उद्या दुपारपर्यंत शरद पवार गटाकडून उमेदवारांची अंतिम यादी होणार जाहीर
सातारा, माढा आणि रावेर या जागेसाठी उद्या उमेदवारांची नाव जाहीर होण्याची शक्यता
गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे शिवतीर्थावरून काय भूमिका घेणार याकडे राज्यासह, देशाचं लक्ष लागलं होतं. अखेर राज ठाकरे यांनी केवळ नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आहे. तसंच कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीला लागण्याचंही आवाहन केलं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीची ताकद वाढणार तर आहेच, पण महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार आहेत. विधानसभा निवडणुकामध्येही राज ठाकरे महायुतीसोबत राहिले ते महाविकास आघाडीला हे कडवं आव्हान असेल.
जगात सध्या सर्वाधिक तरुण भारत देशात आहेत. त्यामुळे तरुणांसाठी केंद्र सरकारने नरेंद्र मोदींनी काम केलं पाहिजे. २००६ साली भाषणातून बोललो होतो जीन्सवाला शेतकरी हवाय, तसा विकास झाला पाहिजे.
गेल्या पाच वर्षात जे चांगलं काम केलं ते बोललोय. मी व्यक्तिगत टीका करत नाही. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ज्या टोकाने बोललेत तसं मी बोलत नाही
त्यावेळी हे माझ्या सोबत का नाही आले तेव्हा सत्तेतील मालिदा खात होते
तुमच्या काय अपेक्षा आहेत ते सांगायला आलोय
२००६ साली भाषणातून बोललो होतो जीन्सवाला शेतकरी हवाय
सर्वाधिक तरुण भारत देश आहे
तरुणांसाठी केंद्र सरकारने काम केलं पाहिजे
१० वर्षात देश म्हातारा होणार
मोदींकडून अपेक्षा आहे तरुणांकडे लक्ष द्या
जागा वाटपाबाबत चर्चा १९९५ साली झाली होती. मात्र मला वाटपाच जमत नाही. हे रेल्वे इंजिन तुमच्याकारनास्तव कमावलेल आह. त्यामुळे चिन्हावर कोणतीही तडजोड होणार नाही, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.
१९८० साली बाळासाहेब इंदीराजींना भेटायला गेले होते
भेटी कोणाच्या ही होऊ शकतात
मुख्यमंत्री एकत्र आले पाहिजे काही तरी केल पाहिजे
एकत्र आले पाहिजे सर्व बोलत होते म्हणून अमित शहांना बोललो होतो
लाव रे तो व्हिडिओ चा काय यावर विचार झाला
माझ्या आयुष्यात तेव्हा एकमेव शिवसेना पक्ष होता
शिवसेने सोबत मेज संबंध भाजप सोबत आले
राजकारणाच्या पलिकडे संबंध होते
काँग्रेस सोबत संबंध नावते
भेटी होत्या पानवगाठी भाजप सोबत होत्या
नंतर नरेंद्र मोदी सोबंत संबंध झाले
गुजरातची प्रगतीच्या पुढे महाराष्ट्र आहे
मोदी पंतप्रधान व्हावेत असा बोलणारा राज ठाकरे एकमेव होता
२०१४ च्या निवडणुकीनंतर पाच वर्षात वेगळ्याच दिसायला लागल्या
मोदीच्या ज्या गोष्टी चागल्या वटल्या ते बोलणार नाही आवडलं तर आवडलं
राजीव गांधीनंतर एक गठ्ठा सत्ता आल्यानंतर जे व्हायला पाहिजे ते झालं नाही म्हणून टोकाचा राग आला
तो टोकाचा विरोध केला तो २०१९ लाव रे तो व्हिडिओ
गेल्या दिवसांपासून राज ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं नेतृत्त्व करणार अशा चर्चा होत्या. मात्र राज ठाकरे यांनी आज या सर्व चर्चांचं खंडण करताना रोखठोक उत्तर दिलं. शिवसेनेचं नेतृत्व त्याचवेळी केलं असंत. बाळासाहेबांशिवाय कोणाच्याही हाताखाली काम करण्याची इच्छा नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
अस वाटतय सभा शिमल्याला आहे फटाक्यांच्या धुरामुळे
पाच वर्षांनंतर निवडणुका होताहेत
महापालिकेच्या निवडणुका अजूनही होत नाही
आता आचार संहितावले जागे झालेत
डॉक्टर आणि नर्सेस ना निवडणुकीसाठी जुंपलय
डॉक्टर नाडी तपासणार का
आयोग सिस्टीम का करत नाही
मी आत्ताच सांगतो डॉक्टरांनी जाऊ नका तुम्हाला नोकरीवरून कोण काढतोय ते मी बघतो
गुडीपाढवाच्या शुभेच्छा दिल्या
पोलिसांची दिलगिरी व्यक्त करतो
पोलिसांना ही पाडाव्याच्या शुभेच्छा
तुम्ही बघत होतात ते मी ही बघत होतो
रोजचे चॅनेल आज मला विचारावे लागते
वाट्टेल त्या बातम्या चालू होत्या
शहाच्या भेटीत आम्ही दोघच भेटलो
बारा तास थांबलो कोणी सांगितलं
शिवतीर्थावर मनसेता गुढीपाडवा मेळावा होत असून सभेच्या ठिकणी राज ठाकरेंची एंन्ट्री झाली आहे. राज ठाकरे व्यासपीठावर येताच शिवतीर्थावर एकच जल्लोष. चांदीचा कलश देऊन राज ठाकरेंच स्वागत करण्यात आलं.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळावा होत आहे. थोड्याच वेळात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्यातून संबोधित करणार आहेत. सध्या लोकसभा निवडणुकांचं वातवरण आहे. यातचं काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते महायुतीसोबत जाण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. भाजपकडूनही महायुती बाबत हिरवा कंदील दाखवला होता. त्यामुळे आजच्या मेळाव्याला महत्त्व आलं आहे. या मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे.
