Marathi News Live Updates: स्वराज्य संघटनेच्या धनंजय जाधव यांची पोलिसांकडून चौकशी

Maharashtra News Live Updates : आज गुरुवार, १ ऑगस्ट २०२४ आजच्या ठळक बातम्या, महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आणि पावसाचे अपडेट, यशश्री शिंदे प्रकरण, पूजा खेडकर प्रकरण एका क्लिकवर वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News
Maharashtra Live News UpdatesSaam tv

Jitendra Awhad : स्वराज्य संघटनेच्या धनंजय जाधव यांची पोलिसांकडून चौकशी

स्वराज्य संघटनेच्या धनंजय जाधव आणि कार्यकर्त्यांना पुणे पोलीसांनी चौकशी करून सोडून दिलं. जितेंद्र आव्हाड गाडी तोडफोड प्रकरणी पुणे पोलिसांकडून जाधव आणि कार्यकर्त्यांची 1 तास चौकशी करण्यात आली. तोडफोड प्रकरणी थेट संबंध नसल्याकारणाने केवळ चौकशी करून समज देऊन पुणे पोलिसांनी सर्वांना सोडून दिलं.

NEET पेपर लीक प्रकरणी सीबीआयकडून पहिलं आरोपपत्र दाखल

NEET पेपर लीक CBI ने NEET पेपर लीक प्रकरणी पहिले आरोपपत्र दाखल केले असून त्यात एकूण 13 जणांना आरोपी केले आहे. तसेच तपास यंत्रणेने या प्रकरणात आतापर्यंत एकूण 40 जणांना अटक केलीय.

Jitendra Awhad:  जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ल्याप्रकरणी डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलीस गुन्हा दाखल करणार आहे. डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पी डिमेलो रोडवर जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता.

राज्यसभा खासदार सुधा मूर्ती यांना दिला जाणार लोकमान्य टिळक पुरस्कार

राज्यसभा खासदार सुधा मूर्ती यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शरद पवार, श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होत आहे. महाराष्ट्र सदनात कार्यक्रमाला सुरुवात झालीय. प्रथमच दिल्लीत पुरस्कार वितरण सोहळा होतोय. हा पुरस्कार मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात आला होता.

Nashik Collector:  नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सप्ताह

पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत महसूल पंधरवाडा कार्यक्रमास सुरुवात झालीय.

96 नवीन तलाठ्यांची नियुक्तीपत्र देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महसूल सप्ताहनिमित्त महसूल विभागास शासनाकडून वाहन

मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी जिल्ह्यातील पहिल्या महिलेचा पालकमंत्र्यांनी सत्कार केला. जिल्ह्यातील विविध उपक्रमांचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन

Jitendra Awhad:   आव्हाडांच्या कारवरील हल्ल्यानंतर समर्थक आक्रमक; रोखला रस्ता

स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या कारवर हल्ला केल्यानंतर आव्हाडांच्या समर्थकांनी ठाण्यात रस्ता रोखलाय. आव्हाड यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत.

Mumbai : मुंबई किनारी रस्ता प्रकल्प करण्यासाठी कंत्राटदाराने पालिकेकडे मागितली 181 दिवसांची मुदत

मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे 91 टक्के काम पूर्ण झालेले असून संपूर्ण प्रकल्प सुरू होण्यास मे 2024 ची मुदत देण्यात आली आहे. आता कंत्राटदाराने 181 दिवसाची अजून मुदत मागितली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.

Amol Mitakari: आमदार मिटकरी यांच्या कारवर हल्ला करणाऱ्या मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी

अकोल्यात मनसेच्या कार्यकर्त्यांना सुनावली एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. ५ जणांना सिव्हिल लाईन पोलिसांनी अटक केली. अमित ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी पाच जणांना अकोला पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहात आमदार अमोल मिटकरीवर झालेल्या हल्ला आणि वाहनाची तोडफोड प्रकरणात या सर्वांना अटक करण्यात आली होती. सचिन गालट आणि इतर लोकांना अटक करण्यात आली होती. काल मनसेचे जिल्हा प्रमुख पंकज साबळे शहर प्रमुख सौरभ भगतसह एकाला जामीन मिळाला होता.

