नाशिकमधील शिवसृष्टी परिसरात मराठे कार्यकर्ते आणि भुजबळ आमनेसामने आलेत. दोन्ही बाजुच्या समर्थकांकडून घोषणा बाजी केली जात आहे.
प्रवीण लोणकर नावाच्या इसमाला पुण्यावरून अटक करण्यात आलीय. 28 वर्षीय प्रवीण लोणकर हा शुभम लोणकर यांचा भाऊ आहे. प्रवीण लोणकर हा कटातील एक सूत्रधार आहे. त्याने शुभमसोबत धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गौतम यांना सामील केलं होतं. ही कारवाई मुंबई गुन्हे शाखेची
बुलढाणा शहरालगत असलेल्या देऊळघाट या गावात आज सायंकाळी दुर्गा विसर्जन मिरवणुकी दरम्यान आक्षेपार्ह बॅनर झळकाविल्याने देऊळघाट या गावात तणाव निर्माण झाला होता . दोन गट आमने-सामने आल्यानंतर काही काळ दगडफेकही झाली. यात एका पोलीस गाडीचे नुकसान झालं असून एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणाला सुरुवातीला बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयात उपचार करून छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आल आहे. सध्या देऊळघाट या गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असून पोलीस अधीक्षक विश्व पानसरे स्वतः घटनास्थळी आहेत देऊळघाट गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
रहिवासी इमारतीत गाड्यांना आग लागली. अग्निशमन दलाची तीन वाहने दाखल झाली असून संपूर्ण इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर येत आहे. सद्यस्थितीत दलाच्या जवानांनी 7 रहिवाशांना धुरातून बाहेर काढले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही. ३ दुचाकी आणि २ चार चाकी आगीत जळून खाक झालेत.
बाबा सिद्धिकी यांची अत्यंयात्रा निघाली आहे. बडा कब्रस्तानमध्ये दफनविधी होणार आहे. सिद्धिकी यांच्या घराबाहेर नमाज-ए-जनाजाला सुरुवात झालीय.
इंदापूर बायपास नजीक बारामती रोडवर ट्रक आणि हायवा डंपर चा अपघात झालाय आणि यामध्ये ट्रक आणि हायवा डंपर या दोन्ही वाहनांनी पेट घेतला आहे.बारामतीकडून एक ट्रक डाळींब घेऊन इंदापूरकडे येत होता दरम्यान पाठीमागून आलेल्या हायवा डंपरने या ट्रक ला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांनी पेट घेतला आहे. अग्निशामक यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून आग विझवण्याचं काम सुरू आहे तर इंदापूर पोलीस देखील अपघात स्थळी दाखल झाले आहेत.या अपघात दोघे जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळतेय.
काँग्रेस भवनमध्ये मुलाखती पार पडल्या. पुणे शहरासह जिल्हा आणि पिंपरी चिंचवड मधील इच्छुकांनी मुलाखती दिल्या. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. शिवाजीनगर मतदारसंघातून सनी निम्हण यांनी सुद्धा मुलाखत दिली. सनी निम्हण भाजप चे माजी नगरसेवक आहेत. सनी निम्हण यांनी अद्याप काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाहीये. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसला कसबा, पुणे कैटोन्मेंटसह शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ मिळण्याची शक्यता
बाबा सिद्दिकी यांची हत्या होताच राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षाच्या हत्येचं प्रकरण देखील गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. सचिन (मुन्ना) कुर्मी याच्या हत्येचा तपास गुन्हे शाखा करणार आहे. पाच तारखेला भायखळ्याच्या घोडपदेव परिसरात सचिन कुर्मीची निर्घृण हत्या हत्या झाली होती. सचिन कुर्मीच्या हत्येच्या आठवड्यात भरात बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली. मंत्री छगन भुजबळ यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याची केली होती मागणी केलीय.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या राज्य निवडमंडळाची बैठक उद्या सोमवार दि. १४ ॲाक्टोबर रोजी दुपारी ४ वा. टिळक भवन दादर येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गट नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्यासह राज्य निवडमंडळाचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री यांचा "संत एकनाथ" तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा "देवाभाऊ" म्हणून उल्लेख करण्यात आलाय. "तमाम जनतेने आपली सुरक्षा स्वतःच करावी", असा मजकूर सुद्धा या फ्लेक्सवर लिहिण्यात आलाय. पुण्यातील अनेक प्रमुख चौकात सेनेकडून जोरदार फ्लेक्सबाजी करण्यात येत आहे.
बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आलीय. गोळीबार प्रकरणातील चौथ्या आरोपीची ओळख पटलीय. झिहान अख्तर असं या आरोपीचं नाव आहे.
चालत्या कारने घेतला पेट घेतल्याची घटना घडलीय. याचा व्हिडिओ व्हायरल झालाय.
व्हायरल व्हिडिओ मालाड पुष्पा पार्क येथील असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी पेटती कार रस्त्यावर धावताना दिसत आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याची स्पष्टता होऊ शकलेली नाहीये.
बाबा सिद्दीकी यांच्या मारेकऱ्यांकडे दोन पिस्तूल आणि २८ राऊंड मिळाले आहेत. लॉरेंस बिश्नोई गँगच्या रोलचा आम्ही तपास करतोय. मुलाच्या ऑफिसमधून बाहेर आल्यावर गोळीबार झाला. दोन हल्लेखोरांना पकडण्यात यश झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ हे देखील बाबा सिद्दिकी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी आणि सिद्दिकी कुटुंब यांचे सांत्वन करण्यासाठी वांद्रे येथील निवासस्थानी पोहोचले आहेत
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील चौथ्या आरोपीची ओळख पटली असून मोहम्मद झीशन अख्तर असं नावं आहे. त्याने हत्यारं पुरवल्याचा संशय आहे. दरम्यान धर्मराज कश्यपच्या वयाची चाचणी करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.तर गुरमैल सिंह याला २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांना धक्का
वसई विरार महापालिकेचे माजी महापौर राजीव पाटील करणार भाजपात प्रवेश
आज संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राजीव पाटील यांचा पक्षप्रवेश
राजीव पाटील हे हितेंद्र ठाकूर यांचे आत्येबंधू
नालासोपारा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर राजीव पाटील यांना उमेदवारी देणार
राजीव पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून नवरात्रोत्सवात भाजप कार्यकर्त्यांच्या मंडळांना भेटी दिल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाची होती चर्चा
विधानसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागल्याने वंचित बहुजन आघाडी ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे.सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभेच्या जगांसाठी आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शासकीय विश्रामगृहात पार पडत आहेत. 2014 साली वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभा निवडणूक लढवली होती.त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील वंचितची ताकद दिसून येते.त्याच अनुषंगाने इच्छुक उमेदवार आपल नशीब आजमावण्यासाठी आज मुलाखती देत आहेत.
नवी मुंबईतील कळंबोली येथे मागील पाच दिवसांपासून धनगर समाजाचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची शासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने धनगर समाजाच्या बांधवानी एकत्र येत सरकारचे कान उघडण्यासाठी ढोल बजाओ आंदोलन केले. शेवटच्या कॅबिनेट मध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलेले लेखी आश्वासन पाळावे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी 10 वर्षा पूर्वी दिलेला शब्द पाळावा अन्यथा महाराष्ट्रभर फिरू देणार नाही असाइशारा धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला.
बाबा सिद्धीकी यांच्यावर झालेल्या हल्यानंतर मलबार हिल परिसरातील मंत्र्याच्या बंगल्याच्या सुरक्षेत वाढ...
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या बंगल्यावरती सुरक्षा वाढवली....
तर मलबार हिल परिसरातील इतर मंत्र्याच्या बंगल्याबाहेर गस्ती वाढवण्यात आली आहे...
त्याच बरोबर मलबार हिल परिसरातील अतिमहत्वाच्या पाॅईंटवर नाकाबंदी करण्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकार्याच्या सूचना..
