Maharashtra News Live Update: बारामती : लुमेवाडीतील सुफीसंत जोधपूरवाले बाबा यांच्या उरुसनिमित्त दर्गावर आकर्षक विद्युत रोषणाई

Marathi Breaking Live Headlines Updates : मनोज जरांगे यांचं उपोषण, ओबीसी मोर्चा, विदर्भात पावसाचा जोर, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News
Published On: 

बारामती : लुमेवाडीतील सुफीसंत जोधपूरवाले बाबा यांच्या उरुसनिमित्त दर्गावर आकर्षक विद्युत रोषणाई

सर्वधर्म सम भावाचे प्रतिक पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील 'क 'वर्ग तीर्थक्षेत्र असलेल्या गाजिए मिल्लत सुफि संत हाजी हाफिज फत्तेह मोहम्मद जोधपूरवाले बाबा (रहे) यांचा ३३ वा उरूस मोठ्या उत्साहात संपन्न झालाय... यानिमित्त महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक , राजस्थान,उत्तरप्रदेश ,मध्यप्रदेशातील हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी केली होती. संदलच्या मिरवणुकीत युवकांनी मोठी गर्दी केली होती उरुसानिमित्त दर्गाहवर अत्यंत आकर्षक अशी विद्युत रोषणाई व दर्गाहच्या आतमध्ये संपूर्ण काचेची सुबक कलाकृती व अरबी भाषेत नामोल्लेख सर्वांचे लक्ष वेधून घेत होती

रेल्वे पुलाला लटकून जीवघेणी स्टंटबाजी करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

या प्रकाराची गंभीर दखल घेत भाईंदर रेल्वे पोलिसांनी संबंधित तरुणाचा शोध घेऊन त्याला पकडून पोलिसांनी त्याला आपल्या कृत्याबद्दल माफी मागायला लावली असून, माफी मागतानाचा व्हिडिओ रेल्वे पोलिसांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर प्रसिद्ध केला आहे.

फॉलोवर्सना आकर्षित करण्यासाठी आपण हा धोकादायक व्हिडिओ बनवल्याची कबुली तरुणाने दिली आहे. मात्र, अशाप्रकारे जीव धोक्यात घालून कोणीही स्टंटबाजी करू नये, असे आवाहनही त्याने केले आहे

Thane: ठाण्यात आज वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पासंदर्भात लोकप्रतिनिधींची बैठक झाली

ठाणे -

वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पासंदर्भात आज लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात आली.

केंद्र सरकारचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, प्रकल्पाबाबत असलेले समज-गैरसमज दूर करण्यासाठी बैठक घेण्यात आली.

एकनाथ शिंदे साहेबांच्या सूचनेनुसार सर्व नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींना प्रकल्पाची सविस्तर माहिती देण्यात आली.

शहरातील अनेक ठिकाणी मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे.

स्टेशन, रस्ते बंद होणे, अंडरग्राउंड रेल्वे आदींबाबत चार-पाच ठिकाणी छोटे-मोठे प्रश्न आहेत; ते लवकरच सोडवले जातील.

Raigad: मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्यात जुंपण्याची चिन्ह

पुणे -

- मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्यात जुंपण्याची चिन्ह

- तटकरेंना कामाची पद्धत माहिती नसेल, तटकरेंपेक्षा मी सिनियर - श्रीरंग बारणे

- आप्पा बारणे हे माझे मित्र, माझ्याबद्दल ते बोलतील अस वाटत नाही - सुनील तटकरे

Mumbai: आरे मेट्रो स्टेशनजवळ बसला भीषण आग

- गोरेगाव मेट्रो स्थानकाखाली एका बसला आग लागल्याने खळबळ उडाली.

- मेट्रो स्टेशनखाली बसला भीषण आग लागली.

- या आगीमुळे निर्माण झालेला धूर थेट मेट्रो स्थानकात शिरल्याने प्रवाशांमध्ये धावपळ उडाली.

- तर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं.

Nagpur:  सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मर्यादित आवाजात डीजे वाजवण्यास भाजपचा पाठिंबा

नागपूर -

- भाजप नेते संदीप जोशी यांनी केलेली डीजे बंदीची मागणी ही पक्षाची नव्हे, तर त्यांची वैयक्तिक भूमिका

- नागपूर भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी स्पष्ट केले

- सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मर्यादित आवाजात डीजे वाजवण्यास भाजपचा पाठिंबा

- भाजपमध्ये प्रत्येकाला वैचारिक भूमिका मांडण्याचे स्वातंत्र्य आहे.

- विरोधक वातावरण चिघळण्याची संधी शोधत आहेत.