Khadakwasla Water Level : खडकवासलातून मुठा नदीत 11, 407 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 5 वाजता 11 हजार 407 क्यूसेक्स करत करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार पाण्याचा विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे.

PMC : पुण्यातील भिडे पुलाजवळील अतिक्रमण हटवलं, पुणे महापालिकेची कारवाई

पुण्यातील भिडे पुलाजवळ असलेले अतिक्रमण पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हटवलं आहे. भिडे पुलाजवळ गेल्या अनेक महिन्यांपासून अतिक्रमण करण्यात आलं होतं. अनेक वेळा पुणे महापालिकेला पुणे विद्रूप होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या, त्यानंतर पालिकेने ही कारवाई केली आहे.

Amol Mitkari : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचं आंदोलन मागे

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील ठिय्या आंदोलन मागे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पायऱ्यांवर मुलगी आणि भावासह सुरू केलं होतं ठिय्या आंदोलन. मनसे कार्यकर्त्यांनी आपल्या गाडीवरील केलेल्या हल्ल्यातील आरोपींना अकोला पोलीस जाणिपूर्वक वाचवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Jitendra Awahad : राज्यातील आमदार सुरक्षित नाहीत, फडणवीसांनी राजीनामा द्यावा :नाना पटोले 

राज्यात आमदार देखील सुरक्षित नाहीत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात हे सगळ घडत आहे. रश्मी शुक्ला या केवळ भाजपासाठी काम करत आहेत. फडणवीस आणि रश्मी शुक्ला यांनी जबाबदारी स्वीवारून राजीनामा द्यावा, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

 Mumbai Congress : लोकसभेत राहुल गांधींविषीयी आक्षेपार्ह भाषा, मुंबई काँग्रेसचं तीव्र आंदोलन

लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची जात विचारून त्यांचा अपमान केल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाचा मुंबई काँग्रेसकडून आंदोलन करून तीव्र निषेध करण्यात येत आहे. भाजपविरोधात मुंबई काँग्रेसतर्फे मुंबई काँग्रेस कार्यालय राजीव गांधी भवन येथे आंदोलन करण्यात येत आहे. राहुल गांधी यांची केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी जात विचारली यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे.

CM Eknath Shinde : स्वप्नीलचं मनापासून अभिनंदन, राज्य सरकार शक्य ती मदत करेल : CM एकनाथ शिंदे

मी मनापासून स्वप्नीलच अभिनंदन करतो, महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. भारताला ओलिम्पिकमध्ये तिसरं मेडल मिळालं आहे. महाराष्ट्र सरकारकडून जेजे सहकार्य करतो येईल ती मदत केली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Congress : BMC कार्यालयाला टाळे ठोकण्यासाठी गेलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्याविरोधात मुंबई युथ काँग्रेस आक्रमक झाली आहे. मुंबई युथ काँग्रेस अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली कांदिवली पश्चिमेकडील आर दक्षिण पालिका कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी कार्यालयाला टाळे ठोकण्यात गेलेल्या काँग्रेस आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Nandurbar Rain News : नंदुरबार जिल्ह्याला अद्यापही दमदार पावसाची प्रतिक्षाच

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव शहरात पावसाला सुरुवात झाली आहे. 8 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर धडगाव शहरात पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. पावसामुळे शेती पिकांना चांगला फायदा होणार आहे. मात्र नंदुरबार जिल्ह्यात अजून दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

Akola News: मनसे नेते अमित ठाकरेंच्या ताफ्यातील वाहनांना अपघात, सुदैवाने कोणालाही दुखापत नाही

मनसे नेते अमित ठाकरेंच्या ताफ्यातील वाहनांना अपघात झालाय. अमित ठाकरेंचा ताफा समृद्धी महामार्गावरून मालेगाव येथून अकोल्याकडे जात होता. ताफ्याातील गाड्या एकमेकांवर आदळल्यात. पातुरजवळील भंडारज फाट्याजवळची घटना असून सुदैवाने कुणालाही कोणतीही दुखापत नाही.

Nashik News: नाशिकमध्ये ठाकरे गटाची महापालिका आयुक्तांच्या कार्यालयावर धडक

नाशिकमध्ये ठाकरे गटाची महापालिका आयुक्तांच्या कार्यालयावर धडक. ठाकरे गटाचे शिष्टमंडळ महापालिका आयुक्तांच्या भेटीला आले. महापालिका आयुक्त दबावाखाली सत्ताधाऱ्यांना जास्त निधी देत असल्याचा ठाकरे गटाने आरोप केला आहे.

