Maharashtra Live Update : महाशिवरात्रीनिमित्त बीड मधील कंकालेश्वर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई

Maharashtra Breaking Live Marathi Headlines Updates 25th February 2025 : आज शनिवार, दिनांक २५ फेब्रुवारी २०२५. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडीचा वेगवान आढावा, शरद पवार, राजकीय घडामोडी, राज्यात ऊन्हाचा तडाखा, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking Live Marathi news
Maharashtra Breaking Live Marathi newsSaam tv
Published On

महाशिवरात्रीनिमित्त बीड मधील कंकालेश्वर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई

महाशिवरात्रीनिमित्त बीड मधील कंकालेश्वर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सहा जणांच्या टीमने यासाठी मागील तीन दिवस मेहनत घेतली होती

नवी मुंबई महापालिकेच्या शाळेच्या पिकनिकसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

नवी मुंबई मनपा शाळा क्रमांक ७६ची पिकनिक आज खोपोली येथील इमॅजिका येथे गेली होती.

यात इयत्ता आठवीची शिकणाऱ्या १३ वर्षीय आयुष सिंग या विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय

संध्याकाळी साडेपाच वाजता आयुषला उलटी झाली आणि तो बेशुद्ध झाला होता

त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले

दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीच्या जाहिरातीसाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झाली असून, पवित्र पोर्टलवर संबंधित व्यवस्थापनांना जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी येत्या शुक्रवारपर्यंत (ता. २८) मुदतवाढ देण्यात आली आहे.

मुंबईत लाडक्या बहिणींचा आभार मेळावा

विधानसभा निवडणुकीत महायुतीला बरोबर मतदान करणाऱ्या लाडक्या बहिणींचा आभार मेळावा मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील महापालिका मैदानावर पार पडत आहे. अंधेरी पूर्व विधानसभेचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार मुरजी काका पटेल यांच्या माध्यमातून या आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

Pimpri -chinchwad : पिंपरी चिंडवडमध्ये मोठी पाईपलाईन फुटली

पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारी एक मोठी पाईपलाईन फुटली आहे. निगडी उडान पुलाजवळ मेट्रोचं काम सुरू असताना पाणीपुरवठा करणारी एक मोठी पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. पाईपलाईन मध्ये पाण्याचा दबाव मोठ्या प्रमाणात असल्याने पाण्याचे फवारे आकाशातून वीस ते तीस फूट उंचीपर्यंत उडू लागले आहेत. मेट्रो चे काम सुरू असताना योग्य खबरदारी घेतल्यामुळे पाण्याची पाईपलाईन फुटली आहे. सध्या त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी दाखल झाले असून पाणी गळती थांबवण्यासाठी अधिकारी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे.

Wardha Accident : प्रयागराजवरुन येणाऱ्या भाविकांच्या मिनीबसला अपघात

प्रयागराजवरुन येणाऱ्या भाविकांच्या मिनीबसला अपघात झाला आहे. वर्ध्यात ही अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात काही भाविक जखमी झाले आहेत.

बेकायदा बांधकामांवरून कल्याण-डोंबिवली महापालिकेची अधिकाऱ्यावर मोठी कारवाई

कल्याण-डोंबिवली महापालिकेची अधिकाऱ्यावर मोठी कारवाई

टिटवाळ्यात बेकायदा बांधकामांवरून साहाय्यक आयुक्त संदीप रोकडेना केले निलंबित!

कल्याण मधील मांडा-टिटवाळा प्रभागातील बेकायदा बांधकामे रोखण्यात अपयश असल्याने केली कारवाई

एकीकडे डोंबिवली मधील 65 इमारतीचा प्रश्न अहिराणी वर असताना पालिकेच्या आदेशांची अंमलबजावणी न केल्याने केली कारवाई

केडीएमसी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी निलंबनाचे दिले आदेश

इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकर असं नाव सांगणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत धमकी प्रकरण

इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकर असं नाव सांगणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल

कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

महापुरुषांचा अवमान,जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्य आणि जीवे मारण्याची धमकी दिल्या बद्दल गुन्हा दाखल

धमकी प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर दुपारी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांचा जुना राजवाडा पोलिसांनी नोंदवला होता जबाब

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे जिल्हा सत्र न्यायालयात हजर

- काल न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना मंजूर केलेल्या जामीनप्रकरणी कोकाटे न्यायालयात हजर

- कोकाटे यांना मंजूर झालेल्या जामिनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोकाटे न्यायालयात हजर

- थोड्या वेळापूर्वीच सत्र न्यायालयाने कोकाटे यांच्या शिक्षण संदर्भातील निकाल राखून ठेवत एक मार्चला अंतिम निकाल देण्याचे काढलेत आदेश

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा रविकांत तुपकर शेतकऱ्यांना घेऊन मुंबईकडे करणार आगेकूच..

