अंगणवाडी सेविका गेल्या सव्वा महिन्यापासून संपावर आहेत.विभागाच्या वतीने आम्ही अंगणवाडी सेविकांना आव्हान करत आहोत की, त्यांनी लवकरात लवकर कामावर रुजू व्हावे.आतापर्यंत सात ते आठ बैठका झाल्या असून अनेक मागण्या मान्य केले आहेत. शासन आणि विभाग सकारात्मक आहे त्यांच्या मागण्या आपण टप्प्याटप्प्याने पूर्ण करत आहोत, असं आदिती तटकरे म्हणाल्या आहेत.
कोल्हापुरात अवकाळी पावसाची सुरुवात झालीय. अचानक पाऊस सुरू झाल्याने नागरिकांमध्ये तारांबळ उडाली आहे.
ऊस तोडणी कामगारांच्या दरवाढीच्या मागणी संर्दभातील बैठक संपली आहे. ऊस तोडणी मजुरीत ३४ टक्के दरवाढ देण्याचा निर्णय या बैठकीमध्ये झाला आहे. ऊस तोडणी मजुरांना प्रतीटन २७४ रुपये मजुरी दिली जाते. यात आता ३४ टक्यांची वाढ होणार आहे.
जितेंद्र आव्हाड यांना श्री रामावर केलेल्या वक्तव्यावरून देशभर टीकेची झोड उठली आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जितेंद्र आव्हाड आणि उद्धव ठाकरे यांच्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मातोश्री सध्या डिप्रेशनमध्ये गेले आहेत. त्यामुळे हिदूंच्या देवतांवर त्यांनी बोलण्याचं धाडस करू नये, बाकी कोणावरही बोला पण रामावर बोलू नका, अन्यथा तुमचा राम करावा लागेल. राम म्हणजे काय ते माहीत आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी केला.
सुविचार गौरव पुरस्कार सोहळ्यात सुरेश वाडकर यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री छगन भुजबळ आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ या कार्यक्रमाला उपस्थित आहेत.
काँग्रेसची समिती संध्याकाळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना सर्व राज्यातील जागावाटपाचा फॉर्मुला सादर करणार आहे. मागच्या आठवड्यात समितीची बैठक झाली होती. बैठकीत त्या त्या राज्यातील नेत्यांशी केली होती.
मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी राज्यातील काँग्रेस जागांसंदर्भात एक ते दोन दिवसात निर्णय घेतील. भाजपचा पराभव करण्याची शक्ती असणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी दिली जाईल. काँग्रेस परंपरागत जागांवर दावा करणार आहे.
काही जागा आपल्याला काही जागा उद्धव ठाकरे तर काही काँग्रेसला मिळतील. ज्या जागा आपल्या वाट्याला येतील त्यात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणलं पाहिजे. महाविकास आघाडीला लोकसभेत चांगल्या जागा निवडून आल्या तर देशात वेगळे चित्र निर्माण होईल
पुणे व पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात वातानुकूलित (ए सी) टॅक्सीचे प्रवासभाडे वाढले
जिल्ह्यात वातानुकूलित टॅक्सीला पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३७ रुपये भाडे निश्चित
त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी प्रवाशांना द्यावे लागणार २५ रुपये
पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने वातानुकूलित टॅक्सीची भाडेसुधारणा करण्याचा घेतला निर्णय
दुसऱ्या बाजूला, काळी-पिवळी टॅक्सीसाठी पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३१ रूपये व पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी २१ रुपये भाडे निश्चि
जळगाव जिल्ह्यात ८१००० हून अधिक शेतकऱ्यांनी हवामानावर आधारित केळी पीक विमा काढला होता. या पैकी १० ते १५ हजार शेतकऱ्याना केळी पीकविमा माध्यमातून नुकसान भरपाई मिळाली नाही, या संदर्भात केळी उत्पादक शेतकऱ्यांनी शासन दरबारी तसेच राजकीय नेत्यांना भेटून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र यातून कोणताही मार्ग निघत नसल्याचे लक्षात आल्यावर आता या शेतकऱ्यांनी आमदार खासदार मंत्री ,राजकीय नेते आणि पुढाऱ्यांना गाव बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण आजची सुनावणी रद्द - विश्वासनीय सूत्रांची माहिती.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची तब्येत बिघडल्यामुळे सुनावणी रद्द करण्यात आल्याची माहिती.