Pune News:  अनुराग ठाकूर यांच्याविरोधात पुण्यात आंदोलन

अनुराग ठाकूर यांच्याविरोधात पुण्यात आंदोलन करण्यात आले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर काँग्रेसचे आंदोलन सुरू आहे. अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांची जात विचारली हा आरोप करत काँग्रेसने आज आंदोलन केले. भाजपविरोधात काँग्रेसने घोषणाबाजी केली.

Nashik News:  विधानसभा निवडणूक; नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून पहिला उमेदवार जाहीर

जागावाटप चर्चेपूर्वीच नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून उमेदवार जाहीर करण्यात आलाय. सुधाकर बडगुजर नाशिक पश्चिम विधानसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती मिळतेय. शिवसेनेच्या मेळाव्यात एकमताने ठराव मंजूर करण्यात आलाय.

Akola News: अकोल्यातील राडा प्रकरण;  अमोल मिटकरी यांचं मुलीसह ठिय्या आंदोलन

अकोल्यातील राडा प्रकरणात आमदार अमोल मिटकरी अकोला पोलिसांवर प्रचंड नाराज आहेत. गुन्हा दाखल झालेल्या 13 पैकी 3 आरोपींना जामीन मंजूर झाले आहेत. चार आरोपींना आज ताब्यात घेतलं. अमोल मिटकरी जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चनसिंग यांच्या भेटीसाठी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात दाखल झालेत.

Mumbai News: राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार

राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. शासन स्तरावर प्रलंबित मागण्यांसाठी बहिष्कार टाकण्यात आलाय. वेतन अनुदानाच्या प्रश्नासाठी कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने बहिष्काराचा इशारा दिलाय.

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये आज काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलका पाऊस 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याध्ये आज काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलका पाऊस झाला. मागच्या आठवड्यात केवळ रिमझिम पाऊस असल्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा होती. आज काही ठिकाणी पाऊस झाला. मात्र अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत मराठवाडा आहे. मोठ्या पावसाळा अभावी धरण प्रकल्प अजूनही कोरडे टाक असल्यामुळे मराठवाड्याची चिंता अजून मिटली नाही.

Pune News: अनुराग ठाकूर यांच्या विरोधात पुण्यात कॉंग्रेसचं आंदोलन

अनुराग ठाकूर यांच्या विरोधात पुण्यात आंदोलन सुरू आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर काँग्रेस आंदोलन करत आहे. भाजप विरोधात काँग्रेसची घोषणाबाजी पाहायला मिळतेय.

Kolhapur News:  कोल्हापुरमध्ये ‘गोकुळ’ कडून पूरग्रस्‍त छावणीतील जनावरांना पशुखाद्याचे वाटप

गेल्‍या काही दिवसांपासून अतिमुसळधार पावसामुळे कोल्‍हापूर जिल्‍ह्यामध्‍ये पूर आलाय. काही पूरग्रस्त गावातील लोकांना जनावरांसह स्‍थलांतरीत करण्यात आलेले आहे. महापुराने शिरोळ तालुक्यातील अनेक लोकांचे आणि जनावरांच मोठे हाल झाले आहेत. शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी गुरुदत्‍त शुगर्स इथं सामाजिक बांधिलकी मधून पंचक्रोशीतील राजापूर, भैरववाडी, कुरुंदवाड, मजरेवाडी, अकिवाट, दानवाड या गावांमधील सुमारे ४०० ते ५०० जनावरे कारखान्‍याच्‍या आवारात आणि गोडाऊनमध्‍ये स्‍थलांतरीत केलेली आहेत. त्यांच्यासाठी गोकुळ कडून आज गुरुदत्त शुगर्सच्या छावणीला 8 टन पशुखाद्य तसेच तेरवाड येथील पार्वती सूतगिरणी छावणीतील २०० जनावरांना करिता 4 टन पशुखाद्य असे एकूण १२ मे.टन पशुखाद्याचे वाटप करण्यात आले आहे.

