Maharashtra Board HSC Result 2023 : बुलढाणा पेपर फुटी प्रकरण: SIT चा अहवाल गुलदस्त्यात; 12 वी निकालाबाबत शिक्षण मंडळ म्हणाले...

विशेष म्हणजे या प्रकरणात बोर्डाने पेपर फुटलाच नसल्याची भूमिका घेतली होती.
hsc result, buldhana
hsc result, buldhanasaam tv
Published On

संजय जाधव / सचिन जाधव

Buldhana News : आज दुपारी दाेन वाजल्यापासून विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीचा निकाल (Maharashtra HSC Exams Result 2023) समजणार आहे. दरम्यान बारावीची परीक्षा सुरू असताना बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील राजेगाव येथील केंद्रावर गणिताचा पेपर फुटल्याने राज्यभरात खळबळ माजली होती. त्यानंतर चाैकशी समिती स्थापन झाली. परंतु आजपर्यंत एसआयटीने दिलेल्या अहवालात काय हाेते हे जिल्हावासियांनी समजू शकले नाही. (Maharashtra News)

hsc result, buldhana
420 च्या तक्रारीवरुन Gautami Patil म्हणाली, मी तर... (पाहा व्हिडिओ)

सिंदखेडराजा तालुक्यातील राजेगाव येथील बारावीच्या केंद्रावरून गणिताचा पेपर फुटल्याने राज्यभरात खळबळ माजली होती. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ आठ लोकांना अटक करण्यात आली हाेती. यातील दोन जण संस्था चालक असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली हाेती. या प्रकरणाची गांभीर्यता बघता सरकारने पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यामावार यांच्या नेतृत्वात एक एस.आय.टी. समिती स्थापन केली.

hsc result, buldhana
Pune Water Cut News : पुणेकरांनाे ! 'या' दिवशी तुमच्या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद; जाणून घ्या 'रोटेशन' पद्धत

परंतु एसआयटीचा अहवाल अद्यापही गुलदस्त्यात आहे. तसेच अटक (arrest) करण्यात आलेले आठ संशयित आरोपी हे जामीनावर सुटले आहेत. या सर्व प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात येऊनही त्यांचा अहवाल अद्याप गुलदस्त्यात का ठेवला गेला आहे.

विशेष म्हणजे या प्रकरणात बोर्डाने पेपर फुटलाच नसल्याची भूमिका घेतली होती मात्र बुलढाण्यातील भारत विद्यालय केंद्रप्रमुखात असलेले शिक्षक घोंगटे यांनी पेपर फुटल्याची व पेपर सुरू असताना माध्यमांच्या कॅमेरासमोर पेपर दाखवूनही अद्याप माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने त्यांच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही.

hsc result, buldhana
Ashish Deshmukh Statement: राहुल गांधींना 'ती' ऐतिहासिक चूक दुरुस्त करता आली असती, काँग्रेसमधून हकालपट्टीनंतर आशिष देशमुखांची पहिली प्रतिक्रिया

राज्यात पेपर फुटीचा हे मोठं प्रकरण असतानाही अद्याप माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने यावर कुठलीही कारवाई केली नसल्याचा समोर आलेल आहे.. त्यामुळे हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.

निकाल राखून ठेवता येत नाही - शिक्षण मंडळ

दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गाेसावी यांनी पत्रकार परिषद घेत बारावीचा निकाल जाहीर केला. यावेळी माध्यमांच्या प्रश्नावर उत्तर देताना गाेसावी यांनी बुलढाणा येथे झालेल्या प्रकाराची चौकशी केली गेली. या प्रकरणात ६ जणांवर गुन्हा दाखल आहे. त्यावर कार्यवाही हाेईल. परंतु विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवता येत नाही असेही गाेसावी यांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com