वेळेअभावी सुनावणीचे वेळापत्रक मात्र आजच तयार होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
आज दिवसअखेरपर्यंत सुनावणीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या मान्यतेनंतरच वेळापत्रकानुसार सुनावणी अपेक्षित आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड आक्रमक
कल्याण पुर्वेतील भाजप आमदार गणपत गायकवाड यांची जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका
जितेंद्र आव्हाड मोघल आणि अफझल खान यांचे दैवत
त्यांनी मुघल आणि अफजलखानाचा अभ्यास न करता श्रीराम, देवांची पोथी पुराण वाचावे.
जितेंद्र आव्हाडांच्या सुरक्षेत वाढ
जितेंद्र आव्हाड सध्या शिर्डीतील सन अँन्ड सॅण्ड हाॅटेलमधून थोड्याच वेळात अधिवेशनस्थळी पोहचणार
प्रभू श्रीरामाबद्दल केले होते वादग्रस्त वक्तव्य
हिंदुत्ववादी संघटनांकडून आव्हाडांना काळे फासण्याचा इशारा
वंचित बहुजन आघाडी ला INDIAमध्ये घेण्याचा निर्णय दिल्लीत होणार
मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत निर्णय होणार
वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत घेण्यासंदर्भात दिल्लीत चर्चा होणार
जागा वाटपावरही होणार चर्चा
प्रकाश आंबेडकरांना किती जागा देणार यावर दिल्लीत ठरणार, सूत्रांची माहिती
प्रकाश आंबेडकर दिल्लीत चर्चेला येणार का? याकडे लक्ष
विद्युत करंट लागल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील कटंगी येथे आज सकाळी घडली आहे. घनश्याम वलथरे आणि संपत वलथरे असे दोन्ही मृतकांचे नाव आहे. गोरेगाव तालुक्यातील कटंगी येथील गावाच्या बाहेर असलेल्या विद्युत डीपीवर काही तांत्रिक अडचण आल्याने ते दुरुस्त करायला गेले असता विद्युत करंट लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे.
नवी मुंबईतील पावणे एमआयडीसी विभागात असलेल्या मेहक केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला पहाटे भीषण आग लागली होती. केमिकल कंपनी असल्याने आगीची भीषणता मोठी होती. एमआयडीसी आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत आधी फोमचा मारा करत पसरणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या आग नियंत्रणात असून कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसून कंपनी मात्र पूर्ण जळून खाक झालेय.
पुणे जिल्ह्यात कुणबीच्या अडीच लाख नोंदी सापडल्या
पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून सुमारे २ लाख ५७ हजार कुणबी नोंदी सापडल्या आहेत
यामध्ये जिल्ह्यातील खेड आणि जुन्नर तालुक्यात सर्वाधिक नोंदी असल्याची माहिती
कुणबी नोंदी शोधण्यासाठी आतापर्यंत विविध १३ प्रकारच्या दस्तांमधून सुमारे ३० लाखाहून अधिक नोंदी तपासण्यात आल्या
त्यात सरसकट कुणबी नोंदी पडताळणी सुरू करण्यापूर्वीच्या १० महिन्याच्या कालावधीत पुणे जिल्ह्यात सुमारे १२ हजार २५४ कुणबी दाखले वितरित करण्यात आले होते
बुलडाणा जिल्ह्यात नव्याने 7 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. शेगाव येथील 2, चिखली येथील 1 तर बुलढाणा शहर व तालुक्यातील एकूण 4 जणांचा समावेश आहे. बुलडाण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 8वर झाली आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर पोलीस सुरक्षा वाढवली
पोलिसांकडून सकाळपासून सुरक्षेत वाढ
आपच्या नेत्या आणि दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांचं ट्विट
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी आज ED ची रेड पडू शकते
केजरीवाल यांना ED कडून 3 समन्स आल्यानंतरही ते चौकशीला हजर राहिले नव्हते
त्यामुळं ED छापेमारी करू शकते अशी चर्चा सुरू झाली आहे
छत्रपती संभाजीनगर शहरातील बेगमपुरा भागात कमरेला गावठी पिस्तूल लावून फिरणाऱ्या एका इसमाला गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं. त्याच्याकडून 50,150 रुपये किंमतीचा गावठी पिस्तूल जप्त करत त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलमांसह महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत गुन्हाही दाखल केलाय.
मुख्यमंत्र्यांसोबत निष्फळ ठरलेल्या बैठकीनंतर दुसऱ्या दिवशीही अंगणवाडी सेविकांकडून आंदोलन सुरूच. एकीकडे यंत्रणा द्यायची नाही दुसरीकडे कामाची सक्ती करायची ही कुठली पद्धत आहे. सरकारच्या महिला बालविकास मंत्री तर या ठिकाणी फिरकल्या देखील नाहीत. जोपर्यंत आमचा मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत मैदान सोडणार नसल्याचा निर्धार हा अंगणवाडी सेविकांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.