Maharashtra Live News: महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन, संगमनेर तालुक्यात पाणीच पाणी

आज शिवराज्यभिषेक दिन आहे. दिवसभरातील बातम्यांचे लाईव्ह अपडेट येथे जाणून घेऊ या.
राज्यातील प्रत्येक महत्वपूर्ण घडामोडींचे वेगवान अपडेट वाचा
Today's Marathi News Live Saam tv
Published On

महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन,  संगमनेर तालुक्यात पाणीच पाणी

महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. संगमनेर तालुक्यातील राजापूर शिवारात झालेल्या जोरदार पावसामुळे शिवारांमध्ये पाणी साचलं आहे. विहिरीतील पाणी सुद्धा अचानक वाढले आहे.

महायुतीमधील घटक पक्षाची उद्या मुंबईत बैठक, लोकसभा निकालावर चर्चा होण्याची शक्यता

देशामध्ये नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतील निकालावर विचार विनिमय करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने महायुतीमधील घटक पक्षाची बैठक दिनांक ७ जून म्हणजेच उद्या सकाळी ११.०० वाजता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या B-5 या निवासस्थानी होणार आहे.

पराभव झाला तरी दादांची साथ सोडणार नाही, राष्ट्रावादीच्या आमदारांचा एकमताने निर्धार

पराभव झाला तरी चालेल पण अजित दादांची साथ सोडणार नाही

अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीत आमदारांचा एकमताने निर्धार

कुठलाही आमदार शरद पवार यांच्यापक्षातील आमदारांच्या संपर्कात नसल्याची आमदारांची बैठकित ग्वाही - सूत्रांची माहिती

गडचिरोलीत वीज कोसळून दाेघांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

गुरुवारी गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. यादरम्यान वीज पडून दाेघांचा मृत्यू तर दाेघेजण जखमी झाल्याची घटना चामाेर्शी तालुक्यात घडली. गुरूदास मणिराम गेडाम व वैभव देवेंद्र चौधरी असे वीज पडून ठार झालेल्यांची नावे आहेत, तर नीलकंठ तरकडू भोयर, लेकाजी भय्याजी नैताम हे जखमी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

नवनीत राणा, रवी राणा अमरावतीवरून दिल्लीकडे रवाना

रात्री उशिरा नागपूर विमानतळावरून राणा दाम्पत्य दिल्लीत पोहचनार

अमरावती लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा पराभवानंतर प्रथमच घराबाहेर

राणा दाम्पत्याला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीत बोलावलं असल्याची माहिती

अमरावती लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर राणा दाम्पत्य दिल्लीला जाणार

बीडमध्ये मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण

बीडमध्ये मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव, धारूर, वडवणी तालुक्यात आज सायंकाळपासूनच पाऊस सुरू आहे. तर आता पुन्हा एकदा बीड शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान दुष्काळी बीड जिल्ह्यात आता मान्सून पूर्व पाऊस दाखल झाल्यानं नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळतय.

सोलापूर जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा, मोहोळ तालुक्यात पुरसदृश्य स्थिती

सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, मोहोळ तालुक्यात पुरसदृश्य स्थिती

सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी

मोहोळ तालुक्यात एक तास प्रचंड मुसळधार पाऊस

मुसळधार पावसामुळे वैराग - मोहोळ मार्ग खचला... रस्त्यावर पाणीच पाणी

नरखेड ते मोहोळ दरम्यानची वाहतूक खोळंबली

नरखेड गावामधील ओढ्यांची एकाच तासात पूर सदृश्य परिस्थिती

यंदाच्या वर्षात वेळेत मान्सून दाखल झाल्याने शेतकरी आनंदी

अजित पवार एनडीए च्या बैठकीला दिल्लीला जाणार

एनडीए बैठकीसाठी दिल्लीला अजित पवार जाणार

शपथविधीआधी होणाऱ्या बैठकीला अजित पवार जाणार

प्रफुल पटेल, तटकरेही जाणार

राणा दाम्पत्याला तातडीने दिल्लीला येण्याचा निरोप

दिल्ली येथील भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाचा राणा दाम्पत्याला तातडीने दिल्ली येण्याचा निरोप,भाजपाच्या माजी खासदार नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा तातडीने आज संध्याकाळी नागपूर वरून दिल्लीकडे रवाना होणार आहेत.