- मात्र सत्ताधारी पक्ष म्हणून वातावरण बिघडू न देण्याची जबाबदारी आमची

Pune: भारतीय लष्करातील जवानांनी घेतलं पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन

पुणे

भारतीय लष्करातील जवानांनी घेतलं पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन

१३० जवानांनी घेतलं सामूहिक दर्शन

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मध्ये जवानांकडून बाप्पाला आरती

डाॅल्बी बाबतच्या नियमांचे पालन करा; राज्यमंत्री योगेश कदम यांचे अहवान

सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात डॉल्बी वाजवणे बाबत जे नियम आहेत. त्याचे पालन करण्या बाबत सरकारने जे नियम बनवले आहेत. ते पालन करणे गरजेचे आहे. जनतेचा विचार करून कायदा केला जातो. भाविकांना त्रास होऊ नये यासाठीच कायदा बनला आहे.अस मत गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केले आहे.

लवकरच आॅपरेशन टायगर; मंत्री भरत गोगावले यांचा मोठा दावा

उध्दव ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर लवकरच टायगर आॅपरेशन मोहिम यशस्वी केली जाणार आहे, असा मोठा दावा रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे.

सुधाकर घारे यांच्या महायल्गार आंदोलनाबाबत मंत्रालयातील बैठक

खोपोली MIDC मध्ये स्थानिकांच्या प्रश्नावर आवाज उठवण राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी यल्गार आंदोलन पुकारले होते. या प्रकरणी मंत्रालयात मंगळवार 8 सप्टेंबर रोजी बैठक होणार आहे.

बदलापूर पालिकेचे नियोजन सभापती संभाजी शिंदे यांना पालिकेबाहेरच धक्काबुक्की

बदलापूर पालिकेचे नियोजन सभापती संभाजी शिंदे यांना पालिकेबाहेरच धक्काबुक्की

शिवसेनेच्या भरत नवगिरे यांनी केली धक्काबुक्की

धक्काबुक्कीच्या घटनेचा व्हिडीओ झाला व्हायरल

संभाजी शिंदे बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल

कल्याण स्टेशन परिसरातील रस्त्याला पडले भगदाड

कल्याण स्टेशन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महात्मा फुले चौकापर्यंतच्या रस्त्यावर एक भगदाड पडले आहे. रस्त्यावरील पेव्हरब्लॉक खचला आहे. त्याठिकाणी डांबर टाकून भगदाड बुजविण्याचा प्रयत्न केला. दुरुस्तीला काही तास उलटत नाही तोच तो खड्डा अधिकच खचला आहे. यामुळे महापालिकेच्या कामाच्या गुणवत्तेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. रस्त्याच्या मधोमधच भगदाड पडल्याने वाहतूक कोंडी होत आहे.

अमरावती शहरातील 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीची हत्या

अमरावती शहरातील 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीची हत्या प्रकरण

आरोपी आनंद भड नामक तरुणाला जिल्हा सत्र न्यायालयात केले होते अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी हजर...

८ सप्टेंबर पर्यंत आरोपी आनंद भड याला पोलीस कोठडी सुनावणी..

जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी खासदार बजरंग सोनवणे आंतरवाली सराटीत दाखल

बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आंतरवाली सराटीत दाखल होत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज सातवा दिवस आहे.
उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सोनवणे आणि जरांगे पाटील यांच्यात विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या भेटीकडे राजकीय वर्तुळासह मराठा समाजाचेही लक्ष लागले आहे.

मालेगावमध्ये लूम कारखान्याला भीषण आग; म्हाळदे शिवारात खळबळ

नाशिकच्या मालेगाव शहरातील म्हाळदे शिवारात असलेल्या लूम कारखान्याला दुपारच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली.असिफ खान जमशेर खान हे सदर कारखान्याचे मालक असून आग लागल्याचे समजताच त्यांनी अग्निशामक दलाला याची माहिती दिली.

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नांदेडमध्ये मराठा समाज आक्रमक; आमदार-खासदारांच्या घराबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त 

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज नांदेड जिल्हा बंदची हाक देण्यात आली असून मराठा समाज आक्रमक झाल्याचे चित्र आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून नांदेडमधील सर्व आमदार आणि खासदारांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शिवाजीनगर येथील माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानाबाहेरही पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, मराठा समाजाने काढलेल्या रॅलीत शिंदे सेनेच्या दोन आमदारांविरोधात घोषणाबाजी झाल्याने पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर IT अभियंता पोलिसांच्या ताब्यात; हिंजवडीत संताप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाकड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हिंजवडी पोलिसांनी एका खासगी कंपनीतील IT अभियंत्याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईनंतर IT अभियंत्यांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत असून, सोशल मीडियावर याबाबत प्रतिक्रिया उमटत आहेत.

