभे राहणार
आरक्षण आंदोलनासाठी ज्या मंत्र्यांसोबत चर्चा केली त्यांनीच माहिती दिल्याचा जरांगे पाटलांचा दावा
धाराशिव इथे शिवजयंती उत्सवासाठी आल्यानंतर नव्या मराठा आरक्षणाबाबत आंदोलनाबाबत मनोज जरांगे पाटील यांची माहिती
मनमाड शहरात गेल्या अनेक वर्षा पासून सार्वजनिक शिवजयंती मोठ्या उत्सहात साजरी केली जात आहे.
यंदा तेवढ्याच उत्सह पुर्ण वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली असून, शिवजयंतीच्या मिरवणूकीत आमदार सुहास कांदे सहपत्नीक सहभागी झाले होते.
दुपारी १२ वाजता निघालेल्या या मिरवणूकीत विविध कला पथक सहभागी होत त्यांनी आपल्या कला सादर केल्या.
आपल्या लाडक्या राजाच्या या मिरवणूक सोहळ्यात मनमाडकर नागरीक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
साहित्य यात्री महादजी शिंदे एक्सप्रेस या विशेष ट्रेनला मंत्री उदय सामंत झेंडा दाखवणार
उदय सामंत देखील या ट्रेनमधून काही अंतर प्रवास करणार
१२०० हून अधिक साहित्यप्रेमी या ट्रेनमधून प्रवास करुन दिल्ली गाठणार आहे
छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर रॅलीला झाली सुरूवात
जिल्हाभरातून शिवभक्त रॅलीत सहभागी
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 21 फेब्रुवारीला मस्साजोगला जाणार
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा पोलिसांनी प्रयत्न केल्याचा विषय समोर आल्याने मस्सा जोगला जाणार
हत्येला वेगळ वळण देण्यासाठी नेमकं काय षडयंत्र रचलं होतं यासंदर्भात गावकऱ्यांशी चर्चा करून घेणार माहिती
संतोष देशमुख यांची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याची दाखविण्याचा प्रयत्न होता असा गावकऱ्यांनी केलाय आरोप
गावकऱ्यांच्या अन्नत्याग आंदोलनासंदर्भात देखील करणार चर्चा
अन्यथा मसाजोग मध्ये सर्वजण अन्नत्याग आंदोलन करणार,एखादा मेला तर सरकारला अवघड होईल , जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
बीड -
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे
पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाकडून परळीत चौकशी सुरू
पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांच्या टीम कडून महादेव मुंडे खून प्रकरणातील साक्षीदारांची चौकशी सुरू
महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला होता
आज यातील साक्षीदारांची चौकशी सुरू आहे
नाशिक -
- नाशिकमध्ये शिवजयंतीचा उत्साह
- छत्रपतींचे पोवाडे, ढोल ताशाचा गजर आणि शिवाजी महाराजांच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- पंचवटी कारंजा, नाशिकरोडच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
कोल्हापूर -
सचिन तेंडुलकरच्या कुटुंबीयांनी घेतलं नृसिंहवाडीत दत्त महाराजांचे दर्शन
अंजली तेंडुलकर, सारा तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर दत्त महाराजांच्या चरणी
तेंडुलकर कुटुंबीयांची नृसिंहवाडीच्या दत्त महाराजांवर अपार श्रद्धा
अभिनेता विकी कौशल्य आज शिवजयंतीच्या निमित्ताने किल्ले रायगडावर उपस्थित होता.
यावेळ मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे देखील उपस्थित होते.
अभिनेता विकी कौशल्य, छावा चित्रपट निर्माता लक्ष्मण उतेकर यांचा हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले.
किल्ले रायगडावर उपस्थिती हे आपलं भाग्य असल्याचे विकी कौशलने सांगितले
भांडूप एलबीएस मार्गावर विचित्र अपघात
टेम्पोमध्ये टेम्पो चालक उपस्थित नव्हता मात्र टेम्पो चालू असल्या कारणाने पुढे सरकला
टेम्पोने एका बाईक चालकाला धडक दिली
अपघातामध्ये बाईकचालकाचा मृत्यू झाला.
मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षण आंदोलन दडपण्यासाठी सरकारचा नवा प्लॅन ?
दोन मंत्र्यांना सोबत घेत सरकार नवे मराठा आरक्षण आंदोलन उभं करण्याच्या तयारीत,मनोज जरांगे पाटील यांचा गौप्यस्फोट
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दोन मंत्र्यांची आंदोलनाबाबत चर्चा झाल्याची ही माहिती
दोन मंत्री अगोदर आरक्षणासाठी अन्नत्याग आंदोलन करणार,त्यानंतर आरक्षण आंदोलन उभे राहणार
आरक्षण आंदोलनासाठी ज्या मंत्र्यांसोबत चर्चा केली त्यांनीच माहिती दिल्याचा जरांगे पाटलांचा दावा
धाराशिव इथे शिवजयंती उत्सवासाठी आल्यानंतर नव्या मराठा आरक्षणाबाबत आंदोलनाबाबत मनोज जरांगे पाटील यांची माहिती
सांगली -
म्हैसाळ कागवाड रोडवर कर्नाटकची बस आणि ट्रॅक्टर मध्ये अपघात
अपघातानंतर बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटली
अपघातात 16 जण किरकोळ जखमी. यामध्ये पुरुष, महिला जखमी, जखमी मध्ये लहान मुलांचाही समावेश, मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
सुदैवाने अपघातात जीवितहानी नाही.
पुणे -
- पुण्यात मुस्लिम धर्मियांकडून उत्साहात शिवजयंती साजरी
- शिवजयंत्ती निमित्त कोंढव्यात मुस्लिम धर्मियांकडुन मिरवणुक
- मुस्लिम मावळा फाउंडेशनच्या वतीने सर्वधर्मीय शिवजयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता .
- यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा देत अतिशय भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली
- कोंढव्यात दरवर्षी शिवजयंती निमित्त मिरवणुकीचं आयोजन करण्यात येतं.
पुणे -
- शिवसृष्टीच्या दुसऱ्या चरणाचा लोकार्पण सोहळा
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार लोकार्पण
- पुण्यातील आंबेगाव येथे साकरण्यात आली आहे शिवसृष्टी
- दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतुन साकारण्यात आली आहे शिवसृष्टी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव निमित्त वर्धेच्या छत्रपती शिवाजी चौकात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी चौक मित्र परिवाराच्या वतीने हे शिबीर घेण्यात आले आहे.
दरवर्षी रक्तदान शिबीर घेत रुग्णसेवेच्या माध्यमातून शिवाजी महाराजांना अभिवादन केल्या जाते.
कोल्हापूर खासदार शाहू महाराज छत्रपती
विकिपीडियावरून संभाजी राजेंसंदर्भातला मजकूर त्वरित काढला पाहिजे
विकिपीडिया म्हणजे इतिहास नव्हे जे ज्याला वाटतं ते विकिपीडियावर टाकत असतात त्यामुळे त्यावरही कारवाई व्हावी
ट्विटर आणि विकिपीडियावर कारवाई व्हावी
मालवण इथला पुतळा कोसळणं हे दुर्दैवी घटना आहे यापुढे तरी राज्य सरकारने पुतळा बनवताना संपूर्ण अभ्यास करून त्याची माहिती घेऊनच बनवावा
धुळे -
धुळ्यात बर्निंग बसचा थरार
सोनगीर दोंडाईचा रस्त्यावर सकाळी अकोला कडून शहादाकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसला अचानक आग...
आगीत संपूर्ण ट्रॅव्हल्स बस जवळून खाक...
अकोल्याहून शहादाकडे जाणारी सिद्धी ट्रॅव्हल्स बसने अचानक घेतला पेट...
सुदैवाने जीवित हानी नाही..
घटनास्थळी अग्निशामक दलाचे बंब दाखल...