थोड्याच वेळात मनसेचा मेळावा सुरू होणार असून शर्मिला ठाकरे सभेच्या ठिकाणी पोहचल्या आहेत. राज ठाकरे यांची मुलगी उर्वशी, मुलगा अमित ठाकरेही पत्नीसोबत सभेच्या ठिकाणी पोहचले आहेत.
महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना पालम तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोगाव येथे येण्यापासून मराठा आंदोलकांनी रोखले. त्यांनी जानकर यांना काळे झेंडे दाखवून एक मराठा लाख मराठा अशा घोषणाबाजी दिल्या.जानकर शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भोगाव येथील मारुती मंदिराच्या दर्शनासाठी येत होते.
हवामान खात्यान दिलेल्या अंदाजानुसार आज वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर ,रिसोड ,मालेगाव तालुक्यात विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह आज पुन्हा अवकाळी मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली.. जिल्ह्यात दुपार नंतर ढगाळ वातावरण बघायला मिळालं. गारपिटीमुळं उन्हाळी पिकांचं काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असून हवामान विभागाकडून आणखी दोन दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी (पीएमसी ) बँक घोटाळा
ईडीने केली ५२.९० कोटी रुपयांची शेत जमीन तात्पुरती जप्त
सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील विजयदुर्ग गावातील एकूण १८०७ एकर जमीन जप्त
पीएमएलए कायद्यांतर्गत करण्यात आली कारवाई
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल
उमेदवारांना प्रत्येक जंगम मालमत्ता उघड करण्याचे बंधन नसणार - कोर्ट
परंतु ज्या जंगम मालमत्ताची किंमत अधिक आहे त्यांची माहिती द्यावी लागणार
अरुणाचल प्रदेशचे आमदार करिखो क्री यांच्या प्रकरणी कोर्टाने हा निकाल दिलाय
सुप्रीम कोर्टाने गुवाहाटी उच्च न्यायालयाचा निकाल रद्द ठरवत हा निर्णय दिलाय
पिंपरी चिंचवड शहरात भरधाव कारचालकाने वाहतूक बंदोबस्तावर असलेल्या दोन वाहतूक पोलिसांना चिरडले आहे. ज्यात दोन वाहतूक पोलीस गंभीर जखमी झाले असून एका वाहतूक पोलिसांची पस्थिती गंभीर आहे.
केशवनगर मुढवा मधील प्रकार
टँकर मधील पाण्याच्या मदतीने आग विझवण्यात आली
कुठलीही हानी नाही बुलेटच नुकसान
पुण्यात गेले काही दिवसापासून उन्हाचा तडका वाढला तापमान 40 च्या पार
वाहने पेट घेण्याच्या घटना प्रत्येक उन्हाळ्यात वाढताना दिसत आहेत
एसटीपी प्लांट साफ करण्यासाठी उतरलेल्या ४ कामगारांचा मृत्यू
विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी परिसरातील घटना
तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश एकाचा शोध सुरू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गोंदिया येथील बिरसी विमानतळ येथे आज दुपारी दोन वाजता आगमन होणार आहे. खासदार प्रफुल पटेल हे बिरसी एअरपोर्ट येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करतील. तेथून पंतप्रधान नरेंद्र मोदी बालाघाट येथे हेलिकॉप्टरने रवाना होतील.
मुंबईतील जागावाटपावरून मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांची नाराजी
वर्षा गायकवाड यांनी नाराजी दिल्लीत कळवली.
नाना पटोले आणि ठाकरे यांच्या भूमिकेमुळे मुंबईतील काही जागा काँग्रेसला मिळाल्या नाहीत, असं वर्षा गायकवाड यांचं मत
संजय राऊत काय म्हणाले?
महाविकास आघाडीत कोणीही नाराज नाही
आमची चर्चा झाली. आता सांगलीतील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत. तिथे कोणीही नाराज नाही
आघाडीत ऑल वेल आहे.