MPSC उत्तीर्ण मुलाची गावातून भव्य मिरवणूक; आईला खांद्यावर घेऊन व्यक्त केला आनंद

बीडच्या आष्टी तालुक्यातील नागतळा गावातील देवदत्त कद्रे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण करून उत्पादन शुल्क विभागात नियुक्ती मिळवली. देवदत्तच्या यशाबद्दल गावकऱ्यांनी त्याचे भव्य स्वागत करत गावातून मिरवणूक काढली. यावेळी आई-वडिलांच्या कष्टाचे चीज झाल्याचा आनंद व्यक्त करत देवदत्तने आईला खांद्यावर घेतले.

जन्माष्टमीच्या उत्साहात आकुर्डीतील इस्कॉन मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने आज सकाळपासून पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी येथील इस्कॉन टेम्पल या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. इस्कॉन टेम्पल मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने वेगवेगळ्या धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे.

पुणे-सातारा महामार्गावर दोन कारची जोरदार धडक; एकाचा मृत्यू, चौघे जखमी 

पुणे-सातारा महामार्गावर हरिश्चंद्री गावच्या हद्दीत रात्री दोन कारमध्ये जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. दळवी कुटुंब देवदर्शनासाठी जात असताना एका कारने त्यांच्या वॅगनारला मागून जोरदार धडक दिली.

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील रुग्णांच्या जेवणात झुरळ आढळल्यानंतर एफडीएने कॅन्टीन वर केली मोठी कारवाई

एफडीएचं पथक हे कळवा रुग्णालयात कारवाई करता आले असताना त्यांनी खाद्यपदार्थांचे व भांड्यांचे नमुने हस्तांतरित केले. अहवाल येईपर्यंत हे कॅन्टीन आता बंद स्वरूपात असणार आहे. रुग्णांना जेवण्याकरिता विद्यार्थ्यांच्या कॅन्टीन मधून जेवण पुरवण्यात येणार आहे..

सासवड बाह्यवळण महामार्गावर भीषण अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 वरील आंबोडी हद्दीत आज, भीषण अपघात झाला. या अपघातात सौरव संभाजी जेधे या तरुणाचा गंभीर दुखापतीमुळे दुर्दैवी मृत्यू झाला.सौरव जेधे हा होंडा कंपनीच्या शाईन मोटारसायकल क्रमांक MH-12-ZY 9681 वरून पुणे बाजूकडून जेजुरीच्या दिशेने जात होता. आंबोडी हद्दीतील उड्डाणपूल पार केल्यानंतर त्याची मोटारसायकल घसरली आणि रस्त्याच्या दुभाजकाजवळील विद्युत पोलच्या खांबाला जोरदार धडकली. या अपघातात त्याच्या डोक्याला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. अतिरक्तस्राव झाल्याने त्याचा अपघाती मृत्यू झाला.

जरांगे पाटलांना काही झाल्यास शासन जबाबदार- सतेज पाटील

मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांना हरताळ फासण्याचे आणि मराठा समाजाला फसवण्याचे काम सरकारने केले आहे, असा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला. नवी मुंबईत मराठा समाज मोठ्या संख्येने एकत्र आल्यानंतर मागण्या मान्य झाल्याचे सांगत गुलाल उधळून समाजाच्या भावनांशी खेळ करण्यात आला. मराठा समाजाने शांततेत ५८ मोर्चे काढले, मात्र सरकार या प्रश्नाचा खेळखंडोबा करत आहे. चर्चेसाठी जाणाऱ्या शिष्टमंडळातील माणसे दरवेळी बदलली जातात. सरकारची हा प्रश्न सोडवण्याची मानसिकता दिसत नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीला काही झाल्यास त्याला शासन जबाबदार असेल, असा इशाराही सतेज पाटील यांनी दिला.

राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडली; स्वतंत्र गृहमंत्री नेमण्याची गरज – सतेज पाटील

राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडलेली असल्याचे मी सातत्याने सांगत आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहण्यासाठी स्वतंत्र गृहमंत्री असणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पुण्यात बापट यांना झालेली मारहाण ही राज्याच्या दृष्टीने निषेधार्ह घटना आहे. अशा घटना घडत राहिल्या तर उद्या कोण कोणावरही काहीही करेल, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. राज्यातील जनतेला आपण सुरक्षित आहोत, असा विश्वास वाटला पाहिजे. त्यामुळे राज्याला स्वतंत्र गृहमंत्री नेमावा, अशी आमची मागणी आहे.

सोलापुरात माजी नगरसेवकावर धारदार शस्त्राने हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक

काँग्रेसचे माजी नगरसेवक लालचंद वाधवानी यांच्यावर भरदिवसा धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. प्रकाश किसनदास आडवाणी असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव असून, त्याने हातात कोयता घेऊन सर्वांसमक्ष वाधवानी यांच्यावर वार केले. गुरुनानक चौकातील सिंधी कॉलनी परिसरातील गुरुनानक मंगल कार्यालयाबाहेर ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, वैयक्तिक वादातून आरोपीने हा हल्ला केल्याचे समोर आले आहे.