आगीचं कारण अद्याप स्पष्ट नाही...
नाशिक -
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने नाशिकच्या शिवाजी महाराजांच्या मंदिरात पहाटेपासूनच पूजाविधी पार पडले.
शिवाजी महाराजांच्या मूर्तीला जलाभिषेक, दुधाभिषेक घालण्यात येऊन महाआरती करण्यात आली.
मंदिराच्या अंगणात आकर्षक रांगोळी काढून महाराजांना अभिवादन करण्यात आले.
शिवजयंतीनिमित्ताने दिवसभर मंदिरात विविध धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत.
पहाटेपासूनच मंदिरात परिसरातील नागरिक आणि शिवप्रेमीनी मोठी गर्दी केलीय.
मागच्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना ज्या त्रुटी राहिल्या होत्या त्या सर्व त्रुटी दूर करून आता उभारलेल्या पुतळा जास्तीत जास्त चांगल्या क्षमतेचा असेल याची काळजी घेण्यात आली आहे. हा पुतळा येत्या 100 दिवसात पूर्ण होणार आहे अशी माहिती आमदार निलेश राणे यांनी दिली. मालवण राजकोट येथे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा सोहळा होत आहे. या निमित्ताने आज निलेश राणे यांनी चबुत-याची पाहणी केली यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
पुणे -
सिंहगड रस्ता परिसरात गुइलेन बॅरे सिंड्रोमचा उद्रेक झाल्यानंतर महापालिकेने पाणी तपासणी मोहीम हाती घेतली.
या परिसरातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी विविध ठिकाणी पाठविण्यात आले.
यातून आता महापालिकेच्या पाणीपुरवठ्यासह खासगी टँकर आणि रिव्हर्स ऑस्मोसिस (आरओ) प्रकल्पांचे पाणीही पिण्यास अयोग्य असल्याचे समोर आले आहे.
सिंहगड रस्ता परिसरातील ७० पाणी नमुन्यांमध्ये जीवाणंसूह विषाणू आढळले आहेत.
जळगावात शिवजयंती निमित्ताने वेगवेगळ्या शाळांच्या वाजत गाजत निघालेल्या भव्य मिरवणुकांनी लक्ष वेधले
ढोल ताशाच्या तालावर पारंपारिक वेशभूषेत सहभागी विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींकडून लेझीम नृत्याचे सादरीकरण...
छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ यांच्या विद्यार्थ्यांनी साकारल्या वेशभूषा..
नांदेड -
२२ वर्षांपासून मावेजा मिळेना, प्रकल्पग्रस्तांनी सुरू केले उपोषण.
नांदेडच्या मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्पग्रस्तांना शेतीचा आणि घरांचा मावेजा अद्याप मिळाला नाहीय.
मावेजा मिळावा या मागणीसाठी मुखेड तालुक्यातील रावणगाव येथील ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
मागील 22 वर्षांपासून मावेजा मिळावा यासाठी या गावकऱ्यांचा लढा सुरू आहे.
परंतु शासन या प्रकल्पग्रस्तांना मावेजा देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचा या प्रकल्पग्रस्तांचा आरोप आहे.
तात्काळ मावेजा द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या लेंडी प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.
सिंधुदुर्ग-
शिवजयंतीनिमित्ताने आज मालवणमध्ये पदयात्रा काढण्यात येत आहे.
मालवण टोपीवाला हायस्कूल ते राजकोट किल्ला अशी ही रॅली काढण्यात आली आहे
जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्यासहित शिवप्रेमी या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत.
साडेतीन किलोमीटरची ही रॅली राजकोट किल्ल्यावर जाणार आहे.
शिवप्रेमी आणि मालवणवासीय या सोहळ्यात सहभागी झाले आहेत.
पालघर -
मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सोमटाजवळ ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात.
गुजरातकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर अपघातात
सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही
मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचे काम मागील वर्षभरापासून सुरू
मात्र कुठलेही सूचनाफलक न लावल्याने अर्धवट कामाच्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या बॅरिगेट्सला धडकून अपघात.
