
गोरेगाव पूर्व रत्नागिरी हॉटेलजवळ आग लागली आहे.
संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आग लागली.
अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून आग विझविण्याचे काम सुरू आहे.
या घटनेत कोणी अडकले आहे किंवा जखमी झाले आहे का याची अद्याप माहिती नाही.
पुण्यात मेट्रोमार्गिकेवर आंदोलन करणे भोवलंय.
पुणे महापालिका मेट्रो स्थानकावर आंदोलन करणाऱ्या १५ जणांवर गुन्हा दाखल
पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
सरकारी कामात अडथळानिर्माण करणे, मेट्रो कायदा तसेच बेकायदा आंदोलनसह इतर कलमानुसार गुन्हा दाखल
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे हे कार्यकर्ते होते मात्र आंदोलनानंतर त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे.
सातारा: 'लय भारी' यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांना मुंबईतून दहिवडी पोलिसांनी घेतले ताब्यात...
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात एक तर्फी बातम्या देऊन बदनामी केल्याप्रकरणी खरात यांच्यावर कारवाई
दहिवडी, म्हसवड, वडूज पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी, विनयभंग, बदनामी करणे यासह अनेक गुन्हे दाखल.
शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक उद्या शिवसेना शिंदे गटात करणार प्रवेश
वर्सोवा मतदारसंघातून विधान सभा निवडणूक लढवण्यासाठी राजू पेडणेकर होते इच्छुक
राजू पेडणेकर यांच्या ऐवजी हारून खान यांना उमेदवारी दिल्याने पेडणेकर यांनी लढवली अपक्ष निवडणूक
राजू पेडणेकर यांचे ठाकरे गटातून झाली होती हकालपट्टी
पेडणेकर उद्या करणार शिवसेना शिंदे गटात प्रवेश
कुडनच्या माळी स्टॉप जवळील तलावात मृत माशांचा खच .
रात्रीच्या सुमारास केमिकल माफियांकडून तलावात केमिकल सोडल्याचा संशय .
नैसर्गिक नाल्यांमधून रात्रीच्या सुमारास केमिकल सोडलं असल्याने माशांचा मृत्यू झाल्याचा संशय
स्थानिक नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण
बेरोजगारांना नोकरी मिळावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन केले जात आहे.पुणे महापालिकेच्या मेट्रो स्टेशनवर असलेल्या मेट्रो रुळावर आंदोलन केले जात आहे. आंदोलनकर्त्यांची पोलिसांनी समजूत काढलीय. महिलांवर अत्याचार, शाळांमध्ये शिक्षण मोफत व्हावे अशा देखील आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागण्या आहेत.
शक्तिपीठ महामार्ग वरून राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली आहे. आमची थडगी बांधून विकासाचे मनोरे बांधून तुम्ही ताजमहाल राहू नका अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. ते सांगली मध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. अलमट्टी बाबत महाराष्ट्र सरकारच्या नेत्यांमध्ये एवढा दम नाही. अलमट्टीच्या हरकती घेण्याबाबत आणि अलमट्टी ची उंची वाढली तर याचा फटका पूर पट्ट्यानं बसणार आहे. त्यामुळे शक्तिपीठ आणि पूर बाधित शेतकऱ्यांना घेऊन येत्या 12 मार्च ला आझाद मैदानावर सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.
वर्सोवा विधानसभेचे आमदार हारुन खान यांच्या माध्यमातून स्पेशल स्क्रीनिंगचे सोय करण्यात आलीय. हारून खान शिवसेना ठाकरे गटाचे मुस्लीम आमदार आहेत. अंधेरी वर्सोवा भागातील इन्फिनिटी पीव्हीआरमध्ये विशेष शोचे आयोजन करण्यात आले आहे.
लातूर शहरातल्या अनेक भागात व्यापारी आणि व्यावसायिकांकडून अनधिकृतपणे जाहिरातीचे होर्डिंग आणि बॅनर लावण्यात आले आहेत. दरम्यान वाढत चाललेल्या अनधिकृत होर्डिंग आणि बॅनरवर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. सकाळपासूनच शहरातील अनधिकृत बॅनर काढत महानगरपालिकेची कर्मचारी कारवाई करत आहेत.
उन्हाळा सुरू होताच बाजार समितीमध्ये फळांची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, उन्हाळ्यात कलिंगड खरबूज संत्रा या फळांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आज 60 ते 70 टन कलिंगडाची आवक झालेली आहे मात्र अजूनही प्रखर उन्हाळा तापायला सुरुवात न झाल्याने शेतकऱ्यांना कलिंगड केवळ ६ ते १२ रुपये या भावाने ठोक बाजारात विकावे लागले त्यामुळे, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.. ऊन तापायला लागल्यानंतर कलिंगड, खरबूज या फळांना मागणी वाढते व त्यांचे दर देखील वाढतात असं व्यापारांचं मत आहे.
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज सांगोला मध्ये मुक मोर्चा काढण्यात आला होता. संपूर्ण बहुजन समाजाच्या वतीने हा मोर्चा काढला.आज रविवार हा सांगोला बाजारचा दिवस असूनही संपूर्ण सांगोला शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. महात्मा फुले चौक येथून काळया फिती लावून हा मूक मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला.यावेळी मोर्चे कर्यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली.
क्रांतिकारी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय सहकारी असलेले आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्यावर मेहकर उपविभागीय दंडाधिऱ्यांनी एका वर्षासाठी तडीपारीची कारवाई केली आहे.
वाशिम जिल्ह्यात भूजल पातळी घटल्याने पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अहवालानुसार, सर्व सहा तालुक्यांमध्ये पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घसरली आहे, विशेषतः मानोरा आणि कारंजा तालुक्यांमध्ये परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. शेकडो फूट बोअरवेल खोदूनही पाणी न लागल्याने नागरिक चिंतेत आहेत. येत्या उन्हाळ्यात हा प्रश्न अधिक गंभीर रूप धारण करणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिलाय.
आदित्य ठाकरेंकडून शिबिराचं होणार उदघाटन होणार आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टिने शिबिराचं विशेष महत्त्व आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज बारामतीत मोर्चा निघणार आहे. या मोर्चात देशमुख कुटुंब सहभागी होणार आहे.
खोक्या भाईच्या अटकेसाठी शिरूर येथील पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे सहभागी होणार आहे. आमदार सुरेश धस यांना सहआरोपी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पिंपरी- चिंचवडमध्ये मनसेच्या वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरे यांची तोफ आज धडाडणार आहे. मनसेचा 19 वा वर्धापनदिन चिंचवडमध्ये आज पार पडणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.