विधीमंडळातले राडेबाज, थेट कारावास, आव्हाड- पडळकर समर्थक अडचणीत|VIDEO

Jitendra Awhad Gopichand Padalkar Supporters: विधीमंडळातील राडेबाज कार्यकर्त्यांना आता चांगलाच चाप लावण्यात आलाय... पावसाळी अधिवेशनातील राडेहबाजीनं विधीमंडळात नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता? अशातच चौकशी समितीनं दिलेल्या अहवालानंतर आव्हाड आणि पडळकर समर्थकांवर काय कारवाई करण्यात आलीय...
Supporters of Awhad and Padalkar seen during the clash inside Maharashtra Legislature premises.
Supporters of Awhad and Padalkar seen during the clash inside Maharashtra Legislature premises.Saam Tv
Published On

पावसाळी अधिवेशनात जितेंद्र आव्हाड आणि पडळकर समर्थकांमध्ये झालेला हा राडा आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय...आणि त्याला कारण ठरलयं... नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात चौकशी समितीनं दिलेला अहवाल...या अहवालात आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक नितीन देशमुख आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक सर्जेराव टकले यांना दोन दिवसांचा कारावास सुनावण्यात आलाय. तर दोघांनाही 2029 पर्यंत विधान भवनाच्या आवारात प्रवेश बंदी घालण्याची शिफारस करण्यात आलीय.

राडेबाजांना चाप लावण्यासाठी शिफारसी

विधीमंडळात येणाऱ्या लोकांच्या सुरक्षेसाठी एक स्वतंत्र नियमावली तयार करावी

विधानभवनात सुरक्षा विभागानं पोलिस समन्वय ठेवून चोख सुरक्षा व्यवस्था करावी

अभ्यंगतांची स्वयंचलित रिअलटाईम पार्श्वभूमी तपासावी

अभ्यगंतांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात आल्यास त्याची प्रवेशिका तातडीने रद्द करावी

पावसाळी अधिवेशनात जितेंद्र् आव्हाड आणि गोपीचंद प़डळकर यांनी एकमेकांना डिवचले होते आणि एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली होती. त्यावरून आव्हाडांचे समर्थक नितीश देशमुख आणि पडळकरांचे समर्थक सर्जेराव टकले यांच्यात 17 जुलै 2025 ला विधानभवनाच्या लॉबीत हाणामारी झाली होती. विधीमंडळाची प्रतिष्ठा मलिन केल्यानं विशेषाधिकारी भंग आणि अवमान समितीनं चौकशी सुरु केली.

सर्जेराव टकले आणि नितीन देशमुख यांची समितीसमोर 10 सुनावण्या झाल्या. दोघांचीही साक्ष नोंदवून अहवाल तयार करण्यात आला...त्यानंतर आता दोघांवरही कडक कारवाई करण्यात आलीय. मात्र यापुढे अशा घटनांना आळा बसेल का? हा खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com