आजच्या काळात आपण ५०-१०० वर्ष मागे जातोय की काय अशी सामजिक स्थिती आहे, अशा परिस्थितीत महात्मा फुलेंनी मांडलेला सत्यशोधकी विचार समाजापर्यत पोहचणे गरजेचे आहे, अस मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर आधारित हा सिनेमा शरद पवार यांनी पुण्यातील चित्रपटगृहात जाऊन सपत्निक पाहिल.
'चित्रपट उत्तम असून त्यामध्ये फुलेंच्या आयुष्यातील प्रसंग वास्तव रुपात मांडण्यात आलेले आहेत. कुठल्याही प्रकारची अतिशयोक्ती नाही. अतिशय प्रभावी पद्धतीने साकारण्यात आलेला हा चित्रपट महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये दाखवण्यात यावा, अशी विनंती राज्य सरकारला करणार असल्याचं शरद पवार यावेळेस म्हणाले.
श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात उद्या शनिवारी उद्धव ठाकरे दौरा करणार आहेत.
उद्धव ठाकरे यांचा उद्या कल्याण लोकसभा मतदारसंघात दौरा आहे.
उद्धव ठाकरे या दौऱ्यानिमित्त विविध शाखांना भेट देणार असून यावेळी पदाधिकाऱ्यांच्या बैठका पार पडणार आहेत.
उद्धव ठाकरे अंबरनाथ-टिळकनगर, नेवाळी, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण आणि कळवा मुंब्रा या ठिकाणी भेट देणार आहेत.
पिंपरी स्टेशनहून निघालेली मेट्रो कासारवाडी इथं थांबवण्यात आलेली आहे. इलेक्ट्रिक वायर हेडचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मेट्रोची ही मार्गिका का बंद करण्यात आलेली आहे. वीज पुरवठा नेमका कुठून बंद झाला, याचा शोध घेतला जात आहे. सध्या मेट्रोची एक मार्गिका बंद आहे.
इंडिया आघाडीने वंचितसोबत जागावाटप करण्याची जबाबदारी शरद पवार गत्र आणि उद्धव ठाकरे गट यांच्यावर सोपवली आहे.
वंचितसोबत जागावाटपाबाबतची चर्चा काँग्रेस करणार नाही. इंडिया आघाडीकडून शरद पवार गट आणि ठाकरे गटावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
शरद पवार गट आणि ठाकरे गट त्यांच्या कोट्यातील काही जागा या वंचित आणि राजू शेट्टी देण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
काँग्रेस दोन्ही पक्षासोबत जागावाटपाबाबत चर्चा करणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई गुन्हे शाखे शाखेच्या पोलिसांनी महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवरून मोठी कारवाई करत कोट्यावधी रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. पालघरच्या कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतही कारवाई केली असून तब्बल सहा ट्रकमधील ४००० गोणी गुटखा जप्त करण्यात आला आहे. याची किंमत अंदाजे १०.३२ कोटी रुपये आहे. याप्रकरणी सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
दहा वर्षांपूर्वी घोटाळ्यांची चर्चा व्हायची. आता देशात विकासाची चर्चा होते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी मुंबई आणि रायगडमधील विविध विकासकामांचे उद्घाटन झाले. ट्रान्स हार्बर मार्गावरील दिघा स्थानक, बेलापूर-उरण रेल्वेमार्गाचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. लेक लाडकी योजनेचा शुभारंभही यावेळी मोदींच्या हस्ते करण्यात आला. देश बदलणार ही मोदींची गॅरंटी आहे, अशी हमी स्वतः पंतप्रधानांनी दिली.
नवी दिल्ली INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची उद्या बैठक उद्या सकाळी 11.30 वाजता ऑनलाईन बैठक होणार लोकसभा निवडणुकीच्या तयारीवर बैठकीत चर्चा जागावाटप, निमंत्रकाच्या नावांवर चर्चा होण्याची शक्यता अनेक राज्यातील जागावाटपाबाबत काही अंशी चर्चा झाली आहे, मात्र काही ठराविक जागांबाबत बैठकीत पुन्हा चर्चा होईल
नावाप्रमाणेच हा सेतू अटल आणि मजबूत आहे - शिंदे
देशात मोदींची गॅरंटी चालते - मुख्यमंत्री
काहींचा अहंकार चक्काचूर होईल, शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल
एकनाथ शिंदेंचा अप्रत्यक्ष उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
नरेंद्र मोदी हे जगात सर्वात लोकप्रिय पंतप्रधान आहेत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्तुती केली. अटल सेतूचे भूमिपूजन आणि अटल सेतूचे लोकार्पणही मोदींनीच केले. आज स्वप्नपूर्तीचा दिवस आहे, असेही ते म्हणाले.