राणा दाम्पत्याला तातडीने दिल्ली येण्याचा निरोप

दिल्ली येथील भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाचा राणा दाम्पत्याला तातडीने दिल्ली येण्याचा निरोप देण्यात आलाय. भाजपच्या माजी खासदार सौ नवनीत रवी राणा आणि आमदार रवी राणा तातडीने आज संध्याकाळी नागपूर वरून दिल्लीकडे रवाना होणार आहे.

नाशिक जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, पेरणीच्या कामांना येणार वेग

नाशिक शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मॉन्सूनपूर्व पावसाची हजेरी

अनेक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस

नाशिकरोड परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी

उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाच्या शिडकाव्याने दिलासा

संध्याकाळच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची तारांबळ

मॉन्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांच्या पेरणीच्या आशा पल्लवीत

स्टॉक मार्केटवरून राहुल गांधींचा पंतप्रधान, गृहमंत्री आणि अर्थमंत्र्यांवर निशाणा

निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान, गृहमंत्री आणि अर्थमंत्री यांनी स्टॉक मार्केट वर टिपण्णी केली

पंतप्रधान २-३ वेळा म्हणाले स्टॉक मार्केट पुढे जाणार

गृहमंत्री यांनी स्पष्ट सांगितल की ४ तारखेला स्टॉक मार्केट वर जाईल

सांगलीच्या विशाल पाटील यांचा काँग्रेसला पाठिंबा

विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी घेतली मल्लिकार्जुन खरगे यांची भेट

विशाल पाटील यांचा काँग्रेसला पाठिंबा

आज दुपारी विश्वजीत कदम यांनी घेतली भेट

लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात विजांच्या कडकडाटात तुफान पाऊस

लातूर जिल्ह्यात आज पहाटेपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान आज दुपारपासून जिल्ह्यातल्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झाला आहे. तर गेल्या 2 तासांपासून जिल्ह्यातल्या अनेक भागात विजांच्या कडकडाटात तुफान पाऊस बरसला आहे , त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये पावसाळ्याची चाहूल लागली आहे.

राज्याचं पावसाळी अधिवशेन २७ जूनला, मंत्रिमंडळात निर्णय

पावसाळी अधिवेशन 27 जूनला घेण्याचा निर्णय ठरला.

महाराष्ट्रातली परिस्थिती बघता चारा छावणी संदर्भात काही महत्त्वाची चर्चा झाली

अपंग मंत्रालय संदर्भात देखील महत्त्वाची चर्चा झाली. त्याची गती वाढवण्याबाबत चर्चा झाली

देवेंद्रजी मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित होते मात्र ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते

फडणवीस यांच्या संदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा नाही पक्षाच्या बैठकीत चर्चा झाली . नक्कीच पुढच्या बैठकींना उपस्थित राहतील.

पुण्यात आज पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात, सलग तीन दिवस तडाखा

पुण्यात जोरदार पावसाला सुरुवात

पुणे शहरात आज जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती

शहरातील प्रमुख भागात मुसळधार पावसाची हजेरी

पुण्यातील शनिवार, नारायण पेठेत पावसाला सुरुवात

राहुल झावरे हल्लाप्रकरण, पारनेर पोलिसांनी ३ जणांना घेतलं ताब्यात

खासदार लंके यांचे समर्थक राहुल झावरे हल्लाप्रकरण.

पारनेर पोलिसांनी तीन जणांना घेतले ताब्यात.