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा आंदोलनाच हत्यार उपसल आहे, रविकांत तुपकर हे जिल्ह्याचा दौरा करून पुण्यामध्ये शेतकऱ्यांची बैठक घेणार आहेत, आणि लवकरच हजारो शेतकऱ्यांना घेऊन ते मुंबईकडे आगेकूच करणार आहेत.. नुकतीच बुलढाण्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली, यावेळी रविकांत तुपकर यांनी ही घोषणा केली आहे...

पनवेल महानगरपालिकेचा 3,873.86 कोटीचा अर्थसंकल्प सादर

पनवेल महानगरपालिकेचा 3,873.86 कोटींचा अर्थसंकल्प पनवेल मनपा आयुक्त मंगेश चितळे यांनी जाहीर केलाय. पनवेल महानगरपालिका क्षेत्राला लिव्हेबल सिटी करण्यावर भर देणारा अर्थसंकल्प आहे. उत्पन्न वाढ, लोकउपयुक्त कामे, आरोग्य सेवा सुधारणा आणि आपत्ती व्यवस्थापन यावर प्रशासनाने विशेष लक्ष दिलेय. आपत्ती व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी गाढी नदीवर भिंत बांधणे आणि होल्डिंग पॉईंट विकसित करण्यावर भर देण्यात आला असून प्रशासनाच्या या नियोजनामुळे पनवेल शहराचा सर्वांगीण विकास साधला जाणार असल्याची प्रतिक्रिया आयुक्त मंगेश चितळे यांनी व्यक्त केलेय.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आमदार अपात्रतेसंदर्भातील सुनावणीला सुरुवात

- माणिकराव कोकाटे यांच्या आमदार अपात्रतेसंदर्भातील सुनावणीला सुरुवात

- नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणीला सुरुवात

- आज सरकारी पक्षाची बाजू न्यायालयाकडून ऐकून घेतली जातेय

- २ वर्षांच्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती मिळाल्यानंतर आमदार अपात्रता प्रकरणी काय निर्णय होतो? याकडे लक्ष

50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून वगळल्या जाणार - जयंत पाटील

शंभर वर्ष झालेल्या स्वातंत्र्यसैनिकाचा हिंगोलीत सन्मान , जयंत पाटलांनीही केलं तोंड भरून कौतुक

मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वातंत्र्य सेनानी म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या हिंगोलीच्या टाकळगाव येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माणिकराव देशमुख टाकळगव्हाणकर यांचा आज शताब्दी सोहळ्यानिमित्त हिंगोलीकरांच्या वतीने सन्मान करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हजेरी लावली होती यावेळी जयंत पाटलांनी स्वातंत्र्य सेनानी माणिकराव देशमुख यांचे तोंड भरून कौतुक केले, स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या माणिकरावांनी वयाची गाठत हाताच्या तरुणांना शारीरिक आरोग्याचा संदेश दिल्याचं पाटील यावेळी म्हणाले.

मंत्रालयातील जाळीवर उडी मारुन आंदोलन

मंत्रालयातील जाळीवर उडी मारुन आंदोलन करण्याचा प्रयत्न एका सुरक्षारक्षकाने केला आहे.

उडी मारणाऱ्या सुरक्षारक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

यावरुन मंत्रालयातील सुरक्षा वाऱ्यावर आहे असे म्हटले जात आहे.

राजन साळवी आणि मी आम्ही दोघे एकत्र काम करू - किरण सामंत

राजन साळवी यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. आज ते पहिल्यांदाच मतदार संघात आले, त्यामुळे त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. राजन साळवी आणि मी आम्ही दोघे एकत्र काम करू. संजय राऊत यांचा राजापूर दौरा आहे त्यांचं मी आमदार या नात्याने स्वागतच करतो असे विधान आमदार किरण सामंत यांनी केले आहे.