हल्ल्यानंतर आरोपी प्रकाश आडवाणी हा हल्ल्यासाठी वापरलेला कोयता सोबत घेऊन सर्वांसमक्ष दुचाकीवरून घटनास्थळावरून निघून गेला. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यामध्ये हल्ल्याची घटना कैद झाली आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या लालचंद वाधवानी यांच्यावर आसरा चौक परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात आरोपी प्रकाश आडवाणी याच्याविरुद्ध BNS कलम 109(1), 351(3) तसेच शस्त्र अधिनियमातील कलम 4 आणि 25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

धाराशिवच्या मुरूममध्ये जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा

धाराशिव जिल्ह्यातील मुरूम शहरात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज बांधवांकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. मूर्ती स्थापना झाल्यानंतर परिसरातील मराठा समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेत अभिवादन केले. दरम्यान, मूर्ती स्थापना करण्यात आल्याने नगर परिषद कर्मचारी तसेच पोलीस प्रशासन अलर्ट झाले असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

नागपुरात एलपीजी गॅस सिलेंडरमध्ये अवैध रीफिलिंग करणाऱ्यांवर मोठी कारवाई

- बेलतरोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अन्न पुरवठा विभागाची कारवाई

- 40 पेक्षा एलपीजी सिलेंडर जप्त, गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

- गुप्त माहितीच्या आधारे पुरवठा विभागाची कारवाई

- घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडर मधून कमर्शियल सिलेंडर मध्ये रिफिलिंग करत होते

- पोलीस आणि अन्नपुरवठा विभागाची मोठी कारवाई

पुणे, नागपूरनंतर संभाजीनगरमध्येही गणेशोत्सवा दरम्यान डीजेला बंदी

पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर प्रवीण पवार यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उद्या शहरातील सर्व गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेश महामंडळांची बैठक बोलावण्यात आली असून, बैठकीत गणेशोत्सवासाठी आवश्यक सूचना देण्यात येणार आहेत. डीजे वाजवल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. तसेच धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करणे गणेश महामंडळांना बंधनकारक असून, नोंदणीशिवाय वर्गणी मागणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती प्रवीण पवार यांनी दिली आहे.

बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा - धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बीड जिल्ह्यात मागील दीड महिन्यापासून पावसाने मोठा खंड दिल्याने खरीप पिके हातातून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता असून, तात्काळ पिकांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे. तसेच पावसाअभावी आगामी काळात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त करत, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कृत्रिम पावसाचे प्रयोग करण्याची मागणीही मुंडे यांनी केली आहे

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज मंगळवेढा शहरात कडकडीत बंद

मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. समर्थनार्थ मराठा समाजाच्या वतीने मंगळवेढा बंद ची हाक दिली‌ होती. बंदमध्ये सर्व दुकानदार आणि व्यापार्यांनी सहभागी होत मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला.

पुण्यात बजाज फिनसर्वच्या भव्य कॅम्पसचे भूमिपूजन; मुख्यमंत्री फडणवीसांची प्रमुख उपस्थिती

पुण्यातील कोरेगाव पार्क येथे बजाज फिनसर्वच्या आर्थिक सेवा व्यवसायांसाठी उभारण्यात येणाऱ्या भव्य कॅम्पसचा भूमिपूजन सोहळा सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमस्थळी दाखल झाले असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडत आहे. यावेळी बजाज फिनसर्वचे अध्यक्ष संजीव बजाज, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह मान्यवर उपस्थित आहेत.

पिंपरी चिंचवड मधील काळेवाडीत लहान मुलावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला

पिंपरी-चिंचवडच्या काळेवाडी परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका लहान मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना घडली

-कुत्र्यांनी मुलाला घेरल्याचं लक्षात येताच सतर्क नागरिकांनी धाव घेत मुलाची सुटका केली. नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.

-या घटनेनंतर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, महापालिकेने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

धाराशिव मधे मराठा समाज आक्रमक, शिर्डी हैदराबाद महामार्गावरील पाथरूडमध्ये सकल मराठा समाजाचे रास्ता रोको आंदोलन

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ पाथरूड येथे तासभर महामार्गावर करण्यात आला रस्ता रोको

गेल्या चार दिवसांपासून मराठा समाज आक्रमक होत असलेला पाहायला मिळत आहे जिल्ह्यात ठिकठिकाणी रस्ता रोको आंदोलने करण्यात येत आहेत तर आज देखील शिर्डी हैदराबाद महामार्गावर पाथरूड येथील सकल मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आले

नाशिकमध्ये आज आणखी आश्रम शाळेतील एका आठ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

- सृष्टी ओंकार सूर्यवंशी असं मृत झालेल्या आश्रम शाळेतील विद्यार्थिनीचे नाव

- नाशिकच्या कळवण तालुक्यातील विसरवाडी आश्रम शाळेतील प्रकार

- आश्रम शाळेतच या विद्यार्थिनीला ताप आल्यानंतर काल उपचारासाठी रुग्णालयात केले होते दाखल