रायगडमध्ये तिसरी मुंबई उभी राहणार आहे - अजित पवार
मोदींच्या नेतृत्वात रेल्वेचा चेहरामोहरा बदलला
मुंबई - नवी मुंबई २० मिनिटांत प्रवास होणार
शिवडी ते न्हावाशेवा सागरी पूल
मुंबई ते नवी मुंबई २ तासांचा प्रवास २० मिनिटांत
सागरी सेतूवर वेगमर्यादा १०० किलोमीटर प्रतितास असेल
जगातील सर्वात मोठा सागरी सेतू
अटल सागरी सेतूवर दिवसाला अंदाजे ७० हजार वाहने धावतील
मुंबई ते नवी मुंबई, नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार अधिक सुलभ
१६.५ किलोमीटर पाण्यावर, तर साडेपाच किलोमीटर जमिनीवर
१०० वर्षांपर्यंत हा सागरी सेतू सुस्थितीत राहणार
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह आदर्श हिवरे बाजार गावचे सरपंच पोपटराव पवार यांना अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठापनेचे निमंत्रण
नाशिक विभागातून सामाजिक कामे करणाऱ्या १० नामवंतांना या सोहळ्यास देण्यात आलेले निमंत्रण
अहमदनगर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक रवींद्र साताळकर आणि नाशिक विभागाचे संपर्कप्रमुख घनश्याम दोडिया यांनी दिली अण्णा हजारेंना निमंत्रण पत्रिका
मुंबई ट्रान्सहार्बर लिंक अर्थात शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण आहे. PM मोदी मुंबईत पोहोचले आहेत. काही वेळातच 'अटल सेतू'चं लोकार्पण ते करणार आहेत, तत्पूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं एक्सवरून सवाल उपस्थित केला आहे.
शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूचं काम केलं कुणी आणि श्रेय घेतंय कोण?, असा प्रश्न एक्स पोस्टद्वारे करण्यात आला आहे. मुंबई ट्रान्सहार्बर लिंक रोड हा महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या काळातील ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. हे आम्ही अभिमानाने सांगतो, असा दावाही ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकला काळाराम मंदिरात दर्शनासाठी आले, आनंद आहे! पण दर्शन झाल्यानंतर थोडा वेळ काढून जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही त्यांनी भेटायला पाहिजे होतं, अशी अपेक्षा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक्स पोस्टद्वारे व्यक्त केली आहे.
नाशिकचा दौरा आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत पोहोचले आहेत.
तरुणांनी मेड इन इंडिया वस्तूचा वापर करावा
पंतप्रधान मोदी
युवकांनी राजणात यावं
युवकांनी राजकारणातील घराणेशाही संपवायला हवी
घराणेशाहीतून देशाचं मोठं नुकसान
पहिल्यांदा मतदानासाठी पात्र असलेल्या तरुणांनी नोंदणी करुन घ्यावी
माझा देशातील युवकांवर विश्वास आहे. युवकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अधिक संधी निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
मराठा आरक्षणासाठी लातूरमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने संपवले जीवन
मनोज जरांगे यांनी फोनवरून आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांची संवाद साधत धीर दिलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काळाराम मंदिरात दाखल झाले आहेत. महंतांच्या उपस्थितीत काळाराम मंदिरात पूजा सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामकुंडावर जलपूजन
रामकुंडावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे पहिले पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नाशिकमध्ये 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा उद्घाटन
१२ जानेवारी ते १६ जानेवारी दरम्यान असणार राष्ट्रीय युवा महोत्सव
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी साजरा करण्यात येतो राष्ट्रीय युवा महोत्सव
तपोवन परिसरातील मैदानावर युवा महोत्सवाच उद्घाटन आणि मोदींची जाहीर सभा
देशभरातून तब्बल ८ हजार युवक युवती युवा महोत्सवात होणार सहभागी
उद्घाटनानंतर देशभरातील युवक युवतींना मोदी करणार संबोधित
मुंबईच्या कांदिवली पश्चिमेकडील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयातून 20 दिवसांच्या नवजात बाळाची चोरी झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. यानंतर कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुलं चोरी करणाऱ्या महिलेला मालवणी परिसरातून अटक केली. पोलिसांनी बाळाला सुखरुप आईकडे सुपूर्द केले. या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
भंडारा गोंदिया लोकसभा लढण्यास प्रफुल्ल पटेल तयार
भंडारा गोंदिया मतदारसंघात राष्ट्रवादी नेहमीच मजबूत राहिलीय. त्यामुळे त्या जागेवर आमचा क्लेम राहणार- पटेल
माझ्या तयारीचा प्रश्न असेल. तर मी सदैव तयार असतो- पटेल
पण भंडारा गोंदियाच्या जागेबाबत तिन्ही पक्ष मिळून ठरवणार- पटेल
स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांना त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.
वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनाच्याही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी खबरदारी घेतलीय. मुंबईच्या दिशेने येणारी अवजड वाहने ठाणे, रायगड जिल्ह्याच्या परिसरातील जिल्ह्यांमध्येच थांबवण्यात येणार आहे. तसेच पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या लोकांना 2 तास आगोदर कार्यक्रमस्थळी येण्याचं बंधनकारक करण्यात आलंय.
पुणे-लोणावळा लोकल फेऱ्या 11 ते 3 या वेळेत सुरू कराव्यात तसेच एक्सप्रेस गाड्यांचा थांबा लोणावळ्यात करावा या मागणीसाठी स्थानिकांकडून लोणावळा येथे रेल रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पुण्याहून मुंबईकडे जाणारी डेक्कन क्वीन एक्सप्रेस स्थानिकांनी तब्बल 20 मिनिटे रोखली. रेल्वे पोलिसांकडून स्थानिकांना रोखण्यात आले. मात्र तरी देखील स्थानिकांनी रेल्वे रुळावर उतरून डेक्कन क्वीन एक्सप्रेस रोखली. मोठ्या संख्येने नागरिक रेल्वे रुळावर उतरल्याने जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
अकोला जिल्हातल्या बार्शीटाकळी तालुक्यात चार महिन्याच्या चिमुकलीचे अपहरण
बार्शीटाकळी तालुक्यातील निंबी येथील घटना
अज्ञात आरोपीविरुद्ध बार्शीटाकळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कुंभेफळ येथे एका 5 वर्षीय शाळकरी बालकाच्या डोक्यावरून स्कूल बसचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. तब्बल दोन वेळा हे चाक त्याच्या डोक्यावरून गेले आणि त्यातच तो चिरडला गेला. हर्षद अनिल हातांगळे असे या बालकाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पुण्यात आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) मध्ये ‘जागतिक साखर उद्योगातील शाश्वतता : आव्हाने आणि संधी’ या संकल्पनेवर आजपासून १४ जानेवारीपर्यंत तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद व प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. आज उद्घाटन प्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, अध्यक्षस्थानी व्हीएसआयचे अध्यक्ष शरद पवार हे देखील यावेळेस उपस्थितीत असतील. परिषदेसाठी 27 देशांतील तज्ज्ञ, अडीच हजार उद्योजक आणि दीड लाखाहून अधिक शेतकर्यांची उपस्थिती अपेक्षित आहे.
एक देश एक निवडणूक या संकल्पनेला तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांचा विरोध
समितीच्या सचिवांना पत्र लिहीत व्यक्त केला विरोध
ही संकल्पना भारताच्या सांविधनिक व्यवस्थेच्या मूलभूत संरचनेच्या विरुद्ध
ही संकल्पना स्पष्ट होत नाही, त्यामुळं समितीशी सहमत होण्यास मूलभूत वैचारिक अडचणी आहेत
ही संकल्पना नेमकी कुठून आली यांचं मूलभूत गुढ सोडवल्याशिवय या आकर्षक शब्दांवर विश्वास ठेवणे कठीण आहे
ज्या राज्यांमध्ये विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेणे अपेक्षित नाही त्या राज्यात एकाच वेळी मुदतपूर्व निवडणुका घेण्यास भाग पाडले जाऊ नये
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.