विखे समर्थक विजय औटी, नंदू औटी सह एका जणाला घेतलं ताब्यात.

राहुल झावरे यांची गाडी फोडून केली होती जबर मारहाण

झावरे यांना अहमदनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी केले आहे दाखल.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला केंद्रात मिळणार २ मंत्रिपदं

चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाला 4 कॅबिनेट मंत्री पद दिली जाणार

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्री पद मिळणार

राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला 1 कॅबिनेट मंत्री पद दिलं जाणार

संघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली फडणवीसांची भेट, नाराजीवरून समजूत काढण्याचा प्रयत्न

देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीनंतर संघाच्या पदाधिकारी यांनी घेतली फडणवीस यांची भेट

धरमपेठ निवासस्थानी सुमारे दिन तास झाली चर्चा झाल्याचं बोललं जातं आहेय...

संघाकडून फडणवीस यांचे मनधरणीचे प्रयत्न केल्याच बोललं जातं आहेय...

पराभवावर चर्चा झाल्याची माहिती, संघाचे वरिष्ठ पदाधिकारी यांचा

नरेंद्र मोदी ९ जून रोजी घेणार पंतप्रधानपदाची शपथ

एनएडीतील घटकपक्षांनी पंतप्रधानपदासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना समर्थन दिलं आहे. येत्या दोन ते तीन दिवसात सत्ता स्थापन केली जाईल. दरम्यान पंतप्रधान पदाची तारीखही निश्चित झाली आहे. ९ जून ला सायंकाळी ६ वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे.

CM एकनाथ शिंदे आणि नवीन खासदारांची बैठक

वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नवीन खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. इंडिया आघाडीच्या कुठल्याही नेत्याच्या संपर्कात न राहण्यासंदर्भात खासदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. शिंदे गटाच्या वाटेला येणाऱ्या केंद्रीय मंत्रिपदाच्या संदर्भात ही महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या बैठकीत नरेंद्र मोदी आणि एनडीएच्या सत्ता स्थापने संदर्भात महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई; पुणे विमानतळावर लाखांचे सोने जप्त

पुणे सीमा शुल्क विभागाकडून पुणे विमानतळावर 24k सोने जप्त केले. दुबईहून आलेला एकाने पॅकेटमध्ये सोनं आणलं होतं. दुबईवरून हा व्यक्ती विमानतळावर आला होता. त्याची झाडाझडती घेतली. तेव्हा एका पॅकेटमध्ये सोनं सापडलं. या सोन्याची किंमत 78,01,043 रुपये इतकी आहे.

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात ७२ तासांत मुसळधार पावसाची शक्यता

महाराष्ट्राच्या पुढील ७२ तासांत अनेक भागांत वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,लोणावळा तसेच आंबोली घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Lok Sabha : लोकसभा निवडणुकीनंतर विखे-लंके समर्थकांमध्ये जोरदार राडा

लोकसभा निवडणुकीनंतर पारनेरमध्ये विखे-लंके समर्थकांमध्ये राडा झाला.खासदार निलेश लंके यांच्या स्विय सहाय्यक राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. सुजय विखे पाटील समर्थक विजय औटीसह आठ ते नऊ जणांनी केला हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यात राहुल झावरे यांची कार फोडून मारहाण केली.

मोठी बातमी! विनोद तावडे अमित शहांच्या भेटीला

दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. दिल्लीत विनोद तावडे हे अमित शहांच्या भेटीला पोहोचले आहेत. दिल्लीत आज देवेंद्र फडणवीस हे पीएम मोदी आणि अमित शहांची भेट घेणार आहेत.

जय भीम नगर झोपडपट्टी वाचवा आंदोलन चिघळलं , पोलिसांत दगडफेक, ५ पोलीस जखमी

पवई भीम नगर परिसरात निष्काशनाची कार्यवाही करण्यासाठी गेलेल्या पालिका अधिकारी आणि पोलिसांवर जमावाने दगडफेक केली. जय भीम नगर झोपडपट्टी वाचवा आंदोलन चिघळलं. झोपड्यांवर करवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. ५ पोलीस जखमी झालेत.

