पुण्यातल्या ससून रुग्णालयातल्या चौकशीसाठी सरकारने समिती नेमली
चौकशीसाठी तीन जणांची समिती नेमली
जे जे रुग्णालयाच्या डीन पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली नेमली समिती
डोंबिवली दुर्घटनेनंतर कामगार मंत्र्यांनी केली घटनास्थळाची पाहणी
दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करणार
कामगार मंत्र्यांनी दिले आश्वासन
वर्ध्याच्या नंदोरी येथे वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस
वादळी वाऱ्यासह पावसामुळे नुकसान
काही घरांची उडाली छत, तर विद्युत खांबे पडली
संध्याकाळपासून गावाचा विद्युत पुरवठा खंडित
मुळशीच्या कोंढुर गावात एका शेतकऱ्याच्या घराला लागली आग
या आगीत पूर्ण घर जळून खाक
आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही
गुजरात - राजकोट TRP गेमिंग झोन आग प्रकरणी सरकारची मोठी कारवाई
राजकोटचे पोलिस आयुक्त राजू भार्गव यांची बदली
त्यांच्या जागी आयपीएस अधिकारी ब्रिजेश कुमार झा यांची नियुक्ती
मुंबईचा मानबींदू असलेल्या कोस्टल रोडला गळती झाल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना न्यायालयाचा दिलासा नाहीच. दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने विभव कुमार यांचा जामीन अर्ज फेटाळला. आप खासदार स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणी विभव कुमार अटकेत आहेत.
पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात मोठी घडामोड होत आहे. अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी रक्ताच्या नमुन्यात फेरफार करणाऱ्या डॉक्टरांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या तिघांना पोलीस कोठडी सुनावलीय.
देवेंद्र फडणवीसांनी घेतली नितीन गडकरी यांची भेट
नागपूरमधील नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी झाली भेट
पुणे अपघात प्रकरणातील आरोपावर अजित पवार म्हणाले,
या प्रकरणात कोणाचा दबाव नाही. अपघात प्रकरणात सुनील टिंगरे यांचं नाव घेत आहे, त्यांच्याशी मी बोललो. त्यांनी वस्तुस्थिती सांगितली आहे. चौकशी अंती 'दूध का दूध, पानी का पानी' होईल.
सोनिया दुहान यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 10 जूनला वर्धापनदिनाच्या दिवशी सोनिया दुहान पक्षात प्रवेश करणार आहे. आज सोनिया दूहान पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित मात्र प्रवेश करणं आज टाळलं.
अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पाण्याचे संकट
पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. नागरीकांसह शेतकरी हवालदिल झाले आहे आहेत.
फेब्रुवारी महिन्यापासूनच जिल्ह्यातील काही भागात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा केला जात होता.
संगमनेर तालुक्यात सर्वाधित टँकर पुरवठा
दीपक केसरकर यांची विरोधकांवर टीका
खोके तुमच्या नेत्यांकडे आहेत ते चेक करा.
या नेत्यांची चौकशी करा.
तुम्ही नाटक चालवलं आहे. ते तुमच्यावरच उलटणार आहे.
हिट अँड रन केसमध्ये बळी गेलेले आहेत, त्यांच्याबद्दल सहानभूती ठेवा.
नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज, २७ मे रोजी बुलडाणा जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची आणि मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, बुलडाणा यांनी दिली.
नवी मुंबई
खारघर आणि कामोठे नोडमध्ये उद्या, मंगळवारी पाणीपुरवठा बंद
सिडकोच्या भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय
उद्या सकाळी 10 ते रात्री 12 या वेळेत पाणीपुरवठा राहणार बंद
बुधवारी देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होणार
राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणुकीची घोषणा
प्रफुल पटेल यांच्या राजीनाम्यानं राज्यसभेची जागा रिक्त
25 जूनला मतदान आणि मतमोजणी होणार आहे
13 जूनला अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख
दहावीचा निकाल आज आहे. सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत आहे. मुलांना विनंती आहे की चांगले मार्क नसतील किंवा अनुत्तीर्ण झाला असाल तर नैराश्य येऊ देऊ नका. पुन्हा परीक्षा द्या आणि पास व्हा. नैराश्यातून कोणतीही घटना घडू देऊ नका, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलं.
कोल्हापूर
450 क्यूसेक्सने पाण्याचा कर्नाटककडे विसर्ग
कृष्णा नदीवरील बंधार्यावरील पाणीपातळी 16 फुटांवर
रविवारी दुपारी ऐन उन्हाळ्यात बंधारा ओव्हरफ्लो
बंधारा ओव्हरफ्लो होऊन कर्नाटकच्या दिशेने पाणी वाहत चालल्याने कर्नाटकातील गावांना दिलासा
मागील दोन दिवसांपासून बंधाऱ्याचे बरगे कोणी काढू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात
मात्र बंधारा ओव्हरफ्लो झाल्याने संरक्षणासाठी असलेल्या पोलीस तसेच पाटबंधारे कर्मचाऱ्यांवरील ताण कमी
रवींद्र धंगेकर यांच्या आरोपांनंतर हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ससूनच्या डॉक्टरांना अटक झाली. त्यावर धंगेकर यांनी खोटा आरोप केला आहे की, त्याच्यावर मुश्रीफ यांचा वरदहस्त होता. धंगेकर यांनी २ दिवसांत माफी मागितली नाही तर, त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे, असे मुश्रीफ म्हणाले.