सरकारच्या प्रत्येक कृतीबद्दल संशय व्यक्त केला जातोय. हे गंभीर आहे. आम्ही आमच्या उपाय योजना मांडणार आहोत.
अडीच वर्षाच्या काळात आम्ही काम केलं आहे. जातीय दंगली करण्याचा त्याच्याकडे शेवटचा प्रयत्न आहे. आरोपींवर अटक झाली असेल पण २ पोलीस आयुक्त आहेत ना? नाना पटोले यांचा फोन टॅप केला जात होतो… तिथे लक्ष का नाही का ?
महाराष्ट्र राज्याचा वेगळा लौकिक होता. उत्तम प्रशासन म्हणून लोक महाराष्ट्राकडे बघत होते. आज ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांची लोकांनी टिंगल करावी अशी स्थिती केली. सरकारने किती निर्णय घेतले… त्यामधील किती निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. दोन ते तीन दिवसांत आचारसंहिता लागेल, असे शरद पवार म्हणाले.
ही गद्दारी फक्त सेना आणि राष्ट्रवादीसोबत झाली नाही, तर जनतेसोबत झाली. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणावर ठाकरे संतापले. ते म्हणाले, मुंबईला २ पोलीस कमिशनर आगेत, आणखी ५ वाढवा … हरकत नाही पण कारभाराचे काय ?
गद्दारांना आणि त्याच्या कुटुंबियांना दिलेली सुरक्षा काढा आणि जनतेला द्या. हे सरकार आपल्या अंगाला काही लागू देत नाही.
काही महिन्यांपूर्वी घोसाळेपण यांची हत्या झाली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.. कुत्रा गाडीखाली आला तर राजीनामा मागणार का? तुम्ही म्हणता कुत्र्याचा मृत्यू झाला तरी राजीनामा मागणार … तुम्हाला जीवाची किंमत नाही का?
तुम्ही जाहिरातबाजीवर पैसा उधळता तेवढा जनतेच्या सुरक्षेवर लावा. शाहू फुले आणि आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आम्ही मोदी शहांचा होऊ देणार नाही, असे ठाकरे म्हणाले.
राज्यातील सुरक्षेचे तीन तेरा वाजले आहेत. राज्यात झालेल्या अतिवृष्टीची मदत शेतकर्यांपर्यंत पोहचली नाही. पीक विमा हे विशिष्ट उद्योगपतींसाठी सुरू केलं. काही शेतक्यांना विम्याने ३ रुपये मिळाले. केंद्रातील चमू येथे येत नाही. लोकसभेत राज्यातील जनता मविआ सोबत राहीली… तशी विधानसभा निवडणुकीत देखील जनता आमच्यासोबत राहील, असे नाना पटोले म्हणाले.
शाहू फुलेंच्या महाराष्ट्राला काळिमा फासण्याचं काम या सरकारचं सुरु आहे. महायुतीने जे पाप केलं ते उघड करण्यासाठी आम्ही जनतेसमोर आलो आहोत. मालवण येथील महाराजांचा पुतळा केवळ ८ महिन्यात त्याची विडंबना झाली. हे पाप महायुतीने केलं, अद्याप फडणवीस यांनी या घटनेची माफी मागितली नाही. माजी मंत्री आणि नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली… महाराष्ट्र हादरला. शाळेत शिकणाऱ्या ५ वर्यांच्या मुली सुरक्षित नाहीत. राजीनामा अनेकांनी मागितला आहे… पण आता जनता यांना दाखवेल.
माझी खासदार काँग्रेस नेत्या प्रिया दत्त या देखील आता बाबा सिद्दिकी यांच्या मकबा हाईट्स निवासस्थानी दाखल झाल्या आहेत. सिद्दिकी आणि दत्त कुटुंबीयांचे नाते फार जुने आहे. दत्त कुटुंबीय आणि सिद्दिकी कुटुंबीय नेहमीच एकमेकांच्या दुःखात सहभागी होत असतात जीशान सिद्दिकी यांचे सांत्वन करण्यासाठी प्रिया दत्त या आता बाबा सिद्दिकी यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत
पुण्याच्या इंदापूरात बापासाठी लेक मैदानात उतरलीय…हर्षवर्धन पाटलांच्या विजयासाठी पवार गटाच्या नेत्या मुलगी अंकिता पाटील ठाकरे यांनी आजपासून तालुक्यात जनसंवाद यात्रा सुरु केलीय. इंदापूर तालुक्यातील व्याहळी गावात भैरवनाथाला श्रीफळ वाढवून या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला आहे.
बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांना धक्का
वसई विरार महापालिकेचे माजी महापौर राजीव पाटील करणार भाजपात प्रवेश
आज संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राजीव पाटील यांचा पक्षप्रवेश
राजीव पाटील हे हितेंद्र ठाकूर यांचे आत्येबंधू
नालासोपारा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर राजीव पाटील यांना उमेदवारी देणार
राजीव पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून नवरात्रोत्सवात भाजप कार्यकर्त्यांच्या मंडळांना भेटी दिल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाची होती चर्चा
शिवकुमार ऊर्फ शिव गौतम उत्तर प्रदेशच्या बेहराईच च्या गंधारा गावचा राहणार
शिवकुमार गँगचा म्होरक्या असल्याचा इतर दोन्ही अटक आरोपींचा चौकशीत दावा
हत्येनंतर शिवकुमार पळून जाण्यात यशस्वी
शिवकुमारच्या शोधात मुंबई गुन्हे शाखेच्या टीम परराज्यात रवाना
शिवकुमार पुण्यात एका स्क्रॅप डीलरकडे कामाला असल्याची सूत्रांची माहिती
बाभळगाव इथल्या दसरा मेळाव्यात आमदार देशमुख बंधूंनी लाडकी बहिणी योजने वर सरकून टीका केली आहे.. लाडकी बहीण योजना ही कुठल्याही एका पक्षाची नाही...,तर ती सरकारची आणि सर्वच लोकप्रतिनिधीची योजना आहे.. त्यामुळे या योजनेचा लाभ पात्र असलेल्या प्रत्येक नागरिकांनी घेतला पाहिजे.. लोकसभेत पराभव झाल्यामुळे, विधानसभेच्या तोंडावर आणलेली योजना आहे... अशी सडकून टीका काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी काल झालेल्या बाबळगाव येथील दसरा मेळाव्यात केली आहे...
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या काँग्रेस नेत्यांची दिल्लीत महत्वाची बैठक
राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते काँग्रेस पक्षश्रेष्ठी यांच्याशी करणार चर्चा
महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार बैठकीसाठी उपस्थित असणार
हरियाणा राज्यानंतर राहुल गांधी महाराष्ट्राचा आढावा घेणार
विधानसभेच्या जागावाटप बाबत देखील बैठकीत चर्चा होणार
महाविकास आघाडीतील काही जागांचा तिढा अद्याप सुटला नसल्याने तो दिल्लीत तरी सुटणार का हे पाहणं महत्वाच
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर मर्दानी दसरा उत्सव सुरू आहे आज सकाळी मोठ्या उत्साहात मर्दानी दसरा उत्सवाला सुरुवात झाली आहे 40 किलो ची देवाची जी तलवार आहे त्या तलवारीलाच खंडा असे म्हटले जाते या खंडाच्या विविध कसरती केल्या जातात याला मर्दानी दसरा असे म्हटले जाते यामध्ये विजेत्यांना बक्षीस आणि पारितोषिक मार्तंड देवस्थानच्या वतीने दिले जाते या उत्सवाला आता सुरुवात झाली असून राज्यभरातून हजारो भाविकांनी हा उत्सव पाहण्यासाठी गर्दी केली आहे रात्री देवाची पालखी गडावरून गावामध्ये आली होती ही पालखी गडावर सकाळी परत आल्यानंतर मर्दानी दसरा उत्सवाला सुरुवात झाली आहे
सणासुदीच्या काळात गोवा बनावट दारूचा मोठा साठा कोल्हापूर पोलिसांनी केला जप्त
24 लाखांच्या गोवा बनावट दारूसह 38 लाखांचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई
शाहुवाडी तालुक्यातील आंबा येथे कोल्हापूर पोलिसांची कारवाई
चौघांना अटक;शाहुवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
दसऱ्याच्या मध्यरात्री पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाची कारवाई
अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू ट्रक पलटी झालाय.. इंदौर वरून बेंगलोरला साबण बनवण्याचे केमिकल घेऊन जात असताना ड्रायव्हर साईडचे चाक निखळल्यामुळे हा ट्रक पलटी झाला आहेय. राष्ट्रीय महामार्गावरील भोसला इंजिनिअरिंग महाविद्यालय रस्त्यावरील डिवायडरवर हा ट्रक उलटलाऐ. त्यामुळे डिझलची टाकी पुर्ण फुटली असुन डिझेल व केमिकल रस्त्यावर प्रमाणात पडलेले होते. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नाही. चालकाला किरकोळ मुक्कामार लागला असून तो सुखरूप आहे.