देवेंद्र फडणवीस नागपुरमध्ये दाखल, कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी

Summary

Nagpur Breaking News: लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरमध्ये दाखल झालेत. यावेळी विमानतळावर भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष संघटनेचे काम करत उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनाम्याची घोषणा केली आहे. त्यानंतर समर्थकांनी राजीनामा देऊ नये, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे.

Pune Accident: सिंहगड रोडवर ट्रकने महिलेला चिरडले

सिंहगड रोड प्रयजा सिटी परिसरात आज सकाळी RMC प्लांटच्या ट्रकने एका महिलेचा चिरडले. त्यामध्ये त्या महिलेचा मृत्यू झाला आहे. सिंहगड पोलीस स्टेशन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे.

सुप्रिया सुळे पुण्यात! कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

Summary

Pune News: बारामती लोकसभा मतदार संघात दणदणीत विजय मिळवल्यानंतर सुप्रिया सुळे पहिल्यांदाच पुण्यामध्ये दाखल झाल्या आहेत. यावेळी कार्यकर्त्यांकडून सुप्रिया सुळे यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद राहुल गांधी यांच्याकडे?

राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेते बनाव अशी अनेक खासदारांची मागणी आहे. राहुल गांधी पद स्वीकारणार का, हे पाहावे लागेल. पक्षाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे. येत्या २ दिवसांत नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.

 vishal Patil : सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना भेटणार

काँग्रेस बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची विशाल पाटील भेट घेणार आहेत.

काँग्रेस आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील दोघेही मुंबईकडे रवाना झाले आहेत.

Narendra Modi : नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीसोहळ्याची तयारी सुरु

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसोहळ्याला अनेक देशांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. शपथविधी सोहळ्याच निमंत्रण द्यायला सुरुवात केली आहे. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल हे नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. कालच नरेंद्र मोदी यांनी फोन करत पुष्प कमल दहल यांना निमंत्रण दिलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

डोंबिवली स्फोटातीला मृतांचा आकडा वाढला, बेपत्ता कामगारांची ओळख पटली

डोंबिवली अमुदान कंपनी स्फोटाला 15 दिवस पूर्ण झाले आहेत. या स्फोटातील मृतांचा आकडा 12 वरून 17 वर पोहोचला आहे. या स्फोटात 9 कामगार बेपत्ता होते. त्यातील ५ कामगारांची ओळख पटली आहे. 23 मार्च ला झालेल्या स्फोटात 12 कामगारांचा मृत्यू झाला होता, 9 कामगार बेपत्ता होते ,9 बेपत्ता कामगारांपैकी 5 कामगारांची ओळख पटली असून मृत्यूचा आकडा 17 वर पोहोचला आहे.

varsha Gaikwad : वर्षा गायकवाड उद्धव ठाकरेंची भेट घेणार

वर्षा गायकवाड आज उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेणार आहेत. लोकसभेच्या विजयानंतर वर्षा गायकवाड पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. दुपारी 12 वाजता वर्षा गायकवाड या भेट घेणार आहेत.

आंबोली घाटात भला मोठा दगड कोसळला

सिंधुदुर्गातील आंबोली घाटात धबधब्याच्या परिसरात पहाटे भला मोठा दगड रस्त्यावर कोसळला

कोसळलेला दगड संरक्षक भितीकडे जावून स्थिरावला

आज पहाटे ही घटना घडली

सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही

भलामोठा दगड रस्त्यावर कोसळल्यामुळे रस्त्यावर मोठ्या भेगा पडल्या आहेत

Sanjay Raut : पराभूत झालेला माणूस पुन्हा पंतप्रधान कसा होऊ शकतो? संजय राऊतांचा सवाल

संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

नरेंद्र मोदींचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ सोपा नाही. मोदींची भाषा पाहा, संघ, पक्ष यांचा मोदींना विरोध आहे. पराभूत झालेला माणूस पुन्हा पंतप्रधान कसा होऊ शकतो? संसदीय पक्षात मतदान घ्या आणि विचारा पंतप्रधान मोदी हवेत का? पंतप्रधान मोदींनी शपथ घेतली तरी त्यांचं सरकार जास्त काळ टिकणार नाही.