नवी दिल्ली -
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांच्या जामीन अर्जावर आज कोर्टात सुनावणी
दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात सुनावणी सुरू
सुनावणीसाठी आप खासदार स्वाती मालीवाल स्वतः उपस्थित
विभव कुमार यांना जामीन मिळणार का हे पाहणं महत्वाचं असेल
दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा इयत्ता दहावीत 95.81 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. यंदाही मुलींनीच दहावीच्या निकालात बाजी मारली आहे.
नगरमध्ये पावसाळा सुरु होण्यापूर्वी नवीन नळ कनेक्शन देण्यास मनाई आदेश महापालिका आयुक्तांनी दिली आहेत.
शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या मुळा धरणात पाण्याची नवीन आवक होईपर्यंत नवीन नळ कनेक्शन न देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
उन्हाच्या तीव्रतेमुळे मुळा धरणाची पाणी पातळी खालवल्याने याचा परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
दुष्काळ सदृश्य परिस्थिती मुळे धरणातून पाण्यासाठी आवर्तनाची मागणी वाढत असल्याने पाटबंधारे विभागाने पाणी वितरण काटकसरीने सुरु केले आहे.
राजकोट TRP गेमिंग झोन आग प्रकरणी गुजरात सरकारने मोठी कारवाई केली आहे.
गुजरात सरकारने 6 अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे.
नगर पालिका, PWD च्या अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या दौऱ्यानंतर सरकारची कारवाई
राजकोट अग्नितांडवानंतर अग्निशमन दलाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. मुंबईतील सर्व मॉलच्या अग्निसुरक्षा यंत्रणेची तपासणी होणार आहे. कालपासून सुरु झालेली ही मोहिम आठवडाभर सुरु राहणार आहे. मुंबईतील ६९ मॉलपैकी यातील ६६ मॉलची सुरक्षा तपासणी हाती घेण्यात आल्याची माहिती मुख्य अग्निशमन दल अधिकाऱ्यांनी दिली आहे.
- इगतपुरी तालुक्यातील वैतरणा धरणात तिघे जण बुडाले आहेत. दोन जण धरणाच्या झारवड शिवारात बुडाले आहेत. तर एक जण वावी शिवारात बुडाल्याची माहिती आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात अर्ज केला आहे.
केजरीवाल यांनी अंतरिम जामिनाची मुदत 7 दिवसांनी वाढवून मिळावी अशी विनंती केली आहे.
अरविंद केजरीवाल सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जामिनावर बाहेर आहेत.
केजरीवाल यांना 2 जूनपर्यंत कोर्टाने अंतरिम जामीन दिला आहे. कोर्ट अरविंद केजरीवाल यांची मागणी मान्य करत का हे पाहणं महत्वाचं आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सफारीदरम्यान १७ एप्रिलला वाघिणीला घेराव सदृश्य स्थिती निर्माण करणाऱ्या पर्यटक जिप्सी आणि शासकीय क्रूझर वाहन यावर व्यवस्थापनाने कठोर कारवाई केली. महिनाभराच्या काळासाठी एकूण 10 वाहने पर्यटन फेरीतून बाद करण्यात आली आहेत.
खातोडा ते ताडोबा गेट या रस्त्यावर टी 114 वाघिणीची वाट नियमबाह्य पद्धतीने अडवण्यात आली होती.
खुटवंडा, मोहर्ली आणि कोलारा या द्वारावर नोंदणी केलेल्या 9 जिप्सी, तर एका शासकीय क्रूझर वाहनाचा यात समावेश आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाणीबाणी
सोलापुरात शहरात नागरिकांना पिण्यासाठी पाच दिवसाआड पाणी पुरवठा
ग्रामीण भागात 10 ते 12 दिवसाआड पाणीपुरवठा
बार्शीत तब्बल 10-12 दिवसाआड पाणीपुरवठा
नागपूरसह विदर्भात उन्हाचा पारा कमालीचा वाढला आहे. गेल्या आठवड्यात नागपुरात बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या चार जणांचा मेयो रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या चार जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता, पण अद्याप अंतिम रिपोर्ट (अहवाल)नाही. नागपूरात वेगवेगळ्या ठिकाणी हे चारही अनोळखी व्यक्ती असून बेशुद्ध अवस्थेत आढळून आले होते. चार जणांचा मृत्यू उष्माघाताने झाला, की नाही. याबाबत नागपूर मनपाकडून स्पष्टता देण्यात आलेली नाही.
कोकण विभाग पदवीधर जागेसाठी मनसेकडून अभिजीत पानसे यांना मनसेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.