
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं.
राज्यातील ३४७ तालुक्यांतील शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केलं. शेतकऱ्यांना ३१ हजार 628 कोटी रुपयांचं पॅकेज देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी ७ ऑक्टोबर रोजी केली. राज्यातील ३४७ तालुक्यांना सरकारनं भरघोस मदत केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी डोंगरी भागातील नुकसानग्रस्त घरांना १० हजार रुपये अधिकची मदत तर दुकानदारांना ५० हजार रुपयांपर्यंतची मदत देण्यात येणार आहे.
अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरातून शेतातील जमीन खरडून गेलेली आहे. त्यासाठीही सरकारनं मदत जाहीर केली आहे. त्यासाठी ४७ हजार रुपये हेक्टरी भरपाई देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणालेत. तसेच प्रति विहीर ३० हजार रुपयांची मदतही देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणालेत. अतिवृष्टी होऊन पूर आपत्ती परिस्थिती उद्भवलेली आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यातील ३४७ तालुक्यांमधील शेतकऱ्यांचे शेती पीक आणि शेतजमीन यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
जनावरे दगावणे, मनुष्य हानी होणे, घर पडझड होणे, पुरामुळे गावातील बाधितांना स्थलांतरीत करणे याबाबत मदत देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे. कृषी विभागामार्फत राज्यामध्ये पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. त्यानुसार जून २०२५ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत २६.६९ लाख हेक्टर क्षेत्राचे तर सप्टेंबर २०२५ या महिन्यात जवळ जवळ ३९ लाख हेक्टर क्षेत्रावरील एकूण सुमारे ६५ लाख हेक्टर क्षेत्राचे शेतीपिक नुकसान झालेले आहे.
महाराष्ट्रात १ कोटी ४३ लाख ५२ हजार २८१ हेक्टर जमिनीवर पिकांची लागवड झाली होती. यापैकी साधारणपणे ६५ लाख हेक्टर जमिनीवरील पिकांचं नुकसान झालं आहे. दरम्यान क्षेत्र आणि पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून प्रभावित झालेले तालुके सोबतच्या परिशिष्टानुसार आपत्तीग्रस्त घोषित करण्यात आलेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.