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. २००४ ते २००८ या काळात ते विविध खात्यांचे राज्यमंत्री तसेच म्हाडाचेही अध्यक्ष होते.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजप निवडणूक समितीची बैठक होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता भाजप प्रदेश कार्यालयात बैठक पार पडेल.
भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह समितीचे इतर नेते राहणार उपस्थित आहेत. भाजपची पहिली यादी येत्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता असल्याने या बैठकीत अंतिम नावावर अंतिम चर्चा होणार आहे.
भंडारा जिल्ह्यातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रातील माजी आमदार चरण वाघमारे हे सध्या अपक्ष असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जयंत पाटील व शरद पवार यांच्याशी संपर्कात असल्याची अनेक दिवसांपासून चर्चा होती. चर्चेसाठी मिळालेल्या निमंत्रणानुसार ते आज शरद पवारांची भेट घेत चर्चा करून पक्षप्रवेश व तुमसर - मोहाडी विधानसभेच्या उमेदवारी संदर्भात निर्णय घेणार आहेत.
देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेलेले बाप लेक बुडाण्याची घटना संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडच्या वांजोळा परिसरात घडली.
२ सप्टेंबरपासून हे आरोपी कुर्ल्यात भाड्याने खोली घेऊन रहात होते. या खोलीसाठी महिन्याला १४ हजार भाडं देत होते.
४ जणांनी मिळून बाबा सिद्धीकी याच्या हत्येची सुपारी घेतली होती. प्रत्येकी ५० हजार वाटून घेणार होते. पंजाबमध्ये हे तिघं जणं एका जेलमध्ये असताना एकमेकांच्या संपर्कात आले. जेलमध्ये आधीपासून बिष्णोई गॅगचा एक सदस्य होता त्याच्या संपर्कात हे तिघं आले.
बाबा सिद्दीकी यांचे पार्थिव बडा कब्रस्तान मारिन लाईन येथे होणार दफन
मुस्लिम समाजाच्या नुसार होणार दफनविधी
संध्याकाळी 8.30 वाजता होणार दफनविधी
यापूर्वी बाबा सिद्दीकी यांचे पार्थिव बांद्रा येथील राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आह
बाबा सिद्दीकी यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी राजकीय नेते येण्याची शक्यता आहे
मुस्लिम धर्मानुसार नमाज ए जनाजा म्हणजे शेवटची प्रार्थना करण्यात येणार
7 वाजता हि प्रार्थना त्यांच्या राहत्या घरी मकबा हाईट येथे होणार
यानंतर त्यांचा दफनविधी रात्री साडेआठ वाजता मरीन लाईन्स येथील बडा कब्रस्तान येथे होणार
- अजित पवार यांचा नाशिक दौरा रद्द
- अजित पवार यांच्या हस्ते आज देवळाली विधानसभा मतदारसंघात होता विविध विकासकामांचा उद्घाटन सोहळा
- बाबा सिद्दिकी हत्येच्या घटनेमुळे अजित पवार यांचा नाशिक दौरा रद्द
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.