Maharashtra Live News Update: रत्नागिरीत सकाळपासून पावसाची हजेरी, बळीराजा चिंतेत

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज शुक्रवार, दिनांक ३ ऑक्टोबर २०२५, महाराष्ट्रात पाऊस विश्रांती घेणार, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

Jaykumar Gore: पालकमंत्री जयकुमार गोरे पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनात सहभागी

- रा. स्व. संघाचा ड्रेस परिधान करत, हातात लाठी घेत पथसंचलनात सहभागी

- सोलापुरातील पूर्व भागात झालेल्या पथसंचलनात नोंदवला सहभाग

- मंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी देखील सहभाग नोंदवला

- काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जयकुमार गोरे यांनी पहिल्यांदाच पथसंचलनात सहभाग नोंदवला

Yavatmal: यवतमाळ नगरपालिकांच्या प्रभाग रचनेवर मोहोर

यवतमाळ जिल्ह्यातील निवडणूक होऊ घातलेल्या दहा नगरपालिका तसेच एका नगरपंचायतीचा अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आलाय. दहा पालिकेत 276 नगरसेवक राहणार असून यवतमाळ पालिकेत 29 प्रभाग तर 58 नगरसेवक असणार आहेत.जवळपास चार वर्षापासून पालिकेचा कारभार प्रशासक म्हणून मुख्याधिकारी पाहत आहेत,यामुळे निवडणुका कधी होतील याची प्रतीक्षा भावी नगरसेवकांना होती न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर प्रक्रियेला वेग आला आहे.

Indapur: माणगाव आणि इंदापूरच्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार

मुंबई गोवा महामार्गावर माणगाव आणि इंदापूर इथं होणाऱ्या वाहतूक कोंडीतून प्रवाशांची लवकरच सुटका होईल अशी आशा निर्माण झाली आहे. महामार्गाच्या कामातील महत्वाचा टप्पा असलेल्या माणगाव आणि इंदापूर येथील बायपासचे काम मागील काही वर्षांपासून रखडले आहे. ठेकेदाराने कामातून माघार घेतल्याने हे काम रखडलं होते परंतु आता पुन्हा एकदा या कामाला सुरुवात होत आहे. बायपासच्या या कामाची तिसऱ्यांदा निविदा प्रक्रियेनंतर ठेकेदाराची नियुक्ती झाली असून या कामातील अडथळा दूर झाला आहे. मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे आणि खासदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत या कामाचे भूमिपूजन आज होत आहे.

Pune: पुणे लोकमान्य फेस्टिवलच्या वतीने दसऱ्यानिमित्त तीस फुटी रावणाच्या प्रतिकृतीचे दहन

पुणे लोकमान्य फेस्टिवलच्या वतीने दसऱ्याच्या निमित्ताने लोकमान्य नगर जॉगिंग पार्क जवळ येथे यंदा 30 फुटी रावणाची प्रतिकृती बनवण्यात आली होती.

ओला दुष्काळ, अत्याचारी, वाढती गुन्हेगारी, बेरोजगारी, दहशतवाद अशा रूपात्मक रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात येणार आहे.

पुणे शहरातून आणि परिसरातून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी रावण दहन पाहण्यासाठी गर्दी केली होती.

यावेळी उपस्थितांनी जय श्रीराम, जय जय श्रीराम अशा घोषणा देवून परिसर दणाणून सोडला होता.यावेळी हवेत रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती.

Pune: पुण्यात मेट्रो प्रवासी संख्येत तुफान वाढ,सप्टेंबर महिन्यात रेकॉर्डब्रेक

पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ झाल्याचं दिसत आहे.वाहतूक कोंडी, पीएमपी तिकीट दरवाढ व पावसाने नागरिक मेट्रोकडे वळले असून गेल्या चार महिन्यांत प्रवासी संख्या २४ लाखांनी वाढून सप्टेंबरमध्ये ७५ लाखांवर पोहोचली आहे

महामेट्रो’कडून वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन मार्गांवर मेट्रो सेवा सुरू करण्यात आली आहे.

या वर्षी मार्चपासून प्रत्येक महिन्यात मेट्रोचे प्रवासी वाढत असल्याचं चित्र आहे.मात्र, जून महिन्यापासून प्रवासी संख्या वेगाने वाढण्यास सुरुवात झाली असून जूनपासून पाऊस सुरू झाल्यामुळे, तसंच पीएमपी तिकीट दरवाढ व कोंडीमुळे प्रवासी मेट्रोकडे वळल्याचं दिसत आहे.

गणेशोत्सवात प्रवासी संख्येचे अनेक उच्चांक झाल्याचे पाहायला मिळाले.