Pune Gaja Marne News: गजा मारणेला 3 मार्चपर्यंत कोठडी

Pune Gaja Marne News: गजा मारणे न्यायालयात होणार दाखल, कोथरूड पोलिसांनी केलं होतं अटक

कोथरूड पोलिसांनी २४ फेब्रुवारीला गजा मारणेला अटक केली होती. आज पोलीस गजा मारणेला घेऊन न्यायालयात दाखल होणार आहेत. अडीच वाजता कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. मारणेला जिल्हा कोर्टात दाखल करण्यात येणार आहे.

कल्याणमधील घरात सिलेंडरचा स्फोट, ३ जण जखमी

कल्याण जवळील मोहने परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. मोहने परिसरातील एका घरात सिलेंडरचा स्फोट झालाय. यात तीन जण जखमी झाले आहेत. महिलेसह १२ वर्षांची मुलगी आणि एक व्यक्ती गंभीर जखमी आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

काँग्रेसचे खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून लाडकी बहीण योजनेवर पुन्हा टीका

सरकारची तिजोरी रिकामी झालीय. आता 9 लाख लाडकी बहीण योजनेतून काढले जाणार आहेत.

- लोक चळवळीतून ही योजना सुरू करणार आहोत.

- सोलापूर लोकसभा मतदारसंघातील तीन गावातील पाण्याच्या प्रश्नासाठी खासदार यांच्याकडून नवीन योजना.

- महापालिकेतील प्रशासकांच्या सातत्याने बदल्या होत आहेत.

- महानगरपालिका निवडणूक लवकरात लवकर झाल्या पाहिजे, सर्व सुरळीत होईल.

- सरकारकडे इतर योजनेसाठी पैसे नाहीत कारण सगळे पैसे लाडकी बहीणवर वापरले.

- सरकारची तिजोरी रिकामी झालीय. आता 9 लाख लाडकी बहीण योजनेतून काढले जाणार आहेत.

- त्यांना EVM करायचे होते पण आम्ही लाडकी बहीणमुळे आम्ही जिंकलो हे दाखवायचे होते म्हणून त्यांनी लाडकी बहीण आणली.

Maharashtra Politics: शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांना उद्धव ठाकरे यांचा विनायक राऊत यांच्यामार्फत निरोप

विनायक राऊतांचा महादेव बाबर यांना काहीच दिवसांपूर्वी आला फोन

अडचणीच्या काळात पक्ष सोडू नका पक्षांच काम जोमाने जरा

लवकरच उद्धव ठाकरे आणि महादेव बाबर यांची भेट होण्याची शक्यता

महादेव बाबर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा

भिवंडीत नीलम गोऱ्हे विरोधात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जोरदार निदर्शने

दिल्ली येथील साहित्य संमेलन विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये दोन मर्सिडीज दिल्यावर पद मिळते असे खळबळजनक वक्तव्य करून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.

या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहेत.

भिवंडी लोकसभा क्षेत्रातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपनेते विश्वास थळे, लोकसभा संपर्कप्रमुख साईनाथ तारे,जिल्हा प्रमुख कुंदन पाटील,तालुकाप्रमुख करसन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई नाशिक महामार्गावरील राजनोली नाका या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली आहेत.

यावेळी नीलम गोऱ्हे यांच्या फोटोला जोडे मारीत महिला शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला.

Navi Mumbai: नवी मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर

मनपा आयुक्त डॉ कैलास शिंदे यांनी सादर केला अर्थसंकल्प.

५७०९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सदर.

एकूण १३०० कोटी शिलकीचा अर्थसंकल्प सादर.

मागील काळात खर्चावर नियंत्रण ठेवल्याने मोठ्या शिलकीचा अर्थसंकल्प सादर

कोणत्याची कराची दरवाढ न करता अर्थसंकल्प सादर.