- उपचार करून पुन्हा आश्रम शाळेत आणल्यानंतर मुलीला अचानक झाली उलटी

- पुन्हा ताप आणि उलटी झाल्याने मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता सदर मुलीचा उलटी झाल्यानंतर मृत्यू झाल्याच आले समोर

- मृत विद्यार्थिनीवर ताप आल्याने दोन दिवसांपासून केले जात होते उपचार

यंदा महाराष्ट्र केसरी कुस्तीचा महासंग्राम नागपुरात रंगणार

- यंदाची प्रतिष्ठेची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात नागपुरात आयोजित करण्यात येणार आहे.

- महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून निवड झालेले १ हजार ५०० मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

- महाराष्ट्र केसरी ठरणाऱ्या विजेत्याला फॉर्च्युनर गाडी, तर उपविजेत्याला स्कॉर्पिओ गाडी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.

- तसेच वजनी गटातील विजेत्याला १८ बुलेट मोटारसायकलींचे बक्षीस देण्यात येणार..

- विदर्भात कुस्तीला राजाश्रय मिळावा आणि या भागातील कुस्तीपटूंना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

- यंदा महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा वाशिममध्ये, तर लहान मुलांच्या कुस्ती स्पर्धा भंडारा येथे होणार आहेत

शरद पवारांनी तेव्हाच मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यायला हवा होता- मंत्री भरत गोगावले

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना मंत्री भरतशेठ गोगावले यांनी शरद पवारांवर भाष्य केले. पूर्वीच्या काळात आरक्षणाच्या निर्णयासाठी फारशा अटी-शर्ती नव्हत्या. त्यावेळी शरद पवारांनी निर्णय घेतला असता, तर त्याचा समाजाला फायदा झाला असता, असे गोगावले म्हणाले. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद आणि सातारा गॅझेटचा कायद्याच्या चौकटीत राहून तज्ज्ञांकडून अभ्यास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.


मंत्री भरत गोगावले आज पंढरपुरात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. रोजगार हमी योजनेतील अनेक ठेकेदारांची बिले प्रलंबित असून, केंद्राकडे महाराष्ट्राचे सुमारे ३ हजार कोटी रुपये बाकी असल्याचे त्यांनी सांगितले. शिवराज सिंह चौहान यांच्याकडून ही रक्कम मिळाल्यानंतर प्रलंबित बिले अदा केली जातील, अशी माहिती गोगावले यांनी दिली. तसेच रायगडचे पालकमंत्री व्हावे, यासाठी कार्यकर्त्यांनी विठ्ठलाकडे साकडे घातल्याने दर्शनासाठी पंढरपूरला आल्याचेही त्यांनी सांगितले.

MPSC पेपरफुटीविरोधात अमरावतीत हजारो विद्यार्थी रस्त्यावर

MPSC पेपरफुटीविरोधात अमरावतीत हजारो विद्यार्थी रस्त्यावर;..

सरकार अन् आयोगाविरोधात तुफान घोषणाबाजी करत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला विद्यार्थ्यांचा मोर्चा

बारामती शहरातील प्रगती नगर येथे बारा वर्षीय मुलीची आत्महत्या

बारामती शहरातील प्रगती नगर येथे बारा वर्षीय मुलीची आत्महत्या...

इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या.

शहरात आठवड्या भरा नंतर इमारतीवरून उडी मारण्याची दुसरी घटना...

प्रज्ञा सुनील शिंदे या बारा वर्षीय मुलीची आत्महत्या

मनोज जरांगे यांचे उपोषणस्थळ आणि परिसरात श्वान पथककडून पाहणी

मनोज जरांगे यांचे उपोषणस्थळ आणि परिसरात श्वान पथककडून पाहणी

काही अनुचित घटना घडू नये याची खबरदारी म्हणून श्वान पथकाकडून करण्यात आली पाहणी

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारी

सांगोल्यात जमिनीचा बोगस फेरफार नोंदवल्याचा धक्कादायक प्रकार

तलाठी आणि सर्कल यांनी संगनमताने चुकीचा व बोगस फेरफार नोंदवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत शेतकरी पंढरीनाथ देशमुख यांनी थेट विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

Airplane Accident News : श्रीनगर विमानतळावर इंडिगोच्या विमानाचा अपघात

श्रीनगर विमानतळावर इंडिगोच्या विमानाचा अपघात

रानवेवरील पार्किंगच्या खांबाला विमान धडकलं

सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेडमध्ये मराठा समाज आक्रमक.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेडमध्ये मराठा समाज आक्रमक.

नांदेडच्या मुदखेड येथे नांदेड ते उमरी महामार्गावर मराठा समाज उतरला रस्त्यावर.

नांदेड ते उमरी महामार्ग मराठा आंदोलकांनी धरला रोखून.

