Maharashtra Governor: सी. पी. राधाकृष्णन बनले राज्याचे नवे राज्यपाल, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

Maharashtra Governor: सी. पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्र राज्याचे नवे राज्यपाल बनले आहेत.
Maharashtra Governor: सी. पी. राधाकृष्णन बनले राज्याचे नवे राज्यपाल, जाणून घ्या  त्यांच्याबद्दल
C P Radhakrishan Governor
Published On

सी. पी. राधाकृष्णन राज्याचे नवे राज्यपाल बनले आहेत. नवनियुक्त राज्यापालांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयचे मुख्य न्याय मूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी त्यांना शपथ दिली. सी पी राधाकृष्णन आधी झारखंड राज्याचे राज्यपाल होते. त्यांच्या जागी आता भाजपचे ज्येष्ठ नेते संतोषकुमार गंगवार हे झारखंडेच राज्यपाल असतील. दरम्यान, रमेश बैस (१८ फेब्रुवारी २०२३ ते २८ जुलै २०२४) आणि भगतसिंग कोश्यारी (२०१९-२०२३) यांच्यानंतर राधाकृष्णन हे गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राचे तिसरे राज्यपाल बनले. या नियुक्तीसह राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे २४ वे राज्यपाल बनले आहेत.

आगामी काळात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी राधाकृष्णन यांना राज्यपालपदी बसवण्यात आले आहे. दरम्यान ६७ वर्षीय सी.पी. राधाकृष्णन हे दीर्घकाळ भाजपचे सदस्य होते. ४ मे १९५७ रोजी तिरुपूर येथे जन्मलेल्या, त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षी जनसंघ आणि नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) साठी काम केलं. त्यापासून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.

राधाकृष्णन यांनी २००४ ते २००७ पर्यंत भाजपच्या तामिळनाडू युनिटचे अध्यक्ष म्हणून काम केले आणि दोन लोकसभा निवडणुकांमध्ये कोईम्बतूर जागा जिंकली. त्यांनी आपल्या कार्यकाळात तीन महिन्यांच्या प्रसिद्ध रथयात्रेचे आयोजन केले. राधाकृष्णन यांनी संयुक्त राष्ट्र महासभेतही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

तामिळनाडूच्या कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोनदा खासदार म्हणून निवडून आले होते. राधाकृष्णन हे तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. राधाकृष्णन यांनी १९९८ आणि १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीतही भाजपने त्यांना उमेदवारी दिली होती, त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. ते १८ फेब्रुवारी २०२३ रोजी ते झारखंडचे राज्यपाल झाले होते.

Maharashtra Governor: सी. पी. राधाकृष्णन बनले राज्याचे नवे राज्यपाल, जाणून घ्या  त्यांच्याबद्दल
Maharashtra Governor: महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण?, जाणून घ्या एका क्लिकवर सर्वकाही

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com