जिल्हा रुग्णालयाततील मुख्य प्रसाकीय अधिकारी वि डी पाटील माजी डॉक्टरसह तिघांवर खंडणीचा गुन्हा दाखल

डॉक्टर प्रतीक भांगरे यांच्या कडून 10 लाखांची खंडणी मागितल्या प्रकणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

दिपाली झोले या रुग्णाचा मागचे महिन्यात मुत्यु झाल्या प्रकरणी डॉक्टर भांगरे यांच्या हलगर्जीपणा मुळे झल्याच आरोप करत 10 लाखांची मागणी केल्याने झाला गुन्हा दाखल

चार दिवसांपूर्वी डॉक्टर आनंद पवार यांनी सिव्हिल सर्जन यांच्यावर केले होते मारहाणीचे आरोप

तिघांना सरकारवाडा पोलिसांनी घेतले ताब्यात .

मसाजोग ग्रामस्थांचा अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात

आंदोलनात संतोष देशमुख यांच्या आई आणि मुलगी वैभवी आंदोलनात सहभागी

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 77 दिवस उलटून गेले आहेत असे असतानाही या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळे हा अद्याप फरारच आहे.

कृष्णा आंधळे ला तात्काळ अटक करावी यासह नऊ मागण्या देशमुख कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी प्रशासनाला दिल्या होत्या.

मात्र या मागण्या मान्य होण्यास विलंब होत असल्याने आजपासून देशमुख कुटुंबीय आणि मसाजोग ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

Washim: कारंजा बाजार समितीत गव्हाची विक्रमी आवक आज गव्हाचा लिलाव राहणार बंद

वाशिमच्या कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी गव्हाची विक्रमी आवक झालीये.

त्यामुळं आज कारंजा बाजार समितीत शेतमालाचा निपटारा होण्यासाठी गव्हाचा लिलाव पूर्णपणे बंद राहील अशा सूचना शेतकरी आणि व्यापाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

काल दिवसभरात कारंजा बाजार समितीत गव्हाची ९ हजार क्विंटलची आवक झाली होती.

यावेळी गव्हाला २९७० रुपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे.

Bachchu Kadu : बच्चू कडू आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत पाहणार आज छावा चित्रपट

छावा चित्रपट पाहण्यासाठी बच्चू कडू यांची चांदुर बाजार ते अमरावती अशी 35 किलोमीटरची बाईक रॅली..

बुलेट चालवत बच्चू कडू बाईक रॅलीत सहभागी..

बच्चू कडू यांनी बांधला तिरंगी फेटा तर कार्यकर्त्यांनी बांधले भगवे फेटे....

बच्चू कडू बाईक रॅली करत पोहचणार चित्रपट गृहात

Amaravati: महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर सालबर्डी, कोंडेश्वर करिता 950 पेक्षा अधिक बसफेऱ्याचे नियोजन

अमरावती मोर्शी बडनेरासह 8 डेपोतून बसेस सुटणार..

महाशिवरात्रीच्या पर्वावर भाविकांच्या सुविधांकरिता एसटी महामंडळ प्रशासन सज्ज..

23 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान धावणार बसेस..

प्रत्येक बस स्थानकावरून 10 बसेसचे नियोजन..

या दरम्यान महिलांना प्रवासात 50 टक्के सूट सवलत लागू असणार आहे..

यासोबतच ज्येष्ठ नागरिकांना देखील ही सवलत शासनाकडून दिली जाणार..

Nanded: भगतसिंग काॅर्नर ते गणेश टॉकीज रस्ता करण्याच्या मागणीसाठी नागरिकांचे आंदोलन

नांदेड शहरातील भगतसिंग काॅर्नर ते गणेश टॉकीज रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालीय.

अक्षरशः या रस्त्याची चाळण झालीय.त्यामुळे या रस्त्यावर लहान-मोठे अपघात घडत आहेत.

भगतसिंग काॅर्नर ते गणेश टाॅकीज हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खचला महापालिका दर वेळेस या रसत्याची केवळ डागडुजी करत आहे.

या डागडुजी केलेल्या खड्ड्यात अनेक आपघात होत असून प्रशासनाने तात्काळ रस्ता बनवावा या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी धरणे आंदोलन केलंय.

तुळजाभवानी चरणी ठाणे येथील भाविकाकडुन अर्धा किलो सोन्याचा मुकुट अर्पण

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या चरणी एका भाविकाने ५४० ग्रॅम (अर्धा किलो) चा सोन्याचा मुकुट अर्पण केलाय.