महामार्गावर सकल मराठा समाजाचे रास्ता रोको आंदोलन सुरू.

धाराशिवमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ रास्ता रोको आंदोलन

धाराशिवमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ रास्ता रोको आंदोलन

सोलापूर हैदराबाद महामार्गावर तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा येथे आंदोलन सुरू

मालेगावमध्ये डेंग्यू-मलेरियाची साथ,शासकीय रुग्णालय हाऊसफुल

मालेगावचे सामान्य रुग्णालय हाउसफुल्ल

बालरुग्ण कक्षात क्षमतेपेक्षा जवळपास दुप्पट रुग्ण

28 खाटांची क्षमता, तब्बल 52 बालके दाखल,

खाटा अपुऱ्या पडल्याने जमिनीवर उपचार

विद्यानंद बापट यांच्या आई वडिलांची रत्नागिरीच्या पोलिसांकडून विचारपूस

विद्यानंद बापट यांच्या आई वडिलांची रत्नागिरीच्या पोलिसांकडून विचारपूस

काल रात्री रत्नागिरी पोलिसांचं पथक आलं होतं विद्यानंद बापट यांच्या मूळ घरी

विद्यानंदचे वडील सुहास बापट यांची माहिती

मूळ घराबाहेर पोलीस बंदोबस्त देण्याच्या दृष्टीने रत्नागिरी पोलिसांच्या हालचाली

रत्नागिरी पोलिसांकडून आई-वडिलांची विचारपूस करत केल्या सूचना

संजय राऊत यांची सतेज पाटील, संजय पाटील यांची सांत्वनपर भेट

मागील महिन्यात पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचं निधन झालं होतं. त्यांच्या निधनानंतर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती संजय पाटील यांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी संजय राऊत यांनी दिवंगत पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करत श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांच्या आठवणींना उजाळा देत शब्दांजली अर्पण केली.

DHULE धुळ्यात डीजे बंदीच्या निर्णयाविरोधात डीजे व्यावसायिक आक्रमक

धुळ्यात डीजे बंदीच्या निर्णयाविरोधात डीजे व्यावसायिक आक्रमक झाले आहेत, गणपती उत्सव आणि आगामी सणासुदीच्या काळात साऊंड सिस्टीम आणि डीजेवर संपूर्ण बंदी घातल्याने धुळे जिल्ह्यातील तब्बल 400 ते 500 डीजे व्यावसायिकां समोर आर्थिक संकट उभं राहिलं आहे, याच पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा साऊंड डीजे चालक-मालक संघटनेने पालकमंत्री जयकुमार रावल यांची भेट घेत परवानगी देण्याची मागणी केली आहे,

धोकादायक नागोठणे पुलावरून हलक्या वाहनांची वाहतुक सुरु होणार

मुंबई गोवा महामार्गावरील नागोठणे येथील पुल धोकादायक बनला आहे. या पुलाचा माती भराव खचला असून रस्त्याला देखील तडे गेले आहेत. पुला आणि रस्त्याची परिस्थिती पहात नागोठणे येथील हा पुल सद्या वाहतुकी करता बंद ठेवण्यात आला आहे. गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची संख्या आणि वाहतुक कोंडीची समस्या लक्षात घेऊन नागोठणे येथील या धोकादायक पुलावरून हलक्या वाहनांची वाहतुक सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आहे. यादरम्यान राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी पुलावर लक्ष ठेवून राहतील त्याच प्रमाणे येथे वाहतुक कोंडी होणार नाही याची दक्षता देखील घेतली जाणार आहे. गणेशोत्सव संपला, पाऊस कमी झाला की या पुल आणि रस्त्याची दुरुस्ती केली जाणार असल्याची माहिती मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.

नाणार प्रस्तावित बॉक्साईड प्रकल्पाची जनसुनावणी रद्द ,जिल्हा प्रशासनाचं अधिकृत पत्र

राजापूर तालुक्यातील नाणार बॉक्साईट प्रकल्पासंबंधित पुढील आठवड्यात 7 सप्टेंबर रोजी होणारी जनसुनावणी रद्द केल्याचं अधिकृत पत्र जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केललाल आहे. हे पत्र जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिलं आहे. नाणार येथे बॉक्साईट प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. नाणारच्या सुमारे 144 हेक्टर क्षेत्रामध्ये होणाऱ्या प्रकल्पाबाबत 7 सप्टेंबर रोजी जनसुनावणीचं आयोजन केलं गेलं होतं. मात्र, या प्रकल्पाला स्थानिक जनतेकडून तीव्र विरोध केला जात आहे. त्याबाबत सागवे येथे नुकतीच नाणार बॉक्साईट उत्खनन प्रकल्पविरोधी संघर्ष सभा झाली. सभेत मोठ्या संख्येने उपस्थित असलेला नाणार-सागवे परिसरातील ग्रामस्थांनी बॉक्साईट प्रकल्पाला तीव्र विरोध असल्याचंही दाखवून दिलं. या सभेत लोकांशी संवाद साधताना आमदार किरण सामंत आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाणार बॉक्साईट प्रकल्पाची जनसुनावणी होणार नाही, असं सांगितलं. त्याप्रमाणे अखेर नाणार बॉक्साईट प्रकल्पासंबंधित जनसुनावणी अखेर रद्द झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.