बी आर एस नेत्या के. कविता यांच्या कोठडीत वाढ
23 एप्रिलपर्यंत कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
कथित दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी के. कविता न्यायालयीन कोठडीत आहेत.
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा मिटला आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना २१ जागा लढणार आहेत. काँग्रेस १७ जागा लढणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्ष १० जागा लढणार आहे.
जयंत पाटील म्हणाले...
गेली अनेक महिने बैठकांमध्ये मविआचे घटक पक्ष चर्चा करत होते
दोन तीन वेळा दिल्ली स्तरावर चर्चा झाली.
आजचा शुभमुहूर्त इंडिया आघाडी मविआच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवेल.
महाराष्ट्रातील महागाई, बेरोजगारी, या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी मविआ कटिबद्ध आहे.
अनेक पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला.
काही ठिकाणी यश आलं, काही ठिकाणी अपयश आलं.
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, आप, माकप, भाकप, शेकाप आदी पक्ष आमच्या सोबत आहेत.
अनेक आंबेडकरवादी संघटना आमच्या सोबत आहेत
महाविकास आघाडीची पत्रकार परिषदेला सुरुवात झाली आहे. या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे, संजय राऊत, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार, जयंत पाटील इत्यादी नेते उपस्थित आहेत.
काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. राजू वाघमारे शिंदे गटात प्रवेश करताना म्हणाले, काही ठराविक नेत्यांच्या हाती काँग्रेस दडलेली आहे, अशी टीका वाघमारे यांनी केली.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे राज्याला उद्देशून पत्र
महात्म्यांची परंपरा लाभलेल्या राज्यात आज परिस्थिती बदललेली
तत्वांशी तडजोड करत नितिमत्तेची चाळण करणारे समाजभेदी विचार डोक वर काढत आहे. राजकीय परंपरेत गुंडांचा शिरकाव झालाय. काळी माती संकटात आणि शेतकरी हतबल झालाय
येणाऱ्या लोकसभेत तुतारीला मत देऊन राज्याचे चित्र बदल्यांचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या शुभेच्छा मराठीत ट्विट करून दिल्या शुभेच्छा
गुढीपाडवा मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी डोंबिवलीत निघणारी नववर्ष स्वागत यात्रा म्हणजे डोंबिवलीकरांसाठी पर्वणी. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळीच श्री गणेशाचे दर्शन घेऊन तरुण-तरुणी सह हजारो डोंबिवलीकर नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होतात. तरुण-तरुणीनी डोंबिवलीमधील आवडता फडके रोड हा फुलून जातो. यंदा देखील स्वागत यात्रेत डोंबिवलीकरांचा उत्साह दिसून येतोय.
आज सकाळपासूनच डोंबिवलीमधील फडके रोडवर तरुण-तरुणांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय. डोंबिवलीकर आजच्या दिवसातले क्षण मोबाईल कॅमेरात टिपताना दिसून येत होते. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत पारंपारिक वेशभूषा करत या स्वागत यात्रेत सहभागी झालेत.
अयोध्येत प्रभू श्रीराम विराजमान झाल्यानंतर गुढी उभारली,
पण आमचे श्रीराम अनेक वर्ष वनवासात होते,
अयोध्येत त्या ठिकाणी स्थापना झाली, सांस्कृतिक वर्ष सुरू झालं,
या सांस्कृतिक पुनर्निर्माण मध्ये ही संस्कृती पुढील पिढीपर्यंत न्यावा लागेल,
हा आपला इतिहास आहे, जी पान इतिहासतून डिलीट केली
आम्ही विजयी मानसिकतेचे आहे, आम्ही हिंदू आहो हे संगण्याची वेळ आली आहे,
भारतात आणि महाराष्ट्रात विजयाची नवीन गुढी उभारणार आहोत,
त्यामुळे सर्वना शुभेच्छा..
राज्यात आजपासून पुढील तीन दिवस हलक्या सरींची शक्यता
पुढील पाच दिवस कमाल तापमान एक ते दोन अंश सेल्सिअसने कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळणार, हवामान विभागाचा अंदाज
मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना
विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता
राज्यभरात काहीसे ढगाळ हवामान तयार झाल्यामुळे कमाल तापमान चाळिशीच्या आत
साई मंदिरावर उभारली श्रद्धा सबुरीची गुढी, मराठी नववर्षाचे उत्साहात स्वागत
साईबाबांच्या शिर्डीतही गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्षाचा उत्साह दिसून येत आहे. साई मंदिराच्या कळसावर पारंपारिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली आहे.. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सपत्नीक विधिवत पूजा करून ही गुढी उभारली. साईबाबांच्या शिर्डीत वर्षभरातील प्रत्येक सण उत्सव मोठ्या आनंदाने साजरी करण्याची परंपरा आहे. आज मराठी नववर्षाचे स्वागतही मोठ्या उत्साहात पार पडत आहे. आज साईबाबांच्या मूर्तीला कोट्यवधी रुपयांच्या आभुषणांसह साखरेच्या गाठीची माळा परिधान करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.