दरम्यान तुळजाभवानी मातेवर आमच्या कुटुंबीयांची नितांत श्रध्दा असुन समर्पनाच्या भावतेतुन देवीचरणी सुवर्णालंकार अर्पन केल्याचे भाविकांनी सांगितले तर यावेळी तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने या भाविक कुटुंबीयांचा तुळजाभवानी मातेची प्रतिमा व महावस्त्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मंदीर संस्थानचे अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाची जय्यत तयारी पूर्ण मात्र शरद पवारांचा अचानक दौरा रद्द

माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा मराठवाड्यातील दौरा सलग दुसऱ्यांदा रद्द झाला.

प्रकृतीच्या कारणास्तव हा दौरा रद्द झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.

आज शरद पवार हिंगोलीच्या नरसी येथे संत नामदेवांच्या दर्शना सह ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माणिकराव टाकळगव्हाणकर यांच्या जनशताब्दी सोहळ्याला उपस्थिती लावणार होते या कार्यक्रमाची हिंगोलीत संपूर्ण तयारी देखील करण्यात आली होती.

मात्र ऐनवेळी पवार यांचा दौरा रद्द झाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह सगळ्यांचाच हिरमोड झाला आहे.

दरम्यान हिंगोली मधील या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी शरद पवारांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना मात्र आवर्जून पाठवले आहे.

सोने दरात पुन्हा तेजी पुढील आठवडा दरवाढीचाच राहणार ८९ हजार ३०० जी एसटी सह चांदी १ लाख १ हजार

आंतरराष्ट्रीय बाजार बंद होताना शुक्रवारी सोन्याचे दर ५०० रुपयांनी घसरले होते. सोमवारी सुरू झालेल्या चालू आठवड्यात सोने दरात पुन्हा तेजी आली.

मंगळवारी प्रति तोळ्यामागे २०० रुपयांची वाढ होऊन ८६९०० रुपयांवर पोहोचले. ही तेजी कायम राहील असे जाणकारांना वाटते.

मागील पंधरवड्यात ८५हजारांवर असलेले सोने गेल्या आठवड्यात १३०० रुपयांनी वाढून दर प्रति तोळा ८७ हजारांवर पोहोचले होते.

मात्र,आंतरराष्ट्रीय बाजारात दरात घसरण झाल्याचा परिणाम म्हणून सोने ८७ हजारांवरून ८६५०० रुपयांपर्यंत खाली आले होते.

शनिवार व रविवारी आंतरराष्ट्रीय मार्केट बंद असताना सोने २०० रुपयांनी वाढले. सोमवारी पुन्हा त्यात २०० रुपयांची वाढ झाली आहे.

Maharashtra Politics: मंत्रालय येथे राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक

आज राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक होणार आहे...

आज दुपारी १२.०० वाजता मंत्रालय येथे बैठक होणार आहे..

Sharad Pawar: राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा नांदेड-हिंगोली दौरा रद्द

हिंगोली जिल्ह्यातील नरसी येथे संत नामदेव महाराज यांच्या जन्मस्थानी घेणार होते दर्शन.

हिंगोली जिल्ह्यातील इतर कार्यक्रमांना लावणार होते हजेरी.

शरद पवार यांचा तिसऱ्यांदा दौरा रद्द.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील थोड्याच वेळात नांदेड विमानतळावर होणार दाखल.

नांदेड विमानतळावरून हिंगोली कडे होणार रवाना

महाशिवरात्रीनिमित्ताने भिमाशंकर मंदिर आजपासुन  भाविकांसाठी ४८ तास खुले

उद्या महाशिवरात्री आहे या निमित्ताने आज पहाटेची महाआरती दुग्धाभिषेक झालेनंतर मुख्य शिवलिंग भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले असुन आज रात्री १२ वाजता जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शासकिय पुजा पार पडणार असुन दोन दिवस दिवसरात्र मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले रहाणार असुन दोन दिवस भाविकांना भिमाशंकराचे दर्शन घेता येणार आहे प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात सहभागी झालेले भाविक बारा ज्योतिर्लिंग यात्रा करत असतात त्यामुळे महाशिवरात्रीला भिमाशंकरला गर्दी होणार असल्याने भिमाशंकर देवस्थान कडुन भाविकांच्या दर्शनासाठी चोख व्यवस्था करण्यात आलीय.