नारायण राणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटणार

केंद्रीय मंत्री नारायण राणे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंब्याची घोषणा केल्यानंतर राणेंसाठी सभा घेतली होती. नारायण राणे यांच्यासाठी सर्वात पहिली सभा रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये घेतली होती.

Mumbai News : मुंबईतील चेंबूर कॅम्पमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट, अनेक जण जखमी

मुंबईतील चेंबूर कॅम्पमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. चेंबूरमधील दुकानात स्फोट झाला. या स्फोटात अनेक जण जखमी झाले आहेत.

Kolhapur Rain : कोल्हापुरात मुसळधार पाऊस

कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे.

गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णीमध्ये 3 तास पावसाचा कहर पाहायला मिळाला.

हलकर्णी ते बसर्गे रोडवरील ओढ्यावर पाणी आलं आहे.

ओढ्यावरील वाहतूक काही वेळासाठी बंद ठेवली होती

Amravati News: बळवंत वानखडे देणार आमदारकीचा राजीनामा

अमरावती लोकसभा निवडणुकीत दर्यापुरचे काँग्रेस आमदार बळवंत वानखडे हे अमरावतीचे खासदार म्हणून विजयी झाले. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार तथा मावळत्या खासदार नवनीत राणा यांचा पराभव करुन त्यांनी अमरावतीची जागा बळकावली. त्यामुळे त्यांना कुण्यातरी एका पदाचा राजीनामा देऊन एक पद शाबूत राखावे लागणार आहे.

चाकूने वार करून युवकाची हत्या; यवतमाळ येथील घटना

चाकूने वार करून युवकाची हत्या; यवतमाळ च्या राळेगाव येथील घटना

अँकर : पूर्ववैमानशातून युवकाची धारदार शस्त्राने सहा ते सात वार करून हत्या केल्याची घटना यवतमाळच्या राळेगाव येथील बस स्थानका समोर रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली.

Mumbai News: मुंबई विमानतळावर आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई विमानतळावर आत्महत्येचा प्रयत्न

कर्नाटक पोलिसांनी लूक आऊट नोटीस बजावलेल्या २४ वर्षीय आरोपीने मुंबई विमानतळावर हाताची नस घेतली कापून

मोहम्मद आफ्रिद विरोधात कर्नाटकात आहे गुन्हा दाखल

सहार पोलीस ठाण्यात आफ्रिद विरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Shivrajyabhishek Din: किल्ले रायगडावर 351 वा शिवराज्याभिषेक साजरा होतोय

स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर 351 वा शिवराज्याभिषेक साजरा होत आहे. दोन दिवस साजरा होणाऱ्या सोहळ्याला याचीदेही याची डोळा पहाण्यासाठी शिवप्रेमींनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली आहे. कल संध्याकाळी गडावरील विवीध देवी देवतांचे पुजन, मर्दानी खेळानी या सोहळ्याला प्रारंभ झाला तर आता काही वेळात प्रत्यक्ष शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे.

Rain Update: राज्यात शनिवारपासून जोरदार पाऊस

राज्यात शनिवारपासून जोरदार पाऊस होणार आहे. मॉन्सून वाटचालीसाठी पोषक स्थिती आहे. बुधवारी मोसमी पाऊस तळकोकणात दाखल होणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात मॉन्सून गोव्यातच अडखळला आहे. आज तळकोकणात मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. शनिवारपासून पुढील तीन दिवस राज्याच्या बहुतेक भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com