Supreme Court:  अनुसूचित जाती आणि जमातीतील उपवर्गीकरणास सर्वोच्च न्यायालयाची मान्यता

अनुसूचित जाती आणि जमातीतील उपवर्गीकरणास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिलीय. राज्य सरकारला वर्गीकरण करता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायमूर्तींनी ६ विरुद्ध १ अशा बहुमताने हा निकाल दिलाय.

Yashashri Shinde Case: यशस्वी शिंदे हत्या प्रकरण; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, कांजूर बंदचे आवाहन

उरणमधील यशस्वी शिंदे या तरुणीच्या हत्येनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. हिंदुत्ववादी संघटनांनी कांजूर बंदचं आवाहन केलंय.

Mumbai News: मुंबईसाठी भाजपचे विशेष प्लॅनिंग, ३६ विधानसभा मतदासंघांसाठी रणनीती ठरवणार

मुंबईसाठी भाजप विशेष प्लॅनिंग करत आहे. तर सहप्रभारी अश्विनी वैष्णव मुंबईकडे विशेष लक्ष देणार आहेत. मुंबईच्या ३६ विधानसभा मतदासंघांसाठी बैठका घेऊन रणनीती ठरवणार असल्याची माहिती मिळतेय.

Nashik News: सुरगाणा तालुक्यात १२ गावांतील नागरिकांचा पाण्यातून धोकादायक प्रवास

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील कीरपाडामधील नागरिकांना पाण्यातून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी पूल नसल्याने महिलांसह मुलांना पाण्यातून धोकादायक प्रवास करावा लागतोय.

 Pandharpur Accident :  पंढरपूरजवळ कंटेनरचा भीषण अपघात

पंढरपूरजवळ कासेगाव येथे उजनी उजव्या कालव्यात कंटनेर उलटला आहे. हा अपघात रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास झाला. यामध्ये चालक जखमी झाला आहे. विजापूरहून नगरकडे कंटेनर निघाला होता. कासेगाव येथील उजनी उजवा कालव्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर थेट तीस फूट खोल कालव्यात उलटला.

Karad News : कर्जाच्या तगाद्यामुळे डॉक्टरची आत्महत्या; कराड तालुक्यातील ओंड येथील घटना

कर्जाच्या तगाद्यामुळे डॉक्टरची आत्महत्या केली आहे. कराड तालुक्यातील ओंड येथे घटना घडली आहे.डॉ. हेमंत रेळेकर यांनी दवाखान्यातचं आत्महत्या केली आहे. फायनान्स कंपनीच्या लोकांनी त्रास दिल्यानं आत्महत्या केल्याचा नातेवाईकाचा आरोप आहे. कराड ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RTE Admission :  आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी मुदतवाढ

आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी पाच ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवेशासाठी पालकांना पुरेसा अवधी मिळावा आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश व्हावा, यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व क्षेत्रीय अधिकारी यांनी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेसाठी देण्यात आलेली मुदतवाढ लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे शाळा प्रवेश करावेत, अशा सूचना राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक यांनी दिल्या आहेत.

New parliament building : नवीन संसद भवनाला गळती

नवीन संसद भवनाला गळती लागली आहे.

संसद भवनाच्या लॉबीत पाणी गळत आहे.

पावसाळी अधिवेशन सुरु असताना नवीन संसद भवनाला गळती लागली आहे.

नवीन संसद भवनाला गळतीUddhav Thackeray News : उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना 2 हजार रुपये दंड; विशेष कोर्टाचा निर्णय

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना 2 हजार रुपये दंड सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टाचा निर्णय. राहुल शेवाळे यांनी दाखल केलेला, मानहानी खटला प्रकरण

Mumbai Police : मुंबईच्या रस्त्यांवर लवकरच घोडेस्वार पोलिसांची गस्त

मुंबईच्या रस्त्यांवर लवकरच घोडेस्वार पोलिसांची गस्त असणार आहे. घोडेस्वार पोलीस (mounted cops) पथकाला पुनर्जीवित करण्याच्या मुंबई पोलिसांच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. घोडेस्वार पथकासाठी ३८.४१ कोटी रुपये मंजूर केले. मुंबई पोलीस लवकरच ३० घोडे घेणार आहे. गर्दीचे ठिकाणे, मोर्चे तसेच समुद्रकिनारे आणि पदपथांवर घोडेस्वार गस्त पथक घालणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com