आटपाडी मध्ये आर्थिक वादातून तरुणाचे अपहरण करत हात-पाय बांधून बेदम मारहाण

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी येथे घरी निघालेल्या ३६ वर्षीय तरुणाचे आर्थिक वादातून मोटारीमधून अपहरण करण्यात आले. त्याला आटपाडी येथे नेऊन हात-पाय बांधून पाइप, काठ्या आणि लोखंडी गजाने बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना २९ ऑगस्ट रोजी रात्री घडली. याप्रकरणी गुरुवारी रात्री आटपाडी पोलिस ठाण्यात सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव जिल्हा बँकेसाठी २४५० ठराव प्राप्त, प्रारुप मतदार यादी होणार प्रसिध्द

बँकेच्या निवडणुकीची पूर्वतयारी आता वेगाने सुरू झाली आहे: सोसायटी मतदारसंघासह इतर सहकारी संस्था गटातील मतदानासाठी ठरावांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील दोन्ही गटांतून तब्बल २,४५० ठराव जिल्हा उपनिबंधकांमार्फत विभागीय निबंधकांकडे सादर करण्यात आले आहेत. यामध्ये ८७६ विकास कार्यकारी सहकारी सोसायट्यांचे ८७६ ठराव, तर इतर सहकारी संस्था गटातील तब्बल १,५७४ ठरावांचा समावेश आहे. आता विभागीय निबंधकांकडून या ठरावांची छाननी करून लवकरच प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर हरकती व सूचना मागवून अंतिम मतदार यादी निश्चित केली आहे

बनावट CEOच्या नावाने २ कोटी २० लाखांचा ‘बॉस स्कॅम’

पिंपरी-चिंचवडमध्ये सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नामांकित ऑटो शोरूम कंपनीच्या मालकाच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप अकाउंट तयार करून कंपनीची तब्बल दोन कोटी वीस लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक केली आहे.

Maharashtra News Live Update: काँग्रेसच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचा मोबाईल हॅक

- काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि धुळ्याच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचा मोबाईल हॅक

- मोबाईल हॅक झाल्यानंतर संबंधित व्यक्तींकडून ६२ हजार रुपयांची मागणी

- मोबाईल हॅक झाल्याचा प्रकार खासदार बच्छाव यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांत केली तक्रार

- बच्छाव यांच्या नावाने अनेकांना व्हॉट्सॲपवरून ६२ हजार रुपये पाठविण्याची मागणी

- माझ्या खात्यात ६२ हजार रुपये जमा करा, मी दोन तासांत परत करेन” असे मेसेज अनेकांना पाठवले

- अनेकांनी या प्रकरणी खासदार शोभा बच्छाव यांना माहिती दिल्यानंतर खासदारांनी तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधला

- काही वेळाने डॉ. शोभा बच्छाव यांचा फोन सुरक्षित करण्यात सायबर पोलिसांना यश

- काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि धुळ्याच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचा मोबाईल हॅक

पिंपरी-चिंचवडमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत बंदी असतानाही प्रखर बीम आणि लेझर लाइटचा वापर केल्या प्रकरणी मंडळाच्या अध्यक्षाला न्यायालयाचा दणका

पिंपरी-चिंचवडमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत बंदी असतानाही प्रखर बीम आणि लेझर लाइटचा वापर करणं एका मंडळाच्या अध्यक्षाला महागात पडलं आहे. सांगवी पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात न्यायालयाने मंडळाच्या अध्यक्षाला एक हजार रुपयांचा दंड आणि न्यायालय उठेपर्यंतची शिक्षा सुनावली आहे. या कारवाईच्या माध्यमातून पोलिसांनी यंदाच्या गणेश मंडळांनाही कठोर इशारा दिला आहे.

गणेशोत्सवात डीजे बंदी? आमदार जगताप यांनी स्पष्ट केली भूमिका..

Summary

अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी डीजेवर बंदी घालण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या भूमिकेचे आम्ही समर्थन करतो. डीजेतील प्लाझमा सारखे प्रकार खूप त्रासदायक आहेत. प्लाझमांवर कारवाई व्हायला हवी, त्रासदायक नसलेले डीजे वापरण्यात यावेत तसेच पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात यावी, अशी भूमिका आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.