महामार्गावर अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ.
वर्धा -
- महाराजांचा अभिषेक करत शिवजयंती सोहळ्याला सुरवात
- वर्धेत शिवजयंतीचा उत्साह, आकर्षक रोषणाई
- सकाळपासुन महाराजांना वंदन करण्यासाठी शिवप्रेमीची गर्दी
- वर्धेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज विभिन्न कार्यक्रम
धाराशिवच्या कळंब इथ भगवा ध्वज फडकावत मनोज जरांगे पाटील यांच्याकडून शिवजयंती सोहळ्याची सुरुवात
छावा चित्रपट टॅक्स फ्री करावा, मनोज जरांगे पाटील यांची मागणी
राहुल सोलापूरकर यांच्यावर सरकारच्या आशीर्वादानेच कारवाई नाही, मनोज जरांगे पाटील यांची टीका
पुणे -
पुण्यात शिवजयंतीचा उत्साह
शहरात विविध ठिकाणी आज भरगच्च कार्यक्रम
लाल महाल आकर्षक फुलांनी सजवण्यात आलाय
लाल महालात शिवप्रेमी सकाळपासून अभिवादन करण्यासाठी येत आहेत
रथांमधून शिवरायांच्या मिरवणूकांची तयारी सुरू
अनेक रथ सजले आहेत
शिव प्रेमींची लाल महालात गर्दी
नाशिक -
- आदिवासी विभागात खांदेपालट
- आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांची बदली
- गुंडे यांची पुण्यात महिला व बालकल्याण विभागाच्या आयुक्तपदावर बदली
- नयना गुंडे यांच्या जागेवर आदिवासी विकास महामंडळाच्या एमडी लीना बनसोड यांची नियुक्ती
- लीना बनसोड आदिवासी विकास विभागाच्या नव्या आयुक्त
नागपूर -
- नागपुरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्सव सुरु
- नागपुरातील महालातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्या जवळ उत्सवाला सुरवात
- श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्यावतीने मोठ्या उत्साहात आयोजन
- पारंपरिक वेशभूषेत अनेक तरुण आणि तरुणी पालखी सोहळ्यात उपस्थित
- महाराजांचा दुग्धअभिषेक प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते होईल
- ढोलताशा पथकांचं सादरीकरण
- शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिकांचं सादरीकरण
नागपूर -
- समृद्धी महामार्गावर कार्यरत पेट्रोल पंपावर मूलभूत सुविधा उपलब्ध करा अन्यथा जवाबदारी अधिकाऱ्यांवर 10 लाखाचा दंड ठोठावण्याचा नागपूर खंडपिठाचा इशारा...
- मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम या तिन्ही कंपन्यांना दोन आठवड्याची मुद्दत देत कारवाईचा इशारा दिला आहे.
- याचिकाकर्ते अनिल वडपल्लीवर यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गावर प्रवास करून पेट्रोलपंप आणि रेस्टॉरंटला भेट दिली, त्या ठिकाणी मूलभूत सुविधा नसल्याच प्रतिज्ञापत्र सादर केलेत.
- यात पेट्रोल पंपावर तक्रारपेटी अग्निशामक यंत्रणा उपलब्ध नाहीत स्वच्छतागृहाची साफसफाई नाही. तुम्ही मला दोन्ही बाजूने झाडे तोडण्यात आली, पण नवीन झाडे लावण्यात आली नाही असाही आरोप याचिकाकर्ते यांनी केला....
मुंबई- नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील येवई गावाच्या हद्दीतील गोदामाला भीषण आग
आर. के. लॉजिस्टीक वर्ल्ड गोदाम संकुलातील गोदामाला पहाटेच्या सुमारास अचानक लागली आग
गोडाऊनमध्ये फर्निचर, प्लास्टिक दाणे आणि तेलाचा साठा होता
सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी लाखोंचा माल जळून खाक झाला
आगीचे कारण अस्पष्ट असून अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.