Aibaug: अलिबाग वडखळ महामार्गाची दुरवस्‍था

अलिबाग वडखळ महामार्गाची पार दुरावस्था झाली आहे. रसत्‍यावर मोठमोठे खड्डे पडले असून पाऊस पडलाकी या खड्यांचे मोठमोठे डबकी होतात. अलिबाग हे प्रसिदध पर्यटन स्‍थळ असलेल्या बरोबरच रायगडच जिल्हा मुख्यालय आहे. यामुळे अलिबागला येणाऱ्या पर्यटकांबरोबरच शासकिय कामांसाठी येणाऱ्या नागरीकांची संख्या मोठी असते. अलिबागकडे येणाऱ्या या रस्‍त्‍यावरील मोठमोठया खड्डयांमुळे येथे येणारे नागरीक, पर्यटकांबरोबरच स्थानिक देखील पुरते बेजार आहेत.

ट्रॅक्टर धुण्यासाठी गेलेल्या ४ मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू;छत्रपती संभाजीनगरमधील घटना

ट्रॅक्टर धुण्यासाठी खदानीत गेलेल्या चार मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लिंबेजळगाव येथे काल दसऱ्याच्या दिवशी घडली. इरफान इसाक शेख (१७), इम्रान इसाक शेख (वय १३), ड्रौन हयात पठाण (वय ९) व व्यंकटेश उर्फ गौरव दत्तू तारक (वय ९, सर्व रा. लिंबे जळगाव) अशी मृतांची नावे आहेत. मयतांमध्ये दोन सख्खे भाऊ व एक आतेभाऊ असे एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. काल सकाळी इरफान इसाक शेख हा ट्रॅक्टर धुण्यासाठी जाताना त्यांच्यासोबत त्याचा लहान भाऊ इमरान, मामाचा मुलगा ौन व शेजारील दत्तू तारक यांचा मुलगा व्यंकटेश उर्फ गौरव हे असे तिघेही ट्रॅक्टरमध्ये बसून गाव शिवारातील मुरूम उत्खनामुळे तयार झालेल्या खदानीत गेले. दीड दोन तास झाले तरी मुले परत आली नाहीत, म्हणून मुलांना पाहण्यासाठी ट्रॅक्टर उभे असल्या ठिकाणी गेले; मात्र तिथे त्यांना कोणीच दिसून आले नाही. त्यांनी त्यांचा शोध घेतला; परंतु ते सापडले नाहीत. यावेळी या सर्वांनी शोध घेतला असता एकापाठोपाठ त्यांना तिघांचे मृतदेह हाती लागले तर मोठा इरफान हा तासभर शोध घेतल्यानंतर मिळून आला. तोपर्यंत अनेक जण घटनास्थळी दाखल झाले होते. चारही जणांना बाहेर काढल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला.

Pune Municipal Corporation: मुंबईच्या धरतीवर पुणे महानगरपालिकेने केले विकेंद्रीकरण

पुण्यातील क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकार वाढले मुंबईच्या धरतीवर पुणे महानगरपालिकेने केले विकेंद्रीकरण

अत्यावश्यक सेवांची देखभाल दुरुस्तीचे क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांना अधिकार

महापालिकेचे 15 क्षेत्रीय कार्यालय आहेत त्यांच्या माध्यमातून पाच लाख रुपये पर्यंतचे कामे प्रामुख्याने करण्यात येतात

पाच लाखापेक्षा अधिकची कमी मुख्यालयाकडून होत होते आता तेच अधिकार 25 लाखापर्यंत निविदा काढण्याचे छत्रिय कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहे

शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन आयुक्त नवल किशोर राम यांनी हा निर्णय घेतला आहे

Pune: पुण्यात उंच इमारतींतील अग्निशमन यंत्रणांची तपासणी

पुणे महापालिकेचा निर्णय, उंड्रीतील आगीच्या घटनेनंतर महत्त्वाचे पाऊल

उंड्रीतील मार्वल सोसायटीत झालेल्या आगीच्या दुर्घटनेत इमारतीतील अग्निशमन यंत्रणा बंद असल्याचे समोर आल्यानंतर पुणे महापालिकेने शहरातील ७० मीटरपेक्षा उंच इमारतींची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे

यंत्रणा बंद आढळल्यास संबंधित सोसायटी किंवा बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई होणार आहे.

बांधकाम नियमावलीत बदल झाल्याने पुण्यात आता टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. १०० मीटरपेक्षा उंचीच्या सुमारे ३० पेक्षा जास्त इमारती सध्या शहरात उभ्या आहेत.तर भविष्यात १५० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या इमारतीही शहरात पाहायला मिळणार आहेत.

उंच इमारतींच्या बांधकामांना परवानगी देताना महापालिकेतील 'हाय राइज कमिटी'कडून संपूर्ण अभ्यास करून या प्रस्तावांना मान्यता दिली जाते. या इमारतींची उंची जास्त असल्याने त्यात सुरक्षेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना केल्या जातात.