Pune News: पुणे पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’

पुण्यात केलेल्या नाकाबंदीत दोन तासात १५१८ वाहनचालकांवर धडक कारवाई

१५१८ वाहनचालकांकडून १३ लाख ६५ हजार रुपयांचा दंड वसूल

दुपारी चार वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत शहराच्या विविध भागात नाकाबंदी करण्यात आली.

नाकाबंदीदरम्यान शहरातील ७८ महत्त्वाच्या ठिकाणी चार हजार १८७ वाहनचालकांची तपासणी करण्यात आली

विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, ट्रिपल सीट, सीट बेल्ट परिधान न केलेल्या १५१८ वाहनचालकांवर कारवाई

या नाकाबंदी मोहिमेत पोलिस सह आयुक्त, ४ अतिरिक्त पोलिस आयुक्त, ५ पोलिस उपायुक्त, १० सहाय्यक पोलिस आयुक्त आणि ३९ पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ निरीक्षक आणि वाहतूक शाखेसह ९७ पोलिस अधिकारी तसेच १८७२ पोलिस अंमलदार सहभागी 

Pune News: पुण्यात महापालिका शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी ‘शिक्षण परिषद’

महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण घेतले जाणार

त्यानंतर जर गुणवत्ता घसरली तर त्यास शिक्षकांना जबाबदार धरले जाणार

शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेसंदर्भात ‘असर’चा अहवाल जानेवारी महिन्‍यात जाहीर झाला आहे.

त्यामध्ये पुणे शहर, जिल्ह्यातील गुणवत्तेबाबत गंभीर गोष्टी समोर आल्या आहेत

त्यानुसार इयत्ता ६वी ते ८वीच्या ४० टक्के विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना भागाकार करता येत नाही, मुळ अक्षरे ओळखता येत नाहीत, मुलांना एक ते ९९ पर्यंतचे आकडे ओळखता येत नाहीत

सरकारी शाळांमधील प्रवेश संख्या घटली आहे, मुलांचा स्मार्टफोनचा वापर वाढला आहे असे निरीक्षणे नोंदविली गेली आहेत

शिक्षकांनी गुणवत्ता वाढीसाठी काय करावे हे त्यांनी प्रशिक्षणातून सांगितले जाईल

शिवसेनेच्या "मिशन पुणे" ला अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ब्रेक?

काही दिवसांपूर्वी सेनेचे माजी आमदार महादेव बाबर आणि काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह अनेकांनी घेतली होती एकनाथ शिंदे यांची भेट

या भेटीनंतर पुण्यातील काँग्रेस, शिवसेना (उबाठा) मधील अनेक जणं एकनाथ शिंदेंच्या सोबतीला जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या

मात्र आता यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून या सर्वांना त्यांच्या पक्षात येण्यासाठी प्रयत्न केला जात आहे

काल अजित पवार यांच्या पक्षाच्या रुपाली पाटील यांनी काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर याना पक्षात येण्यासाठी दिली खुली ऑफर

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून महादेव बाबर यांना त्यांच्या पक्षात येण्याची केली विनंती

काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर यांच्याशी अजित पवार यांनी चर्चा केल्याची माहिती

Amravati: अमरावती महानगरपालिका बजेटमध्ये महसुली खर्चात कपात करणार, मनपा आयुक्त यांचा निर्णय

महसुली उत्पन्न कमी असल्याने महानगरपालिका महसुली खर्चात कपात करणार.

मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात महानगरपालिकेचे वार्षिक बजेट सादर होणार...

मर्यादित उत्पन्नातून मर्यादित खर्च करावा लागतो महानगरपालिकेला..

Washim: सोयाबीन अन् कापूस उत्पादक हजारो शेतकऱ्यांना ५ हजाराच्या अनुदानाची अद्यापही प्रतिक्षाच

मागीलवर्षी सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५ हजार रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारणं घेतला होता.

मात्र वाशिम तालुक्यातील अनेक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान अजूनही जमा झालेलं नाही.

शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असूनही ते आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदान मिळावं यासाठी जिल्हा प्रशासनानं राज्य सरकारकडं पाठपुरावा करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतेय.

