Weather Update: अचानक गायब झालेला मान्सून धो धो बरसतोय! कोणत्या जिल्ह्यांना धोका?

Monsoon Returns with Fury: अचानक गायब झालेला मान्सून आता धो धो बरसतोय.... त्यामुळे हवामान खात्याने अलर्ट जारी केलाय.. कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट आहे? आणि तुफान पाऊस बरसण्यामागची कारणं काय आहेत? पाहूयात....
Floodwater from Godavari River covers temple steps in Nashik after relentless rainfall.
Floodwater from Godavari River covers temple steps in Nashik after relentless rainfall.Saam Tv
Published On

राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रीय झालाय.. तर नाशिकमध्ये पावसाने धुमाकूळ घातलाय... गोदावरी नदीचं पाणी दुतोंड्या मारुतीच्या छातीच्या वर गेलंय...दुसरीकडे पालघर आणि पुणे घाट परिसरात हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केलाय... तर पालघर जिल्ह्यातील 2 नद्यांनी इशारा पातळी ओलांडलीय.. त्यामुळे शाळांना सुट्टी देण्यात आलीय...तर विदर्भातील 3 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलाय...

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आलंय... मात्र कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय? पाहूयात.....

मुसळधार पावसामुळे यंत्रणांचं टेन्शन वाढलंय... तर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत... मात्र या धो धो पावसामागच्या कारणांची यादीच हवामान विभागाने दिलीय..

हवामान विभागाने अलर्ट दिल्यामुळे आता नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून आवश्यकता असेल तरच बाहेर पडा...आणि आवश्यक ती काळजीही घ्या...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com