Amravati: अमरावतीत कुख्यात गँगने पोलिसांवर हवेत केला गोळीबार

आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगने पोलिसांवर हवेत गोळीबार केल्याची माहिती पुढे येतेय...

अमरावतीच्या परतवाडा येथील भवानी हॉटेल समोरील घटना...

दसऱ्याच्या दिवशीच फारिंगच्या घटनेमुळे शहरात खळबळ...

बस स्टॅन्ड परिसराला मध्यरात्री पोलीस छावणीचे स्वरूप...

पोलीस व चोरांमध्ये फिल्मीस्टाईल चकमकीनंतर १० जणांना ब्राह्मणसभा भागातून पोलिसांनी घेतले ताब्यात...

मुंबई क्राईम ब्रांच, हरियाणा पोलिसांच्या माहितीवरून नागपूर व अमरावती ग्रामीण पोलिसांकडून कारवाई...

आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू...

Ulhasnagar: उल्हासनगरात सराईत गुंडाने दहशत माजवण्याचा प्रयत्न

उल्हासनगर कॅम्प 2 मधील 24 नंबर शाळा परिसरात बंजारा विकास परिषद येथे बालाजी मित्र मंडळाचा गरबा आहे. ह्या गरब्याचे आयोजक शिवसेना शाखाप्रमुख बाळा भगुरे हे आहेत. त्यांना स्थानिक सराईत गुन्हेगार सोहम पवार याने गरब्याच्या ठिकाणी रात्री पावणे बारा वाजता अडवले. गरब्याला माझ्याकडून परवानगी घेतली का, मी इकडचा भाई आहे असे म्हणत सोहमने बंदूक काढून बाळा भगुरे यांच्यावर रोखले. त्यामुळे गरब्यात एकच खळबळ उडाली. बाळाच्या भावाने मध्यस्थी करीत त्याना वाचवले. मात्र चिडलेल्या सोहमने दहशत माजवण्यासाठी त्याच्या कडच्या बंदुकीतून हवेत दोन गोळ्या झाडल्या. या घटनेची माहिती उल्हासनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष आव्हाड यांना मिळताच त्यांनी तत्काळ पोलिस पथकासह घटनास्थळ गाठत तपास सुरू केला आहे. या प्रकरणी बाळा भगुरे यांच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.

Washim: राजधानी मुंबईत शांत पध्दतीने पण ठाम आंदोलन करण्याचा निर्धार; सुनील महाराज

पोहरादेवी येथे दसऱ्यानिमित्त प्रथमच बंजारा समाजाचा दसरा मेळावा घेण्यात आला.यापुढे दरवर्षी असा मेळावा आयोजित व्हावा, अशी समाजबांधवांची एकत्रित हाक.

एस.टी. प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी सर्व धर्मपीठे व समाज संघटना बाबुसिंग महाराज यांच्या नेतृत्वाखाली एकत्र यावेत असा ठराव पारित.

आरक्षणाची लढाई संविधान पद्धतीने आणि कायदेशीर मार्गाने लढणार असल्याचे समाजाचे स्पष्ट मत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहरादेवीत येऊन गेले असून, मुख्यमंत्रीही पाच वेळा येथे आले; त्यामुळे सरकारला आमच्या मागण्यांची जाणीव आहे, असा समाजाचा विश्वास.

Sangli: विट्यात लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला ऐतिहासिक पालखी शर्यत सोहळा

अत्यंत चुरशीच्या आणि थरारक अशा पार पडलेल्या पालखी शर्यतीमध्ये मूळस्थानची पालखीने प्रथम येण्याचा बहुमान मिळवला.

विट्याचा श्री रेवणसिध्द देव व मूळस्थान येथील श्री रेवणसिध्द देव या दोन देवांच्या पालख्यामध्ये ही शर्यत झाली.रेवणसिध्दाच्या नावानं चांगभलंच्या गजरात पार पडलेल्या शर्यती मध्ये मूळस्थानच्या पालखीने निर्णायक क्षणी आघाडी घेत पालखी शर्यत जिंकली. दीडशे वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणारी ऐतिहासिक पालखी शर्यत सोहळा पाहण्यासाठी देशभरातून लाखो भाविक विट्यात उपस्थित होते.

Ratnagiri: रत्नागिरीत सकाळपासून पावसाची हजेरी, बळीराजा चिंतेत

रत्नागिरी - रत्नागिरीत सकाळपासून पावसाची हजेरी

रत्नागिरीत बहुतांश ठिकाणी तुरळत तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या सरी

चिपळूण ,संगमेश्वर , लांजा , राजापूर आदी भागात पावसाच्या सरी

पावसामुळे बळीराजाची चिंता वाढली

कापणी योग्य झालेलं भात पिक पावसामुळे अडचणीत येण्याची शक्यता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com