Beed: बीडच्या मस्साजोगमध्ये गावकरी आणि देशमुख कुटुंब करणारा अन्नत्याग आंदोलन

आरोपींना अटक व्हावी आणि न्याय मिळावा या मागणीसाठी आज मासाजोगचे गावकरी आणि देशमुख कुटुंब अन्नत्याग आंदोलनाला बसणार आहे..

सकाळी दहा वाजता हे आंदोलन सुरू होणार असून यामध्ये गावातील मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार आहेत.

दोन दिवसात आंदोलनाची दखल घेतली नाही तर पाणीही त्यागनार असल्याचं रात्री गावकऱ्यांच्या बैठकीत ठरलं..

त्यामुळे मसाजोग गावकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन सरकारची डोकेदुखी ठरणार का पाहणं महत्त्वाचं असेल..

Raigad: अवैध बॉक्‍साईड वाहतूकीविरोधात महसूल विभागाची कारवाई सुरू

आता रायगड जिल्‍हयात सुरू असलेल्‍या अवैध बॉक्‍साईड उत्‍खनन आणि वाहतूकीविरोधात महसूल प्रशासनाने कारवाई सुरू केलीय.

श्रीवर्धन तालुक्‍यात उत्‍खनन केलेल्‍या बॉक्‍साईडने भरलेले ट्रक म्‍हसळा तहसीलदार खाडे यांनी रोखून धरले आहेत.

या ट्रक चालकांकडे बॉक्‍साईड उत्‍खननाची रॉयल्‍टी भरलेली पावती नसल्‍याने ही कारवाई करण्‍यात आली.

या कारवाईचे स्‍वागत होत असले तरी आतापर्यंत महसूल विभाग याकडे कानाडोळा का करत होते असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

Ratnagiri: स्वातंत्रवीर सावरकरांनी रत्नागिरीत सुरु केलेलं सहभोजन

भक्तिभूषण दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या 81व्या पुण्यतिथीनिमित्त रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघातर्फे सहभोजन व सहभजनाचा कार्यक्रम रत्नागिरीतील पतितपावन मंदिरात करण्यात आला.

स्वांतत्रवीर सावरकर यांच्या सुचनेनुसार 1930 साली सहभोजनाचा कार्यक्रम करण्यात आला होता.

स्पृष्य - अस्पष्य चा भेदभाव दूर करण्याच्या उद्देशाने हे सहभोजन सुरु करण्यात आलं होतं.

स्वांत्रवीर सावरकरांनी सुरु केलेला हा सहभोजनाचा कार्यक्रम पुन्हा एकदा गेल्या चार वर्षापासून भंडारी समाज करत आहे.

कडक उन्हातही हजारोंच्या संख्येनं नागरीकांनी सहभोजनाचा आस्वाद घेतला तर २१ भजनीबुवांनी सहभजनातून भागोजीशेठ कीर यांना अभिवादन देखील केले.

Pandharpur: पंढरपुरात अवैध वाळू उपशा विरोधात कारवाई

पंढरपूर येथील भीमा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा आणि वाहतूकी विरोधात महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे.‌

पंढरपूर जवळच्या इसबावी आणि शिरढोण येथे नदी पात्रातून अवैध‌‌ वाळू वाहतूक करणाऱ्या 18 लाकडी होड्यांवर कारवाई करून त्या कटर आणि जेसीबीच्या सहाय्याने नष्ट‌ केल्या आहेत.

ही कारवाई तहसीलदार सचिन लंगोटे यांनी केली आहे‌ .

Nandurbar: नंदुरबार जिल्ह्यातील कैरी उत्पादक शेतकरी अडचणीत

नंदुरबार जिल्ह्यातील कैरी उत्पादक शेतकरी अडचणीत....

आंब्यावर आलेल्या मोर वर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव....

फवारणीचा खर्च वाढल्याने शेतकऱ्या आर्थिक फटका....

कैरीचा उत्पादनाचा मोठी घट होण्याची शक्यता.....

धडगाव आणि मोलगी परिसरात मोठ्या प्रमाणात तयार केलं कैरी पासून आमचूल.....

आंब्याचा मोराला बुरशी लागल्याने आमचूल उद्योगाला मोठा फटका.....

याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर निकवाडे यांनी....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com