विद्यार्थ्यांचे निवेदन स्वीकारण्यासही सामाजिक न्यायमंत्र्यांचा नकार

विद्यार्थ्यांचे निवेदन स्वीकारण्यासही सामाजिक न्यायमंत्र्यांचा नकार; निधी वळवल्याचे प्रकरण ताजे असताना त्यात सामाजिक न्यायमंत्र्याच्या उर्मठपणाची भर — संजय शिरसाट यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी आक्रमक

सामाजिक न्याय विभागाच्या अनुसूचित जाती व वंचित घटकांसाठी नियोजित निधी इतर योजनांकडे वळविणे तात्काळ थांबवावे आणि वळविण्यात आलेला निधी पुन्हा सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी Ambedkar Students Association Maharashtra आणि Bodhi Blended Learning यांच्या वतीने सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना निवेदन देण्यासाठी त्यांच्या अजिंक्यतारा बंगल्यावर पदाधिकारी गेले होते.

महाडमध्ये रंगला मंगळागौरीचा कार्यक्रम

महाडमध्ये शिवसेना महिला आघाडीच्या वतीने मंगळा गोरीच्या कार्यक्रमाच आयोजन महाडमध्ये करण्यात आले होते. महिलांसाठी विषेश असणाऱ्या पारंपारीक नाच आणि खेळाच्या कार्यक्रमला महाड तालुक्यातील 35 गृपने सहभाग घेत पारंपारीक नृत्य कला सादर केली. पारंपारीक आणि चित्रपटातील गाण्यांवर झिम्मा, फुगडी, जाकडी, सुप खेळवण आदी खेळ आणि नृत्यकला सादर केली. स्पर्धा घेऊन एक, दोन, तीन नंबर देण्याऐवजी सहभागी होणाऱ्या सर्वच महिला गृपना मानधन देण्यात आल. महिलांच फार मोठ योगदान माझ्या विजयामध्ये आणि पालक मंत्रीपदामध्ये आहे, महिला आघाडीने जो प्रचार केला त्याला तोड नाही. तुमचे अनंत उपकार आम्ही विसणार नाही अशा शब्दात मंत्री भरतशेठ गोगावले यांनी ऋण व्यक्त केले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एनजीटीच्या ध्वनीप्रदूषण आदेशांची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी

पुणे पोलिस आयुक्तांकडे डॉ. कल्याणी मांडके, विवेक वेलणकर आणि निसर्गसेवक संस्थेचे पत्र

ध्वनीप्रदूषण नियमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी, यासाठी डॉ. मांडके यांनी एनजीटीकडे अर्ज केला होता

२०२४ मध्ये पुण्यातील गणेशोत्सवासाठी एनजीटीने नऊ महत्त्वपूर्ण निर्देश दिले

गणपती मंडपाजवळ ध्वनीची पातळी मोजून नागरिकांना दिसेल अशा पद्धतीने प्रदर्शित करणे बंधनकारक

विसर्जन मिरवणुकीतील प्रमुख चौकांमध्येही ध्वनीची पातळी मोजण्याचे निर्देश

परिसराच्या स्वरूपानुसार स्पीकरची संख्या आणि आवाजाची मर्यादा निश्चित करण्याची सूचना

नियमांचे उल्लंघन झाल्यास साऊंड सिस्टीम जप्त करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्याचे एनजीटीचे निर्देश

पुणे आणि हडपसर पंधरा दिवसांचा ब्लॉक, मेल-एक्स्प्रेस, डेमू आणि लोकलवर परिणाम

कामासाठी पुणे आणि हडपसर पंधरा दिवसांचा ब्लॉक

या कामासाठी १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान टप्प्याटप्प्याने ब्लॉक घेण्यात येणार असून, त्याचा परिणाम पुणे विभागातून धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेस, डेमू आणि लोकल गाड्यांवर होणार आहे.

मात्र, ब्लॉकचा काही कालावधी गणेशोत्सवात येणार असल्यामुळे प्रवाशांना त्याचा त्रास होणार आहे.

तीन ऑक्टोबरला हडपसर यार्डमध्ये सकाळी आठ ते दुपारी १२ आणि दुपारी १२ ते चार या वेळेत वाहतूक ब्लॉक असेल

चार ऑक्टोबरला मुख्य कामाचा दिवस असून,हडपसर-जीसीएमसी विभागात मध्यरात्रीपासून सकाळी साडेदहापर्यंत वाहतूक ब्लॉक सुरू राहणार

मटणावरून रक्तरंजित थरार,  मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या

मटणाच्या भाजीवरून उफाळलेला किरकोळ वाद एवढ्या टोकाला गेला की, मोठ्या भावाने सख्ख्या लहान भावावर कुन्हाडीने सपासप वार करून त्याचा खून केला. ही थरारक घटना चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे घडली. रमेश श्रीराम बनकर (वय ५५) असे मृत भावाचे नाव असून, हत्या करणारा मोठा भाऊ जगन श्रीराम बनकर (वय ६